तान्हाजी - Based on True story निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2020 - 15:20

मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.

1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.

२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.

३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.

(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)

४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अ‍ॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.

५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.

६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.

७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.

८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...

९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.

१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही Happy

-------------------------------------------------

अवांतर निरीक्षणे

अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.

ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...

क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अ‍ॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?

ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?

असो,

मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

IMG_20200118_193832.jpg(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

,नवीन Submitted by रश्मी.. on 19 February, 2020 - 11:45>>>

अनुमोदन.. दुर्दैवाने मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या समर्थ कलाकारांची नावे बऱ्याच लोकांना माहिती नाहीत व माहिती असली तरी त्यांची कदर नाही...

चंद्रकांत व सुर्यकांत मांढरे हे दोघे बंधु कोल्हापूरचे . मराठी चित्रपट सृष्टी मधले मानाचे कलावंत . चंद्रकांत यांनी केलेला॑ छत्रपती शिवाजी हा चित्रपट कधी बघायला मिळाला तर बघ. अतीशय रुबाबदार व देखणे होते हे दोघे जण.>> +++११११११

त्या त्या काळातली एकेक स्टाईल असते.>>>. बरोबर आहे. सिनेमाचा तो काळ कृष्णधवल होता. काळानुसार बदल घडत गेले. त्या सिनेमातली बोली भाषा अशीच गंमतशीर होती. तिकडली किंवा ईकडची स्वारी, मालक/ यजमान वगैरे. आई व मामाने आम्हाला असे अनेक सिनेमे दाखवले.

छत्रपती शिवाजी हा सिनेमा मी बघीतला नाही, पण चंद्रकांत चा रुबाब, संवाद फेक हे अविस्मरणीय असायचे. भालजी पेंढारकरांनी दिग्दर्शीत केलेला हा सिनेमा. भालजी फार कडक शिस्तीचे होते, त्यांना पाणचटपणा अजीबात खपायचा नाही. दादा कोंडकेंनी एक त्यांची आठवण सांगीतली होती. दादांना भालजींबरोबर काम करायचे होते. पण भालजी म्हणाले मी तुला घेईन, पण मला पाणचटपणा अजीबात खपणार नाही. दादा तयार झाले.

गनिमी कावा हा शिवाजी महाराजांवर एक सिनेमा भालजींनी काढला, दादा त्यात एक मावळे होते. पण लोकांना हसवले नाही तर ते दादा कसले. त्यात एक प्रसंग होता की शत्रुपासुन लपायला दादा डोंगरावरल्या एका गुहेत लपायला जातात, अंधारात त्यांना हे कळत नाही की ती गुहा एका अस्वलाची आहे. मग ते अस्वल व दादा दोघे खूप धुडघुस घालतात. हा सिनेमा मी माझ्या मामा, आई व मामेबहिणीबरोबर पाहीला. अर्थात लहान असल्याने आम्हाला फार धमाल आली. मंडईत त्या वेळी जुने आर्यन टॉकीज होते त्यात हा पाहीला.

आजकालच्या माकडछाप नटांच्या मानाने चंद्रकांत, सुर्यकांतची अ‍ॅक्टिंग बरीच दर्जेदार होती. Proud

चंद्रकांत सूर्यकांत पण भरपूर ओव्हरअँक्टींग करायचे की Happy
>>>>

ओके. म्हणजे ते तेव्हाचे मराठतले अरबाझ खान - सोहेल खान होते ...
चर्चा शाहरूखची आहे. त्या तोडीचे नाव घ्या.
शाहरूखने स्टाईल मारली की ओवरॲक्टींग आणि ईतरांनी ओवरॲक्टींग केली तर ती त्यांची स्टाईल. असं नाही चालणार. एक निकष ठेवा

दुर्दैवाने मराठी चित्रपटसृष्टीतील जुन्या समर्थ कलाकारांची नावे बऱ्याच लोकांना माहिती नाहीत व माहिती असली तरी त्यांची कदर नाही...
>>>

शाहरूखचे नाव गल्लीगल्लीतला पोरगा जाणून असतो पण ते विविध कारणांमुळे. त्याच्या अंगात जी कला आहे जी त्याची मेहनत आहे त्याची तरी कुठे कदर होते. त्याला माकड वगैरे म्हणत हिणवणारे कमी आहेत का?

ऋन्मेष, बाबा तुला साष्टांग दंडवत. काय आहे, तुझा हा जो कोण शाहरुख आहे ना, त्याची बरोबरी मी चंद्रकांत-सुर्यकांत यांच्याशी करु शकत नाही. कारण शाहरुख काजवा आहे आणी हे दोघे सुर्य -चंद्र. उगा कशाला त्यांचा अपमान करण्याचे पाप मी करु . मराठीत एक म्हण आहे. हो भाऊ, तू मोठ्या बापाचा. तसेच तुझ्या बाबतीत आहे. कमल हसन वै जीवनात कसा का असेना पण कलाकार म्हणून तो निश्चीत उच्च आहे, त्याला देखील तू या शारुक वेडापायी नावे ठेवलीस. तेव्हाच मला कळयला हवे होते की गिरे तो भी टांग उप्पर असे तुझे वर्तन कायम असते.

