कथेचा शेवट अचानक दिल्याने माझी वाचक मंडळी निराश नाही ना झाली. पण मी या कथेची सुरुवात सस्पेन्स फ्लॅशबॅक ने केली आणि शेवट तसाच करतेय. तरच तिची एक साखळी पूर्ण होईल. सरळसोट आयुष्य आपल्या नायकाचं नाही.....फ्लॅशबॅक ने रंजकता वाढवण्याचा प्रयत्न केला इतकंच..माझा प्रयोग आपण स्वीकाराल ना? त्यातून काही नवीन साहित्यकृती जन्म घेत असते...सांभाळून घ्या. या भागात सगळे रहस्य उलगले आहे.
आता त्या 36 तासातल्या सर्व घटना सांगते.
********************************************
सरमिसळ एक भयंकारी रोमांच...अंतिम...?हयात रहस्याचा उलगडा...सुटका...
भयंकर विस्फोट आणि शक्तीचा प्रत्यय आल्यानंतर अविनाश आणि गंगा कितीतरी दिवस बेशुद्ध होते. जवळ जवळ 10 दिवसानी गंगा आणि अविनाश शुद्धीवर आले. सरकारी इतमामांत असल्याने त्यांची व्यवस्थित काळजी घेण्यात येत होती. देशासाठी हिरो होते दोघेही.
बंगलोरपासूनचा फ्लॅशबॅक..…
काय झाले होते तेव्हा?
अविनाश आणि गंगा अखेरीस कुठलंही विघ्न न येता मुंबई विमानतळावर पोचले. खरोखर चोख व्यवस्था होती. ते दोघेही कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांच्या साठी असलेल्या हेलिकॉप्टर कडे जायला लागले. गंगाला कळेना हे नक्की काय चालले आहे. एव्हढा बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था आपल्याला का दिली जातेय? ती आतून अस्वस्थ होती पण या घडीला हे दाखवणे योग्य नव्हते. अविनाशला तिची चलबिचल लक्षात आली. त्याला मात्र कल्पना असावी की हा एव्हढा इतमाम का आहे ते. त्याने योग्य वेळ पाहून तिला सांगायचे असे ठरवले होतेच.
हेलिकॉप्टरकडे जाताना गंगाला आपल्या बॅग मधल्या बाटल्यांचा काही अस्थिर आवाज जाणवला. अगदी काही क्षण. ते दोघे विमानात बसले. त्यातही सुरक्षा व्यवस्था होतीच. त्यांचे हेलिकॉप्टर टेक ऑफ करून बंगलोरला निघाले. आता काही तासात ते बंगलोरला पोचणार होते. रात्रीच डिनर च्या टेबल वर गंगा अविनाश आणि दाणी सर पुढचं प्लॅनिंग करणार होते.
सरतेशेवटी बंगलोरला पोचल्यानंतर तशीच चर्चा झाली.
"ओके, देन मिस्टर दाणी...वि विल प्रोग्रेस अहेड एज वि डिस्कस्सेड!"अविनाश म्हणाला.
"वेल मिस्टर अविनाश, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमची नेमणूक एक सिक्रेट प्रोजेक्ट वर झालीय...आय नो त्याबद्दल कारण तुम्ही कलीग सायंटिस्ट मध्ये आमच्या गंगा मॅडम ची निवड केलीत आणि त्यात मलाही इनवोलव केलाय...हे काय आहे? गंगा ठीक आहे की तीरसायन शास्त्रज्ञा आहे पण म्हणजे एक स्पेस सायंटिस्ट, बरोबर एक योग एक्स्पर्ट विजय, एक सायकीटरिस्ट...आणि एक अडाणी बाई...आय मिन यु अंदरस्टुडं राईट? काय प्रकार आहे हा?"दाणी सर भराभर त्यांचे प्रश्न अक्षरशः भडिमार करत होते.
"दाणी सर, हे खूप विचित्र आहे. आम्ही जेव्हा लास्ट कॉल वर बोललो तेव्हा अविनाश म्हणाला की अमेरिकेतले काही जिओलॉजिस्ट साऊथ अमेरिका, आणि नॉर्थ अमेरिकेच्या बॉर्डर वर काही पुरातन काळापासून च्या घटनांसाठी उत्खनन करत होते तेव्हा त्यांना काही विलक्षण प्रकाश लहरींचे अस्तित्व जाणवले. म्हणजेप्रकाश असूनही प्रचंड निगेटिव्हीटी. आणि काही सेवरल मीटर्स अंडर दे वेन्ट विदिन द अर्थ, आय मिन डीपर इंसाईड. त्यांना एक मंदिर सापडले, त्याचे मनोरे चार बाजूनी हिरव्या लाल रंगाचा फ्लूओरो संट म्हणजे चमकदार रंगात रंगवलेले होते. त्यात काही शिलालेख लाईक सापडलं. त्यांनी इमिजीटली ते स्कॅन करून अर्चिओ लॉजिकल इन्स्टिट्यूट कडे पाठवलं. सो वि हॅव द डेटा. त्यांनतर त्यांनी ते शिलालेख डिकोड करण्याचा प्रयत्न केला. थोडं यश आलं. पण व्हेरी फ्यु अल्फाबेट्स....लाईक देअर आर फ्यु मोर साईट्स ऑन द अर्थ आय मिन टू मोअर...व्हेअर सच कैन्ड ऑफ स्ट्रक्चर्स आर फाउंड....धिस वास अंडर ग्राउंड ड्यु टू टेकटोनिक ऍक्टिव्हिटीज...
