मला परीक्षण लिहिता येत नाही म्हणून मोजकी निरीक्षणे लिहितो.
1) पहिल्याच क्रमांकात अंजलीबद्दल लिहिण्याचा मोह आवरत नाही. येस्स, काजोल अगदी तशीच वाटली आहे. अजय देवगणसोबत कौटुंबिक रोमान्स करताना आत्ता बॅकग्राऊंडला "कभी खुशीss कभी गम.." वाजू लागेल असे वाटत राहते. कदाचित तिच्या दृश्यांचे चित्रिकरण करायला पाहुणा दिग्दर्शक म्हणून करण जोहारला बोलावले असावे. अर्थात ते बोअर झाले अश्यातला भाग नाही, पण आजवर भन्साली स्टाईल ऐतिहासिक रोमान्स बघितल्याने हा फरक चटकन लक्षात आला ईतकेच. बहुधा काजोल प्रत्यक्ष आयुष्यात देखील सौं देवगण असल्याने तिला चित्रपटात तानाजीची बायको दाखवली असावी जेणेकरून श्री देवगण यांना अभिनय करताना तो फील येईल. पण आपल्याला मात्र तो येत नाही.
२) लेडीज फर्स्ट नंतर आता सिंघमची बारी. चित्रपट थ्रीडी नसून फोर डी असणार याचा अंदाज ट्रेलर बघूनच आलेला. हा चौथा डी देवगणचा. तो आपल्या अपेक्षा पुर्ण करतो. सिंघमस्टाईल ॲक्शन आणि त्याचा तो आंखो आंखोसे अभिनय करणारा ईन्टेन्स लूक ! या भुमिकेत त्याच्या या दोन्ही कलागुणांना पुरेपूर वाव होता. देवगणने देखील ही संधी वाया जाऊ दिली नाही. त्याला पाहून आपण वॉव म्हणतोच.
३) पद्मावत चित्रपटात रणवीर सिंगने साकारलेला व्हिलन खिलजी भाव खाणारा होता पण शाहीदने सुखद धक्का देत तोडीस तोड टक्कर दिलेली. ईथेही अजय देवगण तानाजी झाला असताना सैफला भाव खायचा फार वाव असेल असे वाटले नव्हते. पण तो तोडीस तोडच्याही एक पाऊल पुढे गेला. मला या चित्रपटातले सर्वात जास्त आवडलेले कॅरेक्टर म्हणजे सैफने साकारलेला उदयभान. हिडीसफिडीस अंगावर येणारा अभिनय न करता तो पुरेशी क्रूरता दाखवतो. वेळप्रसंगी विनोद आणि मनोरंजनही करतो. चित्रपटात ईतर मनोरंजक मसाला फार नसल्याने याची खरेच गरज होती. शिट्ट्या आणि टाळ्या खेचायचे काम मर्द मराठा मावळ्यांकडे असले तरी पब्लिकच्या चेहरयावर हास्य छोटे नवाब सैफ अली खानच उमलवतात.
(विनोदावरून पडलेला एक प्रश्न - त्या काळात "चुतिया" हा शब्द होता का? त्यावरून चित्रपटात विनोद दाखवले आहेत)
४) कथा छोटी आहे. पण पटकथा फुलवता आली असती ते टाळले आहे. संकलन दृष्टीने म्हणाल तर ते छान आहे. पण खटकले ते शिवकालीन काळ म्हणावा तसा उभाच राहिला नाही. तो फिलच आला नाही. तेव्हाची जीवनपद्धती, संस्कृती काहीच कुठेच जाणवत नाही. तानाजीच्या वडिलांचा लढाईत हात कापला जाणे, त्यांनी मृत्युपूर्वी आपल्या हातातले कडे लहान तानाजीच्या हातात सरकावणे, पुढे मोठे होत त्याने प्रतिशोध घेत ते कर्ज फेडणे, असा ऐंशीच्या दशकातील वैयक्तिक फिल्मी अॅंगल दाखवण्यापेक्षा रयतेवरचे जुलूम खोलात दाखवून ती लढाई स्वराज्याशी आणखी जोडता आली असती. तसेच तान्हाजीचे कोंढाणा व्यतीरीक्त त्या आधीचे काही पराक्रम दाखवता आले असते. पण चित्रपटाचा पुर्ण फोकस कोंढाण्यावरच राहिला आहे.
