Submitted by सायु on 1 January, 2020 - 04:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
चवळी / बरबटी (कडधान्यातला प्रकार) : दोन वाट्या ( ७ ते ८ तास भिजलेली)
लसुण पाकळ्या - १०,१२
हिरव्या मिरच्या - २
धणे पुड - १ चहाचा चमचा
कोथिंबीर , जिरं, तिखट , मीठ अंदाजेच
बेसन पीठ - २ चहाचे चमचे
तळणा साठी तेल
क्रमवार पाककृती:
हिवाळ्यात आवर्जून करण्या सारखी एक भन्नाट विदर्भिय पा.कृ.
लसुण , मिरची , कोथिंबीर, जिरं मिक्सरला फिरवुन घ्यायचं. आता चवळी / बरबटी पण मिक्सरला जाडसर फिरवुन घ्यायची..
त्यात वरिल सगळे साहित्य घालायचे, दोन चमचे बेसन (कमी जास्त करु शकता) घालुन छान एकत्र भिजवुन घायचे, वरुन एक पळी
तेलाचे कडकडीत मोहन घालायचे आणि मुगाचे पकोडे तळतो तसे तळुन घ्यायचे..
दही ,पदीना किंवा मिरची , कोथिंबीर, दह्याच्या चटणी किंवा टोमाटो सॉस ,बरोबर खुप छान लागतात.
वाढणी/प्रमाण:
२ जणां करता
अधिक टिपा:
चवळी जाडसरच वाटायची, बारिक वाटली तर पकोडे कुरकुरीत होत नाहित. नरम पडतात.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लव्हली !! फोटो टाकले असते तर
लव्हली !! फोटो टाकले असते तर बहार आली असती.
नवीन वर्षाच्या खमंग शुभेच्छा !
पहिल्या वहिल्या प्रतिसादा
पहिल्या वहिल्या प्रतिसादा साठी धन्स रश्मी. फोटो उद्या देईन.
मस्त लागेल! फोटो हवेतच.
मस्त लागेल!
फोटो हवेतच.
धन्स हरि दा..
धन्स हरि दा..
+++ फोटो हवेतच.+ नक्की देते.
पाकृ छान वाटतीये! पण मोहन
पाकृ छान वाटतीये! पण मोहन घातलं तर पकोडे खुप तेल पिणार असं वाटतंय..
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
छान तोंपासू!!
छान तोंपासू!!
+++ फोटो हवेतच.+ नक्की देते.>>>>
खायला बोलाविल्यास अधिक उत्तम!
मस्तच.
मस्तच.
खायला बोलाविल्यास अधिक उत्तम! >>>
वा! मस्त पाकृ.
वा! मस्त पाकृ.
छान पाकृ.
छान पाकृ.
एक बाळबोध शंकानिरसन: चवळी / बरबटी वाळलेली असेल तरच भिजवून घ्यायची ना?
ताजी असेल तर सोलून लगेच करता येईल ना?
सायुच्या हातची टेस्टेड
सायुच्या हातची टेस्टेड पाककृती! मस्त कुरकुरीत होतात...
वाह, मस्तच, कुरकुरीत फोटो टाक
वाह, मस्तच, कुरकुरीत फोटो टाक पाहू
मस्त पाकृ सायु.
मस्त पाकृ सायु.
फोटो पाहिजेच.
छान रेसिपी. असेच मटकीचे पण
छान रेसिपी. असेच मटकीचे पण करतात बहुतेक विदर्भात. माझ्या जावेच्या हातचे खाल्ले होते.
छान रेसिपी.
छान रेसिपी.
फोटो सायुतायचाच. तिने का
वा !
वा !
वा! फोटोमुळे तोंडाला पाणी
वा! फोटोमुळे तोंडाला पाणी सुटले अगदी!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
मन्या, आभार, ++ पण मोहन घातलं
मन्या, आभार, ++ पण मोहन घातलं तर पकोडे खुप तेल पिणार असं वाटतंय++ अजिबात तेलकट होत नाहित..
कृष्णा, धन्स . +++ खायला बोलाविल्यास अधिक उत्तम! ++ मोस्ट वेलकम ------ /\-----
अन्जु ताई, मामी , पा. कृ. आवडल्या बद्द्ल धन्स..
मानव, पा. कृ. आवडल्या बद्द्ल धन्स +++ एक बाळबोध शंकानिरसन: चवळी / बरबटी वाळलेली असेल तरच भिजवून घ्यायची ना? + होय.
मन्जु ताई , खुप खुप आभार , सायुच्या हातची टेस्टेड पाककृती! मस्त कुरकुरीत होतात... ---------/\----------
हेमा ताई, वर्षु दी, मैत्रेयी ,पलक,,हरी दा , निलाक्षी सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन खुप आनंद झाला. आभार
सगळ्यांना नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा!!!
हरि दा, फोटो का डीलीट कलात ? माझ्या आधी तुम्ही फोटो टाकला होता , मला कीती आनंद झाला होता.
मस्त फोटो, असे उचलून चटणीत
मस्त फोटो, असे उचलून चटणीत बुडवून खावेसे वाटतायेत, केचप काही आवडत नाही मला.
छान रेसिपी.खूप दिवसांनी ऐकला
छान रेसिपी.खूप दिवसांनी ऐकला शब्द बरबटी.
तुझाच फोटो होता. तुझे फोटो
तुझाच फोटो होता. तुझे फोटो आल्यावर काढला.
असे उचलून चटणीत बुडवून खावेसे वाटतायेत, केचप काही आवडत नाही मला........ अगदी अगदी. अस्से उचलून खावेसे वाटतायेत. केचप नाही आवडत. काय मोहात पाडणाऱ्या रेस्पी आहेत.
आणि सोबतची मिरची तर कहर
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
पण फोटो दिसत नाही.
अजिबात तेलकट होत नाहित.. >>>
अजिबात तेलकट होत नाहित.. >>> >>>आता करुन पाहणे आले..
फोटु मला देखिल दिसत नाही!
फोटु मला देखिल दिसत नाही!
आता उद्या करुन खायला हवे! नुसते करुन पाहणे नको!
करून बघायला हवी.
करून बघायला हवी. फोटो बघून आधी डाळवडे वाटले होते. कुरकुरीत वडे संध्याकाळी खायला मजा येईल. फोटो बघून वाटताना बरीच ओबडधोबड वाटायला हवी असे वाटतेय.
बरबटी हे नाव भोपाळच्या एका मैत्रिणीच्या तोंडून ऐकले होते. बर्बटीच्या भाजीबद्दल ती बोलत होती. मला बरबटी म्हणजे नक्की कोणती भाजी हे कळलेच नाही.
वर्षा धन्स.. कृष्णा, गुगल
वर्षा धन्स.. कृष्णा, गुगल क्रोम ला शरण जा..
साधना, आभार. कुरकुरीत वडे संध्याकाळी खायला मजा येईल.+++ अगदी बरोबर , ईव्हीनींग स्नॉक्स साठी परफेक्ट मेनु. +++ फोटो बघून वाटताना बरीच ओबडधोबड वाटायला हवी असे वाटत+++, होय, नाही तर कुरकुरीत होणार नाही.
वा.... मस्त रेसिपी
वा.... मस्त रेसिपी
झकास दिसतायत..
झकास दिसतायत..
उद्या करणार.
उद्या करणार.
तोंपासु रेसिपी!
तोंपासु रेसिपी!
Pages