त्यानंतर पुढे तिथली माती थोडं सॅम्पल घेऊन ते बाहेर आले. पण दे वेअर नो मोअर नॉर्मल्स...त्यांना भूकम्प जाणवला...ते तसेच निघाले....त्यांना खूप अस्वस्थ वाटत होतं. पण लवकरात लवकर त्यांना तो डेटा आणि त्या लिपीची माहिती योग्य ओथोरिटीज च्या हाती सोपवायची होती. त्यांच्याकडे एक महिना होता फक्त. त्यांच्याकडून ती लिपी वाचली गेल्यामुळे कदाचित काही विक्षिप्त घडलं होतं. त्यानंतर रोज रोज त्या दोघांना आकडी आणि वेडगळ झटके यायला लागले. कदाचित दे न्यू व्हाट्स गोइंग टू हप्पन टू देम...पण त्यांनी ठरवलेलं काम पूर्ण करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली. आता ती लिपी एक फिफ्टी परसेन्ट डिकोड केलीच होती. पण ते काम पूर्ण झालाच नाही. कारण त्या दोघांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले...त्यांनी त्यांच्या लॅब मध्ये स्वतःला कोंडून घेतले. आणि लॅब एक निर्जन ठिकाण बघून तिथे शिफ्ट केली होती. होऊ नोबल अँड कैन्ड दे वेअर...!त्या दोघांनी त्यांची लास्ट आठवण म्हणून त्यांच्या वरीष्ठना एक मेल पाठवला त्यात त्यांची अवस्था म्हणजे काळे पडलेले शरीर एकाच्या अंगावर हिरवे पट्टे आणि दुसऱ्याच्या कान नाक आणि डोळे यातून निघणारा लाल द्रव...एक महिन्याने ते प्रचंड मोठा स्फोट होऊन मेले!म्हणतात की त्यावेळेस जवळच्या शहरामध्ये मे बी पनामा सिटी किंवा मेक्सिको सिटी इत्यादी रात्री लाल आणि हिरवा प्रकाश बघायला मिळाला...
आमच्या या दोन दिवसांच्या कॉन्फरन्स मध्ये हा विषय मुख्य होता! …"अविनाशने सांगितले.
"हो पण तुम्ही स्पेस सायंटिस्ट आहात ना? मग यात इनवोलव कसे?.."दाणी सर म्हणाले...
"सर, अविनाशच्या त्या काँफेरेन्स मध्ये हे प्रकरण एकट्या विज्ञानाच्या हातात नाही हे कळलं यात अनेक सो कॉल्ड पुरातन मिथस ऍक्टिव्ह असल्याची खात्री होती. म्हणून त्यातले एक्सपर्ट विजय सर..आणि काही एक्स्ट्रा टेरेस्त्रीयल फेनोमेन यात आल्याने अविनाश..तो या बाबतीत अतिशय कुशल मानला जातो..आणि मी सध्या इन ऑरगॅनिक कम्पोउंडस च्या स्पेक्ट्रम्स वर काम करतेय म्हणून मी. दाणी सर मला अशी शंका आहे की काही सेल्फ लिमिटिंग इन ऑरगॅनिक चैनस यात ऍक्टिव्ह आहेत....लाईक रोबोटस...मग काही कंपाऊंड वापरून कदाचित अशा स्वयंप्रकाशीत आणि स्वतःला नियंत्रित करू शकणाऱ्या एनर्जींज असू शकतील का? आय हॅव दिज बॉटल्स, बिलिव्ह मी दे मॅटर इन दिज बॉटल्स रिस्पॉन्ड्स व्हेरी वेल टू इंडियन गायत्री चांट!'आय थिंक ते ऍक्टिवेट झालं असावं...कदाचित लाईक अ रिमोट ऑर अ बॉम्ब" गंगा म्हणाली...
"आय थिंक गंगा, यु हॅव व्हेरी लेस टाइम...आटोमयझर वापर, तुला जी इन्स्ट्रुमेंट्स हवीत ती वापर...हे थोडं थोडक नाही...."
