मायबोली धागे शोधाशोधीस मदत

Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31

मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फा.. :स्मितः
पण ही कथा अशी कशी इतक्या जणांच्या नजरेतून सुटली?

@ Bhagyashree
Nandinine लिहिली आहे बहुतेक तुम्ही म्हणता ती कथा...तिच्या मराठी ब्लॉगवर पण आहे ती...
खूपच छान लिहिते ती....
@नंदिनी...तू वाचत असशील. तर अग तुग केल्याबद्दल sorry....

>>आणि हा मिसळपाव साइटवर सुधागड - एक 'नाईट ट्रेक' --
हकु in
27 Mar 2016

एसआरडी धन्यवाद. भारी अनुभव आहे तो.

मला आवडतात भुतांच्या गोष्टी. पण स्थानिक लोक मलाच टरकून असतात.
-----
सकाळी जेव्हा गुहेतून खाली येतो तेव्हा ते गाववाले विचित्र नजरेने पाहतात. त्यांना तिथल्या गोष्टी माहिती असतात पण आपल्याला माहिती नसल्याने भीती वाटत नाही.
हल्ली लोहगडावर राहू देत नाहीत. संध्याकाळी फेरी मारून सर्वांना हाकलतात.

>> देवगण!>>
पूर्वकथानक, घटना माहिती नसल्यास आपल्याला भीती वाटत नसते.

येस् मिळाली. पुन्हा एकदा शब्द नाव आहे. Ashwini खूप खूप धन्यवाद Happy . नंदिनी यांच्या सर्वच कथा छान आहेत. >>>>>
@भाग्यश्री123 कृपया लिंक द्यावी.

आज सावट ही भयकथा वाचली..एकदम मस्त होती..अशा जुन्या कथा कादंबऱ्या वाचायला भारी वाटतेय..मी मायबोलीवर नवीन असल्याने चांगल्या कादंबऱ्या लवकर सापडत नाही..
आज एखादी छान प्रेम कथा वाचू वाटतेय..
कुणाच्या वाचनात चांगली कथा /कादंबरी आली असेल तर कृपया लिंक द्या इथे..

चांगल्या कथा शोधण्यापेक्षा सोप्पी पद्धत - चांगले लेखक शोधले की त्यांच्या लेखनामध्ये मोठ्ठा खजिना आपसूक मिळेल
उदा. चैतन्य रासकर, कौतुक शिरवाडकर, कवठी चाफा, बेफ़िकीर (आणि ऋन्मेष ह्यांचे जुने ललितलिखाण) इत्यादी इत्यादी

धन्यवाद अज्ञानी .. चैतन्य रासकर यांचे काथ्याकुट वाचले होते ते पण खूप भारी होते...बाकीच्या लेखकांचं लिखाण वाचते आता..

तुमच्या वाचनात आली असेल चांगली happy ending वाली तर पाठवा..
घरीच असल्यामुळे किती पण वाचायला दिलंय तरी कमीच आहे..
त्यामुळे जून सगळ शोधून वाचतेय मी

Lol

मला प्रेमकथा वाचायला कंटाळा येतो. कथेत तोंडी लावायला खून, भूत पिशाच्च, गूढ वगैरे असेल तर चविष्ट लागते. थांबा जरा, कोणीतरी सुचवेलच.

अमृताक्षर, आठवणींच कपाट वाचा. नंदिनी यांच्या कथा पण सुंदर आहेत. 'रहे ना रहे हम' नावाची कथा. त्यांच्या ब्लॉगवर आहे. ब्लॉगची लिंक भाग्यश्री ने वर दिलीये.

https://www.maayboli.com/node/67353
हि कथासुद्धा कदाचित आवडेल तुम्हाला.. Happy

माझासुद्धा सेम उद्योग चालु आहे जुने धागे खोदतीये.. Lol

प्रेम कथा आणि आपला ३६चा आकड़ा त्यामुळे त्याला पास Proud
कथेत तोंडी लावायला खून, भूत पिशाच्च, गूढ वगैरे असेल तर चविष्ट लागते +११

धन्यवाद मण्या S ..वाचते मी..घरी बसून बसून सगळे कंटाळून जातात पण मला मात्र मायबोली असल्यामुळे अजिबात चिंता नाही एक से एक भारी लेखक आहेत मायबोली वर..
वाचनाची आवड असणाऱ्यांना तर खजिनाच जणू..

Pages