अग्गंबाई सासुबाई - झी मराठी

Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32

२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!

ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.

सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..

अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल माझ्याकडे भिशी होती म्हणून मी 8 नंतर ते पण किचन चं आवरत आवरत बघत होते.
बबड्या चा खरंच खूप राग आला.
आसावरी च्या सगळ्या साड्या मस्त. गोड दिसत होती फार.
शुभ्रा नी कुंदन जुलरी केवढी घातली होती बापरे..

कालचा लग्नसोहळा फार आवडला. कंटिन्यू रिपीट टेलिकास्ट होते. आसा च्या साड्या छानच आणि दागिन्यांची रेलचेल होती नुसती. त्या बबड्याने सॉलिड गोंधळ घालून ठेवला होता, खूप खूप राग आला त्याचा. बिचार्या आजोबांना काल त्याच्यामुळे खूप वाईट अनुभव आला. पण शेवटी सगळे गोड गोड. >>>>>>>>>> +++++++१११११११११ पण आसा मध्येच नेहमीची साडी नेसून सर्वान्समोर येते ते नाही आवडल. ' लग्न करायच नाहीये' हे तिने शुभ्राला रुममध्ये सुद्दा बोलावून सान्गितल असत की.

शुभ्राची निळी साडी आणि प्रज्ञाची साडीसुद्दा छान होती.

चक्क सुबोध आला सेरीयलमधे! हाउ स्वीट!
कसला गोड दिसत होता! Happy
विक्रांत सरच अगदी! >>>>>>>> सहमत

सुबोध, सुभा कमी विक्रांत सरंजामे जास्त वाटत होता. तेच कपडे दिले होते त्याला. >>>>>>>>> अगदी अगदी. वाटल आता विस आजोबान्ना पैश्याची मदत करतो की काय. आजोबा म्हणतील, एकवेळ सोहम परवडला, पण विस नको रे बाबा! Lol

मालिका संपणार का आता. >>>>>>> अजून तरी नाही. राजेन्ची मोठी बहीण आहे ना घोळ घालायला.

सगळं क्रेडीट आजोबांना जातं.. त्यांचा एकदम टच्ची अभिनय झाला काल >>>>>>> हो ना.

काटेकोरचा पार्ट फनी होता. Biggrin

प्रोमोमध्ये दाखवले डिट्टो तसेच सीन्स दाखवले शेवटी. झीम माबो वाचते वाटत.

आसा शुभ्राला म्हणाली की बबडयाला बबडया झाला ( ज्यु. बबडया) झाला तर ही झबली त्याला घाल आणि शुभ्राने सुद्दा हो म्हणाली तिने म्हणायला हव होत, बबडयाच का, बबडी का नाही?

सोहम आणि शुभ्रा बेडरुममध्ये झोपलेले असतात तेव्हा आसा सोहमला शेवटच बघायला बेडरुममध्ये येते ते विचित्र वाटल.

शेवटच गाण छान होत. कुठल्या चित्रपटातल होत?

फायनली लग्न झाल. आता प्रश्न आहे तो राजे घरजावई होणार की आसा त्यान्च्या घरी जाणार.

शेवटच गाण छान होत. कुठल्या चित्रपटातल होत?

फायनली लग्न झाल. आता प्रश्न आहे तो राजे घरजावई होणार की आसा त्यान्च्या घरी जाणार.

नवीन Submitted by सूलू_८२ on 20 January, 2020 - 07:27 >>>>
हो ते गाणं छानच होत, बहुदा या सिरीयल साठी बनवले असेल. राजे घरजावई नाही होणार ते सरंजामे स्टाईल घर जे प्रोमो मध्ये दाखवायचे ते दाखवणे बाकी आहे. राजेंनी आसा ला फायनान्सिअली इंडिपेन्डन्ट करण्यासाठी अर्धी प्रॉपर्टी आसाच्या नावे केली आहे. बाकी राजेंचा राजवाडा एकदा दाखवला कि मग राजे आहेतच आसाच्या माहेरी पडीक.

काल राजेंचा एक डायलॉग आवडला, ते चष्मीस काका म्हणतात कि बाकी तू आसावरीला राणीसारखी ठेवशील तेव्हा ते म्हणतात हो मी तिला राणीसारखीच ठेवेन कारण मला राजासारखा राहायला आवडतं. (असच काहीस).

मी एवढा मोठ्ठा एपि नाहीच बघू शकले. फक्त लग्न लागलेले तेवढे पाहिले आणि थोडं पुढे मागे करत आसाचा मेकप आणी साड्या पाहून घेतल्या. Proud छानच दिसत होती.