"एनी वेज, गंगा आता जाऊन झोपुया...उद्या काही करून याचा छडा लाव तू...दाणी सर..सॉरी वि टेक युअर लिव्ह...सपोर्ट साठी थँक्स...."अविनाश म्हणाला.।
"नो यंग मॅन..अरे मी फक्त माझी ड्युटी करतोय...खर अडवेनचर तुम्ही करणार आहात...गो अहेड यंगस्टर्स.गंगा लॅब मध्ये भेट उद्या...तुला पावन आणि नीलम असिस्ट करतील बाकी मिस्टर अविनाश आणि मी आहोतच."
ओके सर. म्हणून सगळे आपल्या आपल्या स्थानी परतले..
दुसऱ्या दिवशी सकाळी गंगा आणि सगळे साथीदार त्या लॅब मध्ये सगळे इक्विपमेंट्स घेऊन कामाला लागले. जिवावर उदार होऊन हे सगळं होत होतं. [गंगाला अनेक टेस्ट लिमिटेड वेळात करायच्या होत्या.म्हणजे रात्र थोडी सोंग फार..त्या तीनही बाटल्यात काही विलक्षण रासायनिक अभिक्रिया घडली होती. जी सुप्त अवस्थेत होती. कैक वर्ष......हजारो वर्ष....हा काळ बरीच रहस्य दडवून गेला....
गंगाने स्पेसिट्रोफोटोमीटर, ऑटोमायझर या सारखे इक्विपमेंट्स वापरले...तीला त्या मिश्रणातील रासायनिक घटक जाणून घ्यायचे होतेच पण त्याची डेन्सिटी , केमिकल बेहेविअर, त्याचा जन्म कालावधी....इत्यादी.......आणि मुख्य त्याचा स्पेक्टरम....
म्हणजे प्रकाश ऊर्जा.....पांढऱ्या प्रकाशाच्या सात घटक रंगापैकी.....आणि इनव्हिजिबल रिजन च्या कोणत्या भागात नक्की प्रकाश ऊर्जा शोषली जाऊन उद्दीपन म्हणजे ऊर्जा उत्सर्जित होते...बाहेर सोडली जाते....आणि गायत्री मंत्राचा इतका प्रभाव कि त्यात नक्कीच काहीतरी अक्षय ऊर्जा स्रोत आहे......
गंगाचे काम सुरु असताना अविनाश आणि दाणी सरानी तिला लन्च साठी बोलावले...त्यावेळेस त्यांच्यात पुढच्या गप्पा सुरु होत्या...इतक्यात अविनाश चा मोबाईल वाजला.....वत्सल आत्याचा फोन होता..." अव्या....आर म्या शांताशी बोलले हाय.....आर लै मोठं कारस्थान हाय......"
"होय होय ...मावशी तू आधी शांत हो आणि नीट सांग......" अविनाश म्हणाला. वत्सल आत्याला धाप लागली होती...
"ऐक पोरा....किती येळ लागलं तुला आन गंगीला? टाइम लै कमी हाय.....शांतीने लै मोठी म्हैती सांगितली हाय बग...म्या काय म्हणती....पुढच्या ३० तासात काय बी हुईल....आपल्या देवकीचा फोन आल्ता....लै घाईत हुती.....त्यांना नवीनच सम्पवू शकतो बग.....आमी पारगावला निगतो हाय.....त्ये मोट शक्तीस्थान हाय....त्येंचं....त्ये उगवले तितच ....आन मारत्याल बी तितच......."
वत्सलने एका दमात सगळे सांगितले....
" मावशी.....व्हॉट? पारगाव?...आता? अग पण.....विजय सर कुठे आहेत....शांता?...."
" आता नीट आइक....विजय सरानी पोलिसांना आणि मुंबईतल्या शासकीय संस्थेला कलीव्हलं हाय...ह्यो समदा भाग रिकामा करावा लागलं....शांतीचं शरीर आता बॉम्ब गोळ्यावानी फुटल....शांती अदुगरच ह्ये जग सोडून ग्येली हाय....तिनेच ह्ये आम्हास्नी सांगितलं हाय....तिने त्ये शिलालेख वाचलं हैत.....त्याचं समदं कागूद पारगावात हाईत...त्ये गोदा व्हैनि शोधून दिल....बस्स तुमचं काम सम्पवा आन निगा......देवकी तितच यील,आता प्रशन बकुळाचा हाय, तीच आन द्येवकिच काय झालं हाय त्ये गावात अमी जातूय तवा कळल "
"ओके....." अविनाशने हा शब्द उच्चारेपर्यंत....वत्सलने फोन ठेवलं....."अरे बापरे....गंगा आम्ही आलो काय आणि हे सगळं ;इतक्या वेगाने घडले ......"
इतके नक्की आता
यात अडकून रहाणे काहीच कामाचे नव्हते....गंगेला काही डेफिनेट रिजल्ट आले होते....ती जेवण झाल्यावर दाणी सर आणि अविनाशला घेऊन ती लॅब मध्ये आली आणि स्क्रीन वरचे....डिटेल्स पाहून अविनाश तीन ताड उडाला....एकतर या तीन बॉटल मधील लाल आणि हिरव्या गोळ्यांच्या आकारात कमालीची वाढ झाली होती आणि त्यातून बीटा कणांचा किरणोत्सार सुरु होण्यास काही तास शिल्लक असल्याचे दिसले होते.....कदाचित त्यांच्या अणूत काही बदल होत होते...
