खऱ्याखुऱ्या प्रतिक्रिया द्या , अजूनही म्हणतोय , शिव्या दिल्या तरी चालतील ,
कैदी-३३३
अनोळखी लोकांसोबत बोलण्याकरता इंटरनेटवर बरीच ॲप्लिकेशन उपलब्ध आहेत . अप्लिकेशन मध्ये स्वतःची ओळख उघड न करता पुढच्या व्यक्तीशी बोलता येतं आणि आपल्यालाही त्याची ओळख माहीत नसते . दोघांनाही माहीत नसतं की पुढे कोण बोलतंय , अशामुळे दोघांची ओळख लपून राहते आणि दोघेही चॅटिंगच्या माध्यमातून बोलू शकतात .सहज गंमत म्हणून मी एक ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं . एप्लीकेशन वरती बरेच तरूण व पुरुष असतात sex chat साठी येतात . मलाही रिकामा वेळ होता . झोप लागत नव्हती . रात्र झालीच होती . म्हटलं चुकून एखादी सापडलीच तर भारी आहे , नाहीतर कोणा अनोळखीशी शिळोप्याच्या गप्पा तरी मारू
अशा एप्लीकेशनवरती क्वचितच एखादी मुलगी सापडते . त्या दिवशी मला chatting करण्यासाठी एक मुलगी सापडली . Daddy's Princess असं युसरनेम होतं . ती मुलगी असावी असा माझा तरी समज होता .
Hii
Hello लगेच तिचा रिप्लाय आला ..
Are you really a female ....? मी विचारलं .तिने लगेच मला एक voice मेसेज पाठवला . तो आवाज एका मुलीचा होता.
I am new here... , मी पहिल्यांदाच ते अप्लिकेशन डाऊनलोड केलं होतं .
So am I ... ती म्हणाली
Where are you from....? तिला मी विचारलं
I am from maharashtra , you...?
"मी पण महाराष्ट्राचा आहे ..." मी म्हणालो
" Ohh "
" महाराष्ट्रात कुठे ...? " मी पुढचा प्रश्न विचारला
"... " ती शांत राहिली . बराच वेळ काहीच उत्तर आले नाही .
" Do you wanna play a game... " काही वेळाने तिचा मेसेज आला . आपसुकच माझी उत्सुकता चाळवली गेली . चुकून चांस लागला तर लागला , तेवढीच मज्जा आली असती , आणि तिने स्वतःहून विचारलं होतं म्हटल्यानंतर मी नाही म्हणणार नव्हतो .
" Let's play... " मी वेळ न दवडता मेसेज केला .
" What's your age ..? Are you married ...? If yes , How Manny children do you have...? या सर्वांची उत्तरे देऊन बघ , नीट विचार करून ठरव . संपल्याशिवाय उठायचं नाही.... " तिनं पुन्हा विचारलं
" I am 48 , married , i have two children , what's your age...? हो विचार केलाय चल खेळूया " मी पुन्हा एकदा होकार भरला .
" I am 22 , Are you alone...? " तिचा मेसेज आला .
" Yes..." तिचा मेसेज वाचूनच माझे सैनिक जागे झाले.
" कल्पना कर , की आपण दोघे एका रूम मध्ये आहोत... ती
" केली ..." मी
" सांग मला ती रूम कशी आहे....?
" दहा बाय पंधराची मोठी खोली आहे . मधोमध एक पलंग आहे . त्या पलंगावर पांढऱ्या रंगाची मउशार गादी आहे... " मी
" खोली पूर्णपणे बंदिस्त आहे , आतून बाहेर , बाहेरून आत येण्याची वाट नाही... " ती
" संपूर्ण खोलीत निशिगंधाच्या फुलाचा सुगंध पसरलेला आहे , छतावरुन पांढरे रेशमी पडदे सोडलेले आहेत...." मी
" मी त्या गादीवर फक्त पांढरा शर्ट घालून पडलेली आहे....ती
" मी गादीच्या पायापाशी उभा आहे , हळू हळू तुझ्याकडे सरकत आहे...." मी
आता पहिल्यांदाच तिने इमेज पाठवली होती . मागणी न करता पाठवलेली इमेज पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं . मी लगेच इमेज एक्सेप्ट केली व डाऊनलोड केली . चेहरा क्रॉप केलेला , मानेपासून कमरेपर्यंत ,फक्त पांढरा शर्ट घातलेली , अशी ती इमेज होती . त्या पारदर्शक पांढऱ्या शर्ट मधून तिचे उरोज स्पष्ट दिसत होते . माझे सैनिक आता सावध झाले .
