Submitted by कमला on 15 March, 2020 - 03:38
केसांचे आरोग्य आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या वाढत आहेत. पहिल्या धाग्याने 2000 चा टप्पा गाठला.यापुढील चर्चा इथे करा.
Hair treatments विषयक सल्ले, कोणाला कशाचा चांगला उपयोग झाला, इ. अनुभवांची देवाणघेवाण, पारंपरिक उपाय, निरनिराळी तेले,शांपू,कंडिशनर्स,सिरम, हेअर कलर्स ही आणि सर्व आनुशंगिक चर्चा इथे करता येईल.
आधीच्या धाग्याचा दुवा:
https://www.maayboli.com/node/2466
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी सध्या वेदिक्स ची किट
मी सध्या वेदिक्स ची किट(oil+shampoo +serum) बोलावली आहे. शॅम्पू छान आहे, oil एक दोनदाच लावले आहे. पण छान वाटलं. केस गळायचे थोडे कमी झालेय.
मी enrich मध्ये गेले होते,
मी enrich मध्ये गेले होते, सल्ला विचारायला आणि केस कापून घ्यायला. त्या दिवशी केस धुवून गेले होते त्यामुळे प्रचंड गळत होते. त्याने ते गळलेले केस मला दाखवले आणि म्हणाला की पहिले केस गळतीवर उपाय करा आणि मग केस कापा. उपाय म्हणून त्याने मला त्यांचा शाम्पू, कंडिशनर, ओल्या केसांवर मुळाशी लावायला एक औषध, सिरम असा सगळा सेट घ्यायला सांगितला. आठवड्यातून चार वेळा केस धुवायचे आणि तेल अजिबात लावायचे नाही. मी म्हटलं कितीला पडणार हा सगळा सेट तर तो म्हणाला बारा हजार. मला वाटलं तो दोन हजार म्हणतोय म्हणून मी त्याला परत विचारलं तर तो म्हणाला बारा हजार फक्त
मी म्हटलं मी सिरम माझ्याकडचे वापरेन तर म्हणतो एवढे पैसे घालताय तर सिरम साठी मागे पुढे कशाला करता. त्याला म्हटलं मला केस कापून दे म्हणजे मला ते मॅनेज करायला सोपे जाईल तर म्हणाला नाही आधी केस गळणे बंद झाले पाहिजे. तो सेट तर मी घेणारच नव्हते, शेवटी काहीही न करता आणि घेता परत आले. आता दुसरीकडे केस कापून घेणार आणि सल्फेट नसलेला शाम्पू वापरणार.
कोणाला सल्फेट फ्री शाम्पू ने
कोणाला सल्फेट फ्री शाम्पू ने केस कड़क होण्याचा अनुभव आला का मला येतो बर्याच्दा
मि तूप लावते केसाला गरम करून. दुसऱ्या दिवशी पैंटीन ने धुते.
मस्त मौ होतात केस. फ्रिझीनेस नावाला ही राहत नाही.
सल्फेट फ्री शाम्पू चांगला
सल्फेट फ्री शाम्पू चांगला असतो का? मला खरंच माहिती नाहीये. आयुर्वेदिक शाम्पू ने कोंडा निघत नाही पूर्ण त्यामुळं मी हेड अँड शोल्डर वापरते. रोज तेल मात्र लावते. केस मऊ आहेत. पण गळतात प्रचंड. आणि हे गळणे डाय लावायला सुरवात केल्यापासनं झालंय .
डाय लावायला सुरवात
डाय लावायला सुरवात केल्यापासनं झालंय .>>>> डायमुळे नक्कीच फरक पडतो केसांच्या व्हॉल्युममधे.
आणि हे गळणे डाय लावायला
आणि हे गळणे डाय लावायला सुरवात केल्यापासनं झालंय .>> अगदी अगदी बरोबर!
माझे केस उन्हाने पांढरे झालेले. मी मेंदी, डाय सगळं ट्राय केलं. डोळ्यांना त्रास व्हायला लागला आणि केस गळायचे (टक्कल पडेल की काय अशी अवस्था झाली होती.) व अजून पांढरे झाले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वैतागून डाय लावणं बंद केलं. चिंचवडच्या मणकर्णिकावाल्यांनी सुचवलेले आयुर्वेदीक सिरप, आवळा रस घ्यायला सुरुवात केली. हर्बल शाम्पू वापरते. शिकेकाईवर जास्त भर देतेय. आता केसांचा पांढरेपणा जाऊन तपकीरी झाक यायला लागलीये. केसांना पतंजलीचे आवळा तेल वापरते. गळणे खूप कमी झालेय.