खरतर मोठ्या आकाराचे अणू किरणोत्सार करून लहान अणूत पर्यायाने दुसऱ्या प्रकारचा पदार्थ बनतात...पण इथे उलटे होत होते....छोटा अणु मोठ्यांचे रूप घेत होता...त्यातून आता ऊर्जा उत्सर्जन सुरु होणार होते.....कदाचित एक साखळी प्रक्रिया? साखळी अभिक्रिया?सूर्यावर घडते तशी....
गंगा जवळील विविध एमिशन स्पेक्टरम वरून काही नीट निदान करता येत नव्हते.....पण एक नक्की कि एक अनियंत्रिट्रीट साखळी रसायनिकी अभिक्रिया सुरु झाली होती......
अणुभट्टीत काही विशिष्ट पदार्थ वापरून आण्विक क्रिया थांबवता येते....गंगाने एक रिस्क घ्यायची ठरवली....अविनाश स्थिर होता. गंगाने त्यात स्टेबल रिएजंट टाकला....आणि ते ठेऊन दिलं,त्यावर टॅगिंग केलं .....तिच्या डोक्यात काही वेगळाच विचार आला....आता तिने काम थांबवलं......
लॅब सील केली.दाणी सर , स्वतः गंगा आणि अविनाश....दाणी सरांच्या केबिन मध्ये बसले.
गंगाच्या डोक्यात नक्कीच काही प्लॅन होता.
"अविनाश निट ऐक. आत्या म्हणाली कि शांताच्या शरीराचा स्फोट होईल....आता त्याला तीन तास झाले....बरोबर? म्हणज ती घटना घडून गेली....अगदी तशीच घटना...जी त्या अमेरिकन लोकांच्या बाबतीत घडली....आता आधी म्हटल्याप्रमाणे उत्तर अमेरिका खंड आणि दक्षिण अमेरिका खंड यांच्या सीमारेषेवर एका ठिकाणी पारगावच्या जंगलातल्या भग्न मंदिरसम वास्तूप्रमाणे एक वस्तू उत्तखननात मिळाली पण शिलालेख वाचण्याच्या घोडचुकीमुळे....ते दोन्ही संशोधक या असल्या हिरव्या आणि लाल शक्तींच्या कचाट्यात सापडून मृत्यू पावले....
अशा तीन जागा होत्या.....एक आपलं पारगाव....दुसरं अमेरिका आणि तिसरं....म्हणजे पॅसिफिक महासागराच्या लाईन ऑफ फायरच्या जवळ कुठेतरी....पण सतत होणाऱ्या ज्वालामुखीय उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर....ते उध्वस्त झालं होते किंवा जमिनीच्या पोटात कुठेतरी गाडले गेले होते....आणि मुळात ते पाण्यात असल्यामुळे....कदाचित त्याची ऍक्टिव्हिटी कमी होती...."
"गंगा प्लिज नीट एलबोरेट कर हे सगळं...आणि नीट सांग"दाणी सर गोंधळून म्हणाले
"हो सर, सांगते, सर, मी माझ्या काही पर्सनल कॉन्टॅक्ट वरून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि या बरीच माहिती मला मेल केली होती ज्यात नासाच्या काही गाईडलाईन्स, काही अर्चिओलॉजीकल थिसीज आणि इतर काही आंतरराष्ट्रीय शोध संस्था आणि त्यांच्या कडे असलेले शोध निबंध. अविनाश आंतरराष्ट्रीय किर्तीचा अंतराळ तज्ञ असल्याने आणि ही पारगाव मोहीम एकूण जगाच्या दृष्टीने महत्वाची आहे, त्यामुळे माहिती सरळ मिळू शकली.." गंगा पूर्ण आत्मविश्वास गोळा करून सांगत होती.
