क्षमस्व

Submitted by शुभम् on 5 April, 2020 - 23:04

http://manatalepanavar.blogspot.com/?m=1

या ठिकाणी त्या चारही कथा आहेत .
वाचून पहा मग ठरवा शृंगारिक आहेत कि अश्लील आहेत की उत्तानरसाच्या कथा आहेत....

तुम्हाला त्या उत्तान वाटत असतील , तर त्या मी काढलेल्या आहेतच .

मी म्हटलं होतं शिव्या दिल्या तरी चालतील , सरळ बोलणं वेगळं नि नाव न घेता त्या तीन कथा आंबट आहेत व मायबोली अश्लील होत चालली आहे , यात फरक आहे . मायबोली अश्लील होत चालली आहे त्यांच्या या म्हणण्याला प्रतिक्रियांमध्ये बऱ्याच जणांनी दिलेला होकार मी पाहिला , त्यामुळे मला वाटलं मी चुकीच्या जागी कथा टाकलेली आहेत म्हणून मी त्या कथा काढून टाकल्या .

मला तरी माझी कथा अश्लील वाटत नव्हती , कारण उत्तेजित करणं हा कथेचा हेतु नव्हता . होय , ती कथा प्रोढांसाठी होती हे ही खरं .

मी बारीवीत असताना पहिल्यांदा मला मायबोली कळाली , नविन मोबाइल होता , वाचायला आवडायचं . त्यावेळी मधुराणी नावाची कथा वाचलेली आठवते . ती भयंकर आवडली होती . त्यानंतरही श्रुंगार नावाची देखिल..

या कथालेखकांची मला माहिती नाही पण कथा मात्र आवडल्या . त्याखाली लोकांनी प्रतिक्रिया पण दिल्या होत्या . त्याच्याशी माझी तुलना होउ शकत नाही हे मला माहित आहे , पण जराशं प्रोढ इथे टाकलं तर मोकळे प्रतिसाद भेटतील ,
मग ते काहीही असो ...

एक प्रतिसाद तसा आहे सुद्धा - फालतु / बकवास कथा आहे .
मी त्यांचे आभार मानलेत मनमोकळ्या प्रतिसादासाठी ..

मी लिहण्याच्या प्रयन्त करतोय . आतापर्यंत पाच सहा दिर्घकथा लिहिल्या आहेत . त्यातील सगळ्या मायबोलीवरती मी टाकलेल्या नाहीत . त्यांचा दर्जा सुमार आहे हे मला माहित्याय . माझी पहिली कथा जत्रा मी वाचायला घेतली तर मलाही वाचू वाटत नाही . वरचेवर काहीतरी फरक होतोय एवढं मात्र खरं ...

लिहण्याचा हेतू काय किंवा उद्देश काय हा वादाचा विषय आहे पण मनोरंजन हा माझा हेतु असतो . मनोरंजना बरोबर मग बाकी गोष्टी . मर्यादा ,व्यसन या दोनही कथा आजुबाजुला मी स्वतः पाहिलेल्या आहेत . मला मांडता आल्या नाहीत ही माझी कमतरता , पण ती दुर व्हावी म्हणुन तर लिहितो ना.

आंबट कथा आहेत का नाही हे ज्याचं त्याचं मत पण माझा हेतु त्या आंबट व्हाव्या हा नव्हता . आणि हो मी त्या विचार करुणच लिहिल्या होत्या .

बऱ्याच वेळा दोन पात्रामधील शारीरिक प्रसंग लिहिताना माझी पहिल्यापासुन तारांबळ उडते . मर्यादामध्ये तो बऱ्यापैकी जमला हे तरी मला कळालं...

आता कोणती किती श्रुंगारिक व किती उत्तान या बद्दल मतभेद होत राहतील व वाद वाढेलच .

जर कथा श्रुंगारिक वाटत असतील तल त्या काढलेल्या आहेतच .

आंबट शौकीन म्हटलं याचा राग म्हणुन मी कथा काढल्या नव्हत्या तर या अशा कथांमुळे मायबोली अश्लील होत चालली आहे असं म्हटलं गेलं म्हणुन कथा काढल्या .

मी कमेंट मध्ये वाचलं कि मायबोलीचं सरासरी वय चाळीस आहे , मग एका बावीस वर्षाच्या नवख्या लेखकाच्या अपरिपक्वतेला व पोरकटपणाला तुम्ही माफ करु शकालच....

Group content visibility: 
Use group defaults

शुभम, सगळ्यात आधी प्रतिसदासाठी धन्यवाद! मायबोलीवर बरेच लोक तुमची बाजू मांडत असताना, तुम्ही बाजूला का राहिलात हे न उमजनार कोडं होतं. (एकेवेळी तर माझ्यावर इग्नोरस्त्र चालवले गेलय की काय, अशी शक्यता यावी.)

" कथेच्या वेष्टनात लपेटलेलं पॉर्न " असं तुमचं मत आहेच , ते बदलणार नाही आणि मी त्याचा आदर करतो .

>>>>धन्यवाद! पण त्याआधीचा रेफरन्स युट्युबचा आहे, तुमच्या कथेचा नाही, हे सोयीस्कर विसरू नका.

तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाटेवर भरपुर दुकाने असतात , कोणी लगेच five star उघडु नाही शकत , सुरवात टफरीपासुनच होते .
>>>> हे मी कधी सांगितलं याचा विचार करतोय. पण नेवर माईंड. सुरुवात शून्यातूनच होते, पण फाइव्ह स्टार चालू करता येत नसेल तर सुरुवात दारूच्या गुत्त्यापासून करावी हेही पटत नाही.
तसही, तुम्ही सुरुवातच केलीये असं तुम्हीच म्हणताय, नवखेपणा आहे असं मान्य करताय तर जेव्हा जयश्री यांनी तुम्हाला नवीन लेख म्हटलं, तेव्हा काही आयडीनी बराच विरोध केला. असो!

