खरंतर या छंदाची ओळख लोकल प्रवासातून झालेली . लोकलने प्रवास करत असताना अनेक विक्रेते १० रुपये मैं कलरिंग बुक्स म्हणून ओरडत विकायला येत , आजही येतात.त्यात टॉम जेरी सारख्या कार्टूनची , बॅटमन ,आर्यनमॅन सारख्या सुपर हिरोजची , फळा ,फुलांचा चित्रांचा समावेश असतो . ह्या रंगकामाच्या पुस्तकाचा मुख्य उद्देश लहान मुलाना रंगकाम , चित्रकामची ओळख करून देणे इतका असतो . त्यामुळे त्यात कुठच्या चित्राला कुठला रंग द्यायचा हे सगळं व्यवस्थित सांगितलेलं असतं. लहान मुलं चित्र रंगवत शांत बसावीत हा ही एक उद्देश असावा
तर नेटवर बागडत असताना coloring activity या प्रकरणाचा शोध लागला .थोडं डोकावून पाहिलं असता अरे हे तर लोकलमध्ये विकतात त्याच छापाच आहे की असा प्रथमदर्शनी ग्रह झाला .त्यामुळे थोडं हसायलाच आलं . त्यात ही ऍक्टिव्हिटी स्ट्रेसबस्टर म्हणून केली जाते असंही लिहिलेलं . 'काय बाई , एकेक प्रकरण ' म्हणून सोडून दिलं .
अशातच प्राजक्ता पाटवेशी ओळख झाली . तिच्या पोस्टसमधून , चित्रातून ती अतिशय गुणी कलाकार असल्याचंही समजलं . त्यावेळी ती आणि अजून एक मायबोलीकर अल्पना या दोघी मिळून त्यांचं कलेशी संबंधित फेसबुक पान सुरू करत होत्या . असच एकदा प्राजक्ताशी गप्पा मारत असताना तिने तिच रंगकामाची पुस्तकं दाखवली . तेव्हा "अरे ! हे तर नेटवर बघितलेलं तेच की " ट्यूब पेटली . तेव्हा तिच्याकडून हे नक्की काय प्रकरण असतं हे समजून घेतलं . तिच्याशी बोलून बरच काही समजलं . त्यांनंतर दोस्तीखात्यात तिने तिची नुकतीच प्रसिद्ध झालेली ही कलरिंग पुस्तकं भेट म्हणून दिली.
तर coloring activity for adults हा छंद पाश्चिमात्य जगात बराच लोकप्रिय आहे. प्राजक्ताने बोलता बोलता तिने 2/3 फेसबुक ग्रुपची लिंकही दिली. हे ग्रुप पूर्णपणे ह्या छंदप्रकाराला वाहिलेले आहेत . तिकडचे रंगकाम बघून थक्क व्हायला होतं . वेगवेगळ्या देशातील लोकं ज्या उत्कृष्टपणे वेगवेगळ्या प्रकारचेरंगकाम करतात ते बघून परफेक्ट एवढंच मनात येतं. ह्या ग्रुपमुळेच ह्या छंदाला मी गांभीर्याने घेतलं .
प्राजक्ताने पुस्तक तर दिली पण माझी सुरुवात ग भ म न पासून होती . त्यामुळे तिला निरनिराळ्या शंका विचारून जेरीस आणलं . त्यात कोणते रंग वापरू , माध्यम कोणतं , कुठून सुरुवात करू , चुकलं तर काय करायचं असे वेगवेगळे प्रश्न विचारून पिडलं . ( तिला मला या छंदाची माहिती देण्याचा निश्चितच पश्चताप झालेला असणार )
शेवटी camelin कंपनीच्या रंगीत पेन्सिल विकत आणल्या . आणि श्रीगणेशा केला . पहिलच चित्र रंगवलं आणि हे आपल्याला बऱ्यापैकी जमतंय याचा अंदाज आला .वर उल्लेख केलेल्या फेसबुक ग्रुपात ते चित्र टाकलं . तर तिथल्या लोकांना आवडलं . थोडा हुरूप आला आणि पुढचं चित्र रंगवायला घेतलं . ते ही जमलं .
हे पहिले चित्र रंगवलेल !!!
हळूहळू मला ही रंगकामाची ऍक्टिव्हिटी आवडायला लागली . मजा येऊ लागली . लहान मुलांच काम म्हणून अडगळीत टाकलेल्या ह्या छंदाने एक प्रकारचं रिलॅक्स फिलिंग दिलं . सातवीनंतर चित्रकला सोडूनच दिलेली . ती ह्या प्रकारात सापडली .रंगाचा सेन्स माझा चांगला आहे असे अनेक मित्र मैत्रिणी आवर्जून सांगतात . तो इथे रंगवताना कामी आला . प्राजक्ताच्या पुस्तकातली चित्र सुंदर आहेत त्यामुळे ती तितक्या सुंदरपणे रंगवली गेली पाहिजेत असंही मनाशी ठरवून घेतलं . त्यामुळे अजून मजा यायला लागली .
चित्र रंगवताना सध्या मी रंगीत पेन्सिलचा मुख्यतः उपयोग करते . पण अजूनही अनेक माध्यम वापरता येतात . जस की जेल पेन्स, स्केच पेन्स , रंगीत खडू . . कोणतं माध्यम वापरायचे ते आपल्यावर . शेवटी आनंद मिळणं महत्वाचं.
Coloring Activities मध्ये मंडल हा प्रकार लोकप्रिय आहे . मंडल हे गोलाकार आकारात असलेला वेगवेगळ्या फॉर्ममधला एक प्रकारचा चित्र प्रकार आहे. हिंदू , बौद्ध, जपनीज संस्कृतीत ह्याच मूळ सापडत . अधिक माहिती या लिंकवर मिळेल
https://en.m.wikipedia.org/wiki/Mandala
ही मी रंगवलेली दोन मंडल !!!
१)
२) भाचीचे रंगीत खडू ढापून नुकतंच एक चित्र रंगवलं आहे . हे ते चित्र मंडल
हे अजून काही रंगकामचे नमुने ...
Coloring app म्हणून प्ले स्टोर वर सर्च केल्यास अनेक app दिसतात . त्यावरूनही हा छंद जोपासता येऊ शकतो. पण त्याला कागदावर रंगवलेल्या रंगकामाची सर नाही हे अनुभवातून सांगू शकते
हे रंगकाम करताना मजा येते हे खरं . चित्रावर फोकस करून रंगकाम करण्यात धमाल आहे.. पेशन्स या घटकाची कमतरता असलेल्या प्रत्येकाला ही ऍक्टिव्हिटी उपयुक्त आहे. नेटवर अतिरिक्त बागडून डोळे , मेंदू शिणवण्यापेक्षा तोच वेळ एक चित्र किंवा चित्रांचा तुकडा रंगवून पाहिलं तर छान वाटतं . मी माझी काही चित्र अशीच टप्याटप्यात पूर्ण केलीत .दुसरं एक म्हणजे हा छंद फार काही खर्चिक नाही . अमेझॉन , फ्लिपकार्टवर, क्रॉसवर्डमध्ये , प्राजक्ताच्या फेसबुकपेजवर रास्त किंमतीत विविध प्रकारची कलरिंग बुक्स, रंगीत पेन्सिल , खडू उपलब्ध आहेत . कुठेही लांबच्या प्रवासात ही रंगकाम ऍक्टिव्हिटी वेळ घालवायचा उत्तम मार्ग आहे . काही
तर सर्वांना Happy Coloring !!!
टि बॅग मधले सेपरेटर माझ्या
टि बॅग मधले सेपरेटर माझ्या कडे पण साठवलेले आहेत. काहीतरी काढत असते त्यावर>>>> ऑ? मला वाटलेलं की जगात मला एकटीलाच हे सुचलेलं आहे >>>>
काहीही हा सस्मित, हे तर https://www.maayboli.com/node/56424 इथं पाहून मी पण केलं होतं. वाईट आहे पण आहे
(No subject)
सध्या काहीतरी काढणे बंद असले
सध्या काहीतरी काढणे बंद असले तरी सेपरेटर साठवणे मात्र चालू आहे
हो. मी पण साठवुन ठेवतेय.
