कोरोना आणि सक्तीचे वर्क फ्रॉम होम

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 March, 2020 - 10:54

धागा कुठल्या विभागात काढायचाय समजत नाहीये. सांभाळून घ्या. त्यावर वाद नको. ॲडमिन बघतील.

तर आज आमच्या ऑफिसमध्येही वर्क फ्रॉम होमची चाचपणी सुरू झाली. आमच्या फिल्डमध्ये हे फार अवघड आहे. एकाही कंपनीत हे होत नाही. त्यामुळे कधी याचा सामना करावा लागेल अशी मनाची तयारीही नव्हती. आणि घराची तयारी तर आजही नाहीये. उद्याही नसणारेय.

जसे बॅचलर लाईफ जगणारे विवाहीत लोकांकडे बघून उसासे टाकतात तसे आम्ही एकेकाळी आठ नऊ वाजेपर्यंत ऑफिसात पडीक असताना वर्क फ्रॉम होमवाल्यांवर जळायचो.
पण आता स्वत:वर ती वेळ येतेय तर काही सुचेनासे झालेय. सुट्टीच्या दिवशी मुले घरात असताना मी एखादा ऑफिसचा कॉल करायचे म्हटले तरी माझी तारांबळ उडते. दिवसभर ती डोक्यावर असताना वा त्यांना दुर्लक्षून घरात काम करायचे हे परमेश्वराचा शोध घेण्याईतकेच अवघड आहे.

जास्त डिट्टेलवार नाही लिहीत आता. भावना आणि समस्या समजून घ्या.
माबोवर समदुखी असतीलच. तर ही सिच्युएशन कशी हॅण्डल करायची यावर एकत्रित चर्चा करायला हा धागा !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळा कॅलिफोर्निया ( आणि जिकडे कुठे सक्तीचं घरी बसणं आहे ते प्रदेश, १४ तासाचा लाक्षणिक बंद आणि सेल्फ गोल टाळ्या असलं धेडगुजरी नाही) एक महिना घरात बसला तर ग्लोबल वॉर्मिग वर काही परिणाम दिसेल का? काही मानके असतील तर बघितलं पाहिजे.

वर्क फ्रॉम होम सगळ्यांसाठी:
लॅपटॉप द्यावे लागतात.हा खर्च क्र 1.
फक्त लॅपटॉप देतो, डेस्कटॉप काढून घेतो सगळ्यांचे असं बऱ्याच जणांबद्दल करता येत नाही.कारण काही सॉफ्टवेअर लॅपटॉप वर चालत नाहीत(हेवी 3डी मॉडेलिंग इ.)मग 2 मशीन एका माणसा साठी अडून बसतात.
लॅपटॉप देऊन व्ही पी एन कनेक्ट द्यावा लागतो.यात आय पी प्रोटेक्शन, फिशिंग ऍटॅक ही काळजी घ्यावी लागते.
काही सॉफ्टवेअर लायसन्स पर पर्सन नसून पर मशीन असतात.वेगळे मशीन उर्फ लॅपटॉप वापरल्यास एक लायसन्स खर्च होते.
इंटरनेट द्यावे लागते.डाटा कार्ड दिल्यास लोक त्याचा सिनेमे बघायला वापर करतात.
ही सर्व असेट कंपनी बाहेर न्यायला भरपूर फॉर्म, गेट पास भरावे लागतात.ब्युरोक्रसी अटळ आहे.
आयटी ऑडिट मध्ये फ्री वेअर डिटेक्ट होतात.घरी असताना अशी वेडी वाकडी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याची प्रवृत्ती वाढते.(कामात उपयोगी पण असुरक्षित, इंटरनेटवर कोणीतरी चोरी करून पेड सॉफ्टवेअर फुकट उपलब्ध करून दिलेली)
लोकांना तुमच्या घरचे इंटरनेट वापरा म्हटल्यास लोक कनेक्टिव्हिटी वाईट असल्याचे मुद्दे काढून घरी बराच टाईमपास करतात.
लहान मुलं लॅपटॉप वर बसतात, चहा सांडतात(हे प्रत्यक्ष घडल्याचं ऐकलं आहे)
घरात बाई असली, पाहुणे आले असले आणि घरचे फार समजूतदार नसले तर वर्क फ्रॉम होम ऑफिस मधल्या सारखे प्रॉडकटीव्ह 7 तास होण्याचा बँड वाजतो.किंवा बाई पहाटे 4 ला उठून उरलेले काम पूर्ण करते. तिच्या रुटीन चा बँड वाजतो.