" काही विशिष्ट ऑरा असणारी माणसं या शक्तींच्या निशाण्यावर असतात. ते नक्की कोण आहेत ते सांगू शकत नाही. पण ज्या अर्थी इतक्या सहजतेने ते भूगर्भात गेले त्या अर्थी तेच त्यांचे स्थान असावे.. पण आकाशातही ते बघण्यात आलेत. याना ठराविक आकार किंवा शरीर नसावं.याची ऊर्जा एव्हढी अबाधित कशी?ऊर्जास्रोत नक्की कोणता यावर नीटसं संशोधन करायला मिळालं नाहीय. हे परग्रह वासीं आहेत का यावरही नीट एकमत नाही. शक्ती हा शब्द नकारार्थी वाटतो मला. त्या उलट ऊर्जा ही आश्वासक आहे. यांचा ऊर्जास्रोत सूर्य आहे का भूगर्भात कुठलं अलौकिक इंधन आहे ते नाही माहीत. पण मी जे सॅम्पल अभ्यासले त्यावरून तरी ते किरणोत्सर्गी असावं...या सॅम्पल पासून त्यांना फायदा किंवा धोका आहे. आणि धोका का आहे ते पारगावला गेल्यावर समजेल. कारण याचा उलगडा शांता ने जे डिकोड करून ठेवलाय ते आणि देवकी वहिनीने अजून जी माहिती शोधली आहे ते जुळवून मग होईल.प्लस अविनाशचा जो डेटा आहे त्यात अमेरिका आणि पॅसिफिक मधील काही शिलालेखांचे लिपीचे डिकोड केलेले मटेरियल आहे....त्यावरून आपल्याकडे असलेली आणि ऍक्टिव्हटेड असलेली सम्पल्स आहेत त्यांचा उपयोग करता येईल. आणि त्यांचे म्हणजे त्या शक्तींचे निर्दालन फक्त ती खास व्यक्ती करू शकते.."
"हो गंगा पण ती खास व्यक्ती कोण आहे? तुला काय वाटत?" अविनाश म्हणाला.
"उममम, मला वाटत अविनाश ती अपल्यापैकीच कुणीतरी आहे. इथे जे वर्णन आहे त्यात म्हटल्याप्रमाणे ती व्यक्ती अशी स्त्री किंवा पुरुष आहे जे कोसमिकली रिसेप्टिव आहेत, त्यामुळे ओवर सेन्सिटिव्ह आहेत. ज्यांचे मेंदूचे तरंग खूप खोल नाहीत मेंदू 70 टक्के अलर्ट आहे असेच लोक याना हँडल करू शकतात. आणि इथे अशी माहिती आहे की असे लोक खूप कमी आहेत. त्यांना त्यांनी शोधून मारलंय आधी. गंमत म्हणजे असे लोक ते हवेच्या विरळ स्तर असतात तिथेच सूर्य तिरपी किरणे देत असताना शोधू शकतात.असे तीन लोक आहेत ज्यांना त्यांनि टार्गेट केलं.....देवकी वहिनी, वत्सल आत्या आणि आपला नवीन दादा..
यापैकी देवकी वहिनी नाही करू शकली. वत्सल आत्या हॅज अन ऍक्टिव्ह ऑरा...सो दे कॅन नॉट कम निअर टू हर. राहिला नवीन दादा आय थिंक तोच हे करू शकतो.पण तो करेल कसं?...."गंगाने चिंतेने कपाळाला हात लावला....
"ते बघून घेऊ गंगा...आता आपल्याला निघायला हवं. काही तास शिल्लक आहेत.लेट्स लिव्ह....आणि ते बॉटल्स च किट बरोबर घ्यायला विसरू नको."
अविनाश म्हणाला.
गंगाने होकार दिला आणि अर्धा तास मागितला. आणि सगळी तयारी केली....
योग्य ओथोरिटीज शी संपर्क झाला. आणि त्यांना प्लॅन समजावला गेला.......पुन्हा त्याच हॅलोकॉप्टर ने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अविनाश आणि गंगा पारगावला पोचले....
कितीतरी काळ वत्सल आत्याशी संपर्क झाला नव्हता. देवकीशीही संपर्क झाला नव्हता....
आता मोक्याचे 18 तास उरले होते.इतक्यात नवीनचा मेसेज आला. पारंगावातल्या त्याच्या घरी येण्यासाठी.
गंगा आणि अविनाश तिथे पोचले. गावात खूप अंधार होता. बहुधा तिथली माणसं गावातून निघून गेली होती.
नविनच्या घराचे दार उघडे होते...अविनाश आणि गंगा येताक्षणी झपकन लाईट लागले आणि एक खप्पड अर्धी जळकी कुरूप महिला गंगाच्या पायाशी पडली.
गंगा खूप जोरात किंचाळली...पटकन अविनाशला बिलगली..."ब ब बकुळा...."
"काय?"
अविनाश खेकसला!
