Submitted by कटप्पा on 14 April, 2020 - 21:39
समजा तुम्हाला एक दिवस कोरोना आणि लॉकडाऊन मुक्त मिळाला तर तुम्ही काय प्लॅन कराल?
फक्त एक दिवस मिळणार आहे समजा आणि तेवढाच.
सांगा सांगा काय कराल?
माझ्यापासून सुरु करतो- मी पोरांना शाळेत पाठवेन आणि घरी आराम करेन . प्रचंड गोंधळ चालू असतो घरात दोघांचा .
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सरळ थेटर मध्ये जाईन.....
मी सरळ थेटर मध्ये जाईन..... चित्रपट बघायला... नंतर मॉल मध्ये निवांत शॉपिंग... रात्री कॅसिनो भेट ... डाईस फेकून खूप दिवस झाले राव....
हॉटेलमध्ये जेवण, परत येता
हॉटेलमध्ये जेवण, परत येता येईल अशा ठिकाणी फिरून येईल, आणि स्टॉक करून ठेवेन किमान २ महिने पुरायला हवा इतका स्टॉक.
दुसरे लग्न करेन
दुसरे लग्न करेन
मग पुन्हा लॉकडाऊन लागेल.
आता माझ्याकडे दोन बायका असतील.
छान टाईमपास होईल.
घरची कामेही त्या दोघी वाटून घेतील.
एक दिवस मिळाला तर माझ्या
एक दिवस मिळाला तर माझ्या इच्छा पुर्ण होण्याचा वेळ नाही मिळणार. घरचेच मला बाहेर काढतील. लई कावलेत राव
बाकी बाहेर फिरण्यात काही अर्थ
बाकी बाहेर फिरण्यात काही अर्थ नाही.
सारे ऊपाशी तापाशी तुंबलेले लोकं उच्छाद मांडत असतील...
मला शाहरूखची भेट घ्यायलाही
मला शाहरूखची भेट घ्यायलाही आवडेल.
त्याने आजवर जे देशासाठी महाराष्ट्रासाठी माझ्यासाठी केलेय आणि पुढेही करत राहणार त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करेन
मी मुलांना घेऊन amusement
मी मुलांना घेऊन amusement park ला जाईन. त्यांच्या सोबत दिवसभर फुल्ल टु दंगा करेन.
बायकोला क्रेडीट कार्ड देऊन “ जा सिम्रन जी ले अपनी जिंदगी“ म्हणेन.
लहानपणी एक गोष्ट वाचली होती.
लहानपणी एक गोष्ट वाचली होती. एका माणसाने मध्यमवयात दुसरे लग्न केले, पहिलीला नवर्याचे केस पांढरे हवे होते, ती त्याच्या डोक्यावरचे काळे केस उपटायची, ते बघून दुसरीने नवर्याचे पांढरे केस उपटायला सुरवात केली. संध्याकाळपर्यंत नवर्याच्या डोक्यावर एकही केस शिल्लक राहीला नाही.
मी बायको मुलगी आणि मुलगा
मी बायको मुलगी आणि मुलगा चौघेही घरातून बाहेर पडून चार दिशांना जाऊ. एकदिवस एकमेकांना न झेलता आपापले वैयक्तिक आयुष्य जगू. मग घरी परतल्यावर तू काय केले मी काय केले याच्या गप्पा मारू...
पहिलीला नवर्याचे केस पांढरे
पहिलीला नवर्याचे केस पांढरे हवे होते,
>>>
जर एकच बायको असती आणि तिला हिरवे हवे असते तर ...
ऑफिसमधून सुट्टी घेईन . सारखं
ऑफिसमधून सुट्टी घेईन . सारखं वफ्रॉहो ने कंटाळलेयं
माझे आई-बाबा , माझ्या घरापासून ५ मिन. वर रहातात . माझं गेले महिनाभर माहेरी जाणं झालं नाहीये . रोज फोन करून चौकशी करते .
एक दिवस मिळाला तर तिकडे चक्कर मारेन .
किराणा सामानाचा स्टॉक करायचा आहे , पण ते दूकानात गर्दी असेल तर कितपत जमेल माहीत नाही
एका दिवसासाठी पार्लर्स चालू झाली तर तिकडे चक्कर मारेन आणि नवर्याला आणि लेकालाही पाठवेन सलून्मध्ये नक्की . बोकड झालेत दोघेही केस वाढवून
ऑफिस उघडे असेल तर मी तिथेही
ऑफिस उघडे असेल तर मी तिथेही जाईन.. तडक वॉशरूममध्ये.. दिवसाचा तासभर तिथे कसा जायचा कळायचे नाही.. मिस करतोय ते
माझे आई-बाबा , माझ्या
माझे आई-बाबा , माझ्या घरापासून ५ मिन. वर रहातात . माझं गेले महिनाभर माहेरी जाणं झालं नाहीये . रोज फोन करून चौकशी करते .
>>>>
सेम पिंच माझ्या बायकोच्या वतीने. चार मिनिटे चालत माहेर आहे. मुले अपवाद वगळता रोजच तिथे जायची. किंबहुना मी सुद्धा रोजच जायचो. पण महिनाभर जाता आले नाही.