" Do you wanna undress me...?
" Yes , why not....
" थांब , तुला जर माझा शर्ट काढायचा असेल , तर पुढील पैकी एक पर्याय तुला निवडावा लागेल , तु काय निवडशील....
१) जीवलग मित्राचा खून
२) एका अनोळखी ,अनाथ मुलाचा खून
३) fuck your best friend's wife
४) देशाच्या पंतप्रधानाचा खुन
तिचा हा मेसेज पाहून माझ्या डोक्याची शिर सटकली . काय बावळट मुलगी होती ...? काहीही विचारत होती. मी बराच वेळ काहीच उत्तर दिलं नाही . तिने पाठवलेला फोटो मात्र वेड्यासारखा पहात बसलो ..
" सांग ना उत्तर , १ , २ , ३ कि ४ ... मला उघडं पाहण्यासाठी तु वरीलपैकी काय करशील . Tell me answer , i will send you my nudes ...
तिचा पुन्हा एकदा मेसेज आला . ही मुलगी नक्कीच विकृत होती . पण फारच सुंदर होती . इंटरनेटवरती किंवा पॉर्न वेबसाईटवरती जश्या नट्या असतात , तसाच हा फोटो होता. तेव्हाच माझ्या डोक्यात वीज चमकली हा फोटो देखील खोटा असेल . मग मी इंटरनेट उघडलं आणि रिव्हर्स सर्च करून पाहिलं . मला हुबेहुब तसा फोटो कुठेच दिसला नाही , म्हणजे तो फोटो खराच असावा यात शंका नव्हती . तो mobile वर गडबडीत काढल्यासारखा वाटत होता .
" मला कसं माहित तू खरच मुलगी आहे ...? तू इंटरनेटवरील फोटो वापरत असशील ..." मी मुद्दाम तिला डिवचण्यासाठी मेसेज केला...
तिचा व्हॉइस कॉल आला . व्हॉइस कॉल फिचर फक्त प्रिमीयम युजरसाठीच उपलब्ध होतं .
" आता तरी बसला का विश्वास , मी मुलगीच आहे म्हणून....? तुला फसवून मला काही मिळणार नाही ,सांग आता पटकन उत्तर....
ती तिच्या मधुर व गोड आवाजात म्हणाली . आता माझी खात्री बसली कि ती नक्कीच मुलगी होती व पाठवलेला फोटो हा तिचाच होता .
" बोल ना काय करशील तू , एक , दोन , तीन कि चार.....
" अं......" मी विचार करत होतो...
" कर , विचार कर , पण जास्त वेळ घालवू नको ...." आणि तिने व्हॉइस कॉल कट केला .
मुळात तिने प्रश्नच विचित्र विचारलेला होता . वरील पैकी एखादी कृती निवडली तरच ती मला न्यूडस पाठवणार होती , आणि मला तिला उघड पाहायचं होतं . मग मी उत्तर द्यायचं ठरवलं . तीन पर्याय खुन करण्याचे होते . त्यातील पहिल्यि पर्यायात तर मित्राचा खून करायचा होता . दुसऱ्या पर्यायात अनाथ , लहान मुलाचा व चौथ्या पर्यायात देशाचा पंतप्रधानाचा खून करायचा होता .
तिसरा हा असा एकच पर्याय होता , ज्यात जीवीत हानी नव्हती . मात्र त्यात मित्राच्या बायकोसोबत झोपायचं होतं . चारही पर्याय नैतिकदृष्ट्या चुकीचे होते पण त्यातल्या त्यात तिसरा पर्याय तो म्हणजे मित्राच्या बायकोसोबत झोपण्याचा , तो नैतिकदृष्ट्या मला कमी चुकीचा वाटला. मित्राचा , एका लहान अनाथाचा किंवा देशाच्या पंतप्रधानाचा खून करण्यापेक्षा , मित्राच्या बायकोसोबत झोपणं नैतिकदृष्ट्या मला तरी कमी चुकीचं वाटत होतं .नकळत मनात मित्राची बायकोही येऊन गेली . तसंही मला खरोखर कोठे काही करायचं होतं , फक्त तिला काल्पनिक उत्तर द्यायचं होतं . विचार केला म्हणून काही होत नसतं . माणूस त्याच्या मनात कसले कसले विचार करतो हे ज्याचे त्यालाच माहित . विचार पाहुन शिक्षा मिळत असत्या तर जगातील सर्वच लोकांना तुरुंगात टाकावं लागलं असतं.
