धागा कुठल्या विभागात काढायचाय समजत नाहीये. सांभाळून घ्या. त्यावर वाद नको. ॲडमिन बघतील.
तर आज आमच्या ऑफिसमध्येही वर्क फ्रॉम होमची चाचपणी सुरू झाली. आमच्या फिल्डमध्ये हे फार अवघड आहे. एकाही कंपनीत हे होत नाही. त्यामुळे कधी याचा सामना करावा लागेल अशी मनाची तयारीही नव्हती. आणि घराची तयारी तर आजही नाहीये. उद्याही नसणारेय.
जसे बॅचलर लाईफ जगणारे विवाहीत लोकांकडे बघून उसासे टाकतात तसे आम्ही एकेकाळी आठ नऊ वाजेपर्यंत ऑफिसात पडीक असताना वर्क फ्रॉम होमवाल्यांवर जळायचो.
पण आता स्वत:वर ती वेळ येतेय तर काही सुचेनासे झालेय. सुट्टीच्या दिवशी मुले घरात असताना मी एखादा ऑफिसचा कॉल करायचे म्हटले तरी माझी तारांबळ उडते. दिवसभर ती डोक्यावर असताना वा त्यांना दुर्लक्षून घरात काम करायचे हे परमेश्वराचा शोध घेण्याईतकेच अवघड आहे.
जास्त डिट्टेलवार नाही लिहीत आता. भावना आणि समस्या समजून घ्या.
माबोवर समदुखी असतीलच. तर ही सिच्युएशन कशी हॅण्डल करायची यावर एकत्रित चर्चा करायला हा धागा !
अनेकांना करायचे आहे पण मिळत
अनेकांना करायचे आहे पण मिळत नाहीये
(No subject)
मी गेले 4 महिने वर्क फ्रॉम
मी गेले 4 महिने वर्क फ्रॉम होम करतोय.
मस्त!
मस्त!
तुला नवनवीन धागे विणण्यासाठी शुभेच्छा!
मायबोलीकरांना तुझ्या पुचकट प्रतिसादांसाठी मानसिक बळ मिळो ही सदिच्छा!
आणि करोना गो, गो करोना, करोना गो... हा मंत्र जपून सर्वांनी करोना मुक्त रहा ही मनस्वी ईच्छा!
(ॐभग्न भुगे:भस्माते: अवनी ॐफट स्व:हा) या चालीवर.
मुलांना सांगता येतं की बाबाचं
मुलांना सांगता येतं की बाबाचं ऑफीसचं काम चालू आहे आणि तुम्ही मस्ती केली तर काम होणार नाही आणि बाबाला त्याचा बॉस रागवेल. शिवाय बाबाला पैसे मिळणार नाहीत इ इ. याचा फार वेळ नाही, पण थोडा वेळ तरी याचा इफेक्ट टिकतो. पण घरात जर दंगेखोर आणि अजिबात न ऐकणारा कुत्रा असेल तर ?????? बरं त्याला दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवलं तर तो ओरडून घर डोक्यावर घेतो, त्यामुळे लोकांना त्रास. आमच्याबरोबर रूम मध्ये ठेवलं तर सतत टॉईज आणून ठेवायची, दुर्लक्ष केलं तर खेळण्यासाठी ओरडायच, मांडीवर लॅपटॉपवर बसण्यासाठी हट्ट करायचा. WFH म्हणजे महान वैताग झाला आहे.
घरातून काम करता येईल अशी
घरातून काम करता येईल अशी क्षेत्र मोजकीच आहेत सर्वांना ते शक्य नाही.
एकूण वर्क फोर्स चा विचार केला तर खूपच किरकोळ संख्या असेल त्यांची.
सर्वात महत्वाचे साफ सफाई करणारे कर्मचारी ते घरातून काम करू शकत नाहीत.
तुम्ही स्वतःचे घर स्वच्छ ठेवलं पण परिसर स्वच्छ ठेवायला कर्मचारी हवेतच त्यांची काळजी नाही घेतली तर ते रोग प्रसार करू शकतील.
पोलिस,अग्नी शमक दल,सुरक्षा कर्मचारी,घरकाम करणारे,विविध सरकारी सेवा देणारे,भाजीपाला,अन्न धान्य पुरवठादार,वाहतूकदार,आरोग्य कर्मचारी,पाणी purvadha खात्यात काम करणारे,वीज कंपनीत काम करणारे किती तरी लोक आहेत ते घरात बसून काम करू शकणार नाहीत .
आणि त्यांनी काम थांबवलं तर सर्व व्यवस्था कोलमडून जातील.
