साग्रसंगीत रेस्पी. तर साहित्य -
- दोन वाट्या ज्वारीचं ताजं पीठ
- दोन मध्यम मोठे कांदे जरा जाडसर चिरून
- दोन / तीन हिरव्या मिरच्या मध्यम आकारांत तुकडे करून
- थोडा कढिलिंब
- चार - पाच लसणीच्या कळ्या चकत्या करून
- मूठभर कोथिंबीर; बारीक चिरून
- अर्ध लिंबू (माहीताय, फोटोत एक पूर्ण आहे पण त्यातलं अर्धच वापरलं नंतर)
- शेंगदाणे मूठभर
- अर्धी- पाऊण वाटी तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, साखर चवीनुसार.
- तीन - साडेतीन वाट्या गरम पाणी
लोखंडी कढई भरपूर तापू द्यावी, त्यात तेल तापत घालावं आणि मोहोरी, जिरं तडतडलं की लसूण घालून जरा लाल होउ द्यावा.
यात आता कांदा घालून जरा पाढंरटला की शेंगदाणे, मिरच्या घालाव्यात. कांदा शेंगदाणे नीट होऊ द्यावेत. नंतर कढीपत्ता घालून काही सेकंद परतावं.
यात आता पीठ घालून त्यावर हळद घालावी आणि परतायला सुरुवात करावी. पिठावर हळद घालून मग परतल्यांनी -
हळद जळत नाही
सगळ्या पिठाला नीट खालून वरपर्यंत हलवल्या जातंय की नाही हे हळदीच्या रंगापायी समजतं
मंद आचेवर पीठ चांगलं खमंग सुवास दरवळेपर्यंत भाजावं. हे जरा कष्टाचं काम आहे कारण पीठ भाजायला २० एक मिनिटं सहज लागतात.
यात आता थोडी कोथिंबीर, मीठ, साखर, लाल तिखट घालून नीट मिसळून घ्यावं आणि उकळीचं गरम पाणी थोडं थोडं घालत उकडपेंडी शिजू द्यावी.
शेवटी झाकण घालून दोन दणदणीत वाफा येऊ द्याव्यात. अगदी वाढतेवेळी वरून लिंबाचा रस घालावा, थोडी कोथिंबीर पेरावी आणि अगदी गरमगरमच खायला घ्यावी. सोबत काही कुरकुरीत असेल शेव वगैरे तर फारच उत्तम. सध्या आमचा बाळोबा खायला लागल्यानं लाल तिखटाचं प्रमाण बर्यापैकी कमी आहे.
त्याल पाहून घ्या, येवढं हवं ब्रका
तयार झालीय. या...
पोटभरीचा प्रकार आहे. प्रवासाला जातांना वगैरे किंवा काही बाहेरची काम उशिरापरंत करायची असतील किंवा जेवायला वेळ होणार असेल तर करायला मस्त प्रकार आहे. सोबत ताक वगैरे असेल तर ब्रंच; ब्रेफा फॉर डिनर ला उत्तम
चिंचेचा कोळ असेल तर त्याच पातळ पाणी करून त्यात शिजवावी जास्त चांगली चव येते. अर्थांत नंतर लिंबू नाही वापरायचं .
एकतर कढई सणसणीत तापली नाही
एकतर कढई सणसणीत तापली नाही आणि फोटो सुद्धा टाकलेत,
अडमीन plz इकडे लक्ष द्या,योकुंचा id 100 percnt हॅक झालाय बघा
मस्तच रेसिपी
छान
छान
मारकं द्या गप
मारकं द्या गप
मस्त!
मस्त रेसिपी आणी फोटो, आम्ही कणकेची करतो आता ज्वारिच्या पिठाची करुन बघेन.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
छान रेसिपी. माझ्या साबा
छान रेसिपी. माझ्या साबा गव्हाच्या पिठाची करतात ती पण टेस्टी होते, आता अशी करून बघेन. तुमचा बाळोबा ही खातो म्हटल्यावर आमच्या बाळालाही देऊन बघते
कसली सही दिसतेय उकडपेंडी.
कसली सही दिसतेय उकडपेंडी. भारी रेसिपी, लिहिलंय पण छान नेहेमीप्रमाणे.
फोटो भारी सर्वच.
फोटोमुळे प्रतिक्रिया द्याविशी
फोटोमुळे प्रतिक्रिया द्याविशी वाटतेय
रेसिपी नेहमीप्रमाणेच डिटेलवार. कदाचीत करून पाहिन. इथे काही ताजं पीठ मिळायचं नाही. पण प्रयत्न करायला हरकत नाही.
