मी सध्या काय करतो
गेले काही दिवस सक्तीच्या विश्रांतीसाठी अर्धेधिक जग घरात कोंडले गेले आहे त्यात आपली काय कथा? लोक आपापल्या परीने वेळेचा सदुपयोग करताहेत. घरून काम चालले आहे तरी बराच मोकळा वेळ हाताशी आहे. वाचन लेखन चालू आहे. चित्रपट पाहणे, गाणी ऐकणे तर आहेच पण खूप दिवसात संपर्कात नसलेले मित्र आणि नातेवाईक यांना फोनवरून आणि व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून भेटणे चालले आहे. गप्पा रंगतात आहेत. कन्येची दहावीची परीक्षा तीन पेपर उरलेले असतांना अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या गेली आहे. त्यामुळे धड अभ्यास न धड सुट्ट्या अशी परिस्थिती. तिचे मित्र-मैत्रिणी रोज ठराविक वेळी ऑनलाईन एकत्र येऊन खेळ-अंताक्षरी-गाणी-डान्स-अभ्यास असे सगळेच आलटून पालटून करताहेत. उद्या रात्री सगळ्यांनी आपापल्या बाबांसोबत ९० सेकंद डान्स करतानाचा व्हिडीओ शेयर करायचा आहे त्यामुळे आज-उद्या मला डान्स शिकवण्यात येणार आहे
* * *
घरात ज्येष्ठ नागरिक आहेत - मधुमेह आणि रक्तदाब दोन्ही त्रास असलेले. त्यांना ४ मार्चपासूनच बाहेर जायला बंदीहुकूम काढला होता. त्यांच्या औषधांचा साठा सध्यातरी पुरेसा आहे. दातांच्या आणि डोळ्याच्या तपासणी सारख्या इलेक्टिव्ह गोष्टी पुढे ढकलायचा सल्ला पटकन स्वीकारण्यात आलेला आहे. घरातल्या घरातच दररोज १०००० पावले चालून तसेच तामिळ-तेलगू देमार हाणामारीचे आणि दिलीप कुमारचे खूप जुने भावुक करणारे चित्रपट पाहून त्यांचा वेळ व्यवस्थित जातो आहे. त्यांची बडदास्त उत्तम राखली जात आहे. टीव्हीवर कर्कश्य आवाजातल्या बातम्या पुनःपुन्हा पाहण्याच्या त्यांच्या आग्रहाचा थोडा त्रास होतो, उदास आणि निराश वाटते. त्यांचाही फोनवर स्वमित्रांशी संपर्क आहेच. मोकळा वेळ असल्यामुळे उनो आणि बिगफूल सारखे पत्त्यांचे डाव अधेमधे होत आहेत - हातातले फोन बाजूला ठेवून सगळे कुटुंब एकत्र येण्याचा दुर्लभ योग.
* * *
एक दिवस काही जुनी कागदपत्रे नीट चाळून फायलिंग केले. त्यातील जुनी पत्रे वाचून पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. एक गोष्ट लक्षात आली की गेल्या २० वर्षात कोणालाही पत्र लिहिलेले नाही. पुढे लिहिण्याची शक्यता वाटत नाही. जुन्या बाडातले पणजोबांच्या पश्च्यात सम्राट पंचम जॉर्जच्या स्टॅम्पपेपरवर १९०८ साली केलेले वाटणीपत्र फार मजेशीर वाटले. 'आपसात पटत नसल्यामुळे वाटणी करत आहोत' असे रोखठोक कारण लिहितांना तिन्ही आजोबा बंधूनी पुतण्यांना मात्र स्वतःची इस्टेट आनंदानी लिहून दिलेली आहे
आईचे स्वाक्षरीचे आणि अशिक्षित आजीचे अंगठा उमटवलेले मृत्युपत्र वाचून ह्या द्रष्ट्या स्त्रियांबद्दल कौतुक वाटले. तात्काळ प्रेरणा घेऊन स्वतःचे राहून गेलेले मृत्युपत्र लिहून तयार केले. त्यामुळे येत्या काही वर्षासाठीच्या वित्तनियोजनाचा उप-प्रकल्प आपोआपच पार पडला. करोना काय जाईलही, जगलो तर एव्हढा रिकामा वेळ पुन्हा कधी मिळणार
* * *
बाहेर निसर्ग फुलला आहे . झाडांवर फुलांचे घोस आणि झाडांखाली फुलांचा खच ! पण निसर्गाचे सर्व विभ्रम सध्या 'टच मी नॉट' आहेत.