वर्क फ्रॉम होम ही प्रवास ट्रॅफिक ऑफिस रिसोर्स वापरायला अत्यंत उत्तम कल्पना आहे.आणि तरीही घरी योग्य सेटअप नसल्यास ती अडीअडचणीला वापरायला बाजूला ठेवणं किंवा केस टू केस बेसिस वर देणं कंपनी जास्त पसंत करतात.

इतकी डोकेदुखी असेल तर सरळ Citrix server आणि VDI का वापरत नाही?
महिना ₹ १००० allowance द्यायचा आणि तुम्हाला आवडेल ते इंटरनेट आणि स्वत:चा लॅपटॉप/डेस्कटॉप वापरा असे सांगायचे.

आयपी प्रोटेक्शन. सिट्रिक्स पण सर्वाना पटते असे नाही.
प्रत्येक कंपनी ची याबाबत तत्व 'नॉर्मल ते अत्यंत येडपट आणि अतिशयोक्ती' या रेंज मध्ये डिफर करतात.
आमच्या देशातलं म्हणून अमकां व्ही पी एन सॉफ्टवेअर भारी, तेच वापरा, असंही होतं.यात एखादा अत्यंत जुन्या वळणाचा आयटी मध्ये पहिल्यांदा येत असलेला कस्टमर असला तर त्याचे नियम अजूनच तिरपागडे असतात(उदा. युरोप किंवा ईस्ट युरोप किंवा अमेरिका मधल्या 100-200 वर्षं जुन्या मेकॅनिकल कंपन्या)

' WFM ' चा खरा ताप आपल्यापासुन घरच्यानाच होण्याची शक्यता कुणालाच जाणवत नाहीय का ? Wink

अमितव आणि मी_अनु, धन्यवाद! बऱ्याचशा गोष्टी कळल्या. Going forward, BCP च्या दृष्टीने या सध्याच्या किचकट प्रोसेसेस मध्ये काही बदल होतील असं वाटतं का? May be it is worth investigating in a new work culture that is sustainable and more productive in the long run. अर्थात काही जॉब्स हे घरातून करता येत नाहीत हे गृहीत धरले आहे.

जिज्ञासा, खरं आहे.अश्या परिस्थिती बद्दल डिझास्टर कन्टीन्यूटी प्लॅन्स हवे हे बरोबर आहे.
पण भारतात बऱ्याच वेळा फंडिंग च्या तुटवड्या मुळे, लोकांच्या प्रायोरिटी फक्त तात्काळ प्रोडकटिव्ह गोष्टीत भांडवल गुंतवण्या कडे असल्याने फार कंपन्या हे करू शकणार नाहीत.
इमॅजिका सारख्या प्रसिद्ध आणि चांगली कमाई करणाऱ्या पार्क कडे अपघात झाल्यावर धड ऍम्ब्युलन्स नव्हती.स्काय स्क्रॅपर बिल्डिंग चे परवानगी वाले मजले किती, अग्निशमन दलाची शिडी किती उंच यांच्या गणिताचा ताळमेळ नसतो.गर्दीच्या जागी हॉटेल्स बार्स असतात, एक्झिट किंवा फायर व्हॅन ला रिव्हर्स घ्यायला जागा मिळेल इतका रस्ताही नसतो.
(आठवण इथे सांगायला अप्रस्तुत आणि भयंकर आहे पण बाबा गेले तेव्हा संबंधित बिल्डिंग मध्ये एकही स्ट्रेचर लिफ्ट नव्हती.11 व्या मजल्यावरून अरुंद लिफ्ट मध्ये देह उभा काही लोकांनी आधार देऊन धरून आणावा लागला.आता सर्व नव्या सोसायटी मध्ये एक स्ट्रेचर लिफ्ट असते.ती पाहून नेहमी तेच आठवते.)

