Submitted by मामी on 18 March, 2020 - 01:31
मायबोलीवरील एखादा धागा आठवत असतो पण नक्की कोणाचा होता, कुठे शोधावा कळत नाही. कीवर्ड्स देऊनही सापडत नाही अश्यावेळी इतर मायबोलीकरांकडे विचारणा करण्यासाठी हा धागा. एकमेकां साह्य करू...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी,
मामी,
छान आहे धाग्याची कल्पना
तुम्हाला हवा असलेला लेख सापडेना ह्याच वाईट वाटतंय, पण त्यामुळे नविनविन कायकाय वाचायला मिळतंय.
लवकरच तो लेख सापडो
धन्यवाद :स्मितः
धन्यवाद :स्मितः
इथे लिहिल्यापासून ती कथा वाचण्याची तळमळ जास्तच वाढलीये.
>>>इथे लिहिल्यापासून ती कथा
>>>इथे लिहिल्यापासून ती कथा वाचण्याची तळमळ जास्तच वाढलीये. Proud>>> लिहील्याने विचार पक्के होतात हा माझा अनुभव आहे. त्यामुळे खरे तर तक्रारवजा लिहीणे शक्यतो टाळावे. कारण त्यामुळे त्या लिखाणातील नकारात्मकता अधिक पक्की होते हा अनुभव. मला स्वतःलाच तो नियम पालन करण्याची गरज आहे. असो
एक फुटकळ नावाचा लेख होता,
एक फुटकळ नावाचा लेख होता, त्याचे चल फूट, कळ्ळं? असे मस्त विडंबन होते. ते खूप शोधले पण सापडले नाही. कोणाला सापडले तर द्या प्लीज Happy >> मूळ लेख टण्याचा होता - सध्याचा आयडी टवणे सर.
इथल्या लोकांचा वाचन झपाटा
इथल्या लोकांचा वाचन झपाटा भयानक आहे.
खूपच उपयोगी धागा मामी.
खूपच उपयोगी धागा मामी.
मी पण एक धागा शोधत आहे खूप दिवस. एका मुलीने तिच्या बाबांच्या आठवणी लिहिल्या होत्या. त्यांचा बंगला असतो. आईबाबा भाऊ असे चौकोनी कुटुंब. दुर्दैवाने पुढे वडिलांचं घरी राहायला आलेल्या एका बाईबरोबर विबासं होऊन ते दुसरे लग्न करतात. हे कुटुंब तुटते. पण बालपणीच्या त्या आठवणी फार छान लिहिल्या होत्या.
होय आठवतोय तो लेख. खूप छान
होय आठवतोय तो लेख. खूप छान मैत्र होते वडिलांशी अगोदर, पण नंतर आईवरील अन्यायानं खूप कटुता निर्माण झाली होती लेखिकेच्या मनात.
मागे कधीतरी एक विनोदी लेखन
मागे कधीतरी एक विनोदी लेखन वाचनात आले होते काथ्याकुट अस काहीतरी नाव होत..त्यात खूप सारी पात्र होती एका मैत्रिणीच्या शोधत ते सगळे फिरत होती आणि प्रत्येक वेळी नवीन काहीतरी समोर येऊन खूप गोंधळ होत होता..
लेखकाचे नाव आता आठवत नाहीये आणि काहीतरी सव्वा आठ भाग पर्यंत वाचले होते नंतर पुढचे भाग काही सापडले नाहीत
काथ्याकूट मलाही आवडली होती.
काथ्याकूट मलाही आवडली होती. चैतन्य रासकर ने पूर्ण नाही केली ती हीच का? असो. हे पहा
https://www.maayboli.com/node/68522
हो हो..हीच ती..हे सगळे भाग
हो हो..हीच ती..हे सगळे भाग वाचून झालेत माझे..पण आता पुढचं वाचता येणार नाही
मामी तुम्हाला धागा शोधायला
मामी तुम्हाला धागा शोधायला मदत पेक्षा, तुमच्या डोक्यातील धाग्याचा क्लू शोधायला मदत पाहिजे अस दिसतय.
खरंय खरंय, विक्रमसिंह
खरंय खरंय, विक्रमसिंह
कोणालाच कसा आठवेना मामी
कोणालाच कसा आठवेना मामी म्हणतेय तो धागा? मामी, अजून काही तरी क्लू दे.
धागा शोधा असा एक खेळ होऊ शकतो
धागा शोधा असा एक खेळ होऊ शकतो.
आधी थोडीशीच माहिती द्यायची. त्यावरून नसेल सापडत तर एक एक करत पुढील क्लु देत जायचे.
वेताळच पालखी घेऊन पळाला.
वेताळच पालखी घेऊन पळाला.
विक्रमसिंह यांनी सिक्सर
विक्रमसिंह यांनी सिक्सर मारलाय.
मामी आऊट झाल्या का?
मामी आऊट झाल्या का?