विचार करताना प्रत्येक जण आपापल्या परीने नैतिकता लक्षात घ्यायचा प्रयत्न करतो . एखाद्या माणसाला वरील पर्यांयापैकी खूनाचा पर्याय कमी चुकीचा वाटलं असता , पण मित्राच्या बायको सोबत झोपणं जास्त चुकीचं वाटलं असतं . नैतिकता ही बऱ्याच वेळा सापेक्ष असते . मी सहजपणे तिला उत्तर पाठवलं पर्याय तीन म्हणून.
" वाह , खून करण्यापेक्षा मित्राच्या बायको सोबत झोपणे पसंद करशील , म्हणजे माझ्याकडून मजा घेण्यासाठी तू मज्जाच करण्याचं निवडलं...
" मग तसे आम्ही मजेदारच आहोत
आता मी तुझ्या शर्टाची बटणं काढतोय... मी
" आता तु मला विवस्त्र केलंय .... ती . तिने तिच्या उरोजांचा एक क्लोज अप फोटो पाठवला . तिचे ते गोरेपान उरोज , त्यामध्ये दिसणाऱ्या हिरव्या नसा पाहून माझ्या संपूर्ण अंगात शिरशिरी जाणवली . वरील प्रश्नामुळे बेसावध झालेले सैनिक पुन्हा सावध झाले .
" पुढे जाण्यासाठी तु अजून काय करशील...
१) तुझ्या सासूचा खून
२) तुझ्या आईचा खून
३) fuck your wife's best friend
४) तुझ्या एका शत्रुचा खुन ..."
मी मूड मध्ये आलो होतो . सावधान होउन सैनिक उभे होते . आणि त्याचवेळी प्रश्न विचारून तिने माझ्या मूडवरती पाणी फिरवले . उत्तर दिल्याशिवाय ती पुढे जाणार नाही हे मला माहीत होतं .
मला आता तिच्यासोबत सर्व काही करण्याची कल्पना करायची होती आणि तिचं उरलेलं शरीर पाहायचं होतं . पण वरील पैकी एखादी कृती विचारात घेतल्याशिवाय ती मला पुढे काही करू देणार नव्हती . याहीवेळी दिलेले पर्याय विचित्र होते . माझ्या सासूचा मला कितीही राग आणि वैताग येत असल्या तरी तिचा खून करणं मला परवडणारं नव्हतं . माझ्या स्वतःच्या आईचा खून करण्याचा मी विचारच करू शकत नव्हतो . शत्रूच्या खुनाच्या पर्यायाचा मी विचार केला . तसे पाहता मला कोणी शत्रू नव्हताच , त्यामुळे नसलेल्या व्यक्तीचा खून करणं हे नैतिक दृष्ट्या मला कमी चुकीचं वाटत होतं . तरीही तो खूनच होता . खून करणे चुकीचे आहे हे माझं मन मला सांगत होतं . इथेही तिसऱ्या पर्यायात जीवीत हानी नव्हती . सर्वच पर्याय चुकीचे होते , त्यातल्या त्यात मला तिसरा पर्याय कमी चुकीचा वाटला . मी इथेही उत्तर पाठवलं पर्याय तीन म्हणून...
" तु तर भलताच खिलाडी निघाला , मित्राच्या बायकोसोबत झोपतो , बायकोच्या मैत्रिणीसोबत झोपतो ...
आणि तिने तिच्या खांद्यापासून नाभी पर्यंतचा फोटो पाठवला . तिची खोल नाभी व ते उरोज पाहून माझे सैनिक पुन्हा सावध झाले .
" मग आहेच मी खिलाडी . आता मी तुझ्या , दोन्ही कबुतरांना कूस्करतोय....
