तान्हाजी - Based on True story निरीक्षण

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2020 - 15:20

मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.

1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.

२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.

३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.

(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)

४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अ‍ॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.

५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.

६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.

७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.

८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...

९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.

१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही Happy

-------------------------------------------------

अवांतर निरीक्षणे

अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.

ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...

क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अ‍ॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?

ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?

असो,

मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही Happy
धन्यवाद,
ऋन्मेष

IMG_20200118_193832.jpg(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी एक वाक्या अगदी पटलं. मायबोली पूर्वीसारखी राहिली नाही. एक गंमत अगदी आत्ता घड्ली बरंका. माननीय डीजे ह्यांनी एका दुसर्या धाग्यावर एक विधान केलं. ज्याचा सरळ अर्थ असा होता की छत्रपतिंनी पेशव्यांची नेमणूक केली. अजिंक्यरावांनी जे मीनलताईंना म्हटलंय ना, की छत्रपतींनी पेशव्यांना नेमलं हे वाक्य महाविनोदी आहे. मी म्हटलं चला. डी़जेंच वाक्य कोट करावं म्हणून पहायला गेले तर प्रतिसाद डिलिट केलेला.

एनिवेज. अजिंक्यराव, मी तरी असंच वाचलंय की छ्त्रपती शाहू महाराज जे छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते, त्यांनी आधी बाळाजी विश्वनाथांची आणि बाळाजींच्या निधनानंतर बाजीरावांची पेशवे म्हणून नियुक्ती केली. आपणास काही वेगळे माहित असल्यास सांगावे.

एक गंमत अगदी आत्ता घड्ली बरंका. माननीय डीजे ह्यांनी एका दुसर्या धाग्यावर एक विधान केलं. ज्याचा सरळ अर्थ असा होता की छत्रपतिंनी पेशव्यांची नेमणूक केली. अजिंक्यरावांनी जे मीनलताईंना म्हटलंय ना, की छत्रपतींनी पेशव्यांना नेमलं हे वाक्य महाविनोदी आहे. मी म्हटलं चला. डी़जेंच वाक्य कोट करावं म्हणून पहायला गेले तर प्रतिसाद डिलिट केलेला.>>
Submitted by अस्मानी on 23 January, 2020 - 05:17

अस्मानी ताई, तुम्हाला भास वगैरे होत आहेत का...?
ह्या धाग्याचा काही उपयोग होतो का बघा : https://www.maayboli.com/node/73109#comment-4471910

आणि हो. मी तरी सगळ्या खर्या साधूसंतांना देवाचे अवतारच मानते. आणि बरीच माणसं तसंच मानत असावित नाहितर साधूसंतांची समाधी मंदिरं, मठ वगैरे बनले नसते. लोक त्यांच्या दर्शनाकरीता गेले नसते.

मिनलताईंना फार कष्ट नको पडायला म्हणून सांगतो, पेशवा पद शिवशाहीपासूनच सुरु झालं. पहिले पेशवा मोरोपंत पिंगळे. पेशवा अष्टप्रधान मंडळाचा प्रमुख असतो.

मग मोरोपंत पिंगळे कोण होते हे तुम्ही अभ्यास करावा.. स्पष्टीकरण तुम्हाला हवं होतं.. चला मान्य केले तर की छत्रपती नी पेशव्यांची नेमणूक केली.. किंवा गरज भासली

मुद्दाम खोडसाळ, चिथावणीखोर प्रतिसाद का देत आहात आपण? नेमणूक केली आणि गरज भासली या दोन शब्दातला फरक कळत नसेल, तर इतिहासासोबत मराठीचा देखील अभ्यास सुरु करा आता

मग ठिक आहे ना. छत्रपतींनी पेशव्यांची नेमणूक केली हे बरोबरंच आहे. मग ह्यात विनोदी काय होतं? छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंतांची पेशवे म्हणून नेमणूक केली तशी छत्रपती शाहू महराजांनी बाजीरावांची पेशवे म्हणून नेमणूक केली. माणसं बदलली. टायटल्स तीच राहिली.

