Submitted by sneha1 on 17 October, 2019 - 15:04
नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात? भारतीय नागरिकत्व नसताना तुम्हाला भारतातली प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याची गरज असते का?
धन्यवाद!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
OCI card holders should apply
OCI card holders should apply for RE-ISSUE of their OCI card if a NEW PASSPORT is issued.
RULES >> मलादेखील हाच नियम माहित आहे. २० वर्षाखालील मुलांना फक्त ५ वर्षाकरिताच पासपोर्ट मिळतो त्यामुळे दार ५ वर्षाने खटाटोप करा..
>>जुना आणि नवा पासपोर्ट , ओसी
>>जुना आणि नवा पासपोर्ट , ओसी आय हे सर्व पोस्टाने अथवा फेडेक्स ने <<
हि माहिती कुठे वेबसाइट वर आहे का? लिंक द्या जमल्यास... >>
मागच्या महिन्यात, भारतात जायच्या साधारण दोन आठवडे आधी, रिन्युअल प्रोसेस आहे तरी काय हे बघत होते तेंव्हा पाहिलेलं. कॉक्स & किंग्ज च्या साइटवर होतं बहुतेक . आता नक्की आठवत नाही. आम्ही भारतात असताना इथल्या एका मित्राने त्याचं ओसीआय रिन्यु केलं. त्याने सांगितलं की पासपोर्ट पाठवायला लागला नाही. त्याचं रिन्युअल अजून आलं की नाही माहित नाही. आम्ही अप्लाय करायच्या आधी त्याच्याशी परत एकदा बोलू . तेंव्हा काही अजून माहिती मिळाली तर इथे लिहिनच.
कॉक्स अॅण्ड किंग्ज ची माहिती देण्याची स्टाइल म्हणजे सर्क्युलर रेफरंसेस आणि रिकर्शनचा उत्तम नमूना आहे :चिडचिडः
रिनुअल फि $४५ आहे हे कुठेतरी
रिनुअल फि $४५ आहे हे कुठेतरी वाचलेलं असल्याने माहित आहे. >>न्हे मला ही काही जणांनी सांगितले आहे पण कोणालाच त्याची लिंक देता आलेली नाही. मला सापडलेले हे होते
https://www.in.ckgs.us/faq/oci/fees-and-payments/1253/what-are-the-fees-...
माझ्या अंदाजानुसार फॉर्म भरताना किती पैसे ते दाखवत असावेत. मी सिरीयसली पोरीसाठी सध्या व्हिसा काढून काम चालावायचा विचार करतोय. असे केल्याने काही प्रॉब्लेम येउ शकतील का ?
मलादेखील हाच नियम माहित आहे. २० वर्षाखालील मुलांना फक्त ५ वर्षाकरिताच पासपोर्ट मिळतो त्यामुळे दार ५ वर्षाने खटाटोप करा.. >> व्हिसा काढा पोरांचा, ते जास्ती सोपे आहे असे दिसतेय. उगाच ओसीआय काढले
मी सिरीयसली पोरीसाठी सध्या
मी सिरीयसली पोरीसाठी सध्या व्हिसा काढून काम चालावायचा विचार करतोय. <<< यात काही प्रॉब्लेम नाही...
माझी मुलं २००२ साली (वय वर्षे ९ आणि ५) OCI घेतल्यानंतर गेली १७ वर्षे भारतात तेच OCI आणि नवीन पासपोर्ट घेऊन जातात (एकटे सुध्दा).
जुना पासपोर्ट नेत नाहीत. एकदा माझ्या हे ध्यानात आल्याने मी On Arrival Visa काढला.. मुंबईला गेल्या वर २ व्हिसा असल्याने आम्हाला १/२ तास अडकवून ठेवले (आणि नंतर, 'कशाला पैसे वाया घालवले?' असं ऐकवलं )
धन्यवाद देसाई.
धन्यवाद देसाई.
(वय वर्षे ९ आणि६५) >> ६५ ही माहिती नवीन आहे
अरे चुकले का?.. दुरुस्त केले
अरे चुकले का?.. दुरुस्त केले.
https://boi.gov.in/content
https://boi.gov.in/content/overseas-citizen-india-oci-cardholder
या पानावर नोट सेक्शन मधला १ बघा.
