Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55
सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..
मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.
ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ullu हे ऍप सीरिजच्या नावाखाली
ullu हे ऍप सीरिजच्या नावाखाली सॉफ्टपॉर्न दाखवताय
पिचर्स मस्तच आहे
पिचर्स मस्तच आहे
नेफि वर Modern Family घेतली
नेफि वर Modern Family घेतली आहे बघायला...अमेरिकन नवरा-बायको , त्यान्ची तीन मुल....बायकोचे वडील आणि त्यान्ची तरुण कोलम्बियन बायको आणि तीचा आधीच्या नवर्याचा मुलगा, बायकोचा भाउ आणि त्याचा नवरा (गे असतात) आणि त्यानी दत्तक घेतलीली तान्ही Vietnamies मुलगी अशी तीन कुटुम्ब असतात. त्यान्ची सगळी मजा मजा आहे.
Bang Baaja Baarat चा दुसरा
Bang Baaja Baarat चा दुसरा सिझन आलाय का? कुठे पहायला मिळेल?
नेट फ्लिक्स वर हसन मिनाज
नेट फ्लिक्स वर हसन मिनाज पॅट्रिअॅट अॅक्ट छान आहेत भाग. मी फेंटानिल क्रायसिस व रिअल कॉस्ट ऑफ क्रुझेस बघितले आता रोज एक बघीन. जॉन ऑलिव्हर च्या धर्तीवर आहे. क्युट चटपट्या पोरगा वाटतो व छान इंग्लिश आहे. विनोद पण भारी. सिस्टिमचे वाभाडे!!!!
इथे स्पॉयलर्स पण टाकायचे का?
इथे स्पॉयलर्स पण टाकायचे का?

टाईपरायटर ही सिरीज सध्या
टाईपरायटर ही सिरीज सध्या नेटफ्लिक्सच्या अमेरिकन आणि इतर देशातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होते आहे. मी एका अमेरिकन लेखिकेला सोशल मिडियावर फॉलो करते तिने ही सिरीज बघत असल्याचं लिहिलं आहे. हिंदी कळत नाही तरी सबटायटल्स वाचून बघतायत लोक.
त्यांचे शोज आपण नेहमीच बघतो पण आपल्या गोव्यात बनवलेल्या हिंदी शोला असं कल्ट फॉलोइंग मिळणं हे कौतुकास्पद आहे. गुड वर्क बाय सुजॉय घोष.
Maaya 3 येतेय
Maaya 3 येतेय
कुठे येतेय.
कुठे येतेय.
VB On The Web
VB On The Web
jiocinema
नेट फ्लिक्स वर हसन मिनाज
नेट फ्लिक्स वर हसन मिनाज पॅट्रिअॅट अॅक्ट छान आहेत भाग. >>> हो मस्त आहेत त्याचे शोज. क्रिकेट मधल्या भारतीय डॉमिनन्स वर पण एक आहे. बहुधा यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीवरही एक होता.
बाय द वे जॉन ऑलिव्हरचा २०१४ च्या निवडणुकीच्या निकालानंतरचा शो धमाल होता.
सप्टेंबर ६ ला नेटफ्लिक्सवर ‘द
सप्टेंबर ६ ला नेटफ्लिक्सवर ‘द स्पाय’ ही सहा एपिसोड्सची सिरिज आली आहे. साशा बॅरन कोहेनचा लीड रोल आहे. रियल लाईफ स्टोरीवर बेस्ड आहे. स्टोरी बघण्यात मजा आहे तेव्हा प्रत्यक्ष बघा.
अरे सही. बघतो. साशा बॅरन
अरे सही. बघतो. साशा बॅरन कोहेन हा म-हा-न कलाकार आहे. त्याची बोरात आणि अली जी ही कॅरेक्टर्स महाधमाल आहेत. पण स्पाय ची माहिती वाचली तर ही गंभीर सिरीज दिसते.
