नर्गिसच्या कारकिर्दीतील “रात और दिन” हा बहुधा शेवटचा चित्रपट. १९६७ साली आलेला हा चित्रपट फार पूर्वी पाहिला होता. फारसा आठवत नाही. मात्र “स्प्लिट पर्सनॅलिटी” वर बेतलेले कथानक आहे आणि नर्गिसने दोन वेगवेगळी व्यक्तीमत्वं दाखवताना अतिशय प्रभावी अभिनय केला होता हे मात्र आठवते. बाकी मनात रुतून बसले ते या चित्रपटातील “दिलकी गिरह खोल दो” हे गाणे. हे गाणे मी अधून मधून पाहात असतो. वाघ म्हातारा झाला तरी गवत खात नाही म्हणतात त्याच चालीवर वाघीण म्हातारी झाली तरी गवत खात नाही असं का म्हणू नये? गाण्यात नर्गिसचे वय दिसते मात्र ती उणीव तिने आपल्या चिरतरूण अभिनयाने भरून काढली आहे. या प्रौढेचे या गाण्यातील संयत नृत्य आणि त्यावेळचा तिचा मुद्राभिनय पाहिला की असं वाटतं हेच जातिवंत कलाकार. यांना वयाचे बंधन नाही आणि यांच्या कलागुणांना मर्यादा नाही. नर्गिस नृत्यासाठी कधीच प्रसिद्ध नव्हती पण या गाण्यातल्या तिच्या स्टेप्स किती ग्रेसफूल वाटतात. अगदी सहज, हवेत तरंगल्याप्रमाणे या गाण्यात ती वावरली आहे. आणि बरोबर आहे तरणाबांड फिरोझ खान…
शंकर जयकिशनच्या या गाण्यात व्हायोलिनचा सढळपणे वापर केला आहे. गाण्यातही वाद्यवृंद दाखवला आहेच. क्लब किंवा हॉटेलमध्ये जमलेली सिगारेट फुंकणारी मंडळी. त्याकाळात सारेजण सुटात. ज्या दिशेने नर्गिस येते तिकडे सर्वजण पाहू लागतात. तरंगल्याप्रमाणे येऊन ती गाणे सुरु करते. खानसाहेब एकदम मागे वळून पाहतात आणि जणू तिच्या करिश्म्याने ओढल्याप्रमाणे तिच्या दिशेने चालु लागतात. मग काही क्षण दोघांमध्ये जे घडते ते फक्त पाहण्याजोगे, वर्णन करता येणार नाही. तिला तो आवडतो आणि त्याला ती. “महफिलमें अब कौन है अजनबी तुम मेरे पास आओ” म्हटल्याबरोबर फिरोझखान लवून आपण तिच्याबरोबर नृत्य करण्यास इच्छुक आहोत हे सुचवतो. मग ते हळुवार नृत्य सुरु होतं. लताचा प्रौढ नर्गिसला चपखल बसेल असा आवाज आणि फिरोझ खानसाठी मन्नाडेने लावलेला अदबशीर स्वर. एखाद्या खानदानी माणसासारखा भरदार आणि भारदस्त. नर्गिस फिरोझखान दोघेही एकमेकांच्या बाहुपाशात राहून जणू एका लयीत असल्याप्रमाणे डोलतात. संगीताचा हळुवारपणा आहेच त्याबरोबरच गाण्यात दोघांची जुळलेली केमिस्ट्रीही महत्त्वाची आहे. दोघांच्या वयातले अंतर नाहीसेच झाले आहे. या सोबत आहेत शैंलेंद्रचे शब्द.