OCI card holders shall now be given Immigration clearance on the strength of their valid forign passport and OCI Registration Certificate (OCI booklet, popularly known as OCI card).
दर वेळी पासपोर्ट बदलला म्हनुन re-issue ची गरज नाही. (exception 20 and 50 age)
मी दर वेळि वरिल पानाचि
मी दर वेळि वरिल पानाचि printout बाळगते. पण परदेसाई यांच्या सारखाच अनुभव आहे. कधिहि जुना पास्पोर्ट मागितला नाहि.
one more link
https://mha.gov.in/sites/default/files/GuidelinesOCI.pdf
refer item number 4.
जुना पासपोर्ट सोबत नेणे इतके
जुना पासपोर्ट सोबत नेणे इतके त्रासदायक आहे का?
जुना पासपोर्ट सोबत नेणे इतके
जुना पासपोर्ट सोबत नेणे इतके त्रासदायक आहे का? <<< नाही .. पण तो जपून ठेवणे, तीन चार पासपोर्ट बाळगणे इत्यादी त्रासदायक आहे....
Part-B भरून झालेला आहे.. तारखा भरताना DD/MMM/YYYY (01/JAN/2020) अश्या भराव्यात... सांगत नाहीत, पण त्याशिवाय चालत नाही.. )
आता PDF upload चा कार्यक्रम झाला... आता सगळे कागदावर छापून पाठवायचे आहे म्हणे...
परदेसाई - भारतीय पासपोर्ट
परदेसाई - भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो?
>>जुना पासपोर्ट सोबत नेणे
>>जुना पासपोर्ट सोबत नेणे इतके त्रासदायक आहे का?<<
नाहि, एव्हडि वर्षं तेच केलं. प्रत्येक वेळेला इमिग्रेशन ऑफिसरने विजा स्टँप नविन पासपोर्टवर नसल्याने जुना पासपोर्ट मागितला. पण आता नियम बदलले असल्याने केवळ $६० (रिनुअल फि+शिपिंग) करता १८ तासाच्या प्रवासात विघ्न आणावसं वाटंत नाहि...
>>आता सगळे कागदावर छापून पाठवायचे आहे म्हणे...<<
अजुन एक स्टेप आहे. सिजिकेएस्च्या वेबसाइट वर जाउन एंट्रि करावी लागते. तुमच्या घराजवळ काँसुलेट असेल तर वॉक-इन अपाँइट्मेंट घेउन सगळी कागदपत्रं ड्रॉप करु शकता. नविन ओसिआय (बहुदा) बुकलेट फेडेक्सने शिप करतात. नविन पासपोर्ट पाठवावा लागत नाहि, मात्र एक अॅफिडेविट करावं लागतं. थोडक्यात, नविन पासपोर्टवर ओसिआय स्टॅंप चिकटवत नाहित. भविष्यात फक्त ओसिआय बुकलेट प्रवासात बाळगावं लागेल अशी आशा आहे...
जुना पासपोर्ट सोबत नेणे इतके
जुना पासपोर्ट सोबत नेणे इतके त्रासदायक आहे का?
>>>>
नाही. जुना पासपोर्ट सोबत नेतोच as a precaution.
मुद्दा हा आहे की दरवेळी पासपोर्ट रिन्यु केल्यावर OCI re-issue करणे आणी पासपोर्ट re-stamp करुन घेणे गरजेचे आहे का. गरज नाही.
ओसिआय घेण्यामागे मूळ कारण
ओसिआय घेण्यामागे मूळ कारण त्याची वॅलिडिटी लाइफ्लाँग असणं, हे होतं. अपेक्षा होती कि नंतर कधिहि विजाची कटकट/धावपळ उरणार नाहि. सुरुवातीचे नियम (दर पासपोर्ट रिनुअलला रिइशु) जाचक वाटल्याने त्याचा निषेध नोंदवतच होतो (अर्थात माबोवर
). परंतु आताचा नियम (<२०, २१-४९, ५०+) रिझनेबल आहे. त्या कॅटेगोरीत माणसांचे चेहेरे वयोमानानुसार बदलतात म्हणुन नविन फोटो/ओसिआय मेक्स सेंस. सिकेजिएस्च्या भयकथा इथेच वाचलेल्या, रिनुअल लांबवण्यामागे ते एक कारण होत. (जुन '२०ची डेडलाइन भिती घालत होती हा भाग वेगळा).
