भाग १
http://www.maayboli.com/node/42915
भाग २
http://www.maayboli.com/node/42919
भाग ३
http://www.maayboli.com/node/42971
भाग ४
https://www.maayboli.com/node/43034
मागच्या काही सायकल पोस्टला फक्त माबोकरच नव्हे अनेकांचा चांगला प्रतिसाद लाभला. अनेकांनी व्यक्तीगत संपर्क साधून सायकलबद्दल विचारणा केली, सायकली घेऊन चालवायला सुरुवात केली, काहींनी नुसत्याच चौकश्या केल्या तर चौकशा न करताच सायकली घेऊन मग विचारणा करणारे पण मिळाले.
सगळ्यांचेच कौतुक आणि अभिनंदन
पण या सगळ्यात एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आधीचे भाग पुरेसे मार्गदर्शक ठरले नाहीत. काही बेसिक गोष्टी आणि बेसिक प्रश्न वारंवार विचारण्यात आले, त्यामुळे त्यावरच पुढचा भाग टाकावा असा विचार करत आहे.
आधीचे भाग एडीट करण्यापेक्षा यातच अजून सविस्तर लिहीत आहे.
१. सायकल कुठली घ्यावी - सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणून याचे पहिले उत्तर
तर याचे एक असे उत्तर नाही, तुमचे वय, शारिरिक क्षमता, बजेट आणि वापराचा उद्देश अशा अनेक गोष्टी त्यात निगडीत असतात. त्यामुळे अगदी सोपे करून सांगतो.
पहिला मुद्दा वयोगट
वय वर्षे १ ते ५ -फार विचार करण्याची गरज नाही. जवळपासच्या दुकानातून आकर्षक रंगाची, साईड व्हिल्स असलेली, बास्केट आणि अन्य फॅन्सी आयटम असलेली साधी सायकल. साधारण फ्रेम साईज १३ ते १६ इंच.
वय वर्षे ५ ते ७ - इथेही फार गोंधळून जाण्याचे कारण नाही. या वयात ब्रँडनेम पेक्षा स्टायलिश आणि भन्नाट दिसणारी सायकल आवडते, त्यामुळे क्वालिटीपेक्षा त्यांना दुकानात घेऊन जा आणि त्यांना आवडलेली सायकल घ्या. शक्यतो सिंगल गियर, विना सस्पेशन आणि शक्य तितकी हलकी.
दुर्दैवाने या प्रकारात जे आहेत ते बहुतांशी भारतीय बनावटीच्या सायकली. स्टीलच्या, त्यामुळे खच्चून जड आणि त्यात दीड एक किलो सस्पेशनची भर आणि जाड जूड टायर. त्या इवल्या जीवांना त्या झेपतही नाहीत अनेकदा उचलून न्यायची झाली तर.
फायरफॉक्स, बिएसए हे काही चांगले ब्रँड आहेत. गोल्डी हा एक स्थानिक ब्रँड, मला एकाने सांगितले ते पंजाब हरियाणाचा आहे, नक्की माहीती नाही. मी माझ्या मुलाला घेतली होती, चांगली टिकावू होती. फ्रेम साईज १६ ते २० इंच
काही रेकमेंडेशन -
BSA CHAMP DOODLE 16 (2016) ₹3,550
FIREFOX DEMON X 16 ₹6,100
FIREFOX POPEYE 16 ₹6,500
मुलींसाठी (मुलांच्या मुलींच्या अशा वेगळ्या फार नसतात, रंग आणि डिझाईन फुलाफुलांचे वगैरे)
BROOKS CINDY 16(2017) 5,849
BTWIN MISTIGIRL 300
RALEIGH SPORT KID 20 - 7525
वय वर्षे ७ ते १० - (फ्रेम साईज १८ ते २४ इंच ) इथे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. सायकलिंगची खऱ्या अर्थाने आवड लागून, पंख लावून भराऱ्या मारण्याचे वय. त्यामुळे थोडे बजेट वाढवायला हरकत नाही. या वयात क्रेझ असते ती डिस्क ब्रेक, गियर्स, आणि मित्र मैत्रिंणीसमोर शायनिग करायची. त्यामुळे थोडे त्यांच्या मनासारखे होऊ द्या फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा.