हो. मी पण साठवुन ठेवतेय.
छानच चित्रं आहेत. तुमचा छंद
छानच चित्रं आहेत. तुमचा छंद आवडला.>>>+ 999
मस्तच छंद आहे हा जाई!
मस्तच छंद आहे हा जाई!
टि बॅग मधले सेपरेटर माझ्या
टि बॅग मधले सेपरेटर माझ्या कडे पण साठवलेले आहेत. काहीतरी काढत असते त्यावर>>>> ऑ? मला वाटलेलं की जगात मला एकटीलाच हे सुचलेलं आहे >>>>
काहीही हा सस्मित, हे तर https://www.maayboli.com/node/56424 इथं पाहून मी पण केलं होतं. वाईट आहे पण आहे Wink>>>>>>>
दाखवा तर खरं, चांगलं कि वाईट आम्हाला ठरवू दे.
सस्मित
मस्त छंद आणि मस्त लिहिलंयस,
मस्त छंद आणि मस्त लिहिलंयस, जाई.
दाखवा तर खरं, चांगलं कि वाईट
दाखवा तर खरं, चांगलं कि वाईट आम्हाला ठरवू दे.>> हो हो +१
माझे बरेच बूकमार्क्स लेकीने शाळेत मैत्रीणींना गिफ्ट केले. अजुनही मुली विचारतात बनाके लायेगी क्या मेरे लिये

लेक म्हणे मा रोज नही बनाती. अपने मूडके हिसाबसे बनाती है
दाखवा तर खरं, चांगलं कि वाईट
दाखवा तर खरं, चांगलं कि वाईट आम्हाला ठरवू दे.>> हो हो +१ >>>>>
मला काय त्यात खुश्शाल बघा.
त्या रार च्याच धाग्यावर दुसर्या पानावर आहेत.
टुकार आहेत पण पहिल्यांदाच असं काही केलेलं
त्यानंतर केलेले जरा चांगले झाले होते ते वाटून टाकले.
छान आहेत
छान आहेत
मी पण तेच लिहायला आले, छान
मी पण तेच लिहायला आले, छान आहेत कि हर्पेन, ते वेगवेगळ्या पॅटर्न वालं खुपच आवडलं.
धन्यवाद
धन्यवाद
छान लिहीलं आहे. मी मागे असं
छान लिहीलं आहे. मी मागे असं एक पुस्तक आणलं होतं पण मी ते रंगवायला सुरुवात करेपर्यंत मुलीने बरंचस रंगवून टाकलं
आई ग्ग!!! कसली क्युट चित्रे
आई ग्ग!!! कसली क्युट चित्रे आहेत.
खरे आहे कलर सेन्स आहे तुम्हाला. चित्रे फार मोहक रंगवली आहेत.
___________
सस्मित यांनी रंगविलेला फिनिक्स पक्षी देखील सुरेख आहे.
लिहू लिहू म्हणताना राहून गेलं
लिहू लिहू म्हणताना राहून गेलं तुला सांगायचं की मस्तच आहे हा छंद.
मला ओढ असलेला चित्रकलेचा छंद मी ही जोपासू शकते अशा रीतीने . थँक्यू जाई ही दिशा दाखवल्या बद्दल.
(No subject)
धन्यवाद लोकहो .
धन्यवाद लोकहो .
संयोजक , थँक्स .खूप छान वाटले प्रशस्तीपत्र पाहून
धन्यवाद लोकहो .
धन्यवाद लोकहो .
संयोजक , थँक्स .खूप छान वाटले प्रशस्तीपत्र पाहून
छान लिहिलस ग चित्रही मस्त
छान लिहिलस ग चित्रही मस्त रंगवलीस
छानच चित्रं आहेत. तुमचा छंद
छानच चित्रं आहेत. तुमचा छंद आवडला.
+1
्अहो आश्चर्यं! केवढी प्रगती
्अहो आश्चर्यं! केवढी प्रगती जाई! छान वाटलं वाचून.
सुंदर!!
सुंदर!!
Pages