लग्न व्हायच्या आधीचा एपि ज्यामधे आसा जेवत नसते आणि राजे शिडीवरून खिडकीत येतात त्या सीन मधे लांबून शॉट दाखवला की आसाचे कानातले दिसत होते. जवळच्या शॉट मधे गायब. परत लांबच्या सीनमधे दिसत होते.

एरवी ही सिरियल बघत नाही पण फेबु वर मधे मधे अ‍ॅड दाखवल्या म्हणुन पळवत पाहिला एपिसोड, शुभ्रा आणि आसा दोन्ही छान दिसत होत्या.
सोकु ज्यु किती विचित्र दिसत होती , एक्दम एजेड वाटत होती बाकी मधला पन्चटपणा पुर्ण स्किप फक्त लग्ना लागलेले बघितले.

बबड्याने सॉलिड गोंधळ घालून ठेवला होता>>>>>>>
नक्की काय केलं बबड्याने? मी पाहिला नाही तो भाग.

Submitted by माऊमैया on 21 January, 2020 - 00:09

बबड्याकडे जेव्हापासून राजेंनी ७ लाखांचा हिशॊब मागितला आहे तेव्हापासून तो त्यांचा राग राग करत आहे. त्याला आसाचे आणि त्यांचे लग्न व्हायला नको आहे म्हणून तो आजोबांना खोटे सांगतो कि राजेंनी मानपानासाठी १० लाख मागितले आहेत. आजोबांना आधी हे खरे वाटत नाही पण मग ते खूपच दुखी होतात आणि त्यांना धक्का बसतो. पैसे गोळा करण्यासाठी ते मित्रांकडे वैगरें मागतात पण कोणीच देत नाही. ते शुभ्राला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात पण धबडया त्यांना सांगतो कि राजे हुंडा मागत आहेत तर ती लग्न मोडेल. आजोबा बँकेत पैसे मागायला जातात, गधड्या हॉल वर जातो. बँक मॅनेजर लोन साठी गॅरेंटर लागणार म्हणतो तेव्हा आजोबा त्या डबड्याला फोन लावायला सांगतात तर तो शहाणा आजोबाना वेड लागलेय आणि ते सुनेचं लग्न करण्यासाठी लोकांकडे पैसे मागत फिरतात असे सांगतो. बिचारे आजोबां अपमानित होऊन तिथून काढले जातात आणि रस्त्यावर फोन मागत फिरतात. आणि इथे हॉलवर कोंबडीच्या आसाला गौरीपूजनाच्यावेळी सांगतो कि आजोबाना हे लग्न मान्य नाही. .......हुश्य ....

धन्स सुजा, Ajnabi.

ही तर मला नेहमीच थोडी सुजलेली, पोक्त वाटते. अभिनय सुद्धा सो सो च वाटतो त्यामुळे आवडत नाही.

ह्याच विषयावर "क्षितिज ये नही" नावाची सिरीयल पूर्वी (DD) पहिली होती , खूप सुंदर सिरीयल होती (तुषार दळवी आणि सुप्रिया पिळगावकर , विक्रम गोखले , रजत कपूर)..

ह्याच विषयावर "क्षितिज ये नही" नावाची सिरीयल पूर्वी (DD) पहिली होती , खूप सुंदर सिरीयल होती (तुषार दळवी आणि सुप्रिया पिळगावकर , विक्रम गोखले , रजत कपूर).. >+१ कलाकार आठवत नव्हते, पण सिरियल आठवत्ये. पण त्यात पुनर्विवाह होता ती जोडी प्रौढ नव्हती.

अगबाईच सध्या राजस्थानला शूटिंग चालू आहे.अआसावरी,अभिजित, सोहम शुभ्रा दिसले फोटोत,आजोबा नव्हते.
बहुतेक वीणा वर्ल्डने राजे कुटुंबाला हनिमूनला राजस्थानला नेले आहे.तो डबड्या आणि शुभ्रा का ते कळल नाही.
पण झीमराठीने खरच अक्कल गहाण टाकली आहे.
त्या का हे दिया परदेसच्या शिव गौरीला स्वित्झर्लंडमध्ये आणि राजेसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नवकोटनारायणाला राजस्थानमध्ये.

अजनबी Lol

शेवटी सुभा आजोबान्च्या मदतीला आला म्हणून हे लग्न होऊ शकल.

राजेंनी आसा ला फायनान्सिअली इंडिपेन्डन्ट करण्यासाठी अर्धी प्रॉपर्टी आसाच्या नावे केली आहे. >>>>>>> आता हिने ती प्रॉपर्टी डबडयावर फुन्कून टाकू नये म्हणजे मिळवल.