मी भूतान ला सोलो ट्रिप करेन
मी भूतान ला सोलो ट्रिप करेन आणि मोदी राहिले त्या ताज ताशी हॉटेल ला राहीन.(गेली अनेक वर्षं मी फक्त त्याचे रेट डॉलर्स मध्ये बघते, गणित करते आणि साईट बंद करते ☺️☺️)नुसतं भूतान ला जाणं एका दिवसात होईलच.'जाऊन येणं' होणार नाही.
मुंबई मध्ये आहे सध्या.
मुंबई मध्ये आहे सध्या.
एक दिवस मिळाला तर फॅमिली सहित गावी जाईन
सर्व सामान घेईन
अंडी 15 dz
Sukat
बोंबील
सोडे
बिअर, whiskey
आणि इतर समान.
शेतातील घरात सर्व बंदोबस्त केला जाईल.
आरामात 15 दिवस निघाले पाहिजेत आरामात.
पहिलीला नवर्याचे केस पांढरे
पहिलीला नवर्याचे केस पांढरे हवे होते,
>>>
जर एकच बायको असती आणि तिला हिरवे हवे असते तर ...
Submitted by ऋन्मेऽऽष on 15 April, 2020 - 10:25
सरळ टक्कल करायचे आणि डोक्यावर माती थापून दिवाळीतल्या किल्यासारखी हरळी पेरायची.
मी घरातच बसून राहीन. आता सवय
मी घरातच बसून राहीन. आता सवय झालीय. नंतर रूटीन सुरू करताना जाम त्रास होणार आहे.
मी स्टेकेशनला जाईन बंगलोरच्या
तातडीने गाडी काढून सगळ्या
तातडीने गाडी काढून सगळ्या मित्र मैत्रिणींना त्यांच्या कुटुंबासमवेत (आणि घरात जो काही धान्य / शिधा उरला आहे त्यासमवेत) घरी राहायला घेऊन येईन.
मग लॉकडाऊन 3 मे काय 3 डिसेंबरला संपला तरी आम्ही, आमची सगळ्यांची बच्चे कंपनी आणि सगळ्यांचे आईबाबा खुश असतील एकदम.
अजून एक म्हणजे माझ्या माहेरच्यांना पण सांगेन इकडे निघून यायला. सगळे ज्येना + सगळी बच्चेकंपनी एकमेकांचे मनोरंजन करत बसतील. आम्ही सगळे ज्यांना वर्क फ्रॉम होम मिळाले आहे त्यांना कामात जमेल तशी मदत करत एकीकडे गप्पा / खादाडी वगैरे करत राहू.
टचवूड !!!
बायकोला माहेरी सोडुन येईन....
बायकोला माहेरी सोडुन येईन................
ऑफिस उघडे असेल तर मी तिथेही
ऑफिस उघडे असेल तर मी तिथेही जाईन.. तडक वॉशरूममध्ये. >>
तुम्ही ऑफिसचं वॉशरुम मिस करताय. कमाल आहे.
घरात वॉशरूम आहे ना मग का मिस
घरात वॉशरूम आहे ना मग का मिस करताय?
सरळ गावी निघून जाईन. दुस-या
सरळ गावी निघून जाईन. दुस-या दिवशी पुन्हा लाॅकडाऊन होणार त्यामुळे परत येण्याचा प्रश्नच नाही. मस्त आंबे, फणस, करवंद, जांभळं हादडायला मिळतील. आजी आजोबा मिळाल्याने बाळ खुष, नातवाला बघून आजी आजोबा खूष.
निवांत कॉफी-मैत्रीणि-मॉल.
निवांत कॉफी-मैत्रीणि-मॉल. मुख्य म्हणजे घरातील धुणी-भांडी व स्वयंपाक, आवराआवरी एक दिवसाकरता पाSSSSर पाSSपार नजरेआड.
आता काय होतय घरकामापासून सुटकाच नाहीये. ना निवांत 'मी-टाइम'. असे नाही की घरातल्यांची नजरच आहे किंवा ब्राउसिंग थांबलय. पण घरी कॉफी पिण्यात ती मजा नाही जी बाहेर आयती कॉफी व क्रोसाँ हादडण्यात आहे.
मुख्य म्हणजे न्यु यॉर्कमध्ये भटकेन, सेंट्रल पार्कमध्ये भटकेन. खूSSSSSSखूप चालेन.
.
भारतवारी करण्याचे मनसुबे रचेन. जाइनही.
Tumhi NJ madhe ka Samo?
Tumhi NJ madhe ka Samo?
होय च्रप्स.
होय च्रप्स.
सेंट्रल पार्क मध्ये भटकेन
सेंट्रल पार्क मध्ये भटकेन वाचले आणि गेस केला
बऱ्याच मिटिंग पेंडिंग आहेत,
बऱ्याच मिटिंग पेंडिंग आहेत, आधी त्या लाईन अप करेन.
जास्त बाहेर फिरणार नाही. अत्यावश्यक कामे आवरेन.
मग एके दिवशी कितीतरी वेळ CCD मध्ये जाऊन बसेन. निवांत!!!
अज्ञातवासी तुम्ही घरी आहात हे
अज्ञातवासी तुम्ही घरी आहात हे आमच्यासारख्या वाचकांसाठी चांगले आहे. तुम्हाला राक्षसमंदिर लिहायला निवांत वेळ मिळाला आणि आम्हाला मेजवानी मिळाली. बाहुलीचे भाग देखील पटापट येऊ लागले...
धन्यवाद च्रप्स
धन्यवाद च्रप्स
Pages