<< पण भारतात बऱ्याच वेळा फंडिंग च्या तुटवड्या मुळे >>
फंडिंग हे फक्त कारण आहे, बाकी मूळ वृत्ती "जुगाड" आणि "चलता है" अशी आहे. बहुतेक ऑफिसमध्ये बिझनेस कंटीन्यूईटी प्लॅन नसतो. आग लागली तर काय करायचे ही तर दूरची गोष्ट झाली, पावसामुळे सलग 2-3 दिवस ऑफिस पूर्णपणे बंद झाले तर काय करायचे याचापण पत्ता नसतो.

मी_अनु, ह्या गोष्टी कधी पुसल्या जात नाहीत मनातून Sad
उ. बो., खरंय. BCP plans बरेचदा नसतातच आणि असले तरी कागदावर असतात फक्त!

१०१

आयटी कंपन्यांमध्ये फंडिंगचा तुटवडा!!
आयटी कंपन्यांमध्ये???......
फंडिंगचा तुटवडा????? .....
फंडिंगचा???!!!!!!....
लॅपटॉपसाठी???.....

लॅपटॉप देऊन व्ही पी एन कनेक्ट द्यावा लागतो.यात आय पी प्रोटेक्शन, फिशिंग ऍटॅक ही काळजी घ्यावी लागते.>>> बाबौ!!..केवढा खर्च! Sad

बरेच टीम मेम्बर्स 4 - 5 दिवसात घरून काम करून वैतागले. त्यातल्या एकाने हे पाठवले.
IMG-20200322-WA0084.jpg

खरे तुम्ही लेख पाडायला फार घाई करता. मीच पहिला असं म्हणत घाईघाईत चुकीची माहिती देता. असं नका करत जाऊ. एका MD झालेल्या माणसाचा वैद्यकीय विषय असणारा लेख चुकीचं असल्याचं दाखवून तो बंद करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

आता घरून नीट काम नाही केले तर नंतर काम देता का काम म्हणून दारोदार हिंडावे लागेल ☺️☺️
ज्यांना घरून काम शक्य नाही अश्याना भर पगारी रजा सर्वांनी देणे अपेक्षित आहे.(तरी सगळे देतील का माहीत नाही.यावर सरकारी कायदा निघाल्यास उत्तम.)
ज्यांना कोणीच कागदोपत्री वाली नाही, उदा. खाण्याच्या गाड्या वाले, लोकल मध्ये वस्तू विकणारे यांचे हाल आहेत.सर्वाना काहीतरी उत्पन्नाचा सोर्स मिळावा.

शांताबाई
उगाच आपल्याला पाहिजे ते तर्क लढवून भंपक अनुमान काढू नका.
इतकी जळजळ बरी नाही तब्येतीला.
मी धागा बंद अप्रकाशित करण्याची कारणं पूर्णपणे वेगळी आहेत. आणि ती मी तुम्हाला सांगावी अशी तुमची अजिबात लायकी नाही.

जाता जाता- एक 80 वर्षाच्या माणसाने ज्याला रक्तदाब मधुमेह आणि हृदयविकार आहे त्यानेWHO चे आकडे पाहून भयभीत होऊन मला विचारले की डॉक्टर माझं काय होणार?
त्यांचे सांत्वन कसे करायचे हे मी शिकलेलो आहे.

जे लोक तुम्हाला असले सल्ले विचारतात मला त्यांचं टेन्शन आहे ओ. तुम्ही त्याला सांगायचे -
तुम्ही परदेशातून आला नाहीत ना मग तुम्हाला काही व्हायचे chances फार कमी आहेत. थोडे दिवस थांबा उन्हाळा येतोच आहे मग करोना पळून जाइल.
बिचारे.
You are irresponsible doctor.

जामोप्या, आपण इतर अनावश्यक प्रतिसादांकडे दुर्लक्ष्य करून स्वत:ही इथे ह्या धाग्यावर थांबावे अशी विनंती आहे. कोणीतरी थांबले पाहिजे. हा मनाचा मोठेपणा आपण दाखवावा. आपल्याविषयी थोडा आदर आहे म्हणून लिहिले.

मी जमोप्या नाही ना शांताबाई. तरी आपल्याला विनंतीस मान देऊन मी थांबतो. सॉरी.