तेव्हा घरातून काम करून आपण काही तरी वेगळे करतोय असा भास आयटी कंपन्यांनी करून घेवू नये .
काळजी घ्यावी पण पॅनिक होवून बावरून जावू नये.
मला स्वतःला WFH आवडत नाही .
मला स्वतःला WFH आवडत नाही . फारच disconnected वाटतं . माझी अर्धी टीम पूण्याहून काम करते आणि मी मुंबईहून . तरीही ऑफिसमध्ये जास्त focused असतो असं वाटतं .
आजचा माझा WFH चा पहिला दिवस होता . या आठवडाभर सांगितलय ट्रायल बेसिस वर .
आज सकाळीच नेहमीप्रमाणे सगळं आटपलं . मग मी आणि माझा लेक , अर्धा तास बॅडमिन्टन खेळून आलो .
घरी येउन चहा नाश्ता वगैरे करून , ज्या वेळेला ऑफिसमध्ये पोचते त्या वेळेस ऑनलाईन आले .
प्रवासात जाणारा वेळ सत्कारणी लागला . उद्याही तोच प्लॅन आहे .
पण मग दूपारी चिरंजीव आजूबाजूलाच रेंगाळत होते . मध्ये मध्ये काहीतरी प्रश्न विचारत .
मग कॉल असताना , आता मी माईक अनम्युट करतेय जरा शांत बस अस सांगाव लागत होतं .
बघूया बाकी आठवडाभर काय होतयं ते .
अवांतर - नुकत्याच आलेल्या
अवांतर - नुकत्याच आलेल्या बातमीनुसार अमेरिकेत कोरोना लसीच्या चाचण्या मनुष्यावर सुरु होणार आहेत , परमेश्वर चरणी प्रार्थना यश येवो आणि एकदाचा याला अटकाव होवो. -^-
आम्हाला घरून काम करा किंवा
आम्हाला घरून काम करा किंवा कार्यालयात येऊन करा असा पर्याय दिला आहे, ज्यांना घरून काम करायचे आहे पण घरी आवश्यक बाबी नाहीत त्यांना कार्यालयातून संगणक संच (संगणक पडदा, कळफलक, इत्यादी) घरी घेऊन जा असेही सांगितले आहे. शाळा बंद केल्या आहेत आणि घरून कामाचा पर्याय दिला आहे तर रस्त्यावर १/४ वाहने आहेत.
गो कोरोना नाही ... गो करुणा .
गो कोरोना नाही ... गो करुणा .. करुणा गो....
I am quite Okay with work
I am quite Okay with work from home.
Will you please provide me a home madam/sir/?
पाकिस्तान मध्ये लोकांना Work
पाकिस्तान मध्ये लोकांना Work from home सांगितले एकाने घरातच बॉम्ब फोडला.
त्यांना कार्यालयातून संगणक
त्यांना कार्यालयातून संगणक संच (संगणक पडदा, कळफलक, इत्यादी) घरी घेऊन जा असेही सांगितले आहे.
>>>>
आमच्याकडेही बहुधा असेच करणार आहेत.
आज कोणाकडे ईंटरनेट सेवा आहे आणि तिचा स्पीड काय
ही माहिती जमा केली.
प्रवासात जाणारा वेळ सत्कारणी
प्रवासात जाणारा वेळ सत्कारणी लागला .
..>>>
माझ्यासाठी हा वेळ तीसेक मिनिटे आहे. यात मी चलत प्लस तीन वाहने बदलतो. त्यामुळे दमण्याऐवजी दुनिया बघणे, जनसंपर्क होतो. वेळ प्रवासात वाया गेला असे वाटत नाही.
प्रश्न आहे की मुलांची आणि घरच्यांचीही प्रायव्हसी ही आपण खातो. आणि वर त्यांच्याकडूनच आपली प्रायव्ह्सी जपायची अपेक्षा करतोय. त्यात मुलांचेही शाळा क्लासेस बंद.. दोन आणि पाच या वयाच्या मुलांना कसे समजवायचे. त्यांच्यापासून स्वत:ला कसे वेगळे ठेवायचे
आणि जिथे नवरा बायको म्हणजे आई बाबा दोघे वफ्रॉहो अस्स्तील तिथे आणखी अवघड.
घरात मारामारया होण्याची
घरात मारामारया होण्याची लक्शणं आहेत....
घरात मारामारया होण्याची
घरात मारामारया होण्याची लक्शणं आहेत....
>>>
हो. सिरीअसली. आज न्यूजमध्येही होते की कोरोना आणि वफ्रॉहोमुळे नवराबायकोतील संवाद जास्तच वाढून त्याचे वादात रुपांतर होत घटस्फोटाचे प्रमाण वाढलेय बाहेरच्या देशात.
