मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती २

Submitted by आबा. on 3 March, 2020 - 12:12

अगोदरच्या धाग्याने २००० प्रतिसादांची मर्यादा ओलंडली आहे. तरी तुम्हाला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

अगोदरचे धागे

https://www.maayboli.com/node/2738

https://www.maayboli.com/node/51027

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amazon echo ची "सामने ये कौन आया " मस्त आहे.
ते आजोबा छान नाचतात , खुर्चीत बसल्या बसल्या

बहुधा मास्टर कार्डची जाहिरात आहे - पी व्ही सिंधूला मॉलमध्ये, पेट्रोल पंपवर 'यू टॅप फॉर अस, वुई टॅप फॉर यू' म्हणत माणसं तिच्यासाठी स्वत:च्या कार्डवरून पेमेंट करतात... ती जाहिरात टोटली गंडलेली आहे. तो त्या माणसांचा चोंबडेपणा वाटतो, खासकरून तिच्याकडे स्वतःचं कार्ड असतानाही

मंगलम कापूरची ऍड पण छान आहे. संध्यकाळी दुकानात पूजा करताना अचानक देवच कापूर मागायला येतो तर नोकराने दिलेली कापराची डब्बी फेकून तिजोरीतून मालक मंगलम कापूर देतो। तो देव छान हँडसम आहे।

5 star ची जाहिरात डोक्यात गेली.
मुलगा निगरगट्टपणे चॉकलेट खात उभा राहतो , आजी स्वतःच काठी घ्यायला उठते आणि वरून पडलेल्या ढिगार्यापासून वाचते !
ही नशिबाची क्रुपा आहे , मुलाच्या निष्क्रीयपणाची नाही!

मला अ‍ॅक्सिस बँकेची प्रेग्नंट वुमन बघून बँक परत उघडतात ती अ‍ॅड आवडते. त्यातला वॉचमन रुबाबदार आहे, मॅनेजर हँडसम विथ क्युट स्माईल आहे आणि ती वुमन फार गोड आहे.

बहुधा मास्टर कार्डची जाहिरात आहे - पी व्ही सिंधूला मॉलमध्ये, पेट्रोल पंपवर 'यू टॅप फॉर अस, वुई टॅप फॉर यू' म्हणत माणसं तिच्यासाठी स्वत:च्या कार्डवरून पेमेंट करतात... ती जाहिरात टोटली गंडलेली आहे. तो त्या माणसांचा चोंबडेपणा वाटतो, खासकरून तिच्याकडे स्वतःचं कार्ड असतानाही
Submitted by ललिता-प्रीति on 11 March, 2020 - 08:01

Master नाही, VISA card ची जाहिरात आहे ती. https://www.youtube.com/watch?v=osVqk-YxHzQ

अवांतर : मला जेव्हा माझे नवीन credit कार्ड मिळाले (VISA) तेव्हा मी torch वापरून त्यातील RFID चीप शोधून काढली (जी या tap payment साठी आवश्यक असते) आणि punch machine ने होल पाडून काढून टाकली. कोणत्याही प्रकारे verification न करता रु. २०००/- पर्यंतचे payment ही संकल्पना नाही पटत!!! कधी कार्ड हरवलेच तर ते माझ्या लक्षात येऊन block करेपर्यंत २००० - २००० करत ८-१० हजारांना चुना लागायचा!!!
Credit Card.png

आजकाल त्या चला हवा येऊ द्या टाईप कार्यक्रमात मध्येच ते कलाकार इंटिग्रेशन म्हणून स्पॉन्सर ची जाहिरात करतात. अतिशय डोक्यात जातो हा प्रकार.

SBI ची Father's day ची Ad बघितली आज. खूप आवडली. मग हा धागा आठवला.

