मी त्या भाग्यवान लोकांमधील एक आहे, ज्यांच्या आयुष्यात शाळा दोन वेळा येते. मी ज्या शाळेत शिकले, त्याच शाळेत शिकवले! म्हणायला हे अगदी साधे वाक्य, पण ज्यांना हा अनुभव आहे, त्यांचा ऊर भरून येतो हे सांगताना. असे असले तरी माझ्या या दोन्ही शाळांची सुरूवात मात्र अगदी रडारडी आणि नाखुशीनेच झाली होती. हो! अगदी शिक्षक म्हणून भरती झाल्यावर दुसर्यांदादेखील मला घरच्यांनी 'समजावून' शाळेत पाठविले होते. आजही आठवले की हसू येते!
सर्वात पहिल्यांदा आयुष्यात शाळेचा प्रवेश झाला तो बालवाडीच्या रूपात. म्हणायला 'बाल'वाडी असली तरी मोठ्या मुलांच्या शाळेपेक्षा जास्त कडक शिस्तीची होती. एकदा पालकांनी वर्गात ढकलले की, कुणी कितीही भोकाड पसरून रडले किंवा आकंडतांडव केले तरी दोनची घंटा झाल्याशिवाय सुटका नसायची. जास्तच आवाज वाढला तर बाई खिडक्यासुद्धा बंद करत. घरी कितीही लाड असले तरी इथे आदळआपट करून उपयोग नाही, हे तेव्हाच कळले होते. डब्यात भाजीपोळीच असे. घरी केव्हाही काहीही केले तरी चालते मात्र इथे बाई जेव्हा, जे सांगतील तेच करावे लागे. खेळाची, जेवणाची, नाचाची, अभ्यासाची वेळ ठरली होती. तसे न केल्यास एक शिक्षा नावाचा प्रकार असतो, त्याची ओळख इथेच झाली. आजही मला जेव्हा बाई आठवतात, तेव्हा एका हातात छडी घेतलेल्यांच आठवतात!
तरीसुद्धा ते फुलपाखरांच्या पंखांनी बागडायचेच दिवस होते. इथेच मित्रमैत्रिणी पहिल्यांदा भेटले. मैत्रीची तोंडओळख झाली. आपल्यासारखीच सर्व मुलेमुली शाळेत येतात ही गोष्टच खूप छान वाटे. बघताबघता ते दिवस कधी संपले कळलेच नाही.
क्रमशः
आठवणीतील 'शाळा' :-1
Submitted by Cuty on 4 February, 2020 - 07:46
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. पुलेशु.
छान. पुलेशु.
मस्तच कि. जिथे तुम्ही घडलात
मस्तच कि. जिथे तुम्ही घडलात तिथे इतरांना घडवण्याची संधी मिळाली तुम्हाला..
पुढच्यावेळी मोठा भाग पोस्ट कराल?. छोटा झालाय हा भाग.. पुभाप्र!
धन्यवाद प्राचीन, मन्या.
धन्यवाद प्राचीन, मन्या.
उलट शाळेच्या निमित्ताने मुलांना घडवता घडवता माझीच माणूस म्हणून,शिक्षक म्हणून अन आई म्हणूनसुद्धा जडणघडण झाली.
पुढील भाग मोठे टाकायचा प्रयत्न करीन.
खूप मस्त... पटापट पुढचे भाग
खूप मस्त... पटापट पुढचे भाग टाका..
छान आहे. पुढील भागांची
छान आहे. पुढील भागांची उत्सुकता आहे.
धन्यवाद साधना, माऊमैया.
धन्यवाद साधना, माऊमैया.
मस्त सुरुवात, पुभाप्र.
मस्त सुरुवात, पुभाप्र.
धन्यवाद सामोजी.
धन्यवाद सामोजी.
भाग 2 टाकला आहे.