अजून वयाची पन्नाशी ओलांडायची आहे. >> हे माझ्याबाबतीत पण आहे, पण आरोग्यापेक्षा लुक मला महत्वाचा वाटत नाही. खरे तर आता मला बर्याचजणी 'मस्त दिसतेस" म्हणतात
माझे केस ३0% तरी पांढरे
माझे केस ३0% तरी पांढरे झालेले आहेत. १०-१५ वर्षांपूर्वी पिकायला सुरुवात झाली तेव्हा मेंदी लावायला लागले. पण मेंदीचा वास, सर्दी, एकुणच खटाटोप यामुळे डाय कडे वळले.
लॉरियलचा अमोनिया फ्री कलरने पार्लरमध्ये केस रंगवून घ्यायला लागले. सुरवातीला छान वाटले. नैसर्गिक रंगाचे + जास्त चमकदार केस. पण केसांचा पोत बदलू लागला. गळतीही वाढते असे जाणवले. मग विशेष शांपू, कंडिशनर वापरा, कडक ऊन, वारा टाळा वगैरे प्रकार... मुळातून उगवणारे पांढरे केस अधिक उठून दिसतात म्हणून रंगकामाची वारंवारिता वाढवा..... हा खर्च सुद्धा वाजवी नाही असे वाटू लागले.
मग पुन्हा मेंदी लावायला लागले. यावेळी मेंदीमध्ये कॉफी पावडर टाकून रंग गडद करणे, लावतेवेळी हातमोजे वापरणे, लावल्यावर डोके, कान झाकून ठेवणे, २ तासांवर जास्त वेळ न ठेवता केस धुणे, दुसर्या दिवशी व्यवस्थित तेल डोक्यावर मुरवून शांपूने धुणे....अशी खबरदारी घेऊन मेंदी वापरू लागले. केसांचा पोत पूर्ववत झाला.
आता पिकलेल्या केसांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कितीही गडद म्हटला तरीही तो लालसर रंग आता खटकू लागला आहे. काय करू ते समजत नाही. पुन्हा डाय वापरावा तर त्या केमिकल्स चा केस, त्वचा व इतर आरोग्यावर (डोळे इ.) दुष्परिणाम झाला तर? शिवाय दिवसेंदिवस किंमती वाढत चालल्या आहेत. केसांची वाढ पहाता दर पंधरवड्याला टचप करावे लागेल.
केस तसेच पांढरे राहू द्यावे का? पण हिंमत होत नाही. वाटतं की ९०%वर केस पिकल्यावर मगच असे करूया. तेव्हा पूर्ण रुपेरी छान वाटतील. अजून वयाची पन्नाशी ओलांडायची आहे. आणि जोडीदार केस पूर्ण काळे ठेवत आहे. फार विजोड वाटेल ते.
तर अशा दोलायमान मनस्थितीत असताना इथे मायबोलीवर मला काहीतरी मदत मिळेल या आशेने मी हे सर्व टंकले आहे.
तुम्ही केस सुरक्षित ठेवून, पांढऱ्या केसांना नैसर्गिक काळा/तपकिरी रंगात रंगवता येईल असा काही उपाय करता का? एखादीचा स्वानुभव असल्यास सांगा.
Amaway शाम्पू सल्फेट फ्री
Amaway शाम्पू सल्फेट फ्री असतो का ?
@रुपालि देशपान्डे Glossy
@रुपालि देशपान्डे Glossy repair shampoo च sulfate free आहे वाटतं.
. चिंचवडच्या
. चिंचवडच्या मणकर्णिकावाल्यांनी सुचवलेले आयुर्वेदीक सिरप,>>>>> नाव सांगाल का? आणि ते कुठे मिळेल तेही.च चिंचवडच्या कोणत्या फर्मसीमधे?