घराच्या मागे वनखात्याच्या ताब्यातला डोंगर आहे. त्यामुळे आधीपासूनच बरेच पक्षी येतात. कबुतरांचा नकोसा सहवास रोखण्यासाठी जाळी बसवून घेण्याचा पर्याय अजूनही पटला नाही. त्यामुळे चिमण्या, बुलबुल, मैना, साळुंक्या आणि पोपटासारख्या अन्य सुंदर पक्ष्यांना अटकाव होईल असे वाटते. मागच्या वर्षी बुलबुल पक्ष्यांचे बाळंतपण आमच्या टेरेसवर पार पडल्यापासून 'जाळी नकोच' हे मत दृढ झाले आहे. सध्या वाहनांचा आणि एकूणच आवाज कमी असल्यामुळे सकाळ-दुपार पक्ष्यांचे आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतात. पक्षी धीट झालेत असे उगाचच वाटते. आपण जवळ गेलो तरी घाबरत नाहीत आणि उडूनही जात नाहीत - ही पहा एका पायावर तपस्या चाललीय
* * *
घराच्या तीनपैकी दोन टेरेसवर बाग केली आहे. माळीकाका स्वतःच असल्यामुळे हे काम करायची सवय आणि आवड आहे. नंतर करू म्हणून आधी टाळलेली कामे, रिपॉटिंग, छाटणी, फवारणी आणि टेरेसच्या डीप क्लीनिंगची कामे २-३ दिवसात थोडी थोडी केली. पाठदुखी उफाळून आल्यावर उत्साहाला आवर घालावा लागला पण तोवर बहुतेक कामे योग्यप्रकारे करून झाली होती.
* * *
महिन्याचे सामान तसेही थोडे जास्तच आणले जाते त्यामुळे ती चिंता नाही. लॉकडाऊन होईल अशी शक्यता जाणवल्यामुळे घरकामातल्या दोन्ही मदतनीस, स्वयंपाक करणाऱ्या ताई आणि गाडीचा सारथी यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा पगार देऊन थोडी आधीच पूर्ण सुट्टी दिली होती. सफाई कर्मचाऱ्याला थोडे अधिकचे पैसे हवे होते ते दिले. आता सर्व काम स्वतः करावे लागत असल्यामुळे मदतनीसांची खरी किंमत आणि त्यांचे कष्ट कळत आहेत, आपले रोजचे जीवन सुकर आणि आरामाचे करण्यासाठी राबणाऱ्या हातांबद्दल कृतज्ञता वाटते आहे. फळे आणि भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकरी कुटुंबाकडून हवा तो माल घरपोच (गृहसंकुलाच्या दाराशी) येतो आहे. सर्वात जास्त दुर्लक्षित असलेले कृषीक्षेत्र आणि शेतकरीच आज आपल्याला जगवत आहेत.
* * *
घरातल्या सगळ्यांचेच गृहकृत्यदक्षता अंगी बाणवणे चालले आहे. किचनमधला वावर वाढला आहे आणि कधीतरी करून पाहू म्हणून राहून गेलेल्या पाककृती कमीत कमी साधनात बनवण्यात येत आहेत. सवय न राहिल्यामुळे फजिती होते कधीकधी पण त्यातही मजा आहे. मुळातच खादाड प्रवृत्ती असल्यामुळे जिभेवर ताबा ठेवणे सोपे नक्कीच नाही पण वजन आणि रक्तशर्करा आटोक्यात ठेवण्यासाठी निग्रहाने करावे लागत आहे.
* * *
परिचयातील सर्व मुलांना रोज एक तरी 'करियर ऑप्शन' वर दोन पानी निबंध / अहवाल लिहायचे काम दिले आहे. इंटरनेटची मदत घेऊन नवीन जगात उपलब्ध होणाऱ्या संधींबद्दल त्यांचा आपापल्या परीने हसत खिदळत अभ्यास चालला आहे. रात्री झोपण्यापूर्वी अहवालाचे सादरीकरण बघतांना आपल्याला वाटतात त्यापेक्षा मुले जास्त हुशार, धीट आणि अतरंगी आहेत ही जाणीव सुखावणारी आहे.
