Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याकडे नेटफ्लिक्स किंवा
माझ्याकडे नेटफ्लिक्स किंवा एमेझॉन प्राईम नाही. यूट्यूबवर काही बघण्यासारख्या वेबसिरीज आहेत का?
webseries on youtube >> असा
webseries on youtube >> असा सर्च टाकला गुगलवर तर बर्याच दिसतात
पण खरंच सगळे एपिसोड दिसतात की नाही हे तुम्हीच चेक करुन सांगा
पिचर्स, बँग बाजा बारात,
बेक्ड इ. पहा
मिथिला पालकर, अभिज्ञा भावेंच्या आहेत.
बघते. थँक्स डीविनिता.
बघते. थँक्स डीविनिता.
कोटा फॅक्टरी आहे यूट्यूबवर
कोटा फॅक्टरी आहे यूट्यूबवर
>>कोटा फॅक्टरी आहे यूट्यूबवर
>>कोटा फॅक्टरी आहे यूट्यूबवर
धन्यवाद. चांगली आहे का ही सिरीज. शोधून बघते.
वर्षा TVFplay, Mxplayer वर
वर्षा TVFplay, Mxplayer वर फ्री दिसतात वेबसीरिज, त्या पहा
tvfplay - Tripling चे दोन्ही
tvfplay - Tripling चे दोन्ही सिझन पहा
Hotstar स्पेशल वर 'सिटी ऑफ
Hotstar स्पेशल वर 'सिटी ऑफ ड्रीम्स' आणि 'आऊट ऑफ लव्ह' बघितल्या. दोन्ही आवडल्या पण दोन्हीचे शेवट जरा वेगळे हवे होते असं वाटलं संपल्यावर.
ओके थँक्यू डीविनिता
ओके थँक्यू डीविनिता
You should search for laal
You should search for laal capitaan. Nozipa
Hotstar स्पेशल वर 'छप्पड
Hotstar स्पेशल वर 'छप्पड (छप्पर) फाड कें' सिनेमा आहे. शेवट फार अंगावर येणारा आहे. छान विनोदी चाललेल्या कौटुंबिक नाट्यात एकदम काहीतरी वेगळंच.
इथे स्पॉयलर देत नाही पण एकदा बघायला हरकत नाही.
इथे स्पॉयलर देत नाही पण एकदा
इथे स्पॉयलर देत नाही पण एकदा बघायला हरकत नाही.>>ए विनिता इकडे फक्त वेबसीरिजबद्दल
सॉरी सॉरी. हलवते तिकडे.
सॉरी सॉरी. हलवते तिकडे.
हॉटस्टार वर सध्या शॉकर्स
हॉटस्टार वर सध्या शॉकर्स बघतेय. २ सिझन आहेत. लहान लहान एपिसोड्स आहेत. १० एक मिनिटाचे.
हॉरर्/थ्रिलर स्टोरीज. मस्त वाटतायत पटापट संपतायत त्यामुळे.
फॅमिली मॅनचा पहिला भाग बघितला
फॅमिली मॅनचा पहिला भाग बघितला. बराच मोठा वाटला, एक तास. श्रीकांत आणि जेके मधले नर्मविनोद छान आहेत. श्रीकांत एवढं महत्वाचं काम सोडून मधेच मुलीच्या शाळेत जातो ते पटलं नाही आणि ती मुलगी कसल्या गोळ्या घेत असते ते कळलं नाही. शरद केळकरला बघून उफफ्फ झालं
पाहिलेला भाग विसरायच्या आत बघून संपवायला हवी.
मी जरा कन्फ्यूज झालेय.
मी जरा कन्फ्यूज झालेय.
नेटफ्लिक्स घेवू की अमेझॉन? की अजून कुठली चांगली साईट आहे?
मला जुने हिंदी , ड्ब ईग्रजी व मराठी सिनेमा बघायचे आहेत. कृपया मार्गदर्शन करावे.
भ्रम ची श्टोरी सांगता येईल
भ्रम ची श्टोरी सांगता येईल काय.....
मी जरा कन्फ्यूज झालेय.>>
मी जरा कन्फ्यूज झालेय.>> Amazon prime and YouTube premium are best for you.
नेफ्ली चे पैसे भरतो महिन्याला
नेफ्ली चे पैसे भरतो महिन्याला. प्राईम वर्षाकाठी. नेफ्ली वर आमचा बाळोबा माईटी लिटल भीम अन पेपा पिग हे आणि हेच्च आलटून पालटून बघतो. मला कधीही टीवीवर नेफ्ली नाही पाहाता येत. केवळ शेअरिंग मध्ये असल्यानी परवडतं.
फक्त अॅड्स फ्री अन काही युट्युब ओरिजिनल्स पाहायला हे पैसे जास्त वाटतात. तरीही तद्दन फालतू टैमपास विडिओज हे तिथेच (युट्युब) वरच पाहीले जातात.