नाव सांगाल का? आणि ते कुठे
नाव सांगाल का? आणि ते कुठे मिळेल तेही.च चिंचवडच्या कोणत्या फर्मसीमधे? >> मणकर्णिका हे औषधालयाचे नांव आहे. चाफेकर चौकात आहे.
डॉ. गांधी यांचे! ते चांगली औषधे सुचवतात. तुम्हांला पाहीजे तर फोन नंबर देवू शकते.
तुम्हांला पाहीजे तर फोन नंबर
तुम्हांला पाहीजे तर फोन नंबर देवू शकते.>>>> नक्की द्या!
देवकी, विपू बघा
देवकी, विपू बघा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझे केस काळे आहेत. पण खूप
माझे केस काळे आहेत. पण खूप गळतात. चांगला हर्बल शाम्पू कुणी सुचवेल काय? शिकेकाईची रेडिमेड पावडरचा कुणाला अनुभव आहे काय? शिवाय चांगले सिरम कोणते?
खूप गळतात >> ह्याचे एक कारण
खूप गळतात >> ह्याचे एक कारण एच बी कमी असणे हे पण आहे. आधी चेक करुन घ्या. बाहेरुन करायचे उपाय मग करता येतील.
हेही बरोबर आहे. पटतंय.
हेही बरोबर आहे. पटतंय.
रेडिमेड पावडरचा कुणाला अनुभव
रेडिमेड पावडरचा कुणाला अनुभव आहे काय? >>>>मी जयसन हर्बलची सिल्केशाइन पावडर वापरते.पण त्यात 5 g मधले 300mg रिठा आहे.मुळात रुक्ष असतील तर वापरू नये असे मी सुचवेन.म्हणजे आधी एरंडेल तेल लावावे लागेल. आणि महत्त्वाचे म्हणजे तुमच्या घरी येणारे पाणी कसे आहे ते बघा. पाण्यात क्षार जास्त असले की केस गळतात.
होय. रेडिमेड पावडर मी एकदाच
होय. रेडिमेड पावडर मी एकदाच वापरली होती तेव्हा केस ड्राय झाले होते खूप. हर्बल शाम्पू ही कोणता वापरावा हे कळेनासे झालेय.
कोरफडीचा गर लावून अर्ध्या
कोरफडीचा गर लावून अर्ध्या तासाने केस धुवावेत. मला कोंड्यासाठी खूप फायदा झाला.
मी सुद्धा डाय लावून केसांची बरीच वाट लावून घेतली होती. दर पंधरा दिवसांनी केस कलर करावे लागत. त्यावर माझ्या पार्लरवालीने एक उपाय सुचवला. कलर लावल्यावर टच अप करायची वेळ आली की मेहंदी लावायची, आणि पुन्हा १०ते १५ दिवसांनी कलर लावायचा. त्यामुळे कलर करायची फ्रिकवेन्सी कमी झाली. तसेच हटकून महाभृंगराज तेल वापरायला सुरुवात केली.
परिणामी सध्या डाय/ कलर साधारण पणे महिना- सव्वा महिन्यातून एकदाच लावावा लागतो.
अनघा - अगदी बरोबर . मी सुद्धा
अनघा - अगदी बरोबर . मी सुद्धा आता सव्वा ते दीड महिन्यातून किंवा अगदी फंक्शन वगैरे असेल तर डाय करते. अधेमध्ये मेंदीची आयडिया चांगली आहे . आता करत जाईन. सल्फेट वाला शाम्पू का वापरू नये ?
, पांढऱ्या केसांना नैसर्गिक
, पांढऱ्या केसांना नैसर्गिक काळा/तपकिरी रंगात रंगवता येईल असा काही उपाय करता का? एखादीचा स्वानुभव असल्यास सांगा. >> इंडिगो पावडर वापरून पहा ..मेहेंदी लावल्यानंर केस धुतले कि त्यावर परत मेहेंदी लावतो तशी लावायची. ऍमेझॉन वर आहे available.. all natural आनि review पण चांगले आहेत
Attar Ayurveda Indigo Powder for black Hair -- मी आई साठी हि ऑर्डर केली आहे
गीत१७, तुम्ही इंडिगो पावडर
गीत१७, तुम्ही इंडिगो पावडर वापरल्यानंतर केसांमध्ये पडलेला फरक यावर नक्की इथे लिहा.