सो माझा शारुक बाबतीत पास !

कमल हसन वै जीवनात कसा का असेना पण कलाकार म्हणून तो निश्चीत उच्च आहे,
>>>>

कसा आहे कमल हसन वै जीवनात??

असो,
कमल हसनच्या प्रतिभेबद्दल मला शंका नव्हती. फक्त एक चांगला कलाकार रंगरंगोटीमुळे ओवरहाईप आहे ईतकाच.

जसे हा तान्हाजी चित्रपट स्पेशल ईफेक्टमुळे ओवरहाईप आहे तसाच

कुपोषित मोगॅम्बो Happy
हे (ही) बघा ऋन्मेषसर

सद्दी संपल्ये..

हातच पसरायचे ( ह्याचा मराठीत अर्थ भीक मागणे असा होतो) तर आता चांगल्या संहितेकरता, भुमिकेकरता पसरले तरच काही बरे होईल.
आता रुनू बॉयच्या जमान्यात फक्त गलीबॉय रणवीर !

सॉरी हर्पेनसर हे राहिले Happy
आई अपोलोगाईज ! आई मिसड धिस पोस्ट ॲण्ड ट्र्स्ट मी, ईट्स माई लॉस मोअर दॅन युअर्स !

येनीवेज, आई माई कम टू दि प्वॉईंट ..

चांगल्या संहिता, भुमिका या स्टारडम मिरवणारया लोकांनी शोधायचे कष्ट घ्यायचे नसतात. एखाद्या चांगल्या संहितेच्या पदरी जर शाहरूख पडत नसेल तर ते त्या संहितेचे दुर्दैव. तुम्ही त्या चांगल्या संहिता लिहिणारयांना हा सल्ला द्या की शाहरूख गळाला लागतोय का ते बघा...

बाकी ज्यांनी शाहरूखचा उल्लेख कुपोषित असा केला त्यांनाही किशोरवयीन लिहायचा मोह आवरला नाही यातच सारे आले. म्हणजे एखादा धोनीद्वेषातून त्याला नशीबाचा कर्णधार म्हणून हिणवतो पण त्यालाही धोनीच्या यष्टीरक्षणाबद्दल नकारात्मक बोलवत नाही ईतके ते निर्दोष आहे असे झाले हे.

आणि रणवीर सिंग काय आज आहे उद्याही असेल परवाची ग्यारण्टी थोडी कमी असेल तेरवाची मात्र खात्री नसेल पण शाहरूख हा क्रिकेटमधील सचिन तेंडुलकरसारखा आहे. जसा सचिन रडतखडत निवृत्ती होऊनही त्यानंतरही आपली ब्रांड वॅल्यू जपून आहे. तसेच एस्सारके द किंग खान या ब्रांडला मरण नाही. आजही तो वन मॅन शो आहे. रणवीर-दिपिका किंवा विराट-अनुष्का वा गेला बाजार निक-प्रियांका अशी जोडी त्याला बनवावी लागत नाही. ऊलट त्याची नॉनबॉलीवूड बायको गौरी खानही तितकीच प्रसिद्ध आहे. आर्यन सुहाना अबराम या पोरांनाही त्याच्यामुळे ब्राण्ड वॅल्यु आहे. तर अजून ओळीने दहा वर्षात वीस चित्रप्ट जरी त्याचे फ्लॉप गेले तरी त्याला यत्किंचितही फरक पडणार नाही. अपना टाईम जायेगा हे त्याबाबत कधीच होणार नाही. जर सचिन हा क्रिकेटचा देव असेल तर शाहरूखला बॉलीवूडचा देव म्हणू शकतो. जसे सचिनने जगभरात क्रिकेट खेळणारया देशात भारताची मान ऊंचावली तेच चित्रपटक्षेत्रात शाहरूखने केले. माबोवर कित्येक युएसवासी आहेत. त्यांना विचारून खात्री करू शकता की तिथे काय क्रेझ आहे या माणसाची.

रणवीर वगैरेंचे नाव घेत तुलना करणेही हास्यास्पद आहे. एकेकाळी ऋत्विक रोशन कहो ना प्यार है मधून आलेला तेव्हाही शाहरूख संपला आणि ऋत्विक नवा सुपर्रस्टार झाला असा ओरडा झालेला. पण तसे काही झाले नाही. शाहीद कपूर, अक्षयकुमार, सलमान-आमीर खान ते गेला बाजार रणबीर कपूर ते आज ईतक्या वर्षांनीही रणवीरसिंगची तुलना आणि स्पर्धा शाहरूखच्या स्टारडमशी होते यातच सारे आले.

