चवळी / बरबटीचे पकोडे

Submitted by सायु on 1 January, 2020 - 04:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चवळी / बरबटी (कडधान्यातला प्रकार) : दोन वाट्या ( ७ ते ८ तास भिजलेली)
लसुण पाकळ्या - १०,१२
हिरव्या मिरच्या - २
धणे पुड - १ चहाचा चमचा
कोथिंबीर , जिरं, तिखट , मीठ अंदाजेच
बेसन पीठ - २ चहाचे चमचे
तळणा साठी तेल

क्रमवार पाककृती: 

हिवाळ्यात आवर्जून करण्या सारखी एक भन्नाट विदर्भिय पा.कृ.

लसुण , मिरची , कोथिंबीर, जिरं मिक्सरला फिरवुन घ्यायचं. आता चवळी / बरबटी पण मिक्सरला जाडसर फिरवुन घ्यायची..
त्यात वरिल सगळे साहित्य घालायचे, दोन चमचे बेसन (कमी जास्त करु शकता) घालुन छान एकत्र भिजवुन घायचे, वरुन एक पळी
तेलाचे कडकडीत मोहन घालायचे आणि मुगाचे पकोडे तळतो तसे तळुन घ्यायचे..

दही ,पदीना किंवा मिरची , कोथिंबीर, दह्याच्या चटणी किंवा टोमाटो सॉस ,बरोबर खुप छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
२ जणां करता
अधिक टिपा: 

चवळी जाडसरच वाटायची, बारिक वाटली तर पकोडे कुरकुरीत होत नाहित. नरम पडतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकृ छान वाटतीये! पण मोहन घातलं तर पकोडे खुप तेल पिणार असं वाटतंय..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! Happy

छान तोंपासू!!

+++ फोटो हवेतच.+ नक्की देते.>>>>

खायला बोलाविल्यास अधिक उत्तम!

मस्तच.

खायला बोलाविल्यास अधिक उत्तम! >>> Lol

छान पाकृ.
एक बाळबोध शंकानिरसन: चवळी / बरबटी वाळलेली असेल तरच भिजवून घ्यायची ना?
ताजी असेल तर सोलून लगेच करता येईल ना?

वा !

मन्या, आभार, ++ पण मोहन घातलं तर पकोडे खुप तेल पिणार असं वाटतंय++ अजिबात तेलकट होत नाहित..
कृष्णा, धन्स . +++ खायला बोलाविल्यास अधिक उत्तम! ++ Happy मोस्ट वेलकम ------ /\-----
अन्जु ताई, मामी , पा. कृ. आवडल्या बद्द्ल धन्स..
मानव, पा. कृ. आवडल्या बद्द्ल धन्स +++ एक बाळबोध शंकानिरसन: चवळी / बरबटी वाळलेली असेल तरच भिजवून घ्यायची ना? + होय.
मन्जु ताई , खुप खुप आभार , सायुच्या हातची टेस्टेड पाककृती! मस्त कुरकुरीत होतात... Happy ---------/\----------
हेमा ताई, वर्षु दी, मैत्रेयी ,पलक,,हरी दा , निलाक्षी सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन खुप आनंद झाला. आभार
सगळ्यांना नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!!!

हरि दा, फोटो का डीलीट कलात ? माझ्या आधी तुम्ही फोटो टाकला होता , मला कीती आनंद झाला होता.

तुझाच फोटो होता. तुझे फोटो आल्यावर काढला.
असे उचलून चटणीत बुडवून खावेसे वाटतायेत, केचप काही आवडत नाही मला........ अगदी अगदी. अस्से उचलून खावेसे वाटतायेत. केचप नाही आवडत. काय मोहात पाडणाऱ्या रेस्पी आहेत.
आणि सोबतची मिरची तर कहर

करून बघायला हवी. फोटो बघून आधी डाळवडे वाटले होते. कुरकुरीत वडे संध्याकाळी खायला मजा येईल. फोटो बघून वाटताना बरीच ओबडधोबड वाटायला हवी असे वाटतेय.

बरबटी हे नाव भोपाळच्या एका मैत्रिणीच्या तोंडून ऐकले होते. बर्बटीच्या भाजीबद्दल ती बोलत होती. मला बरबटी म्हणजे नक्की कोणती भाजी हे कळलेच नाही. Happy

वर्षा धन्स.. कृष्णा, गुगल क्रोम ला शरण जा.. Happy
साधना, आभार. कुरकुरीत वडे संध्याकाळी खायला मजा येईल.+++ अगदी बरोबर , ईव्हीनींग स्नॉक्स साठी परफेक्ट मेनु. +++ फोटो बघून वाटताना बरीच ओबडधोबड वाटायला हवी असे वाटत+++, होय, नाही तर कुरकुरीत होणार नाही.

Pages