मी तुमच्या पोस्टची वाट बघेन.
मेंदी केसांना लावली असेल तर
मेंदी केसांना लावली असेल तर सहा महिने तरी कलर लावू नये असे ऐकले आहे. मेंदी केसांवर एक थर तयार करते वगैरे.
मी केसांना रंगवून पस्तावले.
मी केसांना रंगवून पस्तावले. केस सुकलेल्या गवतासारखे झाले. परत मेंदी सुरू केली. आता बऱ्यापैकी झालेत.
काल एक व्हिडिओ पाहिला. त्यात सांगितले की नुसती मेहंदी किंवा इंडिगो लावू नका, त्याने केस कोरडे होणार.
मी दुसऱ्या एका व्हिडिओत पाहिले होते ती रेसिपी देते. तिचा चांगला परिणाम होतो.
2 चमचे चहा पावडर उकळवून त्याच्या गाळलेल्या उकळत्या पाण्यात मेंदी भिजवायची. भिजवताना मेंदी तीन भाग व 1 भाग आवळा पावडर घ्यायची. ही रात्रभर ठेवली तरी चालते. नंतर जितकी मेंदी तितकी इंडिगो पावडर घेऊन गरम पाण्यात 30 मिनिटे भिजवून मग भिजवलेल्या मेंदीत टाकायची. काही थेंब निलगिरी तेल टाकून सगळे एकत्र करून मग केसांना लावायचे. मला चांगला परिणाम मिळाला पण जर खूप पांढरे केस असतील तर लगेच काळे होत नाहीत. दर आठवड्याला लावावे लागते.
मेंदी केसांना लावली असेल तर
मेंदी केसांना लावली असेल तर सहा महिने तरी कलर लावू नये असे ऐकले आहे. मेंदी केसांवर एक थर तयार करते वगैरे>>>
हो, मेंदीमुळे रंग लागत नाही व्यवस्थित. रंग मध्ये दिसतोय मध्ये नाही असे होऊ शकते.
धन्यवाद साधना. मी आधीच्या
धन्यवाद साधना. मी आधीच्या पानांवरचे तुमचे काही प्रतिसाद पूर्वी वाचले होते व तुमच्या काही टिप्स देखील वापरल्या होत्या.
आता काही शंका. मेंदी पावडर जुनी असल्यास काही फरक पडतो का? पावडर आणल्यावर किती दिवसांत वापरून संपवायची? इंडिगो पावडर ब्रँडेड वापरावी का?
दर आठवड्याला मेंदी लावायची म्हणजे.....इतक्यात ह्या उपायाला सुरुवात नाही करता येणार. कोरोनाव्हायरसची दहशत असताना सर्दी होऊ शकेल असं काही काम नाही करु शकत.
खरं तर उन्हाळा हा ऋतू या प्रयोगासाठी उत्तम आहे. पण ....
जुनी असेल तर रंगणार नाही
जुनी असेल तर रंगणार नाही कदाचित. मी उर्जिता जैनची मेंदी व इंडिगो पावडर वेगवेगळी आणते. इंडिगो पावडर महाग आहे. जैनचीच ग्रेनिल वापरत होते आधी पण त्यात बहुतेक भेसळ होत असावी. शेवटच्या दोन तीन वेळेस अजिबात रंग चढला नाही. त्यातही मेंदी+इंडिगो असेच मिश्रण आहे.
मेंदीने मला तरी सर्दी होत नाही. तशी मला कुठल्याही नैसर्गिक गोष्टीने सर्दी होत नाही. मात्र फ्रिजचे पाणी किंवा आईस्क्रिमने दोन तासात घसा धरतो आणि दुसऱ्या दिवशी नाक जाम होते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
उर्जिता जैन ची इंडिगो पावडर
उर्जिता जैन ची इंडिगो पावडर वापरून कपड़े डाय करू शकतो का???
तो रंग कपड़े धुतल्यावर जात नाही न
ही इंडिगो म्हणजे निळीच्या
ही इंडिगो म्हणजे निळीच्या पानांची पावडर का?
इंडिगो म्हणजे नीळ कपडा
इंडिगो म्हणजे नीळ कपडा रंगवायलाच वापरली जात होती.
Pages