चवळी / बरबटीचे पकोडे

Submitted by सायु on 1 January, 2020 - 04:18
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

चवळी / बरबटी (कडधान्यातला प्रकार) : दोन वाट्या ( ७ ते ८ तास भिजलेली)
लसुण पाकळ्या - १०,१२
हिरव्या मिरच्या - २
धणे पुड - १ चहाचा चमचा
कोथिंबीर , जिरं, तिखट , मीठ अंदाजेच
बेसन पीठ - २ चहाचे चमचे
तळणा साठी तेल

क्रमवार पाककृती: 

हिवाळ्यात आवर्जून करण्या सारखी एक भन्नाट विदर्भिय पा.कृ.

लसुण , मिरची , कोथिंबीर, जिरं मिक्सरला फिरवुन घ्यायचं. आता चवळी / बरबटी पण मिक्सरला जाडसर फिरवुन घ्यायची..
त्यात वरिल सगळे साहित्य घालायचे, दोन चमचे बेसन (कमी जास्त करु शकता) घालुन छान एकत्र भिजवुन घायचे, वरुन एक पळी
तेलाचे कडकडीत मोहन घालायचे आणि मुगाचे पकोडे तळतो तसे तळुन घ्यायचे..

दही ,पदीना किंवा मिरची , कोथिंबीर, दह्याच्या चटणी किंवा टोमाटो सॉस ,बरोबर खुप छान लागतात.

वाढणी/प्रमाण: 
२ जणां करता
अधिक टिपा: 

चवळी जाडसरच वाटायची, बारिक वाटली तर पकोडे कुरकुरीत होत नाहित. नरम पडतात.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनिम्याऊ, निरु, माऊमैया , चिन्नु मनःपुर्वक आभार.. Happy
++ उद्या करणार.+++ नक्की करा आणि एकडे फोटो पण द्या.

आताच केले. मस्त झालेत. खूप दिवस पडून असलेली चवळी पण संपवता आली.
सायू, तुम्ही आता माबोवर लिहीत नाहीत का ?

Pages