बाजीरावला नाचगाण्याची आवड होती, मस्तानी खूप कुशल नर्तिका होती हे सत्यच आहे. यात डीजे याना उगाच का लक्ष्य केले जात आहे कळलं नाही.
पेशव्यांनी खरोखर असली प्रकरणं न करता आपल्याला छत्रपतींनी नेमून दिलेली कामं नीट केली असती तर स्वतःची आणि राज्याची प्रगती करून घेतली असती.

अजिंक्यराव नाराज का होताय? एखाद्या पोस्टवर एखाद्याची नेमणूक केली जाते तेव्हा त्या पोस्टवर काम करण्यासाठी कुणाचीतरी गरज असते म्हणूनच केली जाते ना? आणि एखाद्या नेमक्या माणसाची नेमणूक केली जाते म्हणजे त्या पोस्टसाठी तो माणूस लायक असतो म्हणून केली जाते ना?

बाजीरावला नाचगाण्याची आवड होती, मस्तानी खूप कुशल नर्तिका होती हे सत्यच आहे. यात डीजे याना उगाच का लक्ष्य केले जात आहे कळलं नाही.
पेशव्यांनी खरोखर असली प्रकरणं न करता आपल्याला छत्रपतींनी नेमून दिलेली कामं नीट केली असती तर स्वतःची आणि राज्याची प्रगती करून घेतली असती.>>>>> धन्य आहात. अहो ४० वर्ष जगले ते फक्त. त्यातलं अर्धं आयुष्य रणांगणावर काढलं त्यांनी. त्यांच्याकडे वेळ असेल नाचगाण्याला? मस्तानी त्यांना राजा छत्रसालाने दिली होती. त्यांचा दोष असेल तर एवढाच की मस्तानीला "ठेऊन" न घेता त्यांनी तिच्याशी लग्न केलं. तिच्यावर प्रेम केलं. आणि कुठली हो कामं नीट केली नाहित त्यांनी? मराठी राज्य कुठ्ल्याकुठे वाढवलं त्यांनी. नर्मदेच्या परिसरात आजही त्यांना पेशवा सरकार म्हणून मान आहे. पण आपलीच लोकं त्यांचं असं चारित्र्यहनन करतांना पाहून वाईट वाटतं.

आणि हो. राजा छत्रसाल बुन्देलांनी बाजीरावांना मस्तानी का दिली होती ह्याचाही इतिहास वाचलात तर बरे होईल.

त्या वाक्याचा खरा अर्थ आणि रोख स्पष्ट असताना तुम्ही जी सारवासारव करीत आहात ती खेदजनक आहे. दुसरा मुद्दा, मीनल या आयडीच्या "४थी ला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे.. त्या नंतर संभाजीराजे, शाहू महाराज, पेशवेपद वैगरे.. जावू द्या.." या वाक्यावरून त्यांचा इतिहासाचा अभ्यास किती हुच्च आहे हे लक्षात येतंय.
या शिवाय "पेशव्यांना प्रधान नेमले" या वाक्यातला विनोद फोडून सांगावा लागणार असेल तर तुम्ही चालू द्या तुमची चर्चा

नुसता वेड्याचा बाजार अन पेढ्याचा पाऊस आहे ईथे. यांना काय वाटतं ते इतरांच्या माथी मारुन नव्या इतिहासाचा कर्नाटकी कशीदा लिहुन घेत आहेत इथल्या दोन भगिनी निवेदिता.

अस्मानी जी सोडून द्या.. पेशव्यांच योगदान नाकारणे हेच उद्दिष्ट ठेवुन ही चर्चा चालू आहे..पण ते कोणाला ही शक्य नाही म्हणून मस्तानी बाईंचा उल्लेख केला जातो आहे, आणि Ajinkyarao Patil ji हे खोडसाळ, चिथावणीखोर प्रतिसाद नाहीत..हे माझे मत आहे.. तुम्हाला ते तसे का वाटत आहे? इतिहास अभ्यासा.. छत्रपती आणि पेशवे यांचे योगदान फार आहे.. त्यामुळे ते नाकारू नका.

