मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!
मायबोलीवर आपण आजपासून तीन दिवस, म्हणजेच २९ फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा दिवस २०२० साजरा करणार आहोत. या तीन दिवसांत आपल्याला खेळायला मिळणार आहेत निरनिराळे खेळ आणि वाचायला मिळणार आहेत विशेष लेख.
या खेळांमधला पहिला खेळ सुरू करूया.
मराठी नाटकं आणि चित्रपट हे मराठी सांस्कृतिक जीवनाचं एक महत्त्वाचं अंग. करमणूकप्रधान, हलक्याफुलक्या चित्रपट आणि नाटकांबरोबरच आशयप्रधान, वास्तवदर्शी नाटकं आणि चित्रपट मराठीत निर्माण होत असतात. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला अशा विविध मराठी चित्रपट आणि नाटकांची नावं आठवून त्यावरून कोडी घालायची आहेत. जो भिडू कोड्याचं उत्तर देईल त्याने/तिने पुढचं कोडं घालायचं आहे.
पहिलं सोप्पं कोडं आमच्याकडून!
मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या जयंतीला साजरा केला जातो, त्यांचं हे सर्वाधिक यशस्वी नाटक.
XXसXX
ह्या वर्षीच्या मभादि उपक्रमात
ह्या वर्षीच्या मभादि उपक्रमात ज्यांच्या आवडलेल्या पुस्तकावर लिहायचे आहे ते लेखक मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या ह्या चित्रपटाच्या प्रिमियरला उपस्थित होते. त्यावेळची त्यांची प्रकाशचित्रे मायबोलीवर नक्की सापडतील.
चिनुक्सा तुला हे उत्तर नक्की माहित असणार पण बाकीच्यांना नाहीच जमले तर (च) दे
हा भारत माझा?
हा भारत माझा?
सस्मित फोटो कुठे आहेत?
सस्मित
प्रिमियरच्या वेळचे फोटो कुठे आहेत?
हरपेन,
हरपेन,
ते तीन चित्रपटांना उपस्थित होते.
माहित नाही. मी अंदाज लावला.
माहित नाही. मी अंदाज लावला.
फोटोवाला चित्रपट सांगा,
फोटोवाला चित्रपट सांगा, पुराव्याने शाबीत करायला तो धागाही द्या इकडे
शोधावं लागेल
शोधावं लागेल
हर्पेन अजून काही क्ल्यु द्या.
हर्पेन अजून काही क्ल्यु द्या.. ते ३ चित्रपटांना हजर होते असं सांगतायत वर
प्रिमियरच्या वेळी काढलेल्या
प्रिमियरच्या वेळी काढलेल्या फोटोंच्या दोन धाग्यात त्यांचा फोटो आहे.
पण अजून एक क्लू म्हणजे चित्रपटाचे नाव तीन अक्षरी असून त्यातल्या अनेक प्रमुख पात्रांनी वेगवेगळ्या कालखंडातील प्रत्येकी दोन भुमिका केल्या आहेत.
संहिता?
संहिता?
वावे बरोबर
वावे बरोबर
प्रिमियरच्या वेळचे फोटो इथे पहा
१. https://www.maayboli.com/node/45905
२. https://www.maayboli.com/node/45894
पुढचं कोडं द्या कुणीतरी. मला
पुढचं कोडं द्या कुणीतरी. मला सुचत नाहीये.
दोन कोडी एकत्र.
दोन कोडी एकत्र.
दोन गाजलेले मराठी चित्रपट.
पहिला चित्रपट दोन कादंबऱयांवर आधारलेला आहे.
दुसरा चित्रपट तीन कादंबऱयांवर आधारलेला आहे.
दोन्ही चित्रपटांची नावं सांगा.
कादंबऱ्यापण मराठीच आहेत?
कादंबऱ्यापण मराठीच आहेत?
पहिला सिंहासन - अरुण
पहिला सिंहासन - अरुण साधूंच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्यांवर आधारित
बरोबर.
बरोबर.
आता दुसरा चित्रपट.
हो, मराठी कादंबऱ्या आहेत.
दुसऱ्याला जरा क्लू लागेल.
दुसऱ्याला जरा क्लू लागेल.
दहा मिनिटं वाट पाहून देतो.
दहा मिनिटं वाट पाहून देतो.
एका लेखिकेच्या दोन कथांवर
एका लेखिकेच्या दोन कथांवर आधारलेला एक चित्रपट नुकताच आला होता. या चित्रपटातली अभिनेत्री कोड्यातल्या चित्रपटाची नायिका होती.
मुक्ता बर्वेचा जोगवा.
मुक्ता बर्वेचा जोगवा. क्लूमध्ये उल्लेख आहे तो सिनेमा 'आम्ही दोघी'
बरोबर
बरोबर
मस्त कोडं होतं.
मस्त कोडं होतं.
पुढंच कोड कुणी तरी घाला
पुढंच कोड कुणी तरी घाला
एक मराठी चित्रपट ज्याचा नंतर
एक मराठी चित्रपट ज्याचा नंतर हिंदी व तमिळमधेही अवतार झाला.
मुंबई पुणे मुंबई
मुंबई पुणे मुंबई
पाठलाग?
पाठलाग?
सैराट आहे का उत्तर @निलाक्षी
सैराट आहे का उत्तर @निलाक्षी
पाठलाग - बरोबर उत्तर
पाठलाग - बरोबर उत्तर
चित्रपट
चित्रपट
फक्त नावातच काटे आहेत.
स्वरसाज आणि गीते अजूनही बिनतोड.
कट्यार काळजात घुसली का.
कट्यार काळजात घुसली का.
Pages