५) जे दाखवले आहे त्यात सगळ्या फ्रेम्स सुंदर आणि भव्यदिव्य करायच्या नादात कृत्रिमता आली आहे. स्वित्झर्लंड वा गेला बाजार सिमला मनालीला जाऊन बागडणे आणि मुंबईतल्याच एखाद्या मॉलच्या स्नो वर्ल्डमध्ये जाऊन सेल्फी काढणे यातल्या आनंदात नैसर्गिक विरुद्ध कृत्रिम अनुषंगाने जो फरक जाणवतो तोच अखंड चित्रपट मला जाणवत राहीला. कदाचित मलाच जे दिसतेय ते गोड मानून घेता आले नसेल हा माझा रसग्रहणदोषही असावा.
६) संवाद ठिकठाक आहेत. मी ऐकलेले की लोकं टाळ्या आणि शिट्ट्या वाजवतात. कुठे ते याची कल्पना नाही. आमच्या शो ला काही जणांनी ओढून ताणून तो प्रयत्न केला पण मग नंतर शांतच राहिले. एखादा मुळातच हौशी ग्रूप असेल तर ते त्यांचे क्रेडीट, मात्र चित्रपट बघताना आपण कुठे उत्स्फुर्तपणे एखादी आरोळी ठोकावी असे मला तरी वाटले नाही. कुठे अंगावर शहारा आला वा डोळे पाणावलेत असेही विशेष झाले नाही.
७) थ्रीडीने मात्र मजा आणली. दोनचार तीरकमान भाले वगैरे घुसले अगदी माझ्या छातीत. एकावेळी तर मी ईतके बेसावध असताना हे झाले की मी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून डोळ्यावरचा गॉगलच काढून ऊलटा फेकून मारणार होतो. त्यामुळे हा चित्रपट बघावा तर थ्रीडीमध्येच. अन्यथा बघूच नका, पुर्ण पैसे वाचवा. मोबाईलवर बघणार असाल तर त्यातही मजा नाही. वेळही वाचवा. फार काही विशेष ईतिहासातही भर पाडणारा नाहीये. त्यापेक्षा चार पैसे खर्चून चित्रपटगृहातच एक थ्रीडी साहसपट म्हणूनच त्याचा लुफ्त घ्या.
८) गाणी सुपर ड्युपर हिट नसतील पण त्या त्या वेळेस स्फुरण चढवणारी आणि चित्रपटाचा मूड कायम ठेवणारी आहेत. व्यावसायिक चित्रपटाची डिमांड पुर्ण करायला तानाजीला नाचवलेय पण मुळातच अजय देवगणला नाचता येत नसल्याने तानाजी फार काही कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन नाचलाय असे झाले नाही. शंकरा रे शंकरा गाण्यात तर कोरेओग्राफीही मजेशीर होती. तानाजी मिशीला पीळ देत सलमानला शोभावी अशी स्टेप मारतो आणि सैफ अली खान त्याला आनंदाने कॉपी करतो. पण सगळ्यात भारी होते ते पार्श्वसंगीत. चित्रपटाला तेच तारून नेते. चित्रपट संपल्यावरही जर काही डोक्यात घोळत राहते, म्हणजे अगदी आता हे परीक्षण, ऊप्स निरीक्षण लिहितानाही माझ्या डोक्यात वाजत आहे, तर ते.. राराराss राराह रार राss राह रारा रा रा राहss...
९) शिवाजी महाराज - शरद केळकर. छान छोटी भुमिका. संयत अभिनय. शोभून दिसला. आणि हे फार महत्वाचे होते. कारण महाराजांची आपल्या मनात जी प्रतिमा असते तिला पुर्ण न्याय आदर मानसन्मान मिळणे फार गरजेचे वाटते मला. आणि दुसरे म्हणजे महाराजच दमदारपणे उभे करणे जमले नसते तर तानाजीचीही शोभा गेली असती.