ज्यांना घरून काम शक्य नाही अश्याना भर पगारी रजा सर्वांनी देणे अपेक्षित आहे.(तरी सगळे देतील का माहीत नाही.यावर सरकारी कायदा निघाल्यास उत्तम.) >> भर पगारी रजेला पैसे कोण देणार? सरकार आर्थिक मदत देण्याबाबत काहीच बोलत नाही, नुसतं टाळ्या वाजवायला सांगते. त्याने मनोबल वाढणार असेल तर चांगलंच आहे, पण आर्थिक बाबतीत काय?
खाजगी दुकानं / उपहारगृह/ विमान कंपन्या/ वाहतूक करणाऱ्या एजनसी इ. इ. बंद झाल्यावर तिकडच्या नोकरांना काढून टाकतील.
अगदी स्किल्ड लेबर असेल तरी फार वेगळं होणार नाही, कारण नेहमीची मंदी आणि यात फरक आहे. यातून किती वेळ बाहेर पडणार नाही याचा काहीच नेम नाही. त्यातून मार्ग काढायचा तर सरकारी नियम नाही तर ठोस मदत विथ नियम गरजेचे आहे.

झंप्या दामले, सॉरी . मी आधीचा ब्लॅक कॅट यांचा प्रतिसाद पाहिला आणि त्यांचेच उपप्रतिसाद असावे (पुढील प्रतिसाद उडते वाचून) असे गृहीत धरले. आपण ब्लॅक कॅट नाही हे मला माहीत आहे. एका आय्डीचा विरोधी प्रतिसाद पाहिला आणि आता प्रति प्रतिसादांची माळ लागणार असे वाटल्याने ते लिहिले. पण आपण ते मानले याचा आनंद आहे.

मदत किती जणांना देणार, त्याचा लेखाजोखा कसा ठेवणार,तितके फंडिंग आहे का असे बरेच किचकटपणे असतील.
मला स्वतःला यावर चांगला उपाय सुचत नाही.पण कोणी श्रीमंत पुढे आले, त्यांनीही आर्थिक साहाय्य दिले आणि सगळ्यांनी मिळून लोक उपाशी मरणार नाहीत असे पाहिले तर उत्तम.माझ्या आणि इतर नोकरदारांच्या लेव्हल वर 1 दिवसाचा पगार डोनेट करणे वगैरे करता येईल.(योग्य ठिकाणी जाणार असे खात्री करून)
नाहीतर दुष्काळी आत्महत्या सारख्या करोना आत्महत्या असा नवा प्रकार हाताळावा लागेल.
(मला हा धागा सरकार, आधीचे सरकार, याने काय केले, तो काय करतो , नंतर ड्यूप्लिकेट आयडी,शिव्या,कोण कोणाचा कोणत्या वेब साईट वरचा पूर्वजन्म यावर विचार करणे या सगळ्यावर जाताना बघायची इच्छा नाहीय.कारण त्यासाठी बरेच धागे चालू आहेत.पण जाणार असेल तर जाऊदे बापडा ☺️☺️आपण शांत राहावे)

शाळा कॉलेजे बंद आणि वसतीगृहेसुद्धा बंद अशा स्थितीत ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांची फार अडचण होत आहे.
गावी परतण्याचे मार्गही बंद आहेत. वसतीगृहे सुरू राहिली असती तर थोडी मदत झाली असती. मुंबईतील काही गुरुद्वारांनी सर्वांसाठी लंगर सुरू केले होते पण जमावबंदी आणि संचारबंदीत काही करणे शक्य दिसत नाहीय.

हॉस्टेल मालकांनीच विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले आहे. शनिवार रविवार मार्केट यार्ड बंद असल्या मुळे मेस बंद होत्या त्या आज सुरू नाही झाल्या. मला वाटतं लोकांना ( काही अंशी सरकारला) आशा परिस्थिती काय करायचं तेच माहीत नाही. काही गोष्टी फार क्लिअर नाहीत. जसे की परिवहन व्यवस्था बंद असली तरी मी लोक आपापल्या गावी जाऊ शकतात का?

पिंपरीचिंचवडच्या विध्या जोशींनी व्हॉटसअपद्वरे आवाहन करून विध्यार्थांना मोफत डबे चालू केले आहेत.
माझ्या वर्गमित्राने कोल्हापूरला जे विद्ध्यार्थी आहेत त्यांची सोय नसल्यास सोय करण्याची तयारी दर्शवली आहे.

ध लिहिता येत नाही,अशुद्ध लेखनाबाबत क्षमस्व.

Pages