माझे वैयक्तिक मत असे ही अजूनही त्यांना मल्टी गियर सायकल देऊच नका. साधी सिंगल गियरवाल्या सायकल पळवण्याची मजा त्यांना घेऊ द्या. एकतर मुले कशीही वापरतात, सोसायटी मध्ये वगैरे असाल तर वयाने मोठे दादा, ताई सुद्धा चक्कर मारायला म्हणून घेतात आणि खडाडखुड करून गियर बदलून वाट लावतात. शिफ्टर, डिल्युलर, आणि चेन अतिशय काळजीपूर्वक वापरावी लागते आणि आपल्या सुपुत्र-सुपुत्रीबद्दल तशी खात्री नसेल तर त्यांना पुढच्या वेळी चांगली भारी गियरची सायकल घेण्याचे कबूल करा.
असेही या वयात भराभर उंची वाढते त्यामुळे दोन एक वर्षात ती छोटी होते आणि नवीन घ्यायची वेळ येते. आणि सातवी आठवीत जरा क्लास, शाळा वगैरे जाता येते तेव्हा गियरची सायकल चांगली.
शक्य तीतके त्याना कन्विन्स करा, नाहीच ऐकले तर मग काय घ्या.
दुसरे म्हणजे सस्पेशन आणि डिस्क ब्रेक. या दोन्ही गोष्टीची क्रेझ मुलांना असते, त्यामुळे त्यांना सिंगल गियर, विदाऊट सस्पेशन आणि साधे ब्रेक अशी सायकल बोर वाटण्याचा धोका आहे. तुम्ही एक पालक म्हणून त्यांना किती पटवू शकता यावर सगळे आहे.
सस्पेशनने सायकल जड होते आणि या प्राईज सेगमेंटमध्ये डिस्क ब्रेकची क्वालिटी अगदीच साधारण असते. ते वगळता अगदीच इच्छा असेल तर ते म्हणत असतील ती घ्या. शेवटी चालवणार ते आहेत, आणि त्यांना नाही आवडली तर मारून मुटकून थोडी चालवून बाकी वेळ पडून राहील हे लक्षात घ्या.
हिरो, बिएसए, श्नेल, फायरफॉक्स हे काही या सेगमेंटमधले आघाडीचे ब्रँड आहेत.
या देखील सायकली जवळच्याच सायकलवाल्याकडे घेता आल्या तर उत्तम. एकतर सर्विसींग किंवा काही बारक्या अडचणी आल्यातर लगेच त्याच्याकडे घेऊन जाता येते आणि कस्टमरची तक्रार आहे म्हणल्यावर ते लक्ष देतात. बाहेरून विकत घेऊन त्यांच्याकडे गेलात आणि ओळखीतला नसेल तर ते फारसे दाद देत नाहीत.
अर्थात ऑनलाईन किंमती पाहून, ठरवून, घासाघिस करूनच घेणे उत्तम.
http://www.firefoxbikes.com/BikeListing.aspx?CatId=12
https://starkennbikes.com/bikes/starkenn/on-road/kids.html
यातही अवजड सायकलीची चलती आहे. अर्थात बजेटमध्ये असल्याने त्याच घेतल्या जातात. माझ्या सायकलपेक्षा माझ्या ९ वर्षाच्या मुलाची सायकल जड आहे. पण किंमत हा मुद्दा मोठा आहे. किती खर्च करायचा हे आधीच ठरवून ठेवा आणि त्यानुसारच पर्याय द्या मुलांना.
कारण सध्या काही इंटरनॅशनल ब्रँडदेखील भारतात उपलब्ध आहेत आणि ते दहा बारा हजारच्या पुढे आहेत.
उंचीचा एक मोठा प्रश्न असतो. अनेकदा मुलांच्या मापाची सायकल मिळत नाही. २२ इंची लहान होते, आणि २४ इंची मोठी होते अशा वेळी काय करावे हा मोठा प्रश्न पालकांना असतो. तर अशा वेळी धाडस करून थोडी मोठी सायकल घ्या. सुरुवातीला काही दिवस त्यांना भिती वाटेल, उंच वाटेल, पाय पुरणार नाहीत अशा वेळी जर सोबत राहून, जवळच सायकल चालवायला लावा. आपल्याला वाटते त्याचपेक्षा पटकन लहान मुले अॅडजस्ट करून घेतात. छोटी सायकल तात्पुरती बरी वाटते पण लवकरच उंची वाढली की मग नवी घ्यायचे हट्ट सुरु होतात.
आपण कसे सायकल शिकलो आठवा. आम्ही तर त्या अवजड काळ्या घोड्यावर मध्ये पाय घालून, हॉप करत, धडपडत, कोपरं, ढोपरं फोडून कसेतरी शिकलो होतो. आपल्यावेळी मापाची सायकल वगैरे लाडच नव्हते, सायकल मिळणे हेच अप्रुप होते. त्यामुळे होउ दे थोडा त्रास मुलांना, काही फारसे बिघडत नाही २२ ऐवजी २४ इंची सायकल घेतली.
अॅक्सेसरीज - अनेकदा डिलर सायकलसोबत घंटा, बॉटल होल्डर, मडगार्ड वगैरे बसवून देतात.
पण हेल्मेट घेणे आणि ते वापरण्याची सवय लावणे अत्यंत महत्वाचे आहे. खरचटणे, पडणे हे चालू द्या पण या डोक्याची काळजी घेणे अती आवश्यक. त्यामुळे सायकल चालवताना हेल्मेट मस्ट हा नियम त्यांच्या अंगवळणी पाडाच.
लहान मुला-मुलींची हेल्मेट ५०० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
याखेरीज सायकलची काळजी घ्यायला मुलांना शिकवा. आठवड्यातून सुट्टीच्या दिवशी त्यांच्यासोबत सायकलची सफाई करायला घ्या. त्यांना चेन काळजीपूर्वक पुसायला लावून, तेलपाणी करायला लावा, हवा भरून घ्या, टायरला कुठे कट गेलेत का, कुठला नट लूज झालाय का हे तपासा. लहान वयात या गोष्टी मनावर बिंबवल्याचा दूरगामी परिणाम खूप चांगला असणारे हे लक्षात घ्या.
आणि एक मुद्दा राहीला, सायकलची आवड निर्माण करायची असेल तर कामातून वेळ काढून त्याच्यासोबत सायकलींग करा.
पोरासोबत सायकल चालवण्याची मजा एक वेगळी असते आणि ते मी सध्या अनुभवतोय आणि तोही. बाबा-मुलाचा क्वालिटी टाईम एकत्र घालवण्यासाठी सायकलींग इतका बेस्ट पर्याय नाही कुठला.
भारी रे आशू !
भारी रे आशू !
लहान वयात या गोष्टी मनावर बिंबवल्याचा दूरगामी परिणाम खूप चांगला असणारे हे लक्षात घ्या. + १
अजून एक उत्तम लेख..आपण कसे
अजून एक उत्तम लेख.. त्यानिमित्ताने आधीचे भाग परत एकदा पाहिले.
आपण कसे सायकल शिकलो आठवा. आम्ही तर त्या अवजड काळ्या घोड्यावर मध्ये पाय घालून, हॉप करत, धडपडत, कोपरं, ढोपरं फोडून कसेतरी शिकलो होतो. आपल्यावेळी मापाची सायकल वगैरे लाडच नव्हते, सायकल मिळणे हेच अप्रुप होते. त्यामुळे होउ दे थोडा त्रास मुलांना, काही फारसे बिघडत नाही २२ ऐवजी २४ इंची सायकल घेतली.>> हे फार आवडलं
सायकलची आवड निर्माण करायची
सायकलची आवड निर्माण करायची असेल तर कामातून वेळ काढून त्याच्यासोबत सायकलींग करा. << पर्फेक्ट
चांगली माहिती, मलाही पोरासाठी सायकल घ्यायची आहेच
चांगली माहिती.