घटस्पोट वगैरे नाय होणार कारण
घटस्पोट वगैरे नाय होणार कारण बाहेर गरजु वस्तुंचा तुटवडा असल्याने, आणि वकील वगैरे बोलायला तयार नसल्याने बहुधा टळेल.
अजुन, वायफाय चालु आहे हे नशीबच समजायचे. ते जर बंद असते कोरोना मुळे तर काहीही होवु शकते...
बाकी, तुम्ही कैच्याकै कोटी करता हो...
घरातून काम करण्या मुळे
घरातून काम करण्या मुळे सार्वजनिक ठिकाण मधील गर्दी कमी होईल
आणि दुसरे कर्मचाऱ्यांना corona pasun स्वतःचा बचाव करता येईल .
हे दोनच हेतू आहेत.
मी गेली 3 वर्षे WFH करतोय.
मी गेली 3 वर्षे WFH करतोय. मुलांना नीट ट्रेन केले आणि तुमच्या कामाचे महत्त्व समजावून दिले तर WFH कितीतरी प्रमाणात सुसह्य होते. तरीही थोडा त्रास असतोच, पण काही क्लृप्त्या लढवून त्याबरोबर जुळवून घेता येते.
>> अवांतर - नुकत्याच आलेल्या
>> अवांतर - नुकत्याच आलेल्या बातमीनुसार अमेरिकेत कोरोना लसीच्या चाचण्या मनुष्यावर सुरु होणार आहेत , परमेश्वर चरणी प्रार्थना यश येवो आणि एकदाचा याला अटकाव होवो. -^-
>> Submitted by मित्रा on 16 March, 2020 - 22:20
अजून एक ते दीड वर्ष लागेल असा अंदाज आहे
सक्तीने वर्क फ्रॉम होम चा
सक्तीने वर्क फ्रॉम होम चा सर्वात जास्त तोटा हा राहील की घरी राहिलो की कळेल ऑफिसात असं काय ( अर्थात किती कमी) काम असतं ते. घरच्यांसमोर तरी खरेखुरे काम करावेच लागेल माबोवर येता येणार नाही आणि ही सक्ती नकोनकोशी होईल
ऋन्मेष मी तुझ्या भावना आणि (खरी) समस्या समजू शकतो.
Work from प्रमाणे वर्क फ्रॉम
Work from home प्रमाणे वर्क फ्रॉम ऑफिस हे सुद्धा येवू शकत .
शेवटी ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
म्हणजे ऑफिस च्या बाहेर पडायचं च नाही सर्व काही ऑफिस मध्येच मिळेल.
कोणाच्या डोक्यात ही आयडिया आली तर?
किती लोक तयार होतील.
जे सिंगल आहेत ते रडत कन्हात तयार होतील.
जे बायकोला वैतागले आहेत ते हसत तयार होतील
ज्यांना आजादी हवी ते नोकरी तून आजाद होतील.
वर्क फ्रॉम होम चा तोटा म्हणजे
वर्क फ्रॉम होम चा तोटा म्हणजे काम नसेल तरी बळेच कायतरी काम करायला लागत. ऑफिसमध्ये दिवसभर माशा मारत बसलात तरी चालतं.
हर्पेन
हर्पेन
पण हो, तसे म्हटले तर माझे ऑफिसमध्ये काम कमीच असते. फिजिकल आणि मेण्टल स्ट्रेस मी कमीच घेत काम करतो हे माझ्या घरीही माहीत आहे. ऑफिसमध्ये माझा बराच वेळ याच्या त्याच्या कामाची चेकिंग करणे, डिफिकल्टीज सॉल्व्ह करणे यातच जातो. कामाचे वाटप करतानाही हे गृहीत धरूनच मला विशेष काम दिले जात नाही. माझा दिवस याच्या त्याच्या डेस्कवर फिरण्यातच जातो. सलग तासभर जागेवर बसून मी काम केलेय असे होत नाही. कधी केलेच तर समोरची पोरगी ऊठून विचारते, आज खूप काम दिसतेय...
घरी कसे एकाच जागी बसून काम होईल?
बसताना बेडवर मांडी घालून बसायचे? लोळायचे? पाय पसरून बसायचे? की ऑफिस स्टाईल टेबल खुर्ची घ्यायची? त्यातही तासभर कधी तसे बसावे लागले तर मान पाठ माझी आखडून जाते. सवयच नाही तशी.. मग आता कसे जमणार हा एक वेगळाच प्रश्न
आणि हो, आज माझी तब्येत बरी नसल्याने ऑफिसला दांडी आहे. माझ्या जास्त पोस्ट दिसल्या तर या रुनम्याला काम नसते का ऑफिसमध्ये अशी खसखस नको..
