मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!
मायबोलीवर आपण आजपासून तीन दिवस, म्हणजेच २९ फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा दिवस २०२० साजरा करणार आहोत. या तीन दिवसांत आपल्याला खेळायला मिळणार आहेत निरनिराळे खेळ आणि वाचायला मिळणार आहेत विशेष लेख.
या खेळांमधला पहिला खेळ सुरू करूया.
मराठी नाटकं आणि चित्रपट हे मराठी सांस्कृतिक जीवनाचं एक महत्त्वाचं अंग. करमणूकप्रधान, हलक्याफुलक्या चित्रपट आणि नाटकांबरोबरच आशयप्रधान, वास्तवदर्शी नाटकं आणि चित्रपट मराठीत निर्माण होत असतात. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला अशा विविध मराठी चित्रपट आणि नाटकांची नावं आठवून त्यावरून कोडी घालायची आहेत. जो भिडू कोड्याचं उत्तर देईल त्याने/तिने पुढचं कोडं घालायचं आहे.
पहिलं सोप्पं कोडं आमच्याकडून!
मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या जयंतीला साजरा केला जातो, त्यांचं हे सर्वाधिक यशस्वी नाटक.
XXसXX
निवडूंग?
निवडूंग?
कट्यार...नाही
कट्यार...नाही
दुसरीकडचा माधव नायक आहे.
सूर्यगंगा...उत्तर बरोबर
सूर्यगंगा...उत्तर बरोबर
मोहन गोखले स्त्रि भूमिकेत
मोहन गोखले स्त्रि भूमिकेत,सोबत अशोक सराफ,सोनेरी टोळी या कादंबरीवर आधारीत चित्रपट
ठकास महाठक.
ठकास महाठक.
एवढे क्लू नका देऊ. सोपे होते ओळखायला.
मुंबई पुणे मुंबई हे उत्तरही
मुंबई पुणे मुंबई हे उत्तरही बरोबर आहे.
मुंबई पुणे मुंबई हे उत्तरही
मुंबई पुणे मुंबई हे उत्तरही बरोबर आहे.
ठीक आहे आता पुढचं कोडं घाल. तुझी कोडी भारी असतात.
जाऊ दे तुझ्या सारखं कोडं
जाऊ दे तुझ्या सारखं कोडं घालायचा प्रयत्न मीच करतो.
१. ह्या चित्रपटात मराठी सोबतच इंग्रजी गाणी ही आहेत.
२. ह्या चित्रपटातल्या दोन कलाकारांचे आडनाव एकच आहे पण ते एकमेकांचे नातेवाईक लागत नाहीत.
३. ह्या चित्रपटाचे नाव आणि (दुसर्याच) एका चित्रपट कलाकाराचे नाव एकच आहे.
४. ह्या चित्रपटाच्या संगीतकाराला राज्याचा सर्वोकृष्ट संगीतकाराकरता असलेला पुरस्कार सलग तीन वर्षे मिळाला होता.
जाऊ दे तुझ्या सारखं कोडं
जाऊ दे तुझ्या सारखं कोडं घालायचा प्रयत्न मीच करतो. >>> सगळेच कठीण घालताय. तसं मला सोपंही येत नाही ती गोष्ट वेगळी .
इथे एकसे एक कोडी घालणाऱ्यांना आणि ती सोडवण्याऱ्या सर्वाना मानाचा मुजरा.
राजवाडे and सन्स का पिक्चर. अगदी शेवटी अर्धा तास बघितला आहे.
मुक्ता
मुक्ता
चिनूक्सने आधी लिहिले.
चिनूक्सने आधी लिहिले.
खालील पात्रं कोणत्या
खालील पात्रं कोणत्या चित्रपटात आहेत? हे चित्रपट मराठी कथा किंवा कादंबऱयांवर किंवा नाटकांवर आधारित आहेत. तेव्हा त्यांची नावंही दिल्यास उत्तम.
1. रामजी, शिवा, पारुबाई, जोशी, गोविंदा
2. कारभारी, अंजी, रामा, शेकू,
3. मुकुंद, आप्पा, नरुमामा, फावड्या
4. रघू, कुसुमावती, बोरकर
३. शाळा- शाळा (मिलिंद बोकील)
३. शाळा- शाळा (मिलिंद बोकील)
1. दिठी? ('आता आमोद सुनासि
1. दिठी? ('आता आमोद सुनासि आले' - दि बा मोकाशी)
2. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
3. शाळा - शाळा (मिलिंद बोकील)
वावे आणि श्र,
वावे आणि श्र,
बरोबर. शेवटचं राहिलं आहे.
4. दुर्गी - जयवन्त दळवी
4. दुर्गी - जयवन्त दळवी
पुढचं कोडं मी देते.
पुढचं कोडं मी देते.
एक मूळ मराठी नाटक. त्याचे प्रयोग नंतर इतर अनेक भारतीय भाषांमध्ये झाले. नंतर त्यावर एक हिंदी चित्रपटही निघाला.
चिनुक्स बहुतेक यादीच सांगेल
चिनुक्स बहुतेक यादीच सांगेल अशा नाटकांची
पार्टी?
पार्टी?
पार्टी बरोबर! ग्रेट!
पार्टी बरोबर! ग्रेट!
घरी जाम कंटाळा आलाय म्हणून हा
घरी जाम कंटाळा आलाय म्हणून हा खेळ वर काढतो.
नवे कोडे – नाटक ओळखा
नाटकाच्या नावात २ शब्द. त्यातल्या दुसऱ्या शब्दाची संख्या पहिल्याच्या दुप्पट.
लेखकाचे नाव पण दोन शब्दात . इथेही त्यातल्या दुसऱ्या शब्दाची संख्या पहिल्याच्या दुप्पट.
विषय : कुटुंबसंस्थेशी संबंधित
Pages