बट आय वाज प्लेझंटली सर्प्राइज्ड. सिकेजिएस वेब्साइट डझंट प्रोवाय्ड ए बेस्ट युझर एक्स्पिरियंस, बट इट डझ वर्क...
भारतीय पासपोर्ट सरेंडर केला
भारतीय पासपोर्ट सरेंडर केला तरी, तो पासपोर्ट लागतो? <<< नाही...
पण विचारलेले प्रश्न इतके संदिग्ध आहेत, की कळत नाही.... उदा...
Did you have Dual Nationality...?
इथे Except India विचारलेले नाही. त्यामुळे मी आधी हो म्हटले.. म्हणुन पासपोर्ट नंबर विचारला.... मी घाबरून जाऊन जुना पासपोर्ट शोधला.
नंतर मी विचार करून 'नाही' म्हणालो..
एका ठिकाणी OCI Reference No. विचारला (तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा)... आता OCI Reference No. कुठे सापडला नाही.
(12 Alpha Numeric) मग मी File No. वापरला... जो १२ अक्षरांचा होता...
असल्या भानगडी बर्याच आहेत.. त्यामुळे गोंधळ उडतो...
धन्यवाद परदेसाई. आय अॅग्री.
धन्यवाद परदेसाई. आय अॅग्री.
मुद्दा हा आहे की दरवेळी
मुद्दा हा आहे की दरवेळी पासपोर्ट रिन्यु केल्यावर OCI re-issue करणे आणी पासपोर्ट re-stamp करुन घेणे गरजेचे आहे का. गरज नाही. >>
- पासपोर्ट स्टॅम्प करायची गरज नाही
- पण ओसीआय री-इश्यू करावे लागेल, दोन केस मधे
-- २० व्या वर्षापर्यंत प्रत्येक नवीन पासपोर्ट काढल्यानंतर. म्हणजे दर पाच वर्षांनी
-- ५० व्या वयानंतर एकदा, जेव्हा पासपोर्ट नवीन काढाल तेव्हा (रिन्यू करताना नवीनच मिळतो - पासपोर्ट नंबर बदलतो)
सीकेजीएस ची साइट, ते फॉर्म्स, त्यावरची माहिती खूप गोंधळात टाकणारी आहे. पण त्यांचा कस्टमर सपोर्ट चांगला आहे. मी दोन्ही वेळेस प्रत्येकी ३-४ वेळा इमेल व फोन वरून खात्री करून सबमिट केले होते. दोन्ही वेळेस व्यवस्थित मिळाले, साधारण दिलेल्या वेळेत (~ ३ महिने). मागच्या वर्षी या पूर्ण काळात शेवटचे दोन आठवडे सोडले तर सगळी ओरिजिनल्स आपल्याकडेच राहात असल्याने प्रॉब्लेम नव्हता. पण आता प्रोसेस बदलली आहे.
वीसा किती वर्षाचा मिळ्तो?
वीसा किती वर्षाचा मिळ्तो?
व्हिसा घेतलात तर जास्तीत
व्हिसा घेतलात तर जास्तीत जास्त १० वर्षांचा मिळतो..
ओके थँक्स.
ओके थँक्स.