सचिनची तुलनाही अशीच लारा पाँटींग ईंझीपासून आज कोहलीपर्यंत होते. उद्या कोहली सचिनचा धावांचा विक्रम मोडेलही. पण सचिनचे जगभरातल्या क्रिकेटप्रेमींच्या हृदयातले स्थान कोणी हिराऊन घेऊ शकत नाही. शाहरूखबाबतही तसेच आहे. कोणी त्यापेक्षा जास्त हिट देतीलही, पण त्याची जागा नाही घेऊ शकत.
जर कोणी मला म्हटले की लतादिदींची सद्दी संपलीय आणि हा नेहा कक्करचा जमाना आहे तर मी जसा गालातल्या गालात हसेन तसेच हसणारी बाहुली ईथे डोळ्यासमोर आणा...

शाहरुख खान एका ठराविक प्रकारची व्यक्तिमत्वे असलेल्या अभिनयासाठी ठीक आहे. पण तो काहीही करू शकतो किंवा त्याने केलेले कसलेही काम दर्जेदार च असेल असे समजणे म्हणजे अतिशयोक्तीचा कडेलोट आहे.

शाहरुख खान पेक्षा Christian Bale किंवा आमिर खान अधिक सरस आहेत, कारण त्यांनी भूमिकेसाठी भारदस्त व्यक्तिमत्व बनवण्यासाठी जी मेहनत घेतली, ती शाहरुखला जमेल असं वाटत नाही. त्यांच्या भूमिकांची रेंजही मोठी आहे, तेही कुठलेही prosthetic (किशोरवयीन !) न वापरता...

हो रे बाबा, तुमचा शाहरुख लै छान. पण इतरांना हिणवणे योग्य नाही. इतर बऱ्याच विषयात balanced विचार असणारा ऋन्मेष या बाबतीत का असा वागतो? असो!

पण तो काहीही करू शकतो
>>>>
असं कुठे म्हटलेय...?
पण जे तो करतो ते ईतके भारी करतो की दुसरा कोणी करू शकत नाही हे मात्र म्हणतो.

..

कारण त्यांनी भूमिकेसाठी भारदस्त व्यक्तिमत्व बनवण्यासाठी जी मेहनत घेतली, ती शाहरुखला जमेल असं वाटत नाही
>>>>

मी कधीच शाहरूखला अभिनयसम्राट म्हटले नाही. मी त्याला कधी दिसायला देखणाही म्हटले नाही. या दोन्ही गोष्टीत तो सरस नसूनही तो बॉलीवूडचा बादशाह आहे हेच तर त्याला विशेष बनवते Happy

हो रे बाबा, तुमचा शाहरुख लै छान. पण इतरांना हिणवणे योग्य नाही.
>>>>

दोन कलाकारांची तुलना करत एकाला भारी ठरवत असू तर ते लगेच दुसरयाला हिणवणे नाही होत. जगातल्या प्रत्येक प्राणीमात्रात काहीतरी विशेष असते. अगदी माझ्यातही काहीतरी विशेष आहे याच ॲटीट्यूडमध्ये मी जगतो. तिथे कोणालाही मी कसा काय हिणवेन..
वर मी शाहरूखला सचिन बोलताना जर रणवीर रणबीर ऋत्विक यांना विराट कोहली आणि रोहीत शर्मा म्हणत असेल तर ते हिणवणे झाले का? तर नाही Happy

.

बऱ्याच विषयात balanced विचार असणारा ऋन्मेष या बाबतीत का असा वागतो?
>>>>>

हिच शाहरूखबाबतची मजा आहे. यू कॅन लव्ह हिम ऑर यू कॅन हेट हिम.. शाहरूखबाबत अध्येमध्ये राहण्यात मजा नाही Happy

हर्पेन,
सद्दीयो मे ऐसा सुपर्रस्टार होता है जो सद्दियो तक याद रखा जाता है..
त्याची सद्दी एवढ्यात कशी संपणार Happy

अर्ज केलाय, गौर फरमाईयेगा

आके रोज हमारे दर पे,
बस एक ही बात वोह कहते है..
आज भी हम तुमसे,
ऊतनी ही नफरत करते है !

शाहरूखला समर्पित
कवी ऋन्मेष

यू कॅन लव्ह हिम ऑर यू कॅन हेट हिम>>> नो, मेनी कॅन सिम्पली इग्नोर हिम. Yes, he has struggled a lot, but there are many who did. जब उसका दौर था, तब उसने कमा लिया, आता तेवढंच दिसतंय. एकाच धाटणीचे चित्रपट केले, पण प्रेम करावं तर त्यानेच. इतर बाबतीत तो झिरोच. असो
तुलना करणे हा त्या त्या व्यक्तीचा अपमान असतो. जाऊ द्या, तुम्ही प्रेमात आंधळे आहात, मोदी भक्तांसारखे!