१०) दस बात की एक बात. चित्रपट तांत्रिक अंगाने उत्तम आहे. चित्रपटांचे चाहते असल्यास जरूर बघा. पैसा वसूल वाटेल. पण आज मी काही भारी बघितले ही फिलिंग मला तरी आली नाही. तसेच मला यात रिपीट वॅल्यु देखील दिसत नाहीये. सामान्य जनतेमध्ये मात्र या चित्रपटाला घेऊन उत्सुकता आणि क्रेझ दिसून येते. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मातीतल्या वीराची कहाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची, त्यांच्या एका मावळ्याची कहाणी आहे. पडद्यावर जेव्हा महाराज येतात तेव्हा लोकं त्या दृश्याला कॅमेरयात कैद करून व्हॉटसपला स्टेटस ठेवत आहेत. यामागे निव्वळ फॅड नसावे, तर ते कुठूनतरी आतूनच येते. तो मोह मलाही आवरला नाही
-------------------------------------------------
अवांतर निरीक्षणे
अ) पॉपकॉर्न खूपच महाग झालेत. न घ्यावेत तर बायको नाराज, घ्यावेत तर खिसा साधू महाराज.
ब) काही लोकांना थ्रीडी चित्रपट बघून झाल्यावर त्या चष्म्याचा मोह का सुटत नाही? घरी नेऊन तो काय डोरेमॉन बघायला वापरणार आहात? काय फायदा मग एखाद्या वीर पुरुषाचा चित्रपट बघून जर तुम्हाला पुढच्याच मिनिटाला क्षुल्लक स्वार्थ सोडता येत नसेल...
क) पिक्चर थ्रीडी आहे, स्पेशल ईफेक्टचा मारा आणि दमदार अॅक्शन आहे, एकंदरीत दणादण साऊंड असणार आहे.. याची कल्पना असतानाही लोकं तान्ह्या बाळांना का रडवायला पिक्चरला घेऊन येतात?
ड) लोकं शनिवारी सकाळच्या शो ला सुद्धा मोबाईल का सायलेंट ठेऊ शकत नाही? त्यांना श्री नरेंद्र मोदींचा कॉल येणे अपेक्षित असते का?
असो,
मी चित्रपट खरेच पाहिला आहे का? ईथपासून.....
चित्रपटाला खरेच मीच गेलेलो का? ईथपर्यंत.....
या अश्या शंका काही लोकांना वारंवार पडतात. तर फक्त त्यांच्यासाठी म्हणून एक आवर्जून फोटो काढला आहे तो खाली डकवतो, ईतरांनी न पाहता स्क्रॉल केले तरी हरकत नाही
धन्यवाद,
ऋन्मेष
(तान्हाजी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हापासूनच या फोटोसाठी खास दाढी वाढवायला घेतलेली)
पावनखिंड मुव्ही मराठीत आहे की
पावनखिंड मुव्ही मराठीत आहे की हिंदीत?
मराठा साम्राज्याच्या शौर्याची
मराठा साम्राज्याच्या शौर्याची बॉलीवुडला ओळख करुन देणार्या तान्हाजी चित्रपटाने आज अखेर ३५६.०६ कोटींची (बजेट १२४ कोटी) कमाई केली.
बाजिराव-मस्तानी ने ३५६ कोटी (बजेट १४५ कोटी ) कमावले होते तर 'पानिपत' ने ४९.२९ कोटी (बजेट-१०० कोटी) कमावले होते.
बाहुबलीची कमाई किती होती?
बाहुबलीची कमाई किती होती?
बाहुबली मराठी साम्राज्यावर
बाहुबली मराठी साम्राज्यावर होता का ??
मला तान्हाजीतही मराठी
मला तान्हाजीतही मराठी साम्राज्य फार दिसले नाही
माझ्या निरीक्षणातही मी वर हे लिहिले आहे.