सुनिधी, व्हिसा
सुनिधी, व्हिसा स्टँपिंगवाल्याने फार पुर्वी मुलगा लहान असताना सांगितले होते की व्हिसा हा पर्याय ठीक आहे पण जर काही कारणाने (फॅमिली इमर्ज्ञ्सी इ.) तुम्ही सहा महिन्यात (मला आठवतं त्याप्रमाणे पण तुम्ही एकदा खात्री करुन घ्या) पुन्हा यायचं असेल तर प्रवेश नाकारला जातो. तुम्ही किती फ्रिक्वेंटली जाता त्याप्रमाणे हा पर्याय ओके आहे. मागच्या वर्षी मुलांची पिओआय करताना महाग असला तरी फेडेक्सचाच पर्याय वापरावा लागेल असं नवरा म्हणाला होता. आता पोस्टाने पाठवायचा काय प्रॉब्लेम होता मला आठवत नाही पण पाठवण्यापेक्षा परतीचं ट्रॅकिंग करता येत नाही असं काही होतं आणि मला वाटतं आपले ओरिजिनल डॉक्युमेंटस होते. ते काय आहे ते एकदा खात्री करुन घ्या.
थँक्स वेका. ओसीआयच करेन.
थँक्स वेका. ओसीआयच करेन.
मला थोडी माहिती हवी आहे. OCI
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात?>>>security clearance मिळायला अडचण येऊ शकते, फेडरल जॉब्स/ काँट्रॅक्टस हवे असल्यास.
चला... आता १ भाग पूर्ण झाला..
चला... आता १ भाग पूर्ण झाला....
आता in.ckgs.us वर इतर मारामारी करू...
अर्ज Online भरा. मग एक Web Reference दिला जाईल.. तो जपून ठेवा.
आता बर्याच गोष्टी छापुन ठेवायला लागतील...
१. म्हणजे Affidavit in Lieu of Originals.. हे नोटरी समोर सही करून घ्यायचे आहे.. त्यात US passport copy पाठवतो/ते असे म्हटले आहे.
२. २ फोटो
३. Address Proof म्हणुन Driving License ची कॉपी.
४. CKGS ने दिलेला Payment Receipt Number/Web reference No
५. मनिऑर्डर/ बँकर चेक...
६. Fedex Label... कागद पाठवताना Fedex पाकिटावर लावायचे आहे.
७. CKGS label ... कागद पाठवताना Fedex label वर लावायचे आहे.
शिवाय...
१. OCI Renew चा छापील अर्ज सही करून..
२. OCI चे पहिले आणि शेवटचे पान कॉपी आणि सही करून.
३. Passport ची कॉपी सही करून..
४. Original OCI हे ही पाठवायचे आहे...
यात Copy केलेल्या सगळ्या कागदांवर Self Attestation म्हणून सह्या करायच्या आहेत..
Fedex ची दोन लेबल सोडता बाकी सगळे Fedex पकिटात भरून Fedex वाल्याकडून लेबलं लाउन पाठवण्याचा विचार आहे..
माझाबरोबर तुमचे ही काम व्हावे
माझाबरोबर तुमचे ही काम व्हावे म्हणुन लिहितोय.. पोष्टी मोठ्या मोठ्या वाटल्यास वाचू नये..
माझाबरोबर तुमचे ही काम व्हावे
माझाबरोबर तुमचे ही काम व्हावे म्हणुन लिहितोय. >> आमचेही भरलेत तर आमचेही काम होईल तुमच्याबरोबर
लिहा, उपयोग होईल पुढे.
लिहा, उपयोग होईल पुढे.
आमचेही भरलेत तर आमचेही काम
आमचेही भरलेत तर आमचेही काम होईल तुमच्याबरोबर >>>
परदेसाई सीकेजीएसचे एजंट म्हणून प्रसिद्ध झालेत असे इमॅजिन केले 
परदेसाई - मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे. एक चेकलिस्टही असते. ती खरे म्हणजे आपल्या संदर्भाकरता असते पण पाठवायची असते असे लिस्ट मधे यायचे.
मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट
मॅरेज सर्टिफिकेटही असेल लिस्ट मधे <<< ते फक्त भारतीय नवरा , अभारतीय बायको किंवा अभारतीय नवरा भारतीय बायको यांच्या साठी आहे..
आमचेही भरलेत तर आमचेही काम
आमचेही भरलेत तर आमचेही काम होईल तुमच्याबरोबर >>> बो- हो- री- ही- क- ह- र- आठवले.
परदेसाई, ष्टांपव्हेंडर चा साइड धंदा चांगला चालेल. - येथे भारतीय वकीलातीतले फॉर्म भरले जातील.
Pages