मराठी भाषा दिवस २०२० - शब्दखेळ- चित्रनाट्यधारा

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2020 - 23:45

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा!

मायबोलीवर आपण आजपासून तीन दिवस, म्हणजेच २९ फेब्रुवारीपर्यंत मराठी भाषा दिवस २०२० साजरा करणार आहोत. या तीन दिवसांत आपल्याला खेळायला मिळणार आहेत निरनिराळे खेळ आणि वाचायला मिळणार आहेत विशेष लेख.

या खेळांमधला पहिला खेळ सुरू करूया.
मराठी नाटकं आणि चित्रपट हे मराठी सांस्कृतिक जीवनाचं एक महत्त्वाचं अंग. करमणूकप्रधान, हलक्याफुलक्या चित्रपट आणि नाटकांबरोबरच आशयप्रधान, वास्तवदर्शी नाटकं आणि चित्रपट मराठीत निर्माण होत असतात. हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला अशा विविध मराठी चित्रपट आणि नाटकांची नावं आठवून त्यावरून कोडी घालायची आहेत. जो भिडू कोड्याचं उत्तर देईल त्याने/तिने पुढचं कोडं घालायचं आहे.

पहिलं सोप्पं कोडं आमच्याकडून!

मराठी भाषा गौरव दिन ज्यांच्या जयंतीला साजरा केला जातो, त्यांचं हे सर्वाधिक यशस्वी नाटक.

XXसXX

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही. त्यात 4 लेखक अभिनय करण्यासाठी एकत्र आलेले नाहीत.

हा जुना चित्रपट आहे, पण दूरदर्शनवर आणि झीवर बरेचदा लागत असे.

क्लू देतो.

या चित्रपटातल्या एका अभिनेत्रीच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकावर नुकताच एक चित्रपट येऊन गेला.
दुसऱ्या अभिनेत्रीच्या मुलीनेही हिंदीमराठीत खूप लोकप्रियता मिळवली.
तिसऱ्या थोर अभिनेत्रीचा मुलगाही नावाजलेला अभिनेता आहे.
चित्रपट ज्यांनी लिहिला, त्या लेखकाच्या पत्नीची भूमिका पहिल्या अभिनेत्रीने केली होती.
चित्रपटात एका ज्येष्ठ दिग्दर्शकानं काम केलं होतं. त्यांच्या एकेकाळच्या साहाय्यक दिग्दर्शकानं हा चित्रपट दिग्दर्शित केला.

या चित्रपटातल्या एका अभिनेत्रीच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकावर नुकताच एक चित्रपट येऊन गेला. >>> ज्योति चान्देकर आणि तेजस्विनी पंडित?

शाळकरी वयात पहिले पुस्तक लिहिणार्‍या ह्या व्यक्तीने पुढे जाऊन अनेक हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी लिहिलेले एक नाटक
xx xxx

चिनुक्सा - खूप रोचक होता प्रश्न, धन्यवाद विनिता - तुमचे क्लु च कामाला आले Happy

चार दिग्गज मराठी लेखक अभिनेते कोण म्हणे?

या चित्रपटातल्या एका अभिनेत्रीच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकावर नुकताच एक चित्रपट येऊन गेला. - सुलोचना - कांचन घाणेकर
दुसऱ्या अभिनेत्रीच्या मुलीनेही हिंदीमराठीत खूप लोकप्रियता मिळवली. नयन भडभडे रीमा
तिसऱ्या थोर अभिनेत्रीचा मुलगाही नावाजलेला अभिनेता आहे. ही आणि हा कोण
चित्रपट ज्यांनी लिहिला, त्या लेखकाच्या पत्नीची भूमिका पहिल्या अभिनेत्रीने केली होती. गदिमा सुलोचना
चित्रपटात एका ज्येष्ठ दिग्दर्शकानं काम केलं होतं. हे कोण

चार दिग्गज मराठी लेखक अभिनेते कोण म्हणे? - ग दी माडगूळकर , व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, ??

या चित्रपटातल्या एका अभिनेत्रीच्या मुलीने लिहिलेल्या पुस्तकावर नुकताच एक चित्रपट येऊन गेला. - सुलोचना - कांचन घाणेकर
दुसऱ्या अभिनेत्रीच्या मुलीनेही हिंदीमराठीत खूप लोकप्रियता मिळवली. नयन भडभडे रीमा
तिसऱ्या थोर अभिनेत्रीचा मुलगाही नावाजलेला अभिनेता आहे. ही आणि हा कोण
चित्रपट ज्यांनी लिहिला, त्या लेखकाच्या पत्नीची भूमिका पहिल्या अभिनेत्रीने केली होती. गदिमा सुलोचना
चित्रपटात एका ज्येष्ठ दिग्दर्शकानं काम केलं होतं. हे कोण - राजा परांजपे

चौथे लेखक द. मा. मिरासदार
तिसऱ्या अभिनेत्री शांता जोग
ज्येष्ठ दिग्दर्शक राजा परांजपे, त्यांचे साहाय्यक राजदत्त.

जबरी पात्रयोजना होती.

नाटक सांगतय ....
त्याची ऐका आता कहाणी....' >>
एका लग्नाची गोष्ट......नाही नाही

नाट्य, नृत्य, संगीत यांच्या नव्या प्रयोगाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं
आत्ता साठीत असलेल्या त्या वेळच्या जवान प्रेक्षकांसाठी हा अजब प्रयोग होता.
माधुरी असा काही आवाज लावायची....की बस्स
गद्य लेखनाचे गाण्यात रुपांतर प्रेक्षकांना रुचेल का ही भीती खोटी ठरली.
यापेक्षा जास्त क्लु नकोत. मग ओळखालंच लगेच...

चिनूक्स मस्त होता प्रश्न. चार दिग्गज लेखक कोण ते नक्की नाही कळलं.

मी पुल आणि गदिमा असलेले सिनेमे शोधत होते म्हटलं त्यात चवीला अजून दोन लेखक मिळतायत का बघू....

अवनी, तुम्ही दिलेले, शाळकरी वयात पहिले पुस्तक लिहिणार्‍या ह्या व्यक्तीने पुढे जाऊन अनेक हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी लिहिलेले एक नाटक
xx xxx
ह्या प्रश्नाचे उत्तर मला कळले नाही.

मभादिचा चांगला उपक्रम.....सर्वांना भाग घेता येईल असा....माफक प्रतिसाद.....सखेद आश्चर्य
आवाहन......आजच्या व उद्याच्या उपक्रमाचा आनंद घेऊयात....

नाटक सांगतय ....
त्याची ऐका आता कहाणी..<<<<
तीन पैशाचा तमाशा.

ओके अवनी Happy
मला तो प्रश्नच वाटला.

शाळकरी वयात पहिले पुस्तक लिहिणार्‍या ह्या व्यक्तीने पुढे जाऊन अनेक हिंदी चित्रपट दिग्दर्शित केले. त्यांनी लिहिलेले एक नाटक
xx xxx
<<<<<<
सख्खे शेजारी - सई परांजपे

Pages