कोरोना आणि सक्तीचे वर्क फ्रॉम होम

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 March, 2020 - 10:54

धागा कुठल्या विभागात काढायचाय समजत नाहीये. सांभाळून घ्या. त्यावर वाद नको. ॲडमिन बघतील.

तर आज आमच्या ऑफिसमध्येही वर्क फ्रॉम होमची चाचपणी सुरू झाली. आमच्या फिल्डमध्ये हे फार अवघड आहे. एकाही कंपनीत हे होत नाही. त्यामुळे कधी याचा सामना करावा लागेल अशी मनाची तयारीही नव्हती. आणि घराची तयारी तर आजही नाहीये. उद्याही नसणारेय.

जसे बॅचलर लाईफ जगणारे विवाहीत लोकांकडे बघून उसासे टाकतात तसे आम्ही एकेकाळी आठ नऊ वाजेपर्यंत ऑफिसात पडीक असताना वर्क फ्रॉम होमवाल्यांवर जळायचो.
पण आता स्वत:वर ती वेळ येतेय तर काही सुचेनासे झालेय. सुट्टीच्या दिवशी मुले घरात असताना मी एखादा ऑफिसचा कॉल करायचे म्हटले तरी माझी तारांबळ उडते. दिवसभर ती डोक्यावर असताना वा त्यांना दुर्लक्षून घरात काम करायचे हे परमेश्वराचा शोध घेण्याईतकेच अवघड आहे.

जास्त डिट्टेलवार नाही लिहीत आता. भावना आणि समस्या समजून घ्या.
माबोवर समदुखी असतीलच. तर ही सिच्युएशन कशी हॅण्डल करायची यावर एकत्रित चर्चा करायला हा धागा !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकार वेड झालंय.
एकी कडे संचार बंदी आणि दुसरीकडे मुख्य मंत्री म्हणत आहेत अन्न धांन्य,मेडिकल,भाजीपाला,दूध चालू राहणार लोकांना बाहेरच पडू दिले नाही तर सामान कसे घरेदी करणार.

आधी वाचा , मग बोला
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1242083497512022019

चार पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यावर बंदी. चार चाकी वाहनात ड्रायव्हरसकट जास्तीत जास्त तीन लोक. तीन चाकी वाहनात दोन लोक.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1242050926254280709

वर्क फ्रॉम होममुळे सगळेच घरी आहेत . सगळे घरच वायफाय वापरतात. एरवी ठीक आहे , पण ऑफिसचा व्हीपीएन वापरायला सुरुवात केली की कनेक्शन प्रचंड स्लो होत , त्यामुळे मग फोनच हॉटस्पॉट वापरून काम करावं लागतं . ते ही गोगलगायप्रमाणे चालत .
यावर काही उपाय आहे का ?

मी माझा pc घरी न आणता कंपनीतच ठेवलाय. इथून anydeak ने त्याचा ऍक्सेस घेतो त्यामुळे 2 ते 3 mbps स्पीडसुद्धा मला पुष्कळ होतो.

त्यामुळे मग फोनच हॉटस्पॉट वापरून काम करावं लागतं . ते ही गोगलगायप्रमाणे चालत .
यावर काही उपाय आहे का ?>>
जाई , सिट्रिक्स रिक्वेस्ट करता येत का ऑफिस मध्ये ?
मला खरतर इथे वाचून आस्चर्य वाटल कि भारतात बर्‍याच कंपनीनी कसे काय याचा वापर सुरु केला नाहीये. तुमच्या घरच्या मशिनचा वापर करून तुम्हाला लॉग इन करता येते.

सीमा , सिट्रिक्स काय असते ? सॉरी मी आयटी क्षेत्रात नाहीये माझं काम लीगल फायनशीयल रेग्युलरिटीमध्ये आहे .
आम्हाला एक लिंक दिलीये , त्या लिंकवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे . मग रिमोट ऍक्सेस मिळतो मशीनचा / डेटाचा .

जाई खाली पहा. तुमचे ऑफिस हे वापरते का याची चौकशी करता येईल का हेल्प डेस्क कडे ?. बर्‍याच ऑफिसात हे असते परंतु नॉन आयटी लोकांना माहित नसते म्हणुन हेल्प डेस्क कडे विचारून बघा.

https://www.citrix.com/

टेक्सास गव्हर्नर डॅन पॅट्रिक म्हणतायत - कामावर जा. कोरोनाच्या अवास्तव भीतीपोटी देश आर्थिक संकटाच्या खाईत घालू नका. वयोवृद्ध नागरिक स्वत:ची काळजी घेतील.
_________
टेक्सास गव्हर्नर डॅन पॅट्रिक म्हणतायत - कामावर जा. कोरोनाच्या अवास्तव भीतीपोटी देश आर्थिक संकटाच्या खाईत घालू नका. वयोवृद्ध नागरिक स्वत:ची काळजी घेतील.
https://www.theguardian.com/world/2020/mar/23/trump-vows-to-open-up-our-...
________
ट्रंपही म्हणतोय की ' वी विल ओपन अप अवर कंट्री, रि-ओपन इकॉनॉमी' . जे काही होइल ते बघून घेउ. कारण रोग परवडला पण औषध आवरा म्हणायची वेळ येते आहे.

भारतात तर रोजंदारी वर जगणारे खूप आहेत... ट्रेन मध्ये खेळणी,कंगवा विकणारे...हमाल... रिक्षा वाले... मजदुरी करणारे... सेल्समन वगैरे...

मला कामाच्या स्वरूपामुळे वर्क फ्रॉम होम करता येत नाही. आता कार्पोरेट क्लोज्ड होम ऑफिस क्लोज् ड आणि फ्याक्ट्रीज पण क्लोज्ड. खरे क्वारंटाइन चालू झाले आहे.

इथले स्टार बझार दहा वाजता उघडेल

Pages