युक्ती सुचवा युक्ती सांगा- ५

Submitted by स्वाती२ on 26 November, 2015 - 08:04

युक्ती सुचवाच्या चौथ्या भागात पोस्ट्सची संख्या २००० च्या वर झाली आहे तेव्हा स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायला हा भाग पाचवा

या आधीचे भाग -
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
युक्ती सांगा -४: http://www.maayboli.com/node/46521

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सफरचंदे आहेत.. कोणीही फळ कापून दिलं तरी खात नाहीये, सफरचंदे संपण्याची काही युक्ती/ पाकृ आहे का? >>
एक डेझर्ट करून बघा . सफरचन्दाची सालं काढून बारीक फोडी करा. थोडी दालचिनी पूड , साखर आणि जरासे पाणी घालून चाण्गले शिजवून घ्या .
थंड झाल्यावर , एका भांड्यात मारी बिस्किट चा चूरा , शिजवलेलं सफर्चंद असे थर लावा . मध्ये मध्ये थोडे चमचाभर दूध शिम्पडा .
भांड फ्रीझ मध्ये सेट व्ह्यायला ठेवा . नंतर गारेगार झाल्यावर पूडीन्ग सारख्या वड्या पाडून खायला घ्या . जाम भारी टेस्टी लागते .

दमटपणा कायम राहील अशा हवाबंद डब्यात इडल्या ठेवा. रूम टेंपरेचरला राहील असे बघा. ओलसर रूमालाची घडी ठेऊ शकता.
अर्थात याचा एकच साईड इफेक्ट आहे तो चवीवर. पीठ किती आंबलेले होते त्यावर संध्याकाळी चव अवलंबून राहील.
नाहीतर टाचणी घेऊन बसा Light 1

सकाळी केलेल्या इडल्या संध्याकाळपर्यंत मऊ आणि स्पॉंजि राहण्यासाठी काय करावे? >>> हवाबंद डब्यात ठेवल्या की राहतात मऊ अन तश्याच

अळूची भाजी (वावे नी सुचवल्याप्रमाणे वडीच्या पानांची) आणि कोथिंबीर वडीप्रमाणे वड्या केल्या शेवटी.

फोटो अपलोड होत नाहीये.

फराळी पॅटिस करताना arrowroot flour ऐवजी कॉर्नफ्लोअर वापरले तर चालेल का?? कोणाला माहीत असेल तर प्लीज सांगा

मका उपासाला चालत असेल तर वापरा. नाहीतर थोडी उपासाची भाजणी, साबुदाणा पीठ वापरा. फराळी उपासाला करणार असाल तर मका चालत नाही बहुतेक, एरवी असंच करणार असाल तर चालेल.

अहो नेहमीचे साबुदाणे वडे नाही बनवायचे. नेट वर फराळी पॅटिस ची रेसिपी बघितली तर त्यात बटाटा आणि आरारूट फ्लोअर सांगितले आहे. पण आता ते नाही आहे घरात म्हणून विचारले कॉर्नफ्लोअर वापरू शकतो का त्या ऐवजी?

मका उपासाला चालत असेल तर वापरा. नाहीतर थोडी उपासाची भाजणी, साबुदाणा पीठ वापरा. फराळी उपासाला करणार असाल तर मका चालत नाही बहुतेक, एरवी असंच करणार असाल तर चालेल.

नवीन Submitted by अन्जू on 11 December, 2019 - 10:53
>>≥>>>
धन्यवाद.. नाही उपवासासाठी नको आहे असेच करायचे आहेत

काल डझनभर लिंबाचा instant लोणचं केला. Youtube वर पाहून, गूळ, लाल तिखट, लवंग, वेलची सगळं घालून कुकर ला 12 शिट्ट्या काढायला सांगितलं होता. लोणचं कुकर मध्ये सांडला थोडा, पाक सांडला आणि लिंबाच्या फोडीही चिवट झाल्यात... कुकर मध्ये सांडलेले टाकून दिला परंतु चिवट फोडींचे काय करावे.. Sad