असो, मी सहज विचरले कारण बाहुबलीने एक बेंचमार्क सेट केलाय त्या स्केलवर कुठला स्पेशल ईफेक्ट ॲक्शनपट किती कमावतो हे मोजले की आकलनास सोपे पडते.
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख मोगेम्बो होणार
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख मोगेम्बो होणार>> म्हणजे एकदाची हिरोगिरी उतरली वाटतं..!
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख मोगेम्बो होणार
नवीन Submitted by BLACKCAT on 18 February, 2020 - 08:11
>>>
डोक्यावर केस नसलेला शाखा कसा दिसेल? :विचारात पडलेला बाहूला:
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख मोगेम्बो होणार>> म्हणजे एकदाची हिरोगिरी उतरली वाटतं..!
>>>>>
म्हणजे चित्रपट मोगॅम्बो खाणार...
डर चित्रपटात एका नवोदीत व्हिलनने जसे तेव्हाचा ॲक्शन सुपर्रस्टार सनी देओलला खाल्ले होते.
बाजीगर चित्रपटात व्हिलन मेल्यावर सारे हळहळले होते.
अंजाम हा स्त्रीप्रधान चित्रपट ज्याने व्हिलन असून आपल्या नावावर केला होता.
कभी हा कभी ना मध्ये हिरोईन ज्याला मिळते तोच हिरो असे नसते हे दाखवले होते.
शाहरूख आहे तो !
मिस्टर ईंडियामध्ये त्याने कॅलेंडरचा रोल केला तरी तो पिक्चर शाहरूखचा म्हणून ओळखला जाईल
एक माणुस चिडलं वाटतं
एक माणुस चिडलं वाटतं
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख
मिस्टर इंडिया 2 मध्ये शाहरुख मोगेम्बो होणार >>>> मोगॅम्बो , ख..ख..ख.खुश हुआ !
एक माणुस चिडलं वाटतं >>>>>
एक माणुस चिडलं वाटतं >>>>>
सुर्यकांतच्या आवाजात कल्पुन वाचले. 
रश्मी.. वैनी
रश्मी.. वैनी
शाहरुख खान ने मोगम्बो होणे हे
शाहरुख खान ने मोगम्बो होणे हे म्हणजे राहुल गांधीने अमित शहा होण्या सारखे आहे!
एक माणुस चिडलं वाटतं Wink
एक माणुस चिडलं वाटतं Wink
Submitted by DJ.. on 18 February, 2020 - 09:38
डोक्यावर केस नसलेला शाखा कसा
डोक्यावर केस नसलेला शाखा कसा दिसेल? >>>>>>>> मोगॅम्बोला केस होते की सिनेमात.
भुमिकान्ची अदलाबदल केली पाहीजे. म्हणजे शाहरुख मिस्टर इंडिया आणि रणवीर मोगॅम्बो. रणवीरला मोगॅम्बो सूट होईल.
एक माणुस चिडलं वाटतं >>>>>>>
शाखाला वाटले तर तो त्या
शाखाला वाटले तर तो त्या पिक्चर मधल्या जादुई घड्याळाची सुद्धा भूमिका करेल तर मोगेम्बो काय चीज आहे !!
शाहरुख खान ने मोगम्बो होणे हे
शाहरुख खान ने मोगम्बो होणे हे म्हणजे राहुल गांधीने अमित शहा होण्या सारखे आहे!
>>>>
धाग्यात ऑलरेडी शाहरूख आलाय. त्यामुळे शहामोदीरागा वगैरेंची गरज नाहीये आता.
....
सुर्यकांतच्या आवाजात कल्पुन वाचले. Proud
>>>>
कोण सुर्यकांत? शाहरूखपेक्षा मोठा स्टार आहे का हा?
....
डोक्यावर केस नसलेला शाखा कसा दिसेल?
>>>>>
शाहरूखच्या डोक्यावरचे केस गेले तरी चालतील, तोंडातले दात पडले तरी चालतील, डोळ्यांना जाड भिंगाचा चष्मा लागला तरी चालेल आणि चेहरयावर छप्पन सुरकुत्या पडल्या तरी चालतील. पण तेव्हाही तो जेव्हा आपले दोन हात पसरेल तेव्हा तो किंग खान शाहरूखच असेल
....
