पिर पिर पिर पिर

Submitted by भास्कराचार्य on 6 February, 2020 - 15:32

पिर पिर पिर पिर
पिर पिर पिर
मी म्हणजे ...
पिर पिर पिर.

पिर पिर पिर पिर
पिर पिर पिर
कळ्ळं का?
पिर पिर पिर.

पिर पिर पिर पिर
पिर पिर पिर
कंटाळा आला
पिर पिर पिर.

पिर पिर पिर पिर
पिर पिर पिर
वाचा काही
पिर पिर पिर.

पिर पिर पिर पिर
पिर पिर पिर
अहो ऐकाच!
पिर पिर पिर.

पिर पिर पिर पिर
पिर पिर पिर
तीच तीच तीच तीच
पिर पिर पिर.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम मतला.
रदीफही जमलाय.
जमीन चांगली भुसभुशीत आहे.
पुलेंशु

धन्यवाद.

पुढच्या वेळेस नक्कीच जरा चाकोरीबाहेर जाऊन मीटर, गेयता वगैरे सर्व जमवायचा प्रयत्न करेन.

भाचा तुला मुळी कौतुकच नाही.
माणसं, मै माधुरी दिक्षीत बनना चाहती हू, मिलिंद सोमण मेड मी गे, असं कलाकृतीच्या नावातच आपल्या स्फुर्तीदेवतेचे नाव गुंफतात.
तुम्ही तसं न करता 'तीच तीच तीच तीच' लिहून तीच मधली ती कोण असेल म्हणून लोकांच्या डोक्याला खुराक लावून दिलात.
ही कविता नाही गणित आहे गणित.
आणि प्रतिसाद म्हणून काय लिहायचं, गणिताचं उत्तर ?

अ‍ॅमी नाही ज्जा !

उत्तम मतला.<< हे जरा जपून वाचावे लागले.
रदीफही जमलाय.
जमीन चांगली भुसभुशीत आहे.
पुलेंशु<<< लें?

मीटर, गेयता वगैरे सर्व जमवायचा प्रयत्न करेन.<<<<
मीटर घेताना ऑटोरिक्षेसाठी नको, कवितेसाठी हवंय हे आवर्जून सांगा. नाहीतर दुकानदार नेहमीचे फास्ट मीटर देतो आणि कविता फक्त 'mutual fund investments are subject to market risks, read offer documents carefully before investing...' याच चालीत म्हणता येते. त्यामुळे श्रोत्यांची त्या कवितेत भावनिक इन्व्हेस्टमेंट होत नाही.

पुढल्या कवितांसाठी शुभेच्छा आणि वाचक&श्रोत्यांना आल इज वेल..

पुलेंशु<<< लें?<<<<
सानुनासिक स्वरात लिहिले असेल मास्तरांनी. त्यांच्या लेखनकारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे अदमासे दीडशे वर्षांपूर्वी लोक तसेच लिहीत.

खूप गूढ तरीही तरल अशी कविता! कवीच्या भावना यथोचित पोचल्या आहेत.. खास करून कवितेतला छुपा संदेश (पी रं, पी रं) आवडला असून, आज शुक्रवार असल्याकारणाने तो शिरसावंद्य मानण्यात येणार आहे!

रच्याकने, हि कविता कुणीतरी आपले सिद्धहस्त कवी, पाटणकरसाहेबांना पाठवा, ते पूर पूर पूर पुरर्रर्रर्र कविता लिहितील..

विदर्भात बऱ्याच ठिकाणी गाजराला गांजर म्हणतात.
तसे महाराष्ट्रात काही ठिकाणी लेखनाला लेंखन म्हणत असावेत.

उलट शेवटच्या कडव्यातील extra तीचमुळे जास्त छान झालीये कविता. >> धन्यवाद. सर्व मतांचे स्वागतच आहे.

आधी तरंगण्यात, मग शायरी थोडीफार, भरपूर गप्पा, त्यानंतर झकास झोप, आणि दुसऱ्या दिवशी माईल्ड डोकेदुखी अशी एकंदर परिणती झाली बघा!

गाजराला गांजर म्हणतात<<<
विदर्भात कशालाही काहीही म्हणतात, अकोल्याला शहर म्हणतात, त्यांचे काय मनावर घ्यायचे.

अकोल्याला शहर म्हणतात, त्यांचे काय मनावर घ्यायचे.>
अमेरिकेतही गाड्यांमध्ये द्रव पेट्रोल / डिझेल भरतात त्याला गॅस म्हणतात म्हणे. एवढे उन्निस - बीस सर्वत्र चालत असताना विदर्भालाच तेवढे सिंगल आउट करू नका.

लोक बेरिजगारीला, वाढत्या गुन्हेगारीला, मॉब लिंचिंगला आणि मंदिर बांधण्याचा विकास म्हणतात, त्यांचे काय एवढे मनावर घ्यायचे?

अमेरिकेत डिझेल ला पण गॅस म्हणतात? मला वाटलं की फक्त पेट्रोल ला म्हणत असतील (गॅसोलीन या शब्दावरून).