"ह होय म्या बकुळाचं हाय!गंगे वलीखलस या आवदसेला? तुमचं समदं घर म्या बरबाद क्येल, तुज्या बा ला नादी लावलं. गोदाला बी म्याच संपवली. आन ह्यो म्हैपती नंतर फिरला...त्येला बी म्याच....पण आता म्याच बग कशी...ह ह ह "
"दुष्ट, काय म्हणायचं तुम्हाला बकुळा बाई? स्त्री जातीला कलंक आहात...चांगली शिक्षा मिळतये तुम्हाला...माझी दादा वहिनी आत्या कुठे आहेत? काय केलंस त्यांचं? अघोरी शक्ती पाचारण केल्यास...अग तुझ्या एका चुकीपायी आणि सूडाच्या आगीपायी पूर्ण जगाला विनाशाच्या दारी आणून सोडलंस" गंगा कडाडली
"व्हय, म्या बोलावलं त्यांना पन इस्वास ठिव जाणून बुजून न्हाय...गावकऱ्यांनी मला गावाभैर टाकलं...मी अन्न पाणी यावाचून मरून ग्येले पन त्या भग्न मंदिरात माझा आत्मा अडकला...आन तिथले दगुड म्या हलीवले....तवा तीत शांता आन समदी आली...तिचे मैतर आन त्येनं काय बाय मंतर म्हंटले त्ये त्या दगुड वर लिव्हले हुते, लिवून बी घेतले....आन चिमितकार झाला....काय हिरवे आन लाल प्रकाशाचे पट्टे आले आन मला त्या गुहेत घिऊन ग्येले...मला पूना शरीर दिल...म्या जित्ती झाले खरी पन काय बाय शक्ती मिळाल्या...आन म्या ह्यो डाव टाकला...."अखेरच्या घटका मोजत असलेली बकुळा श्वास कसाबसा घेत सगळं सांगत होती.
"बापरे बकुळा...पुढे सांग...."
"फार टाइम न्हाई ,आता म्या चालले...माजा बदला बी प पुरा हुईल...जे व्हायला नग पर त्येनच म्या मुक्त हुईल....आईका...गोदा ने एक पाण्याची बाटली पळीवली हुती..त्यात काय एक रसायन हाय त्ये मंत्र म्हणून त्येच्या अंगावर टाका त्ये निगुन जात्याल आन तुमची द द द्येवकी , आन ती वत्सल....आन त्यो इजय...सुखरूप हैत....अविनाश म्हणून कुनि हाय त्येला म्हनव्
आड पडदा हाय....पडद्याआड तीन पडदे हैत...तू न्हवं पर तूच जा आन शोध स समदी सापडत्याल....''
म्हणून बकुळाने प्राण सोडले....लपलप पडवीतला दिवा हलला...बकुळाचा प्राण दिगंताच्या दिशेने झेपावलं..
"बकुळा उठ...मला कळलं नाही…शी इज डेड..."अव्या म्हणाला
गंगा पुन्हा भावुक झाली..."गंगा प्लिज गेट अप, इमोशनल होऊन चालणार नाही...टीम थांबलीय...प्लिज तू आता पेपर्स लवकर शोध..."
गंगाने गोदाला हाक मारली...नविनला हाक मारली...कुणी प्रतिसाद देईना....
इतक्यात किर्रर्रर्र चीक चीक...असा काहीसा आवाज त्यांनी आतल्या खोलीतून ऐकला....काही लाल प्रकाश येताना दिसला माज घरातून...यावेळेस इंटेनसिटी कमी होती.....
"गंगाने महामृत्युंजय सुरू केला. एक पंधरा मिनिटं गेली...तिने आणि अविनाशने डोळे मिटले...झटाक....स्टिक स्टिक स्टिक म्हणून काही दूर फेकले गेले....गंगाने डोळे उघडले तर समोर लाल आणि हिरवी हिडीस आकृती होती...गंगाचा चेहरा उजळून निघाला होता...त्या शक्ती मागे मागे होत...घराच्या बाहेर पडल्या...त्यांची जाण्याची चाहूल लागताच आतून हालचाल ऐकू आली....
"गंगे आत यी, डागतर आन नवीन हितच हैत..."
गंगा आन अविनाश सावधपणे आत गेले. आत, नऊवारी पातळ नेसलेली एक तेजपुंज स्त्री उभी होती.
"गोदामाई..."गंगाने सहज म्हटले आणि तिला जाऊन बिलगली...."ह्यो तुमचा ठ्येवा...माजी यळ झाली आता...शांतीने लिव्हले त्ये कागुद ह्ये हैत...त्ये दोग सैतान हायेच घियला आले हुते पर तुमच्या येळवर यिन्यान पळाले...त्येंचा कर्दनकाळ ह्यो माझा पोर हाय...गंगे तुज्या हाती समदी मदार हाय....सांबाळ...काय झालंच तर म्या हाय...त्या दुस्टासनी धुळीला मिळल्याबगैर म्या जायची न्हाय."
दमडीही वेळ न घालवता गंगाने ते पेपर्स घेतले...डॉक्टर टंडन आणि अविनाशच्या मदतीने ते समजून घेतले...
तिन्ही साईट म्हणजे जिथे भग्न मंदिर होते तिथले शिलालेख अलमोस्ट डिकोड झाले होते....आता त्याचा एक चार्ट बनवायचा होता....नवीन मात्र नुसता हे बघत बसला होता...त्या तिघांचे अखंड काम सुरू होते...संध्याकाळ झाली...गंगाने चार्ट पूर्ण केला...
एक प्रकारचे सूत्रबद्ध स्तोत्र तयार झाले...तीन पानि होते...
"दादा हे घे उठ....तुला हे त्या भग्न मंदिरात जाऊन म्हणायचे आहे आणि या बॉटल्स त्या शक्तीच्या अंगावर ओतायचे आहेत....दादा जीवाला धोका आहे पण .."
नवीन संतापला..."गंगा मूर्ख आहेस का? म मी मरणाला किती घ घ घाबरतो ते माहितीय न?मी नाही जाणार."
"दादा.......अरे किती, किती अजून स्वार्थीपणाच्या कळसावर जाऊन बसशील...तुझं अख्ख कुटुंब उध्वस्त झालाय या भेकडपणा पाई....मला वाटत तू वाहिनीवर प्रेम केलच नाहीस...तिने मात्र तिचे प्राण धोक्यात घातले आणि...."गंगा ओरडली....
"प्लिज यार आता भांडत बसण्याची ही वेळ नाहीये....नवीन यार तू असा करशील तर देवकीला काय वाटेल? जगाची भिस्त तुझ्यावर आहे..."
इतक्यात आकाशात लाल हिरवे प्रकाशमान पट्टे दिसायला लागले ते अचानक गायब होऊन जमीन हदरायला लागली....
"दादा ,बघ......अवि जाऊ दे ह्या माणसाला सांग ते याला जोरो म्हणतात...तो स्पेशल आहे म्हणतात, म्हणून तर याला मारण्याचा प्रयत्न केलाय...पण आता नाही करू शकले....दादा त्यांच्या शक्तींची एकत्रित सरमिसळ आहे तुझ्यात...जर त्यांच्या हाती लागला असतास तर आज आपली पूर्ण पृथ्वी त्यांनी .... यु आर सस्पेतीबल....ते समजवीन...दादा प्लिज..."
जोरो हा शब्द ऐकल्यावर नवीन झपकन मागे वळला...त्या बाटल्या गंगाकडून खेचून घेतल्या......ते कागद खेचले आणि भडाभडा वाचले....
"ठीक आहे जातो मी..."म्हणून भरावल्यासारखा पारगावच्या जंगलाकडे गेला....
आणि धडाम...लाल आणि हिरव्या रंगाची सरमिसळ...आकाश आणि जमिनीच्या मध्ये प्रचंड वावटळ म्हणून घोंगावली....आता तिचा शेवट आकाशात झाला की जमिनीत हे मात्र एक रहस्य राहिले....
************************************
फ्लॅशबॅक सम्पला
वर्तमान...
अविनाश, देवकी , नवीन , गंगा, वत्सल आत्या, डॉक्टर टंडन , दाणी सर,विजय सर..सगळीच टीव्ही वरील गंगा आणि अविनाश यांची पत्रकार परिषद बघत बसले होते...
'विजय सर, कमाल केलीत तुम्ही...या एव्हड्या मोठ्या धमाक्यात या दोघींना घेऊन तुम्ही एव्हढे दिवस राहिलात??सॅल्युट."..अव्या म्हणला...
" अरे अविनाश मी काही केलं नाही.सगळा या देवकीचा प्लॅन...त्या शक्तींनी तिला पळवाव म्हणून त्या दिवशी बाहेर पडली. नंतर खुबीने तिथले शिलालेख पूर्ण ट्रान्सलेट केले आणि ते आम्हाला कळवलं...अरे त्यांचा म्हणजे त्या चिवट्या बवट्या शक्तींचा मोठा प्लॅन होता "विजय सर म्हणले.
"व्हय पोरा...लै वंगाळ...."
"सो माय गावरान गर्लफ्रेंड मला वाटलं की आता दुसरी...."अव्या फिदी फिदी हसत म्हणाला...
"हात मेल्या...इतकं समदं झालं..पर तू सुदरला न्हाईस..."वत्सल म्हणाली...
सगळेच पोट धरून हसले....
आता सगळ्या रात्री शांत होत्या...कुठलीही घुंगुरवाली काठी नाही की भयाण कविता नाही...सगळे गंगाच्या फ्लॅट वर जमले होते.
देवकी आणि नवीन यांनी बंगलोरला आपलं नवीन आयुष्य सुरू करण्याचा निर्णय घेतला. वत्सलही आता त्या सगळ्यांबरोबर बंगलोरला राहू लागली...डॉकटर टंडन मुंबईला परतले...आपली प्रॅक्टिस सूरु केली....विजय सर आणि अविनाश न्यूझीलंडला परतले....अविनाश जाताना गंगाला मात्र आपले कुणी आपल्यापासून दूर जातेय अशी हूर हूर लागली...
*****************†
सहा महिन्यांनी
मायामीच्या स्पेस रिसर्च सेंटर मध्ये एकच गडबड उडाली होती...."मिस्टर अविनाश...तुम्ही सांगताय ते खरंय का? हॅव यु रियली सिन टू ड्वार्फ प्लॅनट्स ? तेही या सूर्यमालेतील नसलेले ?"