" मी तुझा शर्ट काढून टाकतेय...ती
" माझी जीभ तुझ्या मानेभोवती फिरतेय. हळु हळु खाली सरतेय. .....मी
" माझ्या नख्याने तुझ्या पाठीवर ओरखडे ओढतेय..."ती
" माझी जीभ तुझ्या नाभीभोवती व नाभीत फिरतेय... " मी
" मी तुला विवस्त्र केलंय... " ती
अजुन पुढे जाण्यासाठी तू काय करशील..
१) मित्राच्या बायकोसोबत झोपला ते त्याला सांगशील
२) बायकोच्या मैत्रिणीसोबत झोपला हे तिला सांगशील
३) कुणालाही न सांगता गप्प राहशील
४) दोघांनाही सांगुन पळुन जाशील ....."
तिने पुन्हा एकदा तिचा प्रश्न विचारला होता . आता मला तिचा राग येत होता . वाटत होतं बंद करावं हे ॲप आणि सरळ पॉर्न उघडून सर्व सैनिकांना शांत करावं . मात्र इथे जी मजा भेटणार होती , ती पॉर्न पाहून थोडीच मिळणार होती .
हा ही प्रश्न तिने विचित्रच विचारला होता . मागच्या दोन प्रश्नात मी जे पर्याय निवडले होते , त्या पर्यायांचा या प्रश्नांमध्ये समावेश होता . मी पहिल्या प्रश्नात निवडलं होतं की मित्राच्या बायकोसोबत झोपेन , दुसऱ्या प्रश्नात निवडलं होतं बायकोच्या मैत्रिणीसोबत झोपेन आणि या प्रश्नात उल्लेख केला होता की दोन रहस्य उघड करशील कि गप्प राहशील .
बायकोला किंवा मित्राला या गोष्टींबाबत सांगणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं होतं , आणि सांगून पळून जाणं हे पळपुटेपणाचं लक्षण होतं . दोघांना सांगण्याची माझ्याकडे हिम्मतही नव्हती . मी गप्प राहणं पसंत केलं . याठिकाणी काहींना नैतिकदृष्ट्या बरोबर पर्याय म्हणजे एक , दोन किंवा चार वाटतील . तिसरा पर्याय अधिक चुकीचा वाटेल . पण मी तोच निवडला कारण तोच मला सोयीचा वाटला . मी लगेच उत्तर पाठवलं गप्प राहीन म्हणून...
तिकडून लगेच तिच्या कमरे खालचा फोटो आला . ते चित्र पाहून माझ्या सैनिकांनी 21 तोफांची कडक सलामी दिली .
" माझी जीभ अजुन खाली सरतेय.. मी
" मी माझे पाय पसरतेय..
पुढे बराच वेळ आम्ही मनमोकळेपणाने , distrub न होता sexting केलं . तिने विचारलेला तिसरा प्रश्न शेवटचा होता . शेवटी तिने मला स्वतःचा mastrubation करतानाचा video पाठवला . तो पाहुन मीही मोकळा झालो व निवांत झोपी गेलो .
सकाळी मला जाग आली ती बायको व मुलांच्या कालव्याने . काल ती मुलांना घेऊन माहेरी गेली होती . आज सकाळीच ती कशी माघारी आली , मला प्रश्न पडला. मी उठून बेडरूमच्या बाहेर गेलो . किचनमध्ये बायको मोबाईल वरती काहीतरी पाहत होती . मुले आजुबाजूला कुठेच दिसत नव्हती .
" पोरं कुठं गेली... ?" मी तिला विचारलं .
तिनं रागाने माझ्याकडे पाहिलं आणि तरातरा चालत माझ्याकडे आली . माझ्या डोळ्यापुढे मोबाईल नाचवत म्हणाली ,
" हे असले उद्योग करताना लाज नाय का वाटली ...? " मोबाईल जोरात हलवत होती त्यामुळे ती काय दाखवते हे मला समजत नव्हतं . मी काल घडलेल्या घटने विषयी पूर्ण विसरूनच गेलो होतो . मला वाटलं हिला माझा मोबाईल तर सापडला नसेल ना ...? पण मी ते एप्लीकेशन व चॅटिंग हिस्ट्री सर्व काही डिलीट करून टाकलं होतं , मग तिला काय सापडलं...?
"काय बोलतेय तु , काय दाघवतेय तु...." मी सोज्वळपणाचा आव आणतात म्हणालो .
" माझी जीवलग मैत्रिण आणि तुमच्या जीवलग मित्राची बायको आहे ही . जरा तरी आब्रु राखायची. " असं रागाने ओरडत तिने मोबाईल माझ्या हातात दिला ....
मोबाईल मध्ये एक व्हिडिओ प्ले होत होता . त्या व्हिडिओमध्ये मी व एक स्त्री प्रणय करताना दिसत होतो . मी जेव्हा नीट पाहिले तेव्हा दिसलं कि ती माझ्या बायकोची जिवलग मैत्रीण आणि माझ्या जिवलग मित्राची बायको होती . आम्ही प्रणय केल्याचा हा व्हिडिओ कोणीतरी काढला होता आणि बायकोला पाठवला होता .
पण मी हे केलेलं मला आठवतच नव्हतं . काल रात्री मी त्या विकृत मुलीला तिचे सुंदर शरीर पाहण्यासाठी हे सर्व कल्पनेत करेन असं सांगितलं होतं , पण इथे तर हे सगळं घडलं होतं . ती मुलगी नक्की चेटकिन असावी . तिने माझं रूप घेऊन मित्राच्या बायको सोबत हे सर्व केलं असावा व हा व्हिडिओ बनवला असावा . हे सर्व मला फसवण्याचं कारस्थान होतं . मी फक्त इच्छा व्यक्त केली होती की मी असं करेन , पण तिने स्वतः ते कार्य केलं होतं आणि माझ्यावरती खापर फोडलं होतं .
" अगं खोटा आहे हा व्हिडिओ , कोणी तरी मला फसवण्याचा प्रयत्न करतंंय...
" लाज बाळगा जरा , समोर एवढा मोठा पुरावा असताना निर्लज्जासारखा खोटा आहे म्हणून सांगताय..... नीट बघा त्या व्हिडिओ मध्ये तुम्हीच आहात आणि दुसरी बाई माझी मैत्रीण आहे....
" अग पण आम्ही कधी असं केलं नाही . आमच्यात तसं काही नाही हे तुला माहीतच आहे . ती सर्व काही तुला सांगते , मग हे तिनं तुला सांगितलं नसतं का....?
" काय माहित...? तिलाही पडली असावी भुरळ , पण जरा तरी भान राखायचं , आपल्या दोन कुटुंबांचे संबंध कसे आहेत हे तरी लक्षात ठेवायचं....
आता मी तिला कसं समजावून सांगू हेच मला कळत नव्हतं . मी हे काही केलंच नव्हतं . एक गोष्ट मिळवण्यासाठी फक्त कल्पनेच्या जगात असं करण्याचा पर्याय निवडला होता . सकाळी उठून पाहतो तर निवडलेला पर्याय खरोखरच घडला होता आणि फक्त घडलाच नव्हता तर कोणीतरी अगोदरच माझ्या रहस्याची उकल केली होती . जे रहस्य कालपर्यंत नव्हतं आणि आज सकाळी तयार झालं होतं .
" अग पोरांची शपथ घेऊन सांगतो ते खोटं आहे.... " मला दुसरं काही सुचतच नव्हतं . मी पोरांची कधी खोटी शपथ घेणार नव्हतो , कारण असं काही घडलंच नव्हतं .
ती माझ्या जवळ आली आणि तिने जोरात माझ्या मुस्काडात भडकावली.
" याद राखा , लेकरांची खोटी शपथ घ्याल तर ...
त्याचवेळी दाराची बेल वाजली . बायको दार उघडायला गेली . दारात माझा जिवलग मित्र आणि बायकोच्या जिवलग मैत्रिणीचा नवरा उभा होता .
" भाउजी , तुम्ही...