* * *
अनेक मित्रांनी घरातले फोटो अल्बम काढून वगैरे बघितल्याचे सांगितले. फोटो प्रिंट काढण्याचा काळ कधीच लोटला असे वाटत असतानांच घरात काही शे प्रिंट फोटो आहेत आणि त्यापैकी जुन्यांचे रंग धूसर होत असल्याचे दिसले. दोन दिवस खपून त्यांचे डिजिटलायझेशन केले. मग कामात काम म्हणून त्यापेक्षा काही पावले पुढे जाऊन जुने कॅमेरे, बाबा आदम कालीन तीन ब्लॅकबेरी फोन, जुनी मेमरी कार्ड्स, जुने वापरात नसलेले अन्य स्मार्टफोन, मान टाकलेला जुना लॅपटॉप, एक्सटर्नल डिस्क अशा विविध ठिकाणी विखुरलेल्या हजारो डिजिटल फोटोना एकेठिकाणी केले, त्यातील अनेकदा कॉपी झालेले, ब्लर-अस्पष्ट झालेले, एकाच प्रसंगाचे एकाच फ्रेममधले उगाच १०-१० काढलेले, फोटोत डोळे मिटलेल्या अवस्थेत लोक असलेले, फोटो-बॉम्बिंगच्या केसेस असलेले असे फोटो नष्ट केले. आता मूड लागेल तस त्यांचे व्यवस्थित वर्गीकरण करणार आहे. ह्या प्रकल्पाचा उपप्रकल्प म्हणून चार्जेर-बॅटऱ्या-वायरी-ऍडॉप्टर-जुने फोन आणि वापरात नसलेल्या अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा बराच इ-कचरा जमा झाला आहे आणि थोडे स्थिरस्थावर झाल्यावर त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावायची आहे.
* * *
स्वतःचे कपाट उपसून पुन्हा नीट लावतांना नावडत्या - गचाळ फिटिंगच्या - कंटाळा आलेल्या - वापरण्याची शक्यता नसलेल्या - सगळ्या कपड्यांना भावपूर्ण निरोप दिला. 'ओन्ली द बेस्ट फॉर मी' असे ब्रीदवाक्य ठेवून सर्व नको असलेल्या अन्य वस्तूही कपाटाबाहेर केल्या. कोनमारी आणि मिनिमलिझम नुसतेच वाचून काय उपयोग ?
लॉंड्री आवडता प्रांत आहे. कपडे मशीनला लावणे, वाळवणे, घडी घालून / प्रेस करून ज्याचे त्याच्या कपाटात लावून देणे इतक्यावरच न थांबता चादरी, टॉवेल, पडदे, सोफा कव्हर, शूज, पायपुसणी आणि मग खुद्द वॉशिंग मशीन असे सर्व क्रमाक्रमाने स्वच्छ करून दिल्यामुळे माबदौलत घरातील सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. कौतुकामुळे उत्साहाचे भरते येऊन पुढची पायरी म्हणून फ्रीजसुद्धा अंतर्बाह्य स्वच्छ करून दिला असता पण चुकीच्या शब्दात सत्य सांगणे भोवले. 'आपल्या घरातील फ्रीज हा अन्नपदार्थ कुजवण्याचा कारखाना झाला आहे' असे प्रज्वल-उज्वल सत्यार्थक विधान करायला नको होते. अब क्या करें के तीर छूट गया कमान से .....
* * *
इमारतीला लागून असलेला एक मोठा प्लॉट रिकामा आहे. त्यापलीकडे काही अंतरावर इमारतींचे बांधकाम सुरु आहे. त्यासाठी आलेल्या मजुरांची पत्र्यांची छोटी घरे मला खिडकीतून दिसतात. त्यांचे काम सध्या पूर्ण बंद पडले आहे. सगळे मजूर मुलाबाळांसह घरीच आहेत. सकाळी लहान मुलांच्या आंघोळी आणि बायकांची स्वयंपाकाची लगबग दिसते. पुरुष मंडळी मात्र फक्त फोनवर किंवा पत्ते कुटतांना दिसतात. त्यांचा कंत्राटदार दोनदा पैसे वाटून गेला आहे, रांगा लावून पैसे घेतांना मंडळी दिसली, राशनही असावे. बघून बरे वाटले. पण तो पुन्हा येईल का माहित नाही. कामच नसेल तर त्याला तरी पैसे मिळतील का असा विचार मनात येतो.