युट्युब प्राईम जरा जास्तच प्राईसी वाटलं. १७०/- प्रतिमहिना. हे आधी १२९/- होतं. का वाढवल्या किमती देवास ठौक
असो.
हो त्या टाटा स्काय च्या बोडक्यावरचे महिन्याचे पैसे वेगळे आहेतच. तिथेही ९५% वेळी झी मराठीच असतं फक्त. हे वाढतच जातंय. कुठेतरी बांधायला हवं. याव्यतिरिक्त ब्रॉडबँड चे पैसे आहेतच जे नाकारता येर्त नाहीत.. .
असो.
काल टिव्हीएफ वर क्युबिकल्स ही चार भागांची शॉर्ट वेबसिरीज पाह्यली. चांगली आहे.
शॉकर्स मस्त आहे. बघून संपली.
शॉकर्स मस्त आहे. बघून संपली.
सगळ्या एपि मधे वातावरण निर्मिती मस्त जमलीए. खरंच घाबरायला होतं बर्याच ठिकाणी. एक दोन वेळा म्यूट पण केलं मी
वेबसिरीज कुठे बघितली ते पण
वेबसिरीज कुठे बघितली ते पण लिहीत चला म्हणजे आपण बघू शकतो की नाही त्याचा अंदाज येईल
धनु न्यवाद फिल्मी, योकु
धन्यवाद फिल्मी, योकु
अमेझॉन प्राईम फिक्स करते.
युट्युब वर टिव्हीएफ ची
युट्युब वर टिव्हीएफ ची क्युबिकल्स आहे , मला फारशी रुचली नाही . म्युचुअल फन्ड्स च्या अॅड्स बोअर करतात .
झी५ ची रंगबाज फिरसे (२) बघतोय . दोन एपिसोड झाले , बरी वाटतेय .
मॅक्स प्ले वर,क्विन बघत आहे
एम एक्स प्ले वर,क्विन बघत आहे तीन भाग झाले जबरदस्त आहे जयललिताच्या जीवनावर आधारित आहे...रम्या कृष्णन जयललिताची भूमिका अगदी जिवंत केली आहे...
यूट्यूबवर होम स्वीट होम ही
यूट्यूबवर होम स्वीट ऑफिस ही डाइस मिडीयाची पाच भागांची वेबसिरिज बघितली. वेडींग फोटोग्राफीचा घरातून बिझनेस चालवणार्या दोन बहिणींची (चुलतबहिणी बहुतेक) गोष्ट आहे. बिझनेस करण्याचा पहिला उत्साह ते शेवटी मतभेद होण्यापर्यंतचा प्रवास आवडला.
खरंच घाबरायला होतं बर्याच
खरंच घाबरायला होतं बर्याच ठिकाणी>> मी पहिल्या भागातच म्युट केले. जबरी बनवलीय
वेबसिरीज कुठे बघितली ते पण
वेबसिरीज कुठे बघितली ते पण लिहीत चला म्हणजे आपण बघू शकतो की नाही त्याचा अंदाज येईल>> बरोबर आहे
सध्या MX Player वर Queen
सध्या MX Player वर Queen बघतेय खूप छान आहे... शाळेत खूप हुशार असलेल्या मुलीचा हेरॉईन ते मुख्यमंत्री बनण्याचा प्रवास दाखवला आहे...छान आहे...
Queen
Queen
मी नेट फ्लिक्सवर ( कि प्राइम
मी नेट फ्लिक्सवर ( कि प्राइम ???? दोन्ही रेग्युलर बघत असल्याने हा कायमचा गोंधळ आहे) 'Virgin River' चा सिझन 1 पाहिला आणि आवडला.
एक नर्स प्रॅक्टिशिनर LA हुन virgin river नावाच्या छोट्या टाऊन मध्ये स्वतःच्या आयुष्यातील मोठा 'अपघात' आणि त्या योगाने आलेलं दुःख विसरायला नोकरी करण्यासाठी येते. नर्स म्हणजे भारतातील गांजलेली गरीबडी नर्सबाई इमॅजिन करू नका. चांगली BMW आणि सेलिन (Celine) बॅग कॅरी करणारी सुंदर आणि भावखाऊ नर्स असते. मग छोट्या टाऊनमध्ये हॉट n हँडसम हिरो भेटतो. तिथे भेटणारी लोक आणि घटना प्रसंग बघताना एखाद्या मराठी किंवा जुन्या हिंदी सिनेमाच्या कथेचं इंग्लिश रूपांतर पहातो आहे असं वाटायला लागतं. अनाथ बाळ, एक मनाने दुरावलेले वृद्ध जोडपं, एक अजून लव्ह स्टोरी असणार उपकथानक, भोचक काकवा, किंचित मसाला म्हणून गुन्हेगारी इ इ सगळं काही आहे. अधून मधून डोळ्यांना वॉव होईल अशी व्हर्जिन रिव्हरचं निसर्ग सौंदर्य. थोडक्यात काय तर डोक्याला शॉट नसलेली सहज जाता जाता पहावीशी एक वेबसिरीज.
Pages