Work from home प्रमाणे वर्क
Work from home प्रमाणे वर्क फ्रॉम ऑफिस हे सुद्धा येवू शकत .
शेवटी ह्या एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
म्हणजे ऑफिस च्या बाहेर पडायचं च नाही सर्व काही ऑफिस मध्येच मिळेल.
>>>>>
>>>> मला वाटते भाऊ तुम्ही जरा तपासून घ्या. तुमचे प्र तिसाद सुसब्द्ध वाटत नाही. ओफिसमधल्या सगळ्यांनी नवराबायकोसारखे एकत्र रहायचे म्हणताय का
Work from
Work from home
ह्या पद्धतीचा वापर हा कंपनीच्या फायद्यासाठी च केला जातो.
जे काम करण्यासाठी ऑफिस मध्ये हजर राहण्याची गरज नाही आणि ते काम घरून होवू शकत त्याला वर्क फ्रॉम होम असे नाव आहे.
ह्या मध्ये कंपनीची वीज वाचते,(एसी आणि प्रकाश योजना,लिफ्ट, साठी जी वापरली जाते)
ऑफिस मधील अनावशक्या गर्दी कमी होते म्हणजे जागा सुद्धा वाचते.
बाकी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थे वरचा ताण कमी होतो,रस्त्या वरची गर्दी कमी हे फायदे आहेत च.
माझा वरील प्रतिसाद हा साथीचे रोग आले की सक्तीने वर्क फ्रॉम होम करून घेतात त्या विषयी आहे..
सर्वसामान्य स्थिती तो प्रतिसाद गैर लागू
आहे..
ऑफिस मध्ये सर्व मिळेल ह्याचा अर्थ जेवण
,झोपण्याची सोय असा आहे .
जेणे करून कर्मचाऱ्यांचा बाहेरील जगाशी संपर्क येणार नाही आणि साथीला ते बळी पडणार नाहीत.
मलाही वर्क फ्रॉम होम च्या
मलाही वर्क फ्रॉम होम च्या फायद्यांपेक्षा तोटेच जास्त दिसतायेत. सलग तासभर एका जागेवर बसुन काम करणे म्हणजे डोक्याला तापच.
त्यात आमच्या ऑफिसवाले दिडशहाणे. फेस लॉक ठेवलाय लॅपटॉपला वर्क फ्रॉम होम वाल्या. जरा मान वळली की झाला बंद, यामुळे पण आमच्याकडे नाही घेत कोणी वर्क फ्रॉम होम . या रविवारपासुन काही जणांना जबरदस्ती दिलेय वर्क फ्रॉम होम . बिच्चारे.
Work from home प्रमाणे वर्क फ्रॉम ऑफिस हे सुद्धा येवू शकत . >>> आले पण. आमच्या ऑफिसच्या एका लर्निंग सेंटरमध्ये चालु करतायेत. अन त्यासाठी प्राधान्य अविवाहित मुले - मुली जी घरच्यांपासुन दुर राहतात त्यांना दिलेय.
वर्क फ्रॉम होम हे आठवड्यातील
वर्क फ्रॉम होम हे आठवड्यातील २ ,३ दिवस ठिक आहे. वर्क फ्रॉम होममुळे परफॉर्मन्स कमी होतो असे ऐकले आहे.याहूने काही वर्षांपुर्वी हा प्रकार बंद केला आहे.
. या रविवारपासुन काही जणांना
. या रविवारपासुन काही जणांना जबरदस्ती दिलेय वर्क फ्रॉम होम . बिच्चारे.
>>>
अरे देवा.. रविवारपासून
हा धोका मी लक्षातच घेतला नाही.
शनिवार रविवार जर सुट्टीचा मिळणार नसेल तर आणखी अवघड. फॅमिली लाईफचे तीनतेरा वाजलेले मी कधीच चालवून घेत नाही.
फेस लॉक हे सुद्धा अवघड प्रकरण आहे..
आमच्याकडे तात्पुरते वफ्रॉहो आले तर ही खटाटोप करणार नाही. पण असे नजर ठेवायला काही केले तर तो डोक्याला त्रास.. कारण मी काम प्रामाणिकपणे करतो पण मला माझ्यावर अशी नजर ठेवलेली वा कामाचा हिशोब मागितलेला आवडत नाही सहसा
आमचंबी वर्कफ्रॉमहोम
आमचंबी वर्कफ्रॉमहोम
Pages