चांगली माहिती.
सायकलची आवड निर्माण करायची असेल तर कामातून वेळ काढून त्याच्यासोबत सायकलींग करा. > बरोबर.
छानच लिहिलय!
छानच लिहिलय!
छान लेख
छान लेख
मागे तुमच्याच लेखात विचारून मी लेकाला गियर सायकल नको म्हणत होते पण तो काही ऐकला नाही, गेअरवली घेतली आणि दोनच दिवसात बिघडली सहावा गियर वर जात नाही म्हणून रडारड. आता हा लेखच वाचायला देईन त्याला. सायकलची काळजी घेतो जमेल तेवढी, पण सोसायटीमध्ये प्लास्टिकच्या छोट्या स्पीडब्रेकर मुळे लवकर खुळखुळा होइल असं वाटतं सायकलचा.
चांगली माहिती .. आभारी आहे
चांगली माहिती ..
आभारी आहे
धन्यवाद सर्वाना
धन्यवाद सर्वाना
स_सा इथेच माहिती देईन,म्हणजे बाकीच्याना पण उपयोगी पडेल.
आऊ - हो हेच होते, त्यामुळे माझा विरोध आहे. पण आता घेतलीये तर हरकत नाही. जोरात नेली स्पीडब्रेकर वरून तर खुळखुळा होणारच, आणि मुलांना सांगून पण ऐकत नाहीत. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांचा त्यांना सोसू द्या. त्यांची त्यांनाच जाणीव झाली की मग बरोबर चालवेल.
एकदम बेस्ट लेख...
एकदम बेस्ट लेख...
मुलीसाठी सायकल तर घेतली आहे. सुरुवातीला साईड व्हिल्स होती पण आता बरोबरच्या मैत्रिणींचे बघून साईड व्हिल्स काढायला लावली, पण आता चालवता येत नाही म्हणून कडकड चालू आहे.. उपाय एकच दिसतो आहे.. तिच्या मागे मागे धावून सायकल चालवायला लावणे.. जसे माझ्या वडिलांनी केले होते..
चँप, फारच मोलाची कामगिरी केली
चँप, फारच मोलाची कामगिरी केली आहेस हे सर्व इथे लिहून. किती धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत.
चालवता येत नाही म्हणून कडकड
चालवता येत नाही म्हणून कडकड चालू आहे >> आमच्या कडे साईड व्हिल वाली सायकल छोटी झाली, म्हणून वाढदिवसाला नवीन आणि जरा मोठी सायकल आणून दिली... पण सशर्त ! ही नवीन सायकल तेव्हाच चालवायला मिळेल जेव्हा छोटी सायकल साईड व्हिल शिवाय चालवायला जमेल.
मग काय.. दोन दिवसात जमलं !!
हिम्स - बेस्ट की मग. त्या
हिम्स - बेस्ट की मग. त्या निमित्ताने आपलेही वजन कमी होईल आणि व्यायाम होईल. एकावर एक फ्री
मीत - भारीय आयडीया काढली. जमलंय.
छान माहिती!
छान माहिती!
आम्ही अमेरिकेतून भारतात परत
आम्ही अमेरिकेतून भारतात परत जाणार आहोत. बरचसं सामान शिप करायच आहे. मुलीची सध्या अमेरिकेत वापरात असलेली सायकल तिला लहान पडते. नविन सायकल (२०इंची) इथेच घ्यावी आणि शिप करावी की भारतात जाऊनच विकत घ्यावी?
जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
सोहा - मला कल्पना नाही
सोहा - मला कल्पना नाही अमेरिकेतून शिप करणे किती कॉस्टली आहे पण तुमच्या इतर सामानातच सायकल बसणार असेल आणि त्याला फार वेगळे चार्जेस पडणार नसतील तर माझा सल्ला आहे तिथेच घ्या. कारण भारतीय मार्केटमध्ये इंटरनॅशनल ब्रँडच्या सायकलवर जास्तीची ड्युटी लावली जाते, भारतीय उत्पादकांना स्पर्धेत रहाता यावे म्हणून.