लहान मुलें त्यांचे खेळ स्वतःच शोधतात. हसऱ्या चेहऱ्याने घरासमोर झाडू - सडाशिंपण आणि उगाचच लाकडाच्या झिलप्या इकडच्या तिकडे रचणे, खोटे-खोटे पाणी आणणे असे खेळ (!) ती मुलं खेळतांना दिसतात. त्यांना बघून आनंद वाटावा की दुःख हे मात्र मला समजत नाही.
जीस्त करने के लिए उम्र बहुत थोडी है
अपनी दुनिया से अलग क्या कोई दुनिया देखें
* * *
>>>> In turbulent sea, its
>>>> In turbulent sea, its enough to stay afloat. वादळ गेले की पोहण्याचेही बघू>>>> क्या बात है!
तुमचा उरक वाखाणण्याजोगा आहे!
तुमचा उरक वाखाणण्याजोगा आहे! छान वाटलं वाचून!
किती छान लिहिलंय, मस्त वाटलं
किती छान लिहिलंय, मस्त वाटलं वाचून!
तुमची सकारात्मक ता , कल्पकता
तुमची सकारात्मक ता , कल्पकता व स्रुजनशीलता आवडली.
>>तुमची सकारात्मक ता ,
>>तुमची सकारात्मक ता , कल्पकता व स्रुजनशीलता आवडली.
+१ अगदी हेच म्हणते. धन्यवाद हे शेअर केल्याबद्दल.
छान लिहीलयत. तुमचा परिसरही
छान लिहीलयत. तुमचा परिसरही छान आहे, फोटोतून दिसतोय.
खूपच सकारात्मक!! वाचून एकदम
खूपच सकारात्मक!! वाचून एकदम छान वाटलं नुसतं लोळणे, पुस्तक वाचणे आणि चॅटिंग हे सोडून तुम्ही लिहिलेल्यापैकी एखादी तरी गोष्ट मी करायला हवी असा साक्षात्कार झाला! कपाट आवरायला घेतो उद्या!
आवडलं.सकारात्मक लिहीलय.
आवडलं.सकारात्मक लिहीलय.
मस्त फोटो आणि लेख..आवडला.
मस्त फोटो आणि लेख..आवडला.
खूप सुरेख अन सकारात्मक. नुसते
खूप सुरेख अन सकारात्मक. नुसते वाचूनही उत्साह वाढला. असेच लिहित रहा अन सुरेख फोटोही टाका.
त्या निरागस मुलांबद्दल काय वाटलं शब्दात मांडता येत नाही. समस्या दिसणं अन ती इतरांसमोर आणणं हे ही मोठंच आहे.
@ मऊमाऊ
@ मऊमाऊ
थँकयू !
..... त्या निरागस मुलांबद्दल काय वाटलं शब्दात मांडता येत नाही.....
मलातरी ते कुठे जमले आहे ? mixed feelings
@ स्वाती२
@ स्वाती२
@ sonalisl
@ सामो
@ अज्ञातवासी
@ जिज्ञासा
@ मंजूताई
@ वर्षा
@ धनुडी
@ Chaitrali
@ वेडोबा
अनेक आभार. खाजगी-घरगुती गप्पा किंवा डायरीची पाने लिहावीत तसे मनातले लिहिले होते. ते वाचून सकारात्मक वाटले अशा भावनेचा एक समान धागा सर्व प्रतिसादांमधे आहे. त्यामुळे मलाच भारी वाटतेय
@ kulu
तुम्हाला राग-रागिण्या रिझवत आहेत सध्या आणि शब्दकुबेर तुमच्यावर प्रसन्न आहे. तेच चालू ठेवा असा माझा (स्वार्थी) सल्ला !
भारी लिहिलंय.
भारी लिहिलंय.
फोटो आणि लिखाण मस्तच!
फोटो आणि लिखाण मस्तच!
खुप आवडले!
खुप आवडले!