>>सप्टेंबर ६ ला नेटफ्लिक्सवर
>>सप्टेंबर ६ ला नेटफ्लिक्सवर ‘द स्पाय’ ही सहा एपिसोड्सची सिरिज आली आहे. <<
टाकतो लिस्टमध्ये...
इझरेलच्याच पार्श्वभूमीवर "अवर बॉइज" नांवाची सिरीज आहे. पॅलेस्टाइन्स-ज्युज यांच्या मधला पारंपारिक संघर्ष, कट्टर धार्मिकता आणि त्यात पोलिसांना करावी लागणारी तारेवरची कसरत इत्यादिंचं अतिशय सुरेख चित्रण केलेलं आहे...
इंग्लिशमध्ये आहे का राज? फौदा
इंग्लिशमध्ये आहे का राज? फौदा वगैरेही चांगली आहे पण सबटायटल्स वाचायला कंटाळा येतो.
सायो - नेफि ऑडिओ चे सुद्धा
सायो - नेफि ऑडिओ चे सुद्धा ऑप्शन देते अनेक सिरीजला. फौदा इंग्रजीतूनही आहे बहुधा. मी तसे केल्याचे आठवते.
बघेन ट्राय करुन. अशीच एक
बघेन ट्राय करुन. अशीच एक इस्रायली सिरीज ‘प्रिझनर्स ऑफ वॉर‘ पण चांगली असल्याचं ऐकलं आहे पण पुन्हा सबटायटल्स नकोत म्हणून बघितली नाहीये.
>>इंग्लिशमध्ये आहे का राज? <<
>>इंग्लिशमध्ये आहे का राज? <<
नाहि, हिब्रु मधे आहे. या सिरिज मधे जॉनी अबिद (हुसेन अबु कादर) याने अतिशय सुंदर काम केलं आहे...
थिंकीस्तान १ आणि २
थिंकीस्तान १ आणि २
कुणी केला आहे का उल्लेख?
२ आत्ताच आलाय
नेटफ्लिक्सवर 'Unbelievable'
नेटफ्लिक्सवर 'Unbelievable' नावाची पोलिस तपासकथा आली आहे. 8 भाग आहेत. मला अतिशय आवडली. सगळ्यांची कामं आणि काही प्रसंगामधले भावनिक आणि कलाकारांच्या अभिनयातले बारकावे अतिशय आवडले.
अजून नंतर लिहिन.
Maaya 3>>>अती भंकस
Maaya 3>>>अती भंकस
Typewriter बघायला सुरुवात
Typewriter बघायला सुरुवात केली आहे. मस्त वाटली, स्टोरी पण छान आहे. गोव्यातलं टिपिकल वातावरण छान उभं केलंय. सगळ्यांची कामं पण सुरेख, विशेषतः सगळ्या बालकलाकारांची. आता suspence ची उत्सुकता आहे...
ट्रिप्लिंग १ + २ मस्त TVF
ट्रिप्लिंग १ + २
मस्त
TVF
जॅक रायनचा पुढचा सिझन
जॅक रायनचा पुढचा सिझन नोव्हेंबर १ ला येतोय.
The Family Man
The Family Man
बरीय
तिवारी सुसह्य आहे
तिवारी कोण?
तिवारी कोण?
नेफ्लि वर unbelievable सिरीज
नेफ्लि वर unbelievable सिरीज आली आहे ती छान आहे असं ऐकलंय. पण हे लिमिटेड सिरीज म्हणजे काय नक्की ते नाही कळलं. कुणी सांगू शकेल का?
तिवारी म्हणजे मनोज वाजपेयी
तिवारी म्हणजे मनोज वाजपेयी
रिप्लायसाठी धन्स सस्मित आणि
रिप्लायसाठी धन्स सस्मित आणि बब्बन
हो. ते कळलं पुढचे एपि बघताना.
हो. ते कळलं पुढचे एपि बघताना. पहिल्यात श्री/श्रीकांतच समजलेलं.
Pages