Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2020 - 05:00
*मला लाभलेल्या सोयींनो माफ करा*
=====
माझ्या तिरडीच्या भोईंनो माफ करा
मला लाभलेल्या सोयींनो माफ करा
जगत राहिलो, तुमच्या स्वीकारून चुका
बस निर्दोष ठरत दोषींनो माफ करा
न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी
नशेत सुचलेल्या ओळींनो माफ करा
चुकून आधी जन्माला आलो आम्ही
नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा
फार लावली सवय तुम्हाला मी माझी
मला लागलेल्या सवयींनो माफ करा
हेतुपुरस्सर झाल्या त्यांनी मुजरा घ्या
उगाच झालेल्या भेटींनो माफ करा
राजा ठरलो असतो या लाचारांचा
मी न चाललेल्या चालींनो, माफ करा
एक देवपण हाक मला मारत आहे
सवंग, लसलसत्या उर्मींनो माफ करा
बरा व्हायचे होते मला स्वभावाने
मी न काढलेल्या खोडींनो माफ करा
-'बेफिकीर'!
(०९.०१.२०)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही
न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी
नशेत सुचलेल्या ओळींनो माफ करा>>>> छान आहे गझल.
चुकून आधी जन्माला आलो आम्ही
नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा>>>>>>
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
'बेफिकीर' व्हायचे होते
'बेफिकीर' व्हायचे होते स्वभावाने
पण संवेदनांनो माफ करा.
जबरदस्त!!
जबरदस्त!!
'बेफिकीर' व्हायचे होते स्वभावाने
पण संवेदनांनो माफ करा.
नवीन Submitted by योग on 9 January, 2020 - 08:14>> हे पण भारी..
छान!
छान!
सनम केव्हा पुर्ण करणार.
अर्ध्या लिहिल्या गोष्टी मी कितितरी
अर्ध्य सोडुन त्यावर , माफ करा
असे काही म्हणु नका आता!
>>>>एक देवपण हाक मला मारत आहे
>>>>एक देवपण हाक मला मारत आहे
सवंग, लसलसत्या उर्मींनो माफ करा>>> सह्ही!!!
>>>>>>>चुकून आधी जन्माला आलो आम्ही
नव्या जमान्याच्या पोरींनो, माफ करा>>>>
न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही
न्याय तुम्हाला देऊ शकलो नाही मी
नशेत सुचलेल्या ओळींना माफ करा
माफ केलं.
वाटलंच, काही तरी अंमलाखाली सुचतात या ओळी.
चांगलं, काही तरी भन्नाट सुचण्यासाठी शुभेच्छा आहेतच.
-दिलीप बिरुटे
( शुद्धीत असलेला वाचक)
भोई तिरडी उचलत नाहीत. पालखी
भोई तिरडी उचलत नाहीत. पालखी उचलतात.
भोई तिरडी उचलत नाहीत. पालखी
भोई तिरडी उचलत नाहीत. पालखी उचलतात.
नवीन Submitted by नौटंकी on 19 January, 2020 - 09:33
>> हेच मलाही वाटलेले. पण लयीसाठी भोई शब्द वापरला असेल असं मत झालं. तिरडी उचलणारे खांदेकरी असतात.
राजा ठरलो असतो या लाचारांचा
राजा ठरलो असतो या लाचारांचा
मी न चाललेल्या चालींनो, माफ करा
Sarcasm at its best
भोई'चं सामान्यरूप भोया होईल
भोई'चं सामान्यरूप भोया होईल ना?
गवईचं गवया... तसंच.
भोई'चं सामान्यरूप भोया होईल
भोई'चं सामान्यरूप भोया होईल ना? >> भोईच राहणार. भोई हा पालखी उचलणारा समाज आहे. माळी जसं माळीच राहतं, कोळी जसं कोळीच राहतं तसंच.
कोळी - को ळ्या, माळी मा ळ्या
कोळी - को ळ्या, माळी मा ळ्या असंच होतं.
सामान्य रूप म्हणजे तुम्ही काय समजताय?
अच्छा मला वाटलं अनेकवचन
अच्छा मला वाटलं अनेकवचन संदर्भात बोलत होतात. सामान्यरूप भोयाच होईल.
माझ्या तिरडीच्या भोईंनो माफ
माझ्या तिरडीच्या भोईंनो माफ करा
मला लाभलेल्या सोयींनो माफ करा
=)) च्यायला, या ओळी विसरुलो होतो.
अरे बाबा. भोई लोक पालखी उचलतात तिरडी नाही.
अरे उचला रे, सॉरी आवरा रे या गझलकाराला कोणी.
-दिलीप बिरुटे
(खांदेकरी)
बिरुटे सर माझी नवीन गझल
बिरुटे सर माझी नवीन गझल वाचलीत काय? साप पकडायला गेलो माळरानावर.
=)) च्यायला, या ओळी विसरुलो
=)) च्यायला, या ओळी विसरुलो होतो.
अरे बाबा. भोई लोक पालखी उचलतात तिरडी नाही.
अरे उचला रे, सॉरी आवरा रे या गझलकाराला कोणी.
-दिलीप बिरुटे
(खांदेकरी)
नवीन Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on 1 February, 2020 - 23:00 >>> आवो, राजाची तिरडी भोईच उचलत असतील! ती तिरडी बी पालखीसारखी असू शकते.