“मूडकर नही देखते हम, दिलने कहा है चला चल” म्हणणारा फिरोझ खान आपला स्वभाव आणि उद्देश देखील जाहीर करतो. त्याच बरोबर ” जो दूर पिछे कहीं रह गये अब उन्हे मत बुलाओ” म्हणणारे हे युगुल आता भूतकाळाचा, मागचा विचार करायचा नाही हे देखील सांगते. गाण्याचा बाज “मागची पुढची सारी बंधने टाकून आला क्षण साजरा करा” सांगणारा आहे. नर्गिस गाण्याची सुरुवातच मुळी “दिल की गिरह खोल दो” हृदयाच्या गाठी सोडवा, बंधने मोकळी करा असे सांगूनच करते आहे. तिने जमलेल्या सार्यांना आवाहन केले आहे. आणि कुणी अनोळखी असेल, ज्याच्यासोबत कुणी नसेल त्यानेही भीड बाळगायचे कारण नाही “तुम मेरे पास आओ” असे त्याच्यासाठी खुले निमंत्रण आहे. कृष्णधवल रंगाची जादु गाण्यातल्या वातावरणात आहे. शिवाय त्याकाळची सुटाबुटातली माणसे, नृत्यही सभ्य माणसांचे, हळुवार संगीताला साजेसे. कुठेही धटींगणपणा नाही, वखवख नाही. त्यामुळे एकंदरीतच हे गाणे वेगळ्याच “क्लास” चे आहे असे जाणवते. या क्लासला अधोरेखित करतात ते नृत्य करता करताच एकमेकांमध्ये सावकाश झिरपणारे नर्गिस आणि फिरोझखान …
अतुल ठाकुर
सुंदर! ्
सुंदर!
्
छान रसग्रहण!
छान रसग्रहण!
याच्या अगदी उलट एक गीत आहे. आवाज लताचाच आणि किशोर कुमार.
क्या मौसम है.....
पौढ स्त्री... कोवळ्या वयाचा एक तरुण. फक्त बंदिस्त समारंभ नाही तर मोकळं क्षितीज.
वाह मस्त रसग्रहण. आवडतं गाणं
वाह मस्त रसग्रहण. आवडतं गाणं. ह्याच गाण्याने पिक्चरची सुरुवात होतेना. शाळेत असताना tv वर बघितलेला.
या गाण्याने एक प्रकारची गूढ
या गाण्याने एक प्रकारची गूढ कासाविशी अनुभवते मी. मला हे गाणे आवडत नाही. डिप्रेस्ड वाटतं. का माहीत नाही.
आणखी एक तसच - रातके हमसफर...
रातके हमसफर मला फार आवडते!
रातके हमसफर मला फार आवडते! आशा ताई at her best!
महफिलमें अब कौन है अजनबी तुम
महफिलमें अब कौन है अजनबी तुम मेरे पास आओ... waah... SJ ni akhand gane bhar ek slight echo dila ahe... that makes it a haunting melody
सुंदर!!!
सुंदर!!!
छान! कित्तेकदा अचानक हे गाणे
छान! कित्तेकदा अचानक हे गाणे आवर्जून ऐकावेसे वाटून ऐकले आहे. मात्र या गाण्याबद्दल कुठे लिहिलेले वाचनात आले नव्हते.
छान! कित्तेकदा अचानक हे गाणे
छान! कित्तेकदा अचानक हे गाणे आवर्जून ऐकावेसे वाटून ऐकले आहे. मात्र या गाण्याबद्दल कुठे लिहिलेले वाचनात आले नव्हते. >>>> +1000 . कधी पाहिले नाही हे गाणं
आवडतं गाणं...
आवडतं गाणं...
छान लिहलंय.
छान लिहलंय.

मी हे गाणं फक्त ऐकलंच होतं आतापर्यंत. आता हा लेख वाचून पाहिलंदेखील. नर्गिस नर्गिस न वाटता प्रिया राजवंश वाटली. आणि फिरोझ खान गोबर्या गालांचा दिसतोय
डान्स बरा केलाय नर्गिसने, खासकरून तो लीड करतोय तेव्हाअ. छान ग्रेसफुल मुव्ज आहेत.
सुरेख लिहिलयं!
सुरेख लिहिलयं!
छान लिहीले आहे! काही गाणी
छान लिहीले आहे! काही गाणी अनेकदा ऐकूनही एकदम कधीतरी डोक्यात इतकी क्लिक होतात की मग कितीदाही ऐकून समाधान होत नाही, पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात - तसेच झाले या गाण्याच्या बाबतीत. कधीतरी तो "महफिल मे अब कौन है अजनबी" च्या आधीचा लताचा आलाप कानावर आला आणि त्याचे अॅडिक्शनच झाले. मग अनेक वेळा ते गाणे ऐकले. तो आलाप भयानक अॅडिक्टिव्ह आहे.