बाजीराव रंगेल??? कुठे चालला आहे धागा ??
बाजीराव ने मस्तानी से मोहब्बत कि थी ... अय्याशी नही...

ब्राह्मण विरुद्ध मराठा असा धागा वळवू नका मीनल जी.. नवीन धागा उघडा..

ज्यानीं हा धागा वळवला त्यांना सांगितले तर बरे... रामदासी,रंगेल,वरण भात तुप असा उल्लेख का झाला? मला कोणताही धागा काढायची गरज नाही.. ज्यांना असेल त्यांनी करावा

एक सहज वाटले म्हणून लिहीते. भन्साळीने काशीबाई व मस्तानी यांना एकत्र नाचतांना दाखवले म्हणून बराच रोष निर्माण झाला. आता त्याने ती सिनेमॅटीक लिबर्टी का काय म्हणतात ती घेतली. पण निदान त्याने बाजीराव कोण होता ते तरी अमराठी लोकांपर्यंत पोहोचवले. अमराठी लोकांच्या मनात स्वातंत्र लढ्यात जे सामिल आहेत ( म्हणजे महाराष्ट्र वगळुन सर्व उत्तरेकडील आणी दक्षिणेकडील तसेच पूर्वेकडली राज्ये ) तेच खरे शूर वीर आहेत असा समज होता किंवा आहे. ज्यांना छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे, श्रीमंत बाजीराव आणी रघुनाथराव पेशवे, श्रीमंत बाळाजी विश्वनाथ माहीत नाहीत, त्यांच्यापर्यंत निदान हे पोहोचले तरी मग तो सिनेमा बाजीराव मस्तानी असो वा तान्हाजी. या सिनेमांमधल्या चूका सोडुन द्या आणी आपल्या मुलांना-मुलींना तान्हाजी जरुर दाखवा. माझी मुलगी पण मागे लागलीच आहे, मी पहाणार.

कारण या वीरांनी जे शौर्य दाखवले त्याला तोड नाही. छत्रपती शिवाजी राजे आणी छत्रपती संभाजी राजे नसते तर आज महाराष्ट्रात आपले पूर्वज मुघलच बनले असते.

कारण या वीरांनी जे शौर्य दाखवले त्याला तोड नाही. छत्रपती शिवाजी राजे आणी छत्रपती संभाजी राजे नसते तर आज महाराष्ट्रात आपले पूर्वज मुघलच बनले असते.>>>> १०००% सहमत.

अमराठी लोकांना थोरले बाजीराव, तानाजी ह्यांची ओळख झाली, शौर्य कळलं हा मोठाचं फायदा आहे अश्या सिनेमांचा! जे लोक कधी स्वतःच गावं सोडून कधीच बाहेर पडले नाहीत त्यांना कधीच ह्या गोष्टीची किंमत कळणार नाही. सगळ्या मराठी शूरांचे मग शिवाजी महाराज असो, बाजीप्रभू देशपांडे असो, महात्मा फुले असो, सावरकर असो हिंदीतून सिनेमे निघाले पाहिजेत आणि निव्वळ ही सगळी मंडळी मराठी आहेत म्हणून ह्या सिनेमांना मराठी माणसांनी प्रचंड संख्येने जाऊन हिट करायला पाहिजे.

महाराष्ट्राबाहेर शालेय शिक्षणक्रमात शिवाजी महाराज आणि पेशव्यांबद्दल अक्षरशः एक परिच्छेद असतो. पूर्ण दिल्ली सल्तनतचा अफगाणिस्तान आणि इराण पासून इतिहास असतो. लहान मुलांना catchy वाटेल असाच सिनेमा बनवायला हवा. मुलं जातील, त्यांच्याबरोबर पालक जातील, मुलांना इंटरेस्ट येईल, ते जाणून घेण्याचा प्रयत्न तरी करतील की माझ्या लोकांचा नक्की भूतकाळ काय आहे. They seems interesting!