कोणत्यातरी जाहिरातीत बाकीचे सगळे टेबलवर जेवायला बसले आहेत आणि आईची खुर्ची मोकळी आहे कारण ती किचन मधे अजून राबत आहे यावर चिंता व्यक्त करून त्याचे कारण कोणत्यातरी साध्या तेलामुळे असे प्रोजेक्ट केले आहे. म्हणे त्यांचे तेल पदार्थ जास्त काळ फ्रेश ठेवते. मग त्यामुळे लगेच आई डान्स वगैरे करताना दाखवली आहे. राइट. इतक्या स्त्रीवाद्यांना हे सोपे कारण कसे समजले नाही. उगाच पुरूषाबिरषांच्या मागे लागतात.

दुसरीकडे बोर्नव्हिटा वाल्यांनी ते इम्यूनिटी बूस्टर का काहीतरी असल्याचा क्लेम केला. व्हॉट्सॅप वरचे अफाट क्लेम्स निदान कमर्शियल इण्टरेस्टने केलेले नसतात. इथे सरळसरळ गंडवत आहेत. बोर्नव्हिटा चवीला मस्त असतो. पण इम्यूनिटी?

इम्यूनिटी?
बरोबर. हाइ प्रोटिन्स झाले, मग विटामिन्स झाले, मग antioxidants वाले झाले आणि इम्यूनिटी वाढवणारे बाकीच.

हेच रामदेवबाबाने म्हटलं की mnc कंपन्यांना राग येतो. पण आता एका जाहिरातीत वजन वाढल्याशिवाय इम्यूनिटी कशी येणार हे सूरू. खोटे प्रचार करायचे.

सब गुस्सा करते है मै घर छोड के जा रहा हु .... किती भारी जाहिरात होती ती.... आता बऱ्याच जणांनी आपापल्या DOGGY साठी पण अशीच REMAKE बनवली आहेत YOU ट्यूब वर....

मला आवडलेल्या HP Printers च्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या जाहिराती:
https://www.youtube.com/watch?v=2uA1r8gaRik
https://www.youtube.com/watch?v=YzAaczmX-Q0
https://www.youtube.com/watch?v=wxXhvjFvn_A
https://www.youtube.com/watch?v=SrMqcEKsuXQ

अतिशय चांगला सामाजिक संदेश, धार्मिक भावना दुखावणे नाही की फुकटचे तत्वज्ञान शिकवणे नाही!!!
(नाहीतर ते Ceat Tyres, Tanishq, AU Small Finance Bank वाले! Sad ) [यांचा नामोल्लेख जाणीवपूर्वक केला आहे, जेणेकरून यांचे दुष्कर्म विस्मृतीत जाऊ नये.]

एच पी प्रिंटर अ‍ॅड छानच आहेत. सगळ्याच भिडतात...

नाहीतर ते Ceat Tyres, Tanishq, AU Small Finance Bank वाले! Sad >>>>> यांच्याही लिंक द्या की. धागा आवडलेल्या न आवडलेल्या दोघांचा आहे.

नाहीतर ते Ceat Tyres, Tanishq, AU Small Finance Bank वाले! Sad >>>>> यांच्याही लिंक द्या की. धागा आवडलेल्या न आवडलेल्या दोघांचा आहे.

ज्यांच्यावर 'बहिष्कार' घालायचा आहे, त्यांची जाहिरात मी का करू???

सिमेंट टायर्सच्या जाहिरातीत अमीर खान म्हणाला, फटाके फोडायचे ते सोसायटीच्या आवारात. रस्त्यावर नाही. मग मोडला पापड.
https://www.adgully.com/ceat-tyres-launches-new-securadrive-tvc-with-aam...

जाहिरातीला विरोध करणाऱ्या भाजप खासदारांने आपले संस्कार अनेकदा दाखवून दिलेत. तोच आदर्श असावा

एक शंका. फटाके फोडणे, उडवणे हे धार्मिक कृत्य आहे का? ते करताना देवाचं स्मरण, प्रार्थना, मंत्र म्हणणे असे काही करतात का? त्याची काही फलश्रुती आहे का?

Pages