अजिंक्यराव आणि हर्पेन, मी शाहरूखचा चाहता आहे. भक्ताचा शिक्का मारायची घाई का? मी तुम्हाला शाहरूखद्वेष्टा वा मोदीद्वेष्टा असे घोषित केले तर आवडेल का?
मागे माझा एक धागा होता त्यात मी भक्त आणि चाहता यातील फरक शाहरूखच्या उदाहरणासह सांगितला होता. लिंक सापडल्यास शेअर करतो.

आशुचॅम्प, शाहरूखचा उल्लेख म्हणजे धागा हायजॅक होणे नव्हे. शाहरूख चराचरात आहे. तो ईथेच आहे. तो प्रत्येक धाग्यात आहे. असतोच. आपल्याला अध्येमध्ये साक्षात्कार होतो ईतकेच !

त्याला एकदा उघडा करून बघा, इतकं सगळं आहे तर किमान सामान्य माणसासारखे दोन हात दोन पाय नसतील शाखाला
अजुन दोन चार असतील
मानवजातीच्या कल्याणासाठी इतकं कराच

अजिंक्यराव आणि हर्पेन, मी शाहरूखचा चाहता आहे. भक्ताचा शिक्का मारायची घाई का? >>>

घाई कसली, उशीरच झाला Proud
पण आपण निराश केले नाहीत.
शाहरूख चराचरात आहे. तो ईथेच आहे. तो प्रत्येक धाग्यात आहे. असतोच. आपल्याला अध्येमध्ये साक्षात्कार होतो ईतकेच ! >>

भक्त ॠन्मेष यांचा जयजयकार असो.

धागा नक्की कशाबद्दल आहे? ' तान्हाजी' चित्रपटाचा कि शाहरुखबद्दल? Lol

पण प्रेम करावं तर त्यानेच. >>>>>>>> ++++++११११११११ मी ऋन्मेषइतकी आन्धळी भक्त नाही शाखाची. पण मला तो रोमॅण्टि़क, खलनायकी आणि सैनिकी भुमिकान्मध्ये आवडतो. त्याचे काही चित्रपट मात्र इग्नोर करते.

शाहरूखच्या डोक्यावरचे केस गेले तरी चालतील, तोंडातले दात पडले तरी चालतील, डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा लागला तरी चालेल आणि चेहरयावर छप्पन सुरकुत्या पडल्या तरी चालतील. >>>>>>>>>> शाहरुख असो किव्वा सूर्यकान्त चन्द्रकात, मला कुठल्याही हिरोला किव्वा हिरवीणीला म्हातार्या रुपात बघायला नाही आवडत. त्यान्च्या तरुणपणाचा नॉस्टेलजिया एन्जॉय करते मी. हिरो - हिरवीण माझे आवडते असले तर मग बघायलाच नको, इमोशनल होते मी. अस वाट्त की हे आयुष्यभर तरुणच राहिले असते तर किती बरे झाले असते. सामान्य माणूस असो किव्वा कलाकार, शेवटी तरुणपण हे तरुणपणच! Happy

तेव्हाचे मराठतले अरबाझ खान - सोहेल खान होते ... >>>>>>>> ईईईई

कमल हसनच्या प्रतिभेबद्दल मला शंका नव्हती. फक्त एक चांगला कलाकार रंगरंगोटीमुळे ओवरहाईप आहे ईतकाच. >>>>>>>>> सहमत. 'हि न्दुस्थानी ' आवडला होता. पण त्यानन्तर त्याने जी काही रंगरंगोटी सुरु केली. ' अभय' सारख्या चान्गल्या कथेची वाट लावली.

ऋन्मेष, बॉलिवूड फक्त शाहरुखपुरतीच मर्यादित नाही. इतरही चान्गले कलाकार आहेत की. तुझ बॉलिवूडच ज्ञान वाढव.

कोण आहे शारूख? तान्हाजी सुपर्रस्टार अजय देवगणचा पिच्चर आहे.
Submitted by भास्कराचार्य on 20 February, 2020 - 17:49

>>>>

शाहरूख तो आहे ज्याने किमान तीन पिढ्यांना प्रेम करायला शिकवले .. बदाम बदाम बदाम Happy

त्याला एकदा उघडा करून बघा, इतकं सगळं आहे तर किमान सामान्य माणसासारखे दोन हात दोन पाय नसतील शाखाला
अजुन दोन चार असतील
>>>>>

ऋत्विक रोशनला सहा बोटे होती. हे शारीरीक व्यंग आहे. यावर हसू नये. पण याला चमत्कार म्हणत पुजूही नये Happy

Pages