तुम्हाला अमेरिकेत जास्त चांगल्या क्वालिटीची सायकल, कमी किंमतीत मिळेल. पण तिला शिपिग चार्जेस किती आणि कसे पडतील माहीती नाही. त्याचे कॅल्क्युलेशन तुमच्या बजेटमध्ये बसत असेल तर नक्कीच घ्या....
आणि त्याचे पार्ट्स, सर्विसिंग वगैरेची चिंता करू नका, ते भारतात सगळीकडे मिळेल. अगदीच मनात शंका असेल तर फक्त दोन टायर ट्युब जास्तीच्या घेऊन ठेवा. बाकीचे सगळे इकडे मिळेल.
११ ते १३ वयोगटासाठी काही
११ ते १३ वयोगटासाठी काही सुचवाल काय?
माझी मुलं सध्ध्या ११ वर्षांशी आहेत. २४ इंची फायरफॉक्स व्यवस्थित चालवतात. तसेच २६ इंची लेडीज सायकल आणि युनिसेक्स btwin सायकल जमते. पण जेव्हा नवीन सायकल बघायला जातो तेव्हा सगळ्या २६ इंची MTB अति जाड टायर वाल्या आणि डिस्क ब्रेक वाल्या असतात. किंवा गियर शिफ्टर हे accelerator सारखे असतात.
मुलांच्या उंचीला (सध्ध्या १३८ सेमीच्या आसपास आहे ) जमतेय आणि टायर फार जाड नाहीत असे एक मॉडेल सापडले आहे स्काय रायडर नावाचे [अनालॉग शिमानो गियर शिफ्टर ३x ७, डिस्क ब्रेक ]. तशी हलकी पण वाटली. पोराला फार कष्ट ना करता उचलता आली !! ट्रॅक अँड ट्रेल वाला म्हणाला कि इंडियन मेड आहे.
पण ऑनलाईन काहीच माहिती सापडत नाही या ब्रँड बद्दल.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=AXWgVP7cQUg
ही म्हणताय का तुम्ही....पण ही तर व्यवस्थित एमटीबी आहे. सस्पेन्शन सकट. विदाऊट सस्पेन्शन पण आहे का उपलब्ध. मी देखील नेटवर शोधले पण या ब्रँड बद्दल काही माहीती मिळाली नाही.
ट्रॅक अँड ट्रेलच्या साईडवर देखील नाही.
दोन तीन व्हिडीओ मिळाले त्यावरून आणि एकंदर बिल्ड आणि किंमतीवरून भारतीय बनावटीचीच वाटत आहे.
मुलाला आवडली असेल तर हरकत नाही.
हो हीच. आणि MTB च आहे. माझी
हो हीच. आणि MTB च आहे. माझी मुलं तयार झाली कि आपण suspension आणि डिस्क ब्रेक नसलेली सायकल घेऊ. पण त्यांच्या उंचीला हायब्रीड सायकली फार ऊंच पडतात. आणि छोटया फ्रेम मध्ये सगळ्या MTB विथ suspension आणि डिस्क ब्रेक असतात.
त्यातल्या त्यात हि स्काय रायडर बरी वाटली मुलांना आणि मला पण.
बरं आम्ही या सायकली पार्किंग मध्ये ठेवणार त्यामुळे फार महाग ही नकोत, या आधी मुलांची छोटी सायकल चोरीला गेली होती पार्किंग मधून
https://www.merida-bikes.com
https://www.merida-bikes.com/en_int/bikes/trekking-city/trekking/2018/cr... ही घेतली second hand. चिरंजीव भलते खुश आहेत
झकास, मेरिडा उत्तम ब्रँड आहे
झकास, मेरिडा उत्तम ब्रँड आहे आणि सायकल चे स्पेक्स पण सही आहेत. आता फक्त तुम्ही वर्ती म्हणल्याप्रमाणे सायकल सुरक्षा मोठा कळीचा मुद्दा आहे.
