काकूंनी कर्कश्य आवाजात किंचाळून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं तोंड दाबून ती पुन्हा झोपली. पण एवढ्या-तेवढ्यावर ऐकतील त्या काकू कसल्या? एकदम चिवट स्वभाव! त्यांनी १० मिनिटांनी पुन्हा तारसप्तकात सूर आळवला.
काकू पूर्वी मंजुळ आवाजात हाक मारून तिला उठवत असत. पण वरचेवर आळशी होत जाणारा तिचा स्वभाव आणि तिनेच कधीतरी दिलेल्या सूचनेला अनुसरून त्यांनी वारंवार किंचाळून उठवणं सुरु केलं होतं. एखाद्याला झोपेतून उठवणं हे फार भारी काम नव्हे. पण काकू आपलं कर्तव्य नेटाने निभवत असत.
शेवटी ती उठून तयारी करू लागली. काकूंमुळे आज कॉलेजचा तास बुडणार नव्हता म्हणून तिने उद्याची आनंदाने त्यांना सुट्टी देऊन टाकली.
.
.
.
.
.
.
.
.
.
फोनमधील अलार्म ऑफचं option सिलेक्ट करून!!!
----------------------------------------------------------------
**किल्ली**
----------------------------------------------------------------
अलार्म म्हणजे काकू??? नो!
अलार्म म्हणजे काकू??? नो!
वा, वेगळीच आहे !
वा, वेगळीच आहे !
हेच टाळायचय मला!
हेच टाळायचय मला!
मस्त आयडिया
मस्त आयडिया
(No subject)
घड्याळ काका आणि अलार्म काकू..
घड्याळ काका आणि अलार्म काकू..
धन्यवाद प्राची, मधुरा,
धन्यवाद प्राची, मधुरा, सस्मित, कुमार१, मन्या, अक्षय
घड्याळ काका आणि अलार्म काकू..>>> करेक्ट