तुमच्याकडून प्रेरणा घेऊन असेच काही करावेसे वाटतेय.
छान लिहिलंय. ईतकी सगळी कामं
छान लिहिलंय. ईतकी सगळी कामं तुम्हाला येतात आणि तुम्ही न कंटाळता केली याबद्दल अभिनंदन.
सगळ्या दुनियेकडे भरपूर वेळ असताना मी मात्र कधी नव्हते एवढी व्यस्त झाली आहे.
चालायचंच!
आपलं काम नेहमीच हटके असतं >>> किल्ली सेम पिंच
मी अत्यावश्यक सुविधा वाली आणि बाकीचे घराकडून कामवाले त्यामुळे त्यांच्या अधिक बाळाच्या खाण्यापिण्याच्या सोयी लावून जाणे आणि मदतनीस ताई नसल्याने घरी आल्यावर रामरगाडा ऊपसणे यात दिवस कधी ऊगवला आणि संपला ते कळतही नाही.
लेख खूप आवडला , निवांत वाटले
लेख खूप आवडला , निवांत वाटले ..जांभळ्या फुलांचा फोटो आणि पायर्यांंचा फोटो आवडला .<<<< ईतकी सगळी कामं तुम्हाला येतात आणि तुम्ही न कंटाळता केली याबद्दल अभिनंदन.>>> +1
मला आवराआवर फार आवडते. सतत करत असते . इलेक्ट्रॉनिक वायरी, जुने फोन, सुट्याHDMI केबल्स, मेलेल्या सेल्स/batteries रिसायकल मध्ये पुष्कळ वेळ जातो. एखादी गोष्ट आपण दोन वर्षे वापरली नाही तर सरळ डोनेट करावी असा माझा नियम आहे. (कारण कुठल्याही ऋतूत तिचा उपयोग झाला नाही) घरात वाद घालताना वापरते.
सुरेख लिहिलेय. तो शेवटचा
सुरेख लिहिलेय. तो शेवटचा फोटो कित्ती सुरेख आहे. तुम्ही म्हणता तस आनंद वाटाव कि दु:ख ते कळत नाही. मोठी ताई असलेली ती मुलगी , छोट्या भावाचे केस विंचरून देत आहे. कित्ती गोड. माझ्या घरी बहिण भावांच्यात पण असले काय काय चालु असते. धाकटा आता दुसरीत आहे पण मुलगी अजुनपण कुठे पार्टीला चालले कि त्याचे केस विंचरते, त्याला छान कपडे घालायला लावते. मला भाऊ नसल्याने आणखीणच याचे कौतुक वाटते.
छानच लेख, अनिंद्य. ते
छानच लेख, अनिंद्य. ते बोगनवेलीच्या फुलांच्या सड्याचं प्रचि अगदी दिवाणखान्याच्या भिंतीवर लावावे इतके सुंदर आहे. थोडे फोटोशॉप करावे लागेल कदाचित.
@ चंद्रा
@ चंद्रा
@ आदिश्री
@ चिन्नु
लेखातले सगळेच फोटो मोबाईलच्या कॅमेराचे 'रँडम क्लिक' सदरातले आहेत
@ आदिश्री - .... एखादी गोष्ट आपण दोन वर्षे वापरली नाही तर सरळ डोनेट करावी .... हे माझे स्वप्न आहे. सुदैवाने वाटचाल त्याच दिशेने होत आहे.
@ पुंबा
@ बोकलत
आभार.
@ सीमा
@ सीमा
ती मुलं भावंडं आहेत की नाही हे मला माहित नाही पण भाऊ - बहिणीसारखे सुंदर नाते जगात दुसरे नाही आणि वय वाढले तरी ते फारसे बदलत नाही. प्रतिसादाबद्दल आभार.
@ किट्टु२१,
तुम्हां अत्यावश्यक सेवा-सुविधा देणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच. ब्रावो !
....घरी आल्यावर रामरगाडा ऊपसणे.... यात मात्र हक्काने घरातून थोडी मदत मिळवा. एकरस कामाने घरी बसून कंटाळलेल्या मेम्बरांकडून सुखद धक्का मिळण्याची शक्यता आहे
फारच सुंदर लेख! तुमच्या
फारच सुंदर लेख! तुमच्या बागेतल्या फोटोमधली फुलं कोणत्या प्रकारची आहेत?