शितल , १२ शिट्ट्या ? फार झाल्या गं. साखरेत खुप वेळ शिजल गेल लोणच आणि त्यामुळ आता ते चिवट झाल आहे. मला नाही वाटत फार काही करता येईल. मी एकदा केलाय हा पराक्रम.
कमी असेल तर वाटल्यास मिक्सर मध्ये काढून जाम सारखी कंसिस्टंसी (आपण लिंबाचे मिक्समधले साखर घालून न शिजविता लोणच करतो तस. योकुने लिहिली आहे कृती) करून संपवून टाक.
आई अतिशय सुरेख लोणच करते गोड लिंबाच लोणच. पण इन्स्टंट नाही. आठ दिवस हळद मीठ लावून ठेवते फोडीना. आणि मग त्या पाकात शिजविते. इतक्या मऊ आणि तरीही एकसंध रहातात साली. फार सुरेख असत तीच लोणच.
मला न जमलेला पदार्थ आहे सो मी करायच्या भान्गडीत पडत नाही. पण यावेळी केप्रचा मसाला वापरून तिखट लोणच घातल. (कारण घरी जायला जमले नाही सुट्टी नसल्याने. आईच बनवून देते नेहमी.) जमलय ते.

१२ शिट्ट्यांत साखर/ गूळ पाकाच्या पुढल्या स्टेप पर्यंत शिजवल्या गेलीय. माझा तरी पास या करता Uhoh

जरा अवांतर :: एक अनुभव

काल पावभाजी केली होती. इथल्या धमाल कात्री पाव चर्चेची आठवण असल्याने कात्रीने पाव कापून बघायची हिम्मत केली. आश्चर्य म्हणजे पहिल्या प्रयत्नातच पाव व्यवस्थित कापला गेला. पुढचं सगळं काम पटकन झालं मग. खरंच चांगली युक्ती आहे ही.

मला उन्हात मीठ घालून करायच्या लोणच्याची जेन्यूईन कृती हवीय.

1. लिंबू शिजवलेली कृती नकोय
2. लोणच्यात साखर नकोय.खारट, झणझणीत, दणदणीत लिंबू लोणचे हवेय, बिन तेलाचे.बिन गोडाचे.ज्यात लिंबू /फोडी जुन्या झाल्यावर काळ्या दिसतात आणि त्यावर पांढरे वाळलेले क्रिस्टल मीठ असते ते लोणचे हवेय.
3. अश्या लोणच्याला फोडी करणे चांगले की अख्खे लिंबू यावर सल्ला हवाय
4. अश्या वाल्या यानंतर काळ्या होणाऱ्या लोणच्यात लाल केप्र मसाला घालतात की नाही घालत ते हवेय.
5. आतापर्यंत एकदाच नॉर्मल तेल आणि लाल मसाला घालून केले होते लोणचे, ते कडू लागत होते.त्याला आई/काकू/मावशी/आजी/साबा स्टाईल झिंग आणि चव आली नाही.

गुगल सर्च केले पण त्यात खूप व्हिडीओ होते, बघायला कंटाळा आला.

इन्स्टंट यीस्ट कसे वापरायचे सांगाल का कोणी? दोन तीनदा वापरायचा प्रयत्न केला पण फुकट गेले पीठ Sad आता बनवायचा धीर होत नाहीये

उन्हात मीठ घालून करायच्या लोणच्याची जेन्यूईन कृती >>>> अय्या, उन्हात मीठ घालायचं? ते कसं? नवीनच पदार्थ ऐकला Wink Lol

अनु, पदार्थाची कृती माहीत नसली की असे पांचट जोक सुचतात. Happy

@mi_anu, मी एके ठिकाणी वाचलेली कृती देत आहे.
साहित्य:
लिंबे १०-१२
ओवा ४ टेबल स्पून
मीठ ५-६ टेबल स्पून
१. लिंबे धुवून, स्वच्छ कोरडी करून घ्यावीत.
२. काचेची बरणीदेखील (ज्यात ही आख्खी लिंबे घट्ट बसतील) स्वच्छ व कोरडी करून घ्यावी.
३. मीठ आणि ओवा एकत्र करून घेणे.
४. बरणीत सर्वप्रथम मीठ व ओव्याचा एक थर देऊन त्यावर लिंबे ठेवणे आणि हे रिपीट करणे.
५. बरणीचे झाकण घट्ट लावून किमान ३-४ महिने उन्हात ठेवणे.
६. लिंबांचा रंग काळपट होतो. अधेमधे बरणी अजिबात उघडायची नाही.

ही कृती फेसबुकवरील एका गृपमध्ये वाचली होती आणि करायचा विचार असल्याने लक्षात आहे.

Pages

Back to top