"होय सर, त्या पारगाव मधील इनसिडन्स च्या आधी मी म्हटलं होतं की एक ग्रीन आणि एक रेड असे दोन ड्वार्फ प्लॅनट्स मी उर्ट्स क्लाउड जवळ पाहिले होते..."
इकडे मोठी खळबळ उडाली होती....नॅशनल जिओलॉजिस्ट इस्टिट्यूट ने दोन नवीन सुळके पॅसिफिक मधल्या लाईन ऑफ फायर जवळ डीटेकट केले होते....काही मेजर भूगर्भीय हालचालीतून....
************समाप्त******
ही कथा काल्पनिक आहे..यातले संदर्भ,स्थळे केवळ आणि केवळ कथेची गरज म्हणून आहेत...वास्तवाशी याचा काहीही सम्बन्ध नाही ...कुठलेही गैरसमज यातून निर्माण व्हावेत असा उद्देश नाही..।
Adhbut
Adhbut
धन्यवाद Happyanand
धन्यवाद Happyanand
छान झाली कथा
छान झाली कथा
Concept आणि विस्तारीकरण उत्तम!
पण का कोण जाणे, सुरुवातीच्या काही भागानंतर विस्कळीत वाटली मला.
जबराट! सुपरफास्ट झालाय शेवटचा
जबराट! सुपरफास्ट झालाय शेवटचा भाग. इतका कि परत वाचायला लागेल.
मन्या s...ओके,मनापासून आभार
मन्या s...ओके,मनापासून आभार
किल्ली, सुरुवातीचे अनेक धागे
किल्ली, सुरुवातीचे अनेक धागे एका गाठीपासून पुढे सुटले, आणि नंतर तिथेच येऊन पण वेगळ्या शहरात एकत्र मिळाले...त्यामुळे सगळी कॅरॅक्टर एकाच भागात आली...
मनापासून आभार किल्ली, मी पुढच्या प्रयत्नात आपल्या सूचनेचा नक्की विसर पडू देणार नाही...
वाह !! बहोत खुब.. अतिशय
वाह !! बहोत खुब.. अतिशय प्रभावशाली लेखन... अजुन उत्तमोत्तम लेखनाची अपेक्षा आहे तुमच्याकडून.
मस्त!
मस्त!
मध्ये काही भागांत थोडा वेग कमी झाला होता.
पण शेवट अपेक्षित असाच झाला.
उत्कंठावर्धक कथा, वेग आणि मर्यादित भागांमुळं उत्तम सादरीकरण.
धन्यवाद !
प्रसन्न हरणखेडकर, मास्टरमाइंड
प्रसन्न हरणखेडकर, मास्टरमाइंड मनापासून आभार
प्रसन्न हरणखेडकर, मास्टरमाइंड
प्रसन्न हरणखेडकर, मास्टरमाइंड मनापासून आभार
फार फार छान सिरीज. अगदी
फार फार छान सिरीज. अगदी खिळवून ठेवल शेवटपर्यंत.
मनापासून आभार urmilas
मनापासून आभार urmilas
केव्हडा तो वेगवान शेवट, २-३
केव्हडा तो वेगवान शेवट, २-३ वेळा वाचायला लागला ना ..
हो वेगवान झालाय खरंय....कथा
हो वेगवान झालाय खरंय....कथा प्लॅन मध्ये तशीच होती...
मनापासून आभार उनाडटप्पू
कुटुंबीय, आपण माझ्या पहिल्याच
कुटुंबीय, आपण माझ्या पहिल्याच कथामालिकेला खूप छान आणि स्नेहपूर्ण प्रतिसाद दिलात. काही त्रुटी सांगितल्यात, आवडलं तिथे कौतुक केलंत...त्यामुळे एनर्जी मिळत राहिली लिहायला...
सरमिसळ या कथामालिकेचे पुढचे पर्व लिहायला घेईन काही दिवसात...वेळ लागेल..आणखीन नीट काम करायचं आहे त्यावर...म्हणजे दोन भागात जो वेळ जातो तो जाणार नाही....
जो स्नेह आणि आशीर्वाद आहे असाच असू दे....
मनापासून आभार कुटुंबीय ,
दुसरे पर्व! अरे वा.. येऊद्यात
दुसरे पर्व! अरे वा.. येऊद्यात. वाट बघतीये..
हो. फ्रेमवर्क झालाय, पण आणखीन
हो. फ्रेमवर्क झालाय, पण आणखीन इनटॅक्ट लिहायचीय...वेळ हवाय त्यासाठी...एखाद दोन महिने तरी, पहिल्या पर्वाला लागला तेव्हढाच
हो. फ्रेमवर्क झालाय, पण आणखीन
हो. फ्रेमवर्क झालाय, पण आणखीन इनटॅक्ट लिहायचीय...वेळ हवाय त्यासाठी...एखाद दोन महिने तरी, पहिल्या पर्वाला लागला तेव्हढाच