कारण या वीरांनी जे शौर्य दाखवले त्याला तोड नाही. छत्रपती शिवाजी राजे आणी छत्रपती संभाजी राजे नसते तर आज महाराष्ट्रात आपले पूर्वज मुघलच बनले असते...

अगदी खरं आहे हे .. पुर्णपणे सहमत

वर कोणी लिहीलेय की महाराजांच्या डोळ्यात पाणी आले असे दाखवले. का नाही येणार ? त्यांचा एकेक योद्धा म्हणजे हिरा होता, मोती होता. त्या सर्वांनी जनतेकरता आयुष्य वेचले.

म्यानातुन उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात या गाण्यात ते फिरता बाजूस डोळे किंचीत ओले ही ओळ ऐका.
https://www.youtube.com/watch?v=KB-0XOb8cXQ

>> चित्रपटाच्या नावामध्ये तानाजी ऐवजी तान्हाजी का आहे?
>> Submitted by कोहंसोहं१० on 19 January, 2020 - 09:27

सिनेमा अजून पाहिला नाही. पण हा प्रश्न मला सुद्धा छळत होता. इथे त्यावर चर्चा झालेली वाचून बरे वाटले.

>> तानाजीचे तान्हाजी करण्यामागे अंधश्रद्धा आहे.
>> Submitted by मानव पृथ्वीकर on 19 January, 2020 - 09:39

हि थियरी पटण्यासारखी आहे. सिनेइंडस्ट्रीत न्यूमरॉलॉजीस्ट लोकांची फार चलती आहे. आणि हे अनेकदा जाणवते.

पण तोच हे माझ्याही वाचनात आले...

>> तानाजीच्या हयात वंशजांनी त्याचे नाव तान्हाजी होते व तेच चित्रपटात वापरावे असे सांगितले असे वाचले आहे.
>> Submitted by साधना on 19 January, 2020 - 09:39

उत्सुकतेपोटी, गडावर जो पुतळा आहे त्यावर नाव काय आहे हे शोधले असता तिथे तानाजी व तान्हाजी हि दोन्ही नावे आढळतात...

tanaji_tanhaji.jpg

ते फिरता बाजूस डोळे किंचीत ओले>>> ते डोळे प्रतापराव गुजरांचे होते. शिवरायांनी पाठवलेल्या पत्रानंतरची प्रतापरावांची reaction म्हणून ती ओळ आहे कवितेत.

तान्हाजी बाफ वर पण नेहमीच्या (आड) वळणाने जाती, आडनावांवर नेहमीचे लोक घसरले का ! यांचे बाहू आडनाव वाचून फुरफुरायचे की नाही ठरवतात, आडनावावरून कुणाला पानिपत आवडेल की तान्हाजी हे घाऊक ठरवतात, पण कन्फ्रन्ट केले की शेपूट घालतात! Lol दीज पीपल आर सो प्रेडिक्टेबल.

आडनांवावरुन वाद सुरु झाला नसावा, तो "पानीपत" या चित्रपटाच्या अपयशावरुन सुरु झाला असं वाटतंय. पण ते वाक्य काहिंनी इतकं अंगाला का लाउन घेतलं हि बाब विचार करण्यासारखी आहे...

>> तान्हाई देवी वरून तान्हाजी हे नाव ठेवले होते.
>> खरे नाव तान्हाजीचं असावे.
>> Submitted by me_rucha on 23 January, 2020 - 20:00

असेलही. त्या नावाच्या देवीचे (तान्हाई माता) उल्लेख आढळतात. पण फारशी प्रसिद्ध नसावी बहुतेक. फार कमी उल्लेख आढळतात.

Pages