हे बरंय तुझं मामी! तुला सापडत
हे बरंय तुझं मामी! तुला सापडत नाही म्हणून इतरांना कामाला लावायचं
मला वाटतंय अमानवीय
मला वाटतंय अमानवीय धाग्यावरचीच कुठली तरी पोस्ट असणार ती. सगळी पानं चाळून बघा मामी.
मला वाटतंय अमानवीय
मला वाटतंय अमानवीय धाग्यावरचीच कुठली तरी पोस्ट असणार ती. सगळी पानं चाळून बघा मामी. >>> ह्म्म. बघते. आता तेच करावं लागेल.
कोणालाच कसा आठवेना मामी
कोणालाच कसा आठवेना मामी म्हणतेय तो धागा? मामी, अजून काही तरी क्लू दे. >> बघ तरी! कोणालाच आठवेना.
मी मला कथेतलं जे आठवतंय ते लिहीते इथे.
कथा :
इंग्रजी कथेचा अनुवाद असल्यासारखी भाषा आहे.
(कदाचित, नक्की माहीत नाही) कोणत्यातरी इंग्रजी कवितेवर आधारीत असावी किंवा लिहीताना मुद्दाम तशी शैली वापरली आहे.
एका स्त्री आयडीनं लिहिलेली कथा आहे.
सरदार ( किंवा राजा), त्याची कन्या, तिला काहीतरी शाप म्हणा किंवा मेडिकल कंडिशन म्हणा म्हणून एका गढीत वा किल्ल्यात ठेवलंय. बाहेर पडायची परवानगी नाही. रात्री ती बागेत फिरते किंवा तत्सम काहीतरी. एकदा तिला काहीतरी स्वर ऐकू येतो अथवा सुवास येतो. मग ती शोधायला बाहेर पडते .
पुन्हा हेच की नक्की नाही पण साधारण ३-४ वर्षांपूर्वीची असावी.
मला फारच अंधूक आठवतंय पण शैलीमुळे ती कथा खूप आवडली होती. म्हणूनच तर पुन्हा वाचायची आहे .
हे बरंय तुझं मामी! तुला सापडत
हे बरंय तुझं मामी! तुला सापडत नाही म्हणून इतरांना कामाला लावायचं >>>
इतरांना मदत हवी असेल तरी करीन हो.
सापडली सापडली.
सापडली सापडली.
कथेबद्दल विचार करत असताना अचानक लेडी शार्लट आठवलं. हे शब्द शोधात देऊन काही मिळालं नाही. शार्लट देऊनही काही सापडेना. मग लेडी शब्द शोधला असता भारतीताईंनी लिहिलेली ही अप्रतिम कथा मिळालीच एकदम.
लेडी शेलॉट : एक आख्यायिका : https://www.maayboli.com/node/45548
चला बरं झालं, तुलाच सापडली ते
चला बरं झालं, तुलाच सापडली ते
हुश्श ऽऽऽऽ सुटले सगळे
हुश्श ऽऽऽऽ
सुटले सगळे
मला पण एक धागा द्याल का शोधून
मला पण एक धागा द्याल का शोधून कोणी? एक चित्रपट विषयी लेख होता...कोरियन का चायनीज मूवी...नायक नायिकेला प्रत्यक्ष भेटता येत नसत...
तिने खूप दिवस त्याला पाहिलेलं नसतं म्हणून तो स्वतः च्या ऑफिस खाली येऊन उभा राहतो जेणे करून तिला पाहता येईल...घरी जाताना तिला तिथून जायला त्यांनी सांगितलं असतं...
खूप पोटात तुटलं होत ते सगळं वाचून...लेखिकेने खूप सुंदर शब्दात लिहिलं होत सगळं...ब्लॉग पण सगळे शोधून बघितले ..कुठेच सापडत नाहीये....लिहिणारी लेखिकाच होती हे मात्र नक्की...
सापडली सापडली>> हुश्श
सापडली सापडली>> हुश्श
पण तो ट्रेकिंगचा धागा राहिलाय ना अजून !
पण तो ट्रेकिंगचा धागा राहिलाय
पण तो ट्रेकिंगचा धागा राहिलाय ना अजून ! >> तो मिळेल तेव्हा मिळेल. घाई नाही. :स्मितः
मामी गेले २-३ दिवस इथे येउन
मामी गेले २-३ दिवस इथे येउन चेक करत होतो सापडले का ते, आणि थोडे आठवायचा प्रयत्न केला पण आता लक्षात आले की वाचलेच नव्हते. आता वाचला तो लेख. मस्त आहे.
अरे व्वा. मस्त धागा. मी खूप
अरे व्वा. मस्त धागा. मी खूप दिवस झाले एक कथा शोधतेय पण मला लेखकाचं नाव आठवत नाहीये. कथा साधारण नवरा बायकोच्या नात्यावर होती. प्रेमविवाह असतो आणि आदल्या रात्री प्रचंड भांडण होतं. ती माहेरी जायला निघते आणि तो काहीच न झाल्यासारखं तिच्या सोबत निघतो त्या प्रवासात they fall for each other again. थोडक्यात गोडुला शेवट होता तेव्हा फार आवडली होती. कुणाला आठवली तर प्लिज हेल्प.
Pages