या गाण्यातली आणखी एक जबरदस्त जागा म्हणजे प्रत्येक कडव्याची सुरूवात होताना वापरलेला तबला व इतर एक दोन वाद्यांचा एकत्रित पीस. कानाला हेडसेट लावून त्यातले सर्व सूक्ष्म आवाज ऐकावेत!
नर्गिस मात्र जरा प्रौढ दिसते यात. एखादी मध्यमवयीन बाई जेन ऑस्टेनच्या कथांवर आधारित इंग्रजी पिक्चर मधे तरूण लोकांना डान्सचे धडे देत मॅचमेकिंग करत आहे असे वाटते
ह्या पिक्चरची स्टोरी खरी मस्त
ह्या पिक्चरची स्टोरी खरी मस्त होती. पण शाळकरी वयात काही समजलं नव्हतं तेव्हढं. ती रात्रीचं आपलं रुप दिवसा विसरते आणि दिवसाचं रात्री, असं काहीतरी आहे, स्प्लीट पर्सनॅलिटी वगैरे काहीही माहीती नव्हतं, डोक्यावरुनही गेलेलं. तेव्हा पिक्चर जे काही टीव्हीवर दर रविवारी लागतील ते नेमाने बघायचेच एवढंच. तरी हे गाणं आवडलं आणि फिरोज खान आवडलेला.
जेव्हा मूवी लहानपणी पाहिला ,
जेव्हा मूवी लहानपणी पाहिला , तेव्हा काहिच कळला न्हवता. मग अक्कल आल्यावर छायागीत मध्ये पाहिले गेले गाणे आणि काही गोष्टी खूपच भिडल्या गाण्यातील( मूवीची स्टोरी तेव्हाही तितकीशी कळलीच न्हवती वा मूवी तोवर परत मोठे झाल्यावर पाहिला न्हवता वाटते),
पण गाणे आवडायचे कारण, मी नुकताच डान्स शिकायला सुरुवात केलेली आणि आमचे कथ्थक गुरु , ‘नजाकत’ प्रकार शिकवताना पाश्च्यात पद्धतीत कसा बॉल डान्स वगैरे लय कशी असते म्हणताना तो करून दाखवला. ते डोक्यात होते.
मग ते गाणे जेव्हा पाहिले तेव्हा बॉल डान्स मधल्या मोजक्याच पण नाजूक स्टेप्स खूपच छान वाटल्या. त्यात एक ग्रेस होती.
नर्गिस सुंदर वगैरे दिसत न्हवती( आणि, मला ती कधी वाटली नाहीच) पण , सहजता व सुबकपणे नाच करणे तिने उत्तम केले.
त्यात, कोवळा तरूण फिरोज खान पण असा व्यवस्थित नाच करत होता व नर्गिसला मस्त लवचिकपणे सांभाळत होता ते सुंदर वाटले.
नंतर, परत कधी तरी पेपरात का कुठेतरी वाचले , की नर्गिस गरोदर होती त्या वेळी , त्यामुळे त्या स्टेप्स आठवून वाटले, ओह म्हणून साध्या स्टेप्स दिल्या व फिरोज खान नीट सांभाळत होता.
—-अवांतर आहे तरीही,इथला हा बॉल डान्स डोळ्याला, पर्वणी आहे,——
https://youtu.be/2QGGbT5HGxY
दुसरे, कारण लक्षात रहाण्यासारखे ‘शब्द’ ...
मुडके नहि देखते हम...
हा एक धडा आहे जीवनात शिकण्यासारखा आहे...
आवडले लिखाण आणि प्रतिसादही
आवडले लिखाण आणि प्रतिसादही
प्रतिसाद आवडला झंपी!
प्रतिसाद आवडला झंपी!
धन्यवाद अॅमी.
धन्यवाद अॅमी.
>>>>नर्गिस सुंदर वगैरे दिसत
>>>>नर्गिस सुंदर वगैरे दिसत न्हवती>>> नाही कधीच कन्व्हेन्शनली सुंदर नव्हतीच. पण अभिनय किती सहजसुंदर! 'पंछी बनू उडती फिरु' गाण्यात तिच्या चेहर्यावरची प्रसन्नता ..... इट इस कंटेजिअस!