जेष्ठ मैत्रिण कवयित्री
जेष्ठ मैत्रिण कवयित्री अनुराधा काळे यांनी पाठवलेली मिष्किल प्रतिक्रिया इथे डकवतो आहे (त्यांना माबोवर लॉगिन करायला अडचणी येत आहेत)
सारे काही सांगे लेखाचे नाव
काय आहे सकलांचे वास्तव
मिष्किलतेचा हलकाच भाव
नृत्य कलेला मिळेल की हो वाव
प्रत्येकाची समस्या आगळीवेगळी
जुने चित्रपट बडदास्त ज्येष्ठांची खुले कळी
उदासीन बातम्या नको वाटती वेळोवेळी
पण एकत्र कुटुंब भोजन मजा आगळी
जुनी पुराणी पत्रे म्रुत्यु पत्रे करारनामे
फावला वेळ---वेळ आणली कोरोनाने
लक्ष वेधले कधी नव्हे ते खिडकीने
सुंदर रुप धारण अस्पर्शित निसर्गाने
पाकळ्यांची पखरण पक्षांची किलबिल
दारी येई प्रसवण्या बुलबुल
अर्धोन्मिलित कळ्या अन् ती फुलं
तयांसी निरखता धुलाई कार्य उरकलं
लक्ष वेधे बाह्य जगतात काय हो चाललं
"अपनी हालत तो बहुत अच्छी।"
हे मनोमनी पटलं
अनुराधा काळे
खूप छान लिहिलंय! खूप
खूप छान लिहिलंय! खूप सकारात्मक आहे.
तुम्ही इतकी सगळी कामं आवडीने करता हे कौतुकास्पद आहे.
लेख खूप छान...
लेख खूप छान...
आवडला.. सर्व प्रचिही छान..
कुठल्याही कारणाने का होईना पण जो वेळ मिळाला तो खूप छान सत्कारणी लावलाय आणि आताही लावत असाल...
कामांची लिस्ट करुन ती 'काम' म्हणून पूर्ण करणं आणि अशी रमतगमत, आनंद घेत पूर्ण करणं यात खूप फरक असतो..
खूप पण नाही, कदाचित थोडासाच फरक असावा...
वृत्तीचा म्हणा किंवा Mindset चा..
पण तोच महत्वाचा..
कामाची To Do List पूर्ण झाली ह्या फक्त सुटकेच्या निश्वासाचा Versus आतूनबाहेरुन छान वाटणाऱ्या आनंदाचा..
माझ्याही सुट्टीचा लेखाजोखा इथेच देईन कदाचित..
नुकत्याच मिळालेल्या वाढीव सुट्टीमधल्या वाढीव आनंददायी कामांसाठी शुभेच्छा..
@ निरु
@ निरु
सुंदर प्रतिसादासाठी आभार.
.... कदाचित थोडासाच फरक असावा...वृत्तीचा म्हणा किंवा Mindset चा.....
सौंदर्यशास्त्रावर हिंदी विद्वान आचार्य रामचंद्र शुक्ल यांचा दीर्घ निबंध 'उत्साह' वाचतो आहे. ते लिहितात - 'दुख के वर्ग में जो स्थान भय का है वही स्थान आनंदवर्ग में उत्साह का है. सहासपूर्ण आनंद का नाम उत्साह है. कर्म सौंदर्य के उपासक सच्चे उत्साही हैं. .... फार आवडले आणि पटले.
....माझ्याही सुट्टीचा लेखाजोखा इथेच देईन कदाचित....
जरूर लिहा.
@ आर के जी - आभार. मला त्या
@ आर के जी - आभार. मला त्या फुलझाडाचे नाव माहित नाही.
@ अनघा_पुणे - थँक यू
@ अनुराधा काळे - शीघ्रकविता आवडली. आभार. नवीन पासवर्ड / आयडी मिळवून मायबोलीवर तुम्ही लिहावे असा आग्रह.
सुंदर लेख. बरं वाटलं वाचून
सुंदर लेख. बरं वाटलं वाचून
छान लेख
छान लेख
@ वंदना @ Sparkle आभार.
@ वंदना
@ Sparkle
आभार.
Pages