त्या साठी काय करत आहात?
सध्ध्या तरी घरातच ठेवतोय,
सध्ध्या तरी घरातच ठेवतोय, अजून पार्किंग मध्ये ठेवायची हिम्मत नाही
माझ्या मुलाला नुकतीच B-TWIN
माझ्या मुलाला नुकतीच B-TWIN ची सायकल घेतली सिंगल गिअर वाली. गेल्या दोन वर्षां पासुन सायकली ची आवड निर्माण झाली आहे त्याला आता वय 6.5 वर्ष आहे.
वयाच्या मानाने त्याला थोडी उंच झाली सायकल कारण सरप्राइज च्या नादात त्याला घरीच ठेवलं होतं. सिटवर बसुन चालवताना पाय पण नीट पोहचत नाही तरीही छान चालवतो (न घाबरता).
माझ्या मुलाला नुकतीच B-TWIN
माझ्या मुलाला नुकतीच B-TWIN ची सायकल घेतली सिंगल गिअर वाली. गेल्या दोन वर्षां पासुन सायकली ची आवड निर्माण झाली आहे त्याला आता वय 6.5 वर्ष आहे.
वयाच्या मानाने त्याला थोडी उंच झाली सायकल कारण सरप्राइज च्या नादात त्याला घरीच ठेवलं होतं. सिटवर बसुन चालवताना पाय पण नीट पोहचत नाही तरीही छान चालवतो (न घाबरता).
तरीही छान चालवतो (न घाबरता).
तरीही छान चालवतो (न घाबरता).
>> मुलगा कोणाचा आहे? प्रविण द रायडरचा. रायडींग रक्तातच आहे.
माझी मुलगी आठ वर्षांची आहे.
माझी मुलगी आठ वर्षांची आहे. तिची जुनी सायकल फार लहान होतेय आता, नवी घ्यायची आहे. सायकल चालवता येते, पण पाडापाडी, नीट न वापरणं, कुलुप लावायला विसरणं (नाहीतर सायकलच सोसायटीमध्ये कुठेतरी विसरणं) असे सगळे प्रकार आहेत. घराजवळ टेकडीला जाताना वगैरे एक - दोन किमी माझ्यासोबत रस्त्यावर चालवते ती, एरवी सोसायटीच्या आवारातच. त्यामुळे जरा अजून नीट वापरायला शिकेपर्यंत एक - दोन वर्षं चालेल अशी २४ इंची सेकंड हँड सायकल मला हवी आहे. जवळच्या सायकल दुकानात चौकशी केली तिथे सध्या तरी नाहीये सेकंड हँड. अशी सायकल किती बजेटमध्ये, कुठे मिळू शकेल का?
सर्विस मोटरीच्या टायमाला असला
सर्विस मोटरीच्या टायमाला असला तर्रास न्हवता
फेसबुकवर किंवा olx वर मिळू
फेसबुकवर किंवा olx वर मिळू शकेल
तिथे भरपूर असतात सायकली विकायला
माझ्या १३ वर्शच्या मुलाला
माझ्या १३ वर्शच्या मुलाला सायकल घेणे आहे. त्याची उंची ५ फुत ८ इंच आहे.
त्याला गिअर वालीहवई आहे.
ठाण्यात के २ सायकल म्हणुन दुकान आहे , तिथे श्नेल ची बिना गिअर सयक्ल १३ हजार ची एक आवडलेली आहे.
बाकी कोस्मिक, हिरो , क्रोस इ बघत आहोत.
टायर ट्युब पंचर काढायचे, रबर
टायर ट्युब पंचर काढायचे, रबर तुकडा चिकटवायचे सोलुशनचे नाव काय? फेविबॉन्डने चिकटेल का?
टायर ट्युब पंचर काढायचे, रबर
टायर ट्युब पंचर काढायचे, रबर तुकडा चिकटवायचे सोलुशनचे नाव काय?>>> डायमंड सायकल ट्यूब सोल्युशन
Pages