मागे वळुन पाहताना..
मागे वळुन पाहताना
एक निरागस चेहरा
दिसतो मज मनसोक्त
खळखळुन हसताना
मागे वळुन पाहताना
तोच चेहरा दिसतो मज
भेदरलेल्या डोळ्यांनी
आसपास पाहताना
मागे वळुन पाहताना
लोकांचे चेहेरे न्याहाळताना
तो चेहरा दिसे मज
ओंगळवाण्या नजरा सहन करताना
मागे वळुन पाहताना
ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे
पाहिले मी मुखवटे
एकावर एक चढवताना
मागे वळुन पाहताना
स्वतःला आरशात बघताना
पाहिले आहे मी
स्वतःचीच किळस करताना
मागे वळुन पाहताना
ते स्पर्श सहन करताना
पाहिले आहे मी
स्वतःलाच तीळ तीळ तुटताना
मागे वळुन पाहताना
रोज रोज मरताना
पाहिले आहे मी स्वतःलाच
नैराश्याच्या खाईत झोकताना
मागे वळुन पाहताना
आजही जाणवतो तो कोमल
हातांचा स्पर्श;
केसांमधुन फिरलेला
प्रेमाने ओथंबलेला
मागे वळुन पाहताना
तो स्पर्श अनुभवताना
रोखते. अन्
हात देते स्वतःलाच
जगु पाहते पुन्हा एकदा
ती जळमटे दुर करुनी
शोधते मी स्वतःलाच..
(Dipti Bhagat)
खुप छान, आवडली कविता
खुप छान, आवडली कविता, खरेतर भिडली मनाला
अप्रतिम... खूप सुंदर!!!!!
अप्रतिम... खूप सुंदर!!!!!
ही तू लिहिलेली आजपर्यंतची बेस्ट कविता आहे!!!!
लय भारी!
लय भारी!
Mast..!
Mast..!
छान ...
छान ...
खूप सुंदर ! आवडलीच.
खूप सुंदर !
आवडलीच.
आवडली.
आवडली.
>>>>>मागे वळुन पाहताना
स्वतःला आरशात बघताना
पाहिले आहे मी
स्वतःचीच किळस करताना>>>> पटले नाही.
बाकी सर्व कडवी आवडली पण हे एक पटले नाही.
हात देते स्वतःला.. मस्तच!
हात देते स्वतःला.. मस्तच!
VB, अज्ञा, स्वामिनी, आनंद, डॉ
VB, अज्ञा, स्वामिनी, आनंद, डॉ.काका, कुमारदा,सामो, चिन्नु प्रतिसादासाठी सर्वांचे खुप खुप धन्यवाद!
@सामो, तुला कडव पटल नाही.. तुझ्या मताचा आदर आहे.
असच हक्काने तुला आणि इतर वाचकांना कवितेत काही खटकल/ पटल नाही तर सांगत जा. चुका असतील आवर्जुन सांगा. मी हळुहळु शिकतीये. आणखी इंप्रुव्ह करायला नक्कीच आवडेल..
छान..
छान..
खुप sunder
खुप sunder
मागे वळुन पाहताना…….
मागे वळुन पाहताना…….
छान कविता आहे
खूप आवडली
चांगलंय!
चांगलंय!
अप्रतिम सुंदर!!!
अप्रतिम सुंदर!!!
बोकलत, शामल, यतिन, राघव,
बोकलत, शामल, यतिन, राघव, आत्माराम प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
निव्वळ अप्रतिम खूप काही
निव्वळ अप्रतिम खूप काही सांगून जाते
Chan aahe
Chan aahe
खूप छान, उत्तम जमली आहे.. या
खूप छान, उत्तम जमली आहे.. या कवितेवरून माझी एक जुनी कविता आठवली. सापडली तर डकवू येथे..
राजेंद्र, प्रतिसादासाठी
राजेंद्र, उर्मिला, राव पाटील, प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद!
@उर्मिला, आहात कुठे आपण?? दिसत नाही आजकाल..
@राव पाटील, नक्की डकवा तुमची कविता..आवडेल वाचायला.
छान... आवडली कविता !
छान... आवडली कविता !
अप्रतिम
अप्रतिम
फार मनस्वी लिहिलं आहे. आवडली
फार मनस्वी लिहिलं आहे. आवडली कविता
छान! आवडली कविता..
छान! आवडली कविता..
पुन्हा वाचली..
पुन्हा वाचली..
एकदम विरुद्ध भावना पण दिसतात कवितेत.
मग एकाएकी "लक्ष्मी अगरवाल" आठवल्यात आणि कडव्यांतील भावनांची सांगड घालता आली.
एका चांगल्या रचनेसाठी खूप खूप अभिनंदन!
माझी कवितांची वही दुर्दैवाने
माझी कवितांची वही दुर्दैवाने पुण्यातच राहिली आहे, आता परत जाईन तेव्हाच पोस्ट करतात.. फार वर्ष झालीत ती कविता लिहून तरी फक्त पहिल्या २ ओळी लक्षात आहेत त्या अश्या..
नाजूक निळे डोळे शोधतात कुणाला,
श्वासांमागचे निःश्वास बोलावतात कुणाला..
आनंद, मुक्ता, तृप्ती, पद्म,
आनंद, मुक्ता, तृप्ती, पद्म, राघव प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
@राघव, लक्ष्मी अगरवाल हे माझ्यासाठी खुपच मोठ नाव आहे. त्यांचा जगण्याचा आशावाद म्हणजे उगवता सुर्यच. धन्यवाद..
@राव पाटील, सुंदर पंक्ती.. पुण्यात परतल्यानंतर नक्की पोस्ट करा.. मी वाट पाहील.
सुंदर काव्य छान विचार
सुंदर काव्य
छान विचार
बिपिनदा प्रतिसादासाठी खुप खुप
बिपिनदा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
सापडली आणि पोस्ट केली बघा.
सापडली आणि पोस्ट केली बघा..
https://www.maayboli.com/node/74724
हो.. रावपाटील दुपारीच वाचली
हो.. रावपाटील दुपारीच वाचली तुमची कविता.. तितकीच हृदयाला भिडली..