फोटोचं मनावर घ्याच (इतर रेर्सिपींसाठी)
मस्त आहे
मस्त आहे
मस्त आहे . सादरीकरण, लिखाण ,
मस्त आहे . सादरीकरण, लिखाण , फोटू १०/१०
छान!
छान!
अगणित वर्षांत उकडपेंडी खाल्लेली नाही.
मस्त. कालच केली होती. फक्त
मस्त. कालच केली होती. फक्त ज्वारीच्या पीठाऐवजी हुरडा वापरून.
यम्मी..
वावा..छान.
वावा..छान.
उकडपेंडी हा प्रकार कधीच चाखला
उकडपेंडी हा प्रकार कधीच चाखला नाही. पण ही पाकृ भारीच दिसतेय. करुन पाहीन असं फक्त म्हणत नाही, तर खरच करुन पाहीन. नक्कीच भारी लागेल.
उकडपेंडी घाटाव करत नाहीत का?
उकडपेंडी घाटाव करत नाहीत का? की आमच्याच जुन्नर भागात होत नाही फक्त?
एक शंका: उप्पीट रवाळ असते. हे पिठाचे केल्याने पिठूळ लागत नाही का?
मस्त! तोंपासु फोटो आहेत
मस्त! तोंपासु फोटो आहेत
झकास.
झकास.
. हे पिठाचे केल्याने पिठूळ लागत नाही का? >>
नाही लागत, नीट शिजली की मस्त लागते.
वा मस्त ! पाकृ. करणेत येइल!
वा मस्त ! पाकृ. करणेत येईल!
मला उकड म्हटले की तांदळाचीच आठवते ! फारफार तर भाजणीची पण भाजणीच्या पीठाने अॅसिडीटी होते लगेच म्हणून करत नाही. आता ही करुन पहाते.
मस्त रेसिपी योकु.
मस्त रेसिपी योकु.
तुझी लोखंडी कढई बघून जीव भरून आला.
मस्त! फोटो व फोटोत लोखंडी कढई
मस्त! फोटो व फोटोत लोखंडी कढई बघून जीव सुखावला. मी पण करते अशीच फक्त आयदर कांदा आॅर लसूण! लिंबाच्या ऐवजी दह्याची पण चांगली लागते.
अवांतर: माझ्या शेजारच्या काकूंनी ग्वाल्हेरहून लोखंडी ठोक्याची जाडजूड भक्कम कढई आणलीये.... फारच प्रेमात पडलेय त्या कढईच्या... काल स्वप्नातही तीच कढई दिसली .... ती मिळेपर्यंत काही चैन पडणार नाही.
मंजू ☺
मंजू ☺
मस्त रेसपी.... ताक घालून पण
मस्त रेसपी.... ताक घालून पण ही करतात का
मस्त रेसिपी आणि फोटो
मस्त रेसिपी आणि फोटो दिलेत ते बेस्ट. आमच्या इथे मिळणारे "दोन मध्यम मोठे कांदे जरा जाडसर चिरून" घेतले तर ताटात असलेल्या सर्व साहित्यापेक्षा थोडे जास्तच भरले असते
कसली सही दिसतेय उकडपेंडी.
कसली सही दिसतेय उकडपेंडी. भारी रेसिपी, लिहिलंय पण छान नेहेमीप्रमाणे.>>+१
फोटो एकदम तो. पा. सु..
फोटो एकदम तो. पा. सु..
मस्त रेसिपी.
मीही थोड्याफार फरकाने करत असते उकडपेंडी.
उकडपेंडी खाऊन साधारण २२ वर्ष
उकडपेंडी खाऊन साधारण २२ वर्ष झालीत !
रेसेपी बघूनच चव आली तोंडाला
कणकेची उकडपेन्डी
कणकेची उकडपेन्डी
प्राजक्ता मस्तच एकदम.
प्राजक्ता मस्तच एकदम.
फोटो भारी, बघूनच पाकृ करायची
फोटो भारी, बघूनच पाकृ करायची इच्छा होते.
कढई काळी का पडली असावी? याआधीच्या एका चर्चेत योकूच्या गोऱ्यापान कढईने मानाचे स्थान पटकावले होते असे आठवतेय...नजर लागली की काय...
डुप्लिकेट लोखंडी कढई काळी पडत
डुप्लिकेट लोखंडी कढई काळी पडत नाही असे ऐकून आहे.
(डुप्लिकेट = नकली)
Pages