त्यानं माझ्या बायकोकडे पुर्ण दुर्लक्ष केले व तावातच माझ्याकडे आला . त्यालाही बहुदा व्हिडिओ गेला असावा हे त्याच्या चालीवरून व हावभावावरून समजत होतं . मला मेल्याहून मेल्यासारखं झालं . का मी तशी कल्पना केली .....? कल्पनेतही का त्याच्या पत्नीसोबत व माझ्या बायकोचा जिवलग मैत्रिणी सोबत झोपण्याचा निर्णय घेतला .....? मला माझ्याच कल्पनेत केलेल्या विचारांचा पश्चाताप होत होता.....! आणि या सर्व गोष्टी मी कुणाला सांगू शकत नव्हतो . सांगितलं तरी कोणी विश्वास ठेवणार नव्हतं , कारण परिस्थितीजन्य पुरावा आमच्या विरोधात होता . त्या व्हिडिओमध्ये आम्ही दोघेही स्पष्टपणे दिसत होतो .
" @#$ , तुला मी मित्र समजत होतो , #@%^.. तु तर ^&%$ निघाला...
" माझं ऐकून घे , कुणीतरी मला फसवण्याचा प्रयत्न करतंय , तो व्हिडिओ खोटा आहे . तू तुझ्या बायकोला विचार....
त्यांना त्याचं रिव्हॉल्वर काढले आणि माझ्या कपाळावरती धरलं .
" खोटं बोलु नको , !@# , तुझ्या $#@! , ^%$# खरं बोल ...
तो खूपच रागात होता . आता मी त्याला खरं सांगितलं तरीही तो मला गोळ्या घातल्या वाचून राहणार नव्हता . त्याचवेळी दारातून ती आली , जिच्या सोबत व्हिडिओमध्ये मी होतो , ती , माझ्या जिवलग मित्राची बायको व बायकोची जीवलग मैत्रिण ...
" काय करतोय तु हे.... ? " ती तिच्या नवऱ्याला उद्देशून म्हणाली . " मी कितीवेळा सांगितलं तो व्हिडिओ खोटा आहे म्हणून . कुणीतरी आम्हा दोघांना फसवण्याचा प्रयत्न करतंय....." तिने जवळ जात त्याला बाजूला घेण्याचाही प्रयत्न केला , पण त्याने रागात तिला दोन मुस्काडात दिल्या व बाजूला ढकलून दिले . ती भिंतीला धडकली व तिच्या कपाळाला एक जखम झाली . त्यातून रक्त वाहू लागलं . तिचा सुंदर चेहरा आता रक्ताने माखला गेला होता . ती आता जोराने रडत होती .
" गप्प बस. *@# कुठली , आधी तुलाच मारायला पाहिजे... " असं म्हणत त्याने त्याची रिवॉल्वर तिच्याकडे वळवली आणि तो बंदुकीचा चाप ओढु लागला .
तो रागात होता . तो गोळी चालवेल यात काही शंका नव्हती . उगाच चुकीच्या व्हिडिओमुळे माझ्या मित्राच्या हातून त्याच्या बायकोची हत्या होऊ नये म्हणून मी त्याला जोरात बाजूला ढकलले . त्याने गोळी चालवली ती भिंतीला लागली . नंतर त्याच्या हातातून बंदूक निसटून ती बाजूला जाऊन पडली . मी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे तो बिथरला व अधिक त्वेषाने माझ्यावरती चालून आला . मी त्याच्या मानाने धिप्पाड होतो . मी त्याला सहजंच आवरलं आणि माझ्या मिठीत कैद केलं . शारीरिक युद्धात तो मला हरवू शकत नव्हता याची त्याला जाणीव झाली असावी . त्याने मला लाथाडले व तो बंदूकीकडे सरकू लागला .
त्याच्या हाती बंदूक लागली तर तो मला व त्याच्या बायकोला मारायला कमी करणार नाही याची मला जाणीव होती . मीही बंदुकी कडे सरकू लागलो . आम्ही दोघे बंदुकीपाशी एकाच वेळी पोहोचले . बंदूक घेण्यासाठी आम्हा दोघांची कसरत सुरू झाली . तो बंदुकीच्या नळी माझ्याकडे करत चाप ओढायचा , आणि मी तो प्रयत्न हाणून पाडायचो . काही क्षणासाठी आमचा तो झगडा चालला असेल , पण शेवटी गोळी निघाली आणि ती घुसली माझ्या मित्राच्या मस्तकात. त्याचा जागीच मृत्यू झाला . त्याच्या मेंदूचे तुकडे आणि रक्त सर्वत्र उडालं होतं . ते बीभत्स दृश्य पाहून मला घेरी आली आणि मी जागीच बेशुद्ध झालो .
मला जाग आली , ती एका स्त्रीच्या आवाजाने . तो आवाज मला परिचित होता , तो आवाज त्याच मुलीचा होता , जिच्यासोबत मी काल रात्री चॅटिंग केलं होतं .
" कैदी नंबर ३३३ , तारिख ३-३-२०३३ , वेळ ३:३३ pm ..
कैद्याच्या वर्तनात बदल झाला आहे अशी कैद्याने याचिका दाखल करत लवकर सुटकेची मागणी केली आहे . कैद्यामध्ये खरच बदल झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी घेण्यात आलेल्या सिम्युलेशनचे निकाल आपल्यापुढे सादर केलेले आहेत , my lord .... ..."
तिने तोच पांढरा शर्ट घातला होता . वरती काळा कोट व गळ्यात पांढरी टाय दिसत होती . शर्टच्या आतही अंतर्वस्त्र होतं . मी एका कोर्टरूम मध्ये बसल्यासारखा वाटत होतो .
" सिमुलेशनचे निकाल पाहता आरोपींमध्ये अजूनही काहीच बदल झालेला दिसत नाही . परिस्थिती येताच आरोपी हिंसक होऊ शकतो आणि सामाजिक शांतीला धोका पोहोचवू शकतो , असा व्यक्ती समाजामध्ये राहण्यायोग्य नाही ....
न्यायाधीश बराच वेळ बोलत होता . त्यावेळी मला सर्व काही आठवलं . माझा मित्र , त्याची बायको म्हणजेच माझ्या बायकोची जिवलग मैत्रीण . माझं तिच्यासोबत असलेल्या अफेयरचा झालेला खुलासा , त्यावरून झालेली वादावादी , वादावादी नंतर झालेले भांडण , भांडणातून झालेली त्याची हत्या व त्यासाठी मला झालेली शिक्षा..
" गुन्हेगाराला काही बोलायचं आहे का... ? " माझी आठवणीची साखळी मध्येच तोडत जज साहेबाचा आवाज आला .
" जजसाहेब मी कितीवेळा सांगितलं आहे , तो माझ्या घरात आला होता . त्याने मला धमकावत मारण्याचा प्रयत्न केला . त्याला आवरण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीला त्यानच मारलं आणि जेव्हा तो मला मारण्यासाठी आला तेव्हा स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मी त्याला संपवलं....
" हे सर्व तू सांगितलेलं आहे , पण साक्षीदार व पुरावे सर्व तुझ्या विरोधात आहेत . मी तुला तुझ्या शेवटच्या इच्छे बाबत विचारतोय, तू निकाल ऐकला नाहीस का...? तुला हे येणाऱ्या 23 तारखेला मृत्युदंडाची शिक्षा होणार आहे . तू कधीच बदलू शकत नाही हे सिम्युलेशनद्वारे सिद्ध झालेलंच आहे . समाजाला घातक असणाऱ्या माणसाचा जगून काही उपयोग नाही . 2030 साली भारतीय दंडविधान कायद्यात केलेल्या बदलानुसार तुला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात येत आहे........
मी ओरडून सांगत होतो . मी सर्वकाही स्वसंरक्षणासाठी केलं होतं , पण कोणी माझा ऐकलंच नाही . ते मला आता मृत्युदंड देण्यासाठी नेत होते .
जबरदस्त आहे कथा...
जबरदस्त आहे कथा...
आवडली नाही, कारण त्यानी
आवडली नाही, कारण त्यानी व्हिडिओ कसा केला याबाबत काहीच भाष्य नाही, ती बाई कोण होती याबद्दल पण पुढे काहीच नाही.. त्यामुळे कथा अपुर्ण वाटते.
त्यामुळे कथा अपुर्ण वाटते. >
त्यामुळे कथा अपुर्ण वाटते. >>>> +१
कैदी नंबर ३३३ , तारिख ३-३
कैदी नंबर ३३३ , तारिख ३-३-२०३३ , वेळ ३:३३ pm ..
कैद्याच्या वर्तनात बदल झाला आहे अशी कैद्याने याचिका दाखल करत लवकर सुटकेची मागणी केली आहे . कैद्यामध्ये खरच बदल झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी घेण्यात आलेल्या सिम्युलेशनचे निकाल आपल्यापुढे सादर केलेले आहेत , my lord .... ..."..