भुमिकान्ची अदलाबदल केली पाहीजे. म्हणजे शाहरुख मिस्टर इंडिया आणि रणवीर मोगॅम्बो. रणवीरला मोगॅम्बो सूट होईल.
>>>>>
सहमत आहे.
मिस्टर ईंडियाचा अनिल कपूर आणि राजू बन गया जण्टलमॅन किंवा चमत्कारचा शाहरूख खान फार साम्य आढळते. एक साधेपणा आहे या कॅरेक्टर्समध्ये जो मध्यमवर्गीय सरळमार्गी लोकांना जोडतो नायकाशी.
.......
एक माणुस चिडलं वाटतं Wink
>>>
जर शाहरूखबद्दल कोणी काही म्हणताच प्रत्युत्तर देणे हे चिडणे असेल तर हो... हो... मी चिडलो हो !
अभिषेकच्या शाहरुखची सद्दी
अभिषेकच्या शाहरुखची सद्दी संपल्ये आता त्याचा उत्तराधिकारी रुनूचा रणवीर आहे.
चिड आता
हर्पेन
हर्पेन
पण मोगॅम्बो चे काम हात पसरून
पण मोगॅम्बो चे काम हात पसरून करायचे नाहीय... त्यासाठी भारदस्त माणूस पाहिजे.. कदाचित किशोरवयीन कुपोषित मोगॅम्बो दाखवण्यासाठी शाहरुखला काही फुटेज मिळणार असावे..
किशोरवयीन
किशोरवयीन
हे बघा हर्पेन..
आणि तुम्ही शाहरूखची सद्दी संप्वायला निघाला आहात
किशोरवयीन, म्हणजे झीरो चा
किशोरवयीन, म्हणजे झीरो चा पुढील भाग असावा का?
:विचारात पडलेला बाहूला:
झीरो मी पाहिला नाही त्यामुळे
झीरो मी पाहिला नाही त्यामुळे नोव कॉमेंटस
पण शाहरूख या चित्रपट वगैरेंच्या पलीकडले व्यक्तीमत्व आहे.
झिरो चांगला चित्रपट आहे.
झिरो चांगला चित्रपट आहे.
झिरो चांगला चित्रपट आहे.
झिरो चांगला चित्रपट आहे.
>>>>
या माहितीबद्दल धन्यवाद
कुठे मोबाईलवर फुकटात बघायचा योग आला तर झरूर बघणार
कुपोषित मोगॅम्बो
कुपोषित मोगॅम्बो
हे (ही) बघा ऋन्मेष
सद्दी संपल्ये..
हातच पसरायचे ( ह्याचा मराठीत अर्थ भीक मागणे असा होतो) तर आता चांगल्या संहितेकरता, भुमिकेकरता पसरले तरच काही बरे होईल.
आता रुनू बॉयच्या जमान्यात फक्त गलीबॉय रणवीर !
कोण सुर्यकांत? शाहरूखपेक्षा
कोण सुर्यकांत? शाहरूखपेक्षा मोठा स्टार आहे का हा?>>>>>>>
अयायाया ! ऋन्मेष , तू तुझ्या डोळ्यावरचा शरुकचा बुरखा उतरव त्या शिवाय तुला दुसरे कोणी चांगले दिसणारच नाही. चंद्रकांत व सुर्यकांत मांढरे हे दोघे बंधु कोल्हापूरचे . मराठी चित्रपट सृष्टी मधले मानाचे कलावंत . चंद्रकांत यांनी केलेला॑ छत्रपती शिवाजी हा चित्रपट कधी बघायला मिळाला तर बघ. अतीशय रुबाबदार व देखणे होते हे दोघे जण.
जाऊ दे, तुला काय कळणार जिवंत कला काय असते ते. तू आपला शारुक एके शारुक व जबरा फॅनच करत बस.
हर्पेन
हर्पेन
Submitted by रश्मी.. on 19
Submitted by रश्मी.. on 19 February, 2020 - 11:45>> + ९९९
Pages