मी खरी मतं म्हणुन कथा काढल्या नव्हत्या हे वरही सांगितले . मायबोली अश्लील होतीय , असं लिखान इथे नको म्हणुन काढलं होत .
>>> ही कथा आंबट होती. बस काढली कथा. आणि जर तुम्हाला वाटत असेल मायबोली तुमच्या लिखाणामुळे अश्लील होतेय, तर प्रश्नच मिटला.

" कथेच्या वेष्टनात लपेटलेलं पॉर्न " आहे याची मला जाणीव नव्हती , मला फक्त कथा बोल्ड आहेत एवढंच माहित होतं
>>>> वर उत्तर दिलंच आहे. तरीही सोयीस्कर अर्थ काढू शकतात. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहेच.

कुठलातरी राग कुठेतरी काढायचा अशा लिहिलेल्या वाटतात....
हे मात्र मला अजुन कळलेलं नाही...?

>>>>> काही छोट्या कथा, त्यात खून येतात, विवाहबाह्य संबंध येतात, लैंगिक गोष्टी येतात, अश्लीलता येते आणि तेही फ्लोमध्ये न येता घिसाडघाईने येतं, कथा न फुलवता चुरगळुन टाकल्यासारखी वाटते, असं मला वाटलं, त्यामुळे हे मत मांडलं.
या खऱ्या मतामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर क्षमस्व!
हा माझा शेवटचा प्रतिसाद!

शुभम,
मी तुमच्या तीनही कथा वाचल्या आणि तीनही कथा आवडल्या. खासकरून बायकोकडून फसवल्या गेलेल्या शेतकर्‍याची. पॉर्नचे व्यसन लागलेल्या तरूणाची सुद्धा चांगली होती, तिसरी कथा मात्र विषय चांगला असूनही कथा म्हणून तितकिशी जमली नाही.
नाऊमेद न होता लिहित रहा... मायबोली हे खुले व्यासपीठ आहे कुठल्याही विषयाचे या विचाराचे वावगे नाही असे समजून लिहा.
पठडीबाहेरचा विषय/विचार असला की तो मांडायला आवाज बुलंद हवा आणि त्याबरोबरच थोडा आवेष सुद्धा हवा...
वास्तवकथा लेखन तुम्हाला चांगले जमेल.
शुभेच्छा!

अरे शेवटचा प्रतिसाद दिला, पण अजून थोडं काही लिहिण्याचा मोह आवरत नाही.
@भरत - तुम्ही आणि नॉन कॉन्ट्रीब्युटिंग? असं म्हणायची कुणाची हिम्मत कशी होऊ शकते. सध्याच्या घडीला एका पडत्या राजकीय पक्षाची बाजू खंबीरपणे लावून धरणारे तुम्ही खरे लढवय्ये आहात. यु आर वन हू इज balancing द फोर्स! Wink
@हायझेनबर्ग - शपथ हाब, हा शेवटचा प्रतिसाद लिहिताना मला तुमची आठवण आली होती. शंभर वर्षे आयुष्य....

adnyatvasi,
really like & respect ur opinion. u hv literally not approved shubham's story as shringarik one where it had a very few bold statements. in one of my stories I have also taken help of few bold scenes where a husband realizes his simple wife's innocent & true love & falls in love with her.... it's about how you can fall in love with your partner after arranged marriage & come together in spite of being completely opposite nature.
I guess that can also be a reason for supporting shubham, coz smtimes the plot demands it....
(p. s. - it's not abt thr honeymoon but daily normal life)
I respect all of my literature & honestly not strong enough to handle ur negative responses so I don't think I can post them here.
Thank you
God bless you.
this is my last response. Happy

I think conversation goes wrong now... Bass kara ata ... Lihu dya na jyala je vatat te... India is independent country... So chill

मी माबोवरची चर्चा वाचली होती पण कथा वाचल्या नव्हत्या. या धाग्यामुळे कथा वाचल्या.
व्यसन कथा चांगली होती.
धाडसही चांगली आहे. ती रडू लागते त्यानंतरचा explicit उल्लेख, रुचाला काय वाटले तो पॅरा गाळून टाकला तर जास्त परीणामकारक होईल असे वाटले.
मर्यादा ही कथा तशी चाकोरीतली, पण मर्यादा ओलांडणार्‍या नवर्‍याच्या मनातले उलट सुलट विचार मांडणारी. चांगली जमलेय.
लफडं कथा वाचली नसती तरी चालले असते असे वाटले.
अगदी आक्षेप घ्यावा, माबोवर हे लेखन नसावेच असे म्हणण्यासारखे काही मला तरी कुठल्याच कथेबाबत काही वाटले नाही.
या कथांना आंबटशौकी का म्हटले ? मला वाटले इथे erotica ची लाट वगैरे आली की काय ? अर्थात आली तरी आक्षेप घेणारी मी कोण?

मायबोली हे मराठी संकेतस्थळ आहे. सर्वांना नम्र विनंती की इथे मराठीतच लिहावे. संपूर्ण प्रतिसाद इंग्रजी किंवा मिंग्लिशमध्ये वाचायला त्रास होतो.
बाकी चालू द्या.

अगदी आक्षेप घ्यावा, माबोवर हे लेखन नसावेच असे म्हणण्यासारखे काही मला तरी कुठल्याच कथेबाबत काही वाटले नाही. >>> +१

Pages