कथे मध्ये एक कैदी जो शिक्षा भोगत आहे तो ही कथा सांगत आहे . तो त्याच्या मित्राचा खुन केल्यामुळे तुरुंगात गेला होता .
पण स्वतः मध्ये बदल झाला आहे असं सांगत लवकर सुटका व्हावी म्हणून त्याने न्यायालयात याचिका दाखल केली .
माणसांमध्ये खरंच बदल झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी नवीन पद्धत एक सिम्युलेशन वापरलं जात. ,
ज्याचा उपयोग करून ज्याचा उपयोग त्याचा मध्ये बदल झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी केला गेला .
कथेचा सुरुवातीचा भाग खरोखर घडला नाही तर त्याच्या मनात कल्पनेत घडलेला आहे आणि तशी परिस्थिती आली तर तो पुन्हा खून करू शकतो हे त्या सिमुलेशन द्वारे सिद्ध झालेला आहे...
त्यामुळे त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे...
पण खरेच परिस्थिती आली , तर तो हत्या करेल का असा प्रश्न आहे....
ओह.. ओके ओके
ओह.. ओके ओके
ओह आताशी कळाली...
ओह आताशी कळाली...
अरे बापरे शुभम यांनी सविस्तर
अरे बापरे शुभम यांनी सविस्तर सांगीतल्यानंतर आता कळली खरी. खूपच वेगळी मांडणी आहे. आवडली.
कथा वेगळी आहे पण तितकी नाही
कथा वेगळी आहे पण तितकी नाही आवडली..
त्यातील सेक्सचॅटचा भाग मात्र मी आंबटशौकीन असल्याने आवडला.
अश्या कथा माबोवर असाव्यात की नसाव्यात याबाबत मला भाष्य करायचे नाहीये.
पण एक लेखक म्हणून ते टाळून वाचकाला खिळवणारे लेखन करण्यात खरा कस लागतो एवढे नक्की.
त्यामुळे वेगळा विचार करायची क्षमता जी आपल्याकडे आहे तिला पुर्ण न्याय द्यावे असे वाटते.
पुलेशु
तुमच्या सर्वांच्या
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ...
वेगळा विचार करायची क्षमता जी
वेगळा विचार करायची क्षमता जी आपल्याकडे आहे तिला पुर्ण न्याय द्यावे असे वाटते.>> +१
पण मुळात त्याने चुकून खून केलेला असतो ना? आणि सिम्युलेशनमधेही तो विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमधे खुनाचा पर्याय निवडत नाही. सिम्युलेशनमधेही तो खून चुकूनच करतो. मग तरी तो समाजाला घातक कसा?
पण मुळात त्याने चुकून खून
पण मुळात त्याने चुकून खून केलेला असतो ना? आणि सिम्युलेशनमधेही तो विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमधे खुनाचा पर्याय निवडत नाही...
ही त्याची बाजु , चुकून केलेला असता तर शिक्षा झाली नसती ,
आणि सिम्युलेशन मध्ये तो प्रश्न विचाल्यानंतर , त्याला जे हवं होतं ते मिळवण्यासाठी पुढे जातच राहिला...
आणि शेवटी प्रश्न राहतोच कि सिम्युलेशन मध्ये त्यानं खुन केला , खरी परिस्थिती आली तर करेल का.....?
बायकोच्या मैत्रिणीबरोबर झोपणे
बायकोच्या मैत्रिणीबरोबर झोपणे आणि मित्राच्या बायकोबरोबर झोपणे ही प्रत्येक पुरुषाची फँटसी असतेच. त्याने काही चुक केले असे वाटत नाही.
त्याने चुकून खून केला असे दिसत आहे .
वावे + 786
पुलेश
पुलेश
पण मुळात त्याने चुकून खून
पण मुळात त्याने चुकून खून केलेला असतो ना? आणि सिम्युलेशनमधेही तो विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमधे खुनाचा पर्याय निवडत नाही. सिम्युलेशनमधेही तो खून चुकूनच करतो. मग तरी तो समाजाला घातक कसा?>>>>>>>>>>>> +१ हेच मनात आलेलं. खुन इंटेन्शनली केलेला नाही तरी समाज्विघातक कसा ठरला?