काल डबडयाच बोलण म्हणजे गिरे तो भी टान्ग उपर. आजोबान्नी आता त्याच्या बोलण्याला बळी पडू नये.

आसा राजे बाईकवरुन टाटा करत जातात तो सीन छान होता.

आज आपली मराठी चॅनेलवर ज्यु सोकुचा ' समुद्र' सिनेमा लागला होता, त्यात ती छान दिसत होती.

आता हिने ती प्रॉपर्टी डबडयावर फुन्कून टाकू नये म्हणजे मिळवल.>>+१११

सासूबाईला मार्गी लावले तर आता शुभ्राने डबड्याला सरळ करायला हवे.

सासूबाईला मार्गी लावले तर आता शुभ्राने डबड्याला सरळ करायला हवे.

Submitted by sonalisl on 21 January, 2020 - 08:18>>>>>.डबड्या सरळ झाला म्हणजे अर्धी सिरीयल संपेल. आता ते राजस्थानला हनिमूनला गेलेत तर तिकडे काही गडबड केली नाही म्हणजे झाले. नाहीतर ते तारक मेहता मध्ये मागे एकदा जेठालाल उंटावर बसून पाकिस्तानला गेला होता तसे हा कोंबडीचा आसाला तिकडे पाठवून मोकळा झाला नाही म्हणजे मिळवले.

आज आपली मराठी चॅनेलवर ज्यु सोकुचा ' समुद्र' सिनेमा लागला होता, त्यात ती छान दिसत होती. > मी एकदा पाहिला होता हा सिनेमा. बाकी ठीक ठीक वाटला, पण संगीत फ्फार आवडलं होतं यातलं.

सासूबाईला मार्गी लावले तर आता शुभ्राने डबड्याला सरळ करायला हवे. >>>>>>>> +++++++११११११११

राजेन्च घर मस्त आहे. सरन्जामे व्हिला आहे वाटत. राजेन्ना विचारायला हव , इथे कुठे गुप्त खोली नाहीये ना? Lol

ती ओपन लायब्ररी आवडली मला.

आजोन्बाच काम छान झाल.

घरात दोघच, आसा आणि राजे राहणार आहेत.

' समुद्र' 'आपल मनोरन्जन' वर लागला होता. नावात गोन्धळ झाला होता.

जादूचं कपाट काय, सगळं घर जादूचं वाटतंय. आज टाळ्या वाजवायचा कार्यक्रम होता. बबड्या फुकटची मोलकरीण शुभ्राने सहजासहजी घालवली म्हणून रुसून बसला होता. आसावरी भरजरी साडी आणि गच्च दागिने घालून खाली जमिनीवर झोपली, मग राजेही आदर्श नवरा कसा वागतो दाखवायला बेडच्या दुसऱ्या बाजूने खाली झोपले आणि नवीन बायकोला फुगा फोडून घाबरवलं. लग्नानंतर आजचा भाग बघितला. राजे भरल्या घरात एवढे रोमँटिक वागायचे तर आता तर रान मोकळे आहे.

आजोबा आता नॉर्मल वागत आहेत. आसाला हळद लावताना मला चक्क वाईट वाटलं त्यांच्यासाठी. तो प्रसंग फारच टची वाटला.

राजेंचं घर, गाडी, विचार सगळंच उच्च.

आजोबा आता नॉर्मल वागत आहेत. आसाला हळद लावताना मला चक्क वाईट वाटलं त्यांच्यासाठी. तो प्रसंग फारच टची वाटला.>>+१

मालिका म्हणू नका चित्रपट म्हणू नका सगळीकडे तीच तर्‍हा.
दोघे अगदीच नवखे नाहीत. त्यातून येव्हढा मोठा पलंग.. दोन टोकाला दोघे आरामात झोपले असते. पण नाही.

मालिका म्हणू नका चित्रपट म्हणू नका सगळीकडे तीच तर्‍हा.
दोघे अगदीच नवखे नाहीत. त्यातून येव्हढा मोठा पलंग.. दोन टोकाला दोघे आरामात झोपले असते. पण नाही.

Submitted by sonalisl on 22 January, 2020 - 15:10
>>>>>>>>>>>>>
हे असं दाखवणं जरुरी असते का??? ते नवऱ्याने सोफ्यावर झोपणे आणि बायकोने बेडवर. अरे केलात ना लग्न मग झोपा ना एकत्र बेडवर पण नाही. आपल्याला वाटते हे इंडियन सिरिअल्स मध्येच दाखवत असतील पण पार पाकिस्तानी सिरिअल्स आणि तुर्की (हल्लीच एक बघितली The Promise) सिरिअल्स मध्ये पण हेच.

Pages