Submitted by आशिष कांबळे on 27 March, 2020 - 04:48
काळजावर वार केले मारले नाहीं कुणी
मी जरा करपून गेलो जाळले नाही कुणी
आज माझे शेत सारे चांदण्यांनी बहरले
मागचे आकाश काळे न्हयाळले नाही कुणी
मार्ग होता मोकळा अन; पायवाटा मोकळ्या
पण सुखाची वाट धरुनी चालले नाही कुणी
माणसाने माणसाला का कळेना वंचिले?
गूढ मोठे आज येथे जाणले नाही कुणी?
मानवाचे जहर आहे;का विषाणू कहर तो?
आपुले ना कोण परके वाचले नाही कुणी
निसटले ते सर्व कोणी बुद्ध ज्यांनी वाचले
मोह माया क्रोध यांना गावले नाही कुणी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो पहिला मिसरा माझा आहे हे
अहो पहिला मिसरा माझा आहे हे नमूद तरी करा
मानवाचे जहर आहे;का विषाणू कहर
मानवाचे जहर आहे;का विषाणू कहर तो?
आपुले ना कोण परके वाचले नाही कुणी!!>>
करोनावर आहे का?
हो ....प्रयत्न केला आहे
हो ....प्रयत्न केला आहे
काळजावर वार केले मारले नाही
हो बरका...आपले नाव नमूद करण्याचं राहून गेलं....
काळजावर वार केले मारले नाही कुणी
मी जरा करपून गेलो जाळले नाही कुणी
मा. बेफिकीर जी...हे चालेल का?
सुचवा.....आपले मनःपूर्वक स्वागतच!