अस्तित्व ते तुझे..

Submitted by मन्या ऽ on 26 February, 2020 - 15:56

अस्तित्व ते तुझे..

धुक्यासम अस्तित्व ते तुझे
अलवार मिठीत तुझिया मी येई
त्या मिठीत मी विरताना
तुझे अस्तित्व विरुन जाई

मृदुगंध अस्तित्व ते तुझे
नव्याने फुलणारे
दरवळ दाटला आसमंतात
जीवन सुगंधी करणारे
तुला श्वासात भरु पाहता
मजला भुल देणारे

अस्तित्व ते तुझे
धुसर दर्पणाप्रमाणे
ओळख नजरेत असुन
मज सदैव अनोळखी भासणारे

अस्तित्व ते तुझे
ओल्या रेतीत उमटणाऱ्या
पाऊलखुणेप्रमाणे
नोंद मनात होताच
सागराने पुसून टाकलेले

अस्तित्व ते तुझे
ओघळलेल्या अश्रुंप्रमाणे
तुझ्याच अनावर ओढीने
त्या पापणीआड दडलेले

अस्तित्व ते तुझे
असुन नसले तरी
अंतःकरणात जाणवणारे
श्वासागणिक उमजणारे
हृदयात विसवणारे
तुच तु साऱ्यात सामावुन
माझ्यात उरलेले..

(Dipti Bhagat)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>अस्तित्व ते तुझे
ओल्या रेतीत उमटणाऱ्या
पाऊलखुणेप्रमाणे
नोंद मनात होताच
सागराने पुसून टाकलेले>>>> हे कडवे सर्वाधिक आवडले.

अज्ञा, Lol
सामो, चिन्नु, प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

बाब्बो, फ्रॅन्कली स्पिकींग, धुसर , धुके, अस्तिस्त्व अशा शब्दांमुळे वेगळाच संशय येतो आहे.

पण कवी मनाच्या दृष्टीने चांगली आहे.