तशीच नूतनही कन्व्हेन्शिअली सुंदर नव्हती पण डोळे किती बोलके असावेत. फक्त तिची गाणी मी युट्युबवर लावते आणि बघते (फक्त ऐकत नाही). जशी शम्मी कपूरची गाणी फक्त ऐकायची नसतात तशीच नूतनची गाणि फक्त ऐकायची नसतात.
या गाण्यातली आणखी एक जबरदस्त
या गाण्यातली आणखी एक जबरदस्त जागा म्हणजे प्रत्येक कडव्याची सुरूवात होताना वापरलेला तबला
>>> मी हेच लिहायला आले होते.
छान लिहिलंय. मी अधूनमधून म्युझिक अॅपवर हे गाणं ऐकते.
यातला मन्ना डेचा आवाजही मला फार आवडतो. 'हम तुम ना हम तुम रहे अब... कुछ और ही हो गए अब' या ओळीतला 'अब' शब्द एरवी खूप फ्लॅट आहे, पण मन्ना डे त्याला एक सूक्ष्म व्हायब्रेशन देतो, ते ऐकायला छान वाटतं.
'कल हम से पूछे जो कोई क्या हो गया था तुम्हे कल' - यातला 'कल'चा वापरही मला आवडतो.
नर्गिस मात्र कधीही आवडली नाही, राजकपूरच्या सिनेमांमधली नाही, आणि यातलीही नाही.
छान
छान
खूप सुंदर लिहिलेय. योगायोग
खूप सुंदर लिहिलेय. योगायोग हा की चित्रपट ह्या रविवारी मी पाहिला आणि त्याचवेळी हा लेखही वाचायला मिळाला.
नर्गिसचा हा अखेरचा चित्रपट. ती प्रौढ व बेढब दिसते पण ही त्रुटी तिने चेहऱ्यातून भरून काढलीय. ती इतका चांगला अभिनय करु शकते हे कधी लक्षात आलेच नाही. पेगीच्या रूपात असतानाचा वागण्यातील उतशृंखलपणा आणिa सावध झाल्यावर वाटणारा संकोच तिने मुद्राभिनयातून उत्तम दाखवलाय.
लहानपणी दूरदर्शनवर चित्रपट पाहिलेला तेव्हा काहीही कळले नव्हते. नंतर चित्रपटाबद्दल वाचले तेव्हा कळले की सिझोफ्रेनिक व्यक्तिमत्व असलेल्या स्त्रीची कथा आहे. 1967 साली भारतात या विषयावर चित्रपट निघावा हे आश्चर्यच आहे. शेवट मात्र गुंडाळलाय. सिझोफ्रेनिक माणसे अशी एका क्षणात ठीक होतात का याची कल्पना नाही, पण चित्रपटात नर्गिसच्या नशिबी जे बालपण लिहिले गेले ते भोगणारी व्यक्ती त्यातून इतकी सावरेल असे वाटत नाही.
चित्रपटात अजूनही काही गाजलेली गाणी आहेत. मला चित्रपटाची आठवण झाली ती रेडिओवर 'फुलसा चेहरा, चांदसी रंगत, चाल कयामत क्या कहीये' हे गाणे ऐकून. चित्रपट माहीत नव्हता म्हणून गुगलवर शोधले व त्यात रात और दिन सापडला. ह्या गाण्यात प्रदीपकुमारने इतका सहज व सुंदर अभिनय केलाय की पोशाखी चित्रपटातील ठोकळा तो हाच यावर विश्वास बसू नये.
रफीच्या मखमली आवाजातील या गाण्यावर एक लेख आला तर वाचायला आवडेल.
हे गाणे फक्त ऐकले होते,
हे गाणे फक्त ऐकले होते, लेखामुळे बघितले...सुन्दरच आहे..
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्वांचे मनःपूर्वक आभार
हा लेख आल्यापासून हे गाणं रोज
हा लेख आल्यापासून हे गाणं रोज एकदा तरी ऐकतोच आहे. त्याची धुंदी काही केल्या जात नाहीये. लेखाबद्दल आभार!
खरंच. हा लेख वाचल्यानंतर हे
खरंच. हा लेख वाचल्यानंतर हे गाणं डोक्यात घोळतंच आहे.