साग्रसंगीत रेस्पी. तर साहित्य -
- दोन वाट्या ज्वारीचं ताजं पीठ
- दोन मध्यम मोठे कांदे जरा जाडसर चिरून
- दोन / तीन हिरव्या मिरच्या मध्यम आकारांत तुकडे करून
- थोडा कढिलिंब
- चार - पाच लसणीच्या कळ्या चकत्या करून
- मूठभर कोथिंबीर; बारीक चिरून
- अर्ध लिंबू (माहीताय, फोटोत एक पूर्ण आहे पण त्यातलं अर्धच वापरलं नंतर)
- शेंगदाणे मूठभर
- अर्धी- पाऊण वाटी तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहोरी, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, मीठ, साखर चवीनुसार.
- तीन - साडेतीन वाट्या गरम पाणी
लोखंडी कढई भरपूर तापू द्यावी, त्यात तेल तापत घालावं आणि मोहोरी, जिरं तडतडलं की लसूण घालून जरा लाल होउ द्यावा.
यात आता कांदा घालून जरा पाढंरटला की शेंगदाणे, मिरच्या घालाव्यात. कांदा शेंगदाणे नीट होऊ द्यावेत. नंतर कढीपत्ता घालून काही सेकंद परतावं.
यात आता पीठ घालून त्यावर हळद घालावी आणि परतायला सुरुवात करावी. पिठावर हळद घालून मग परतल्यांनी -
हळद जळत नाही
सगळ्या पिठाला नीट खालून वरपर्यंत हलवल्या जातंय की नाही हे हळदीच्या रंगापायी समजतं
मंद आचेवर पीठ चांगलं खमंग सुवास दरवळेपर्यंत भाजावं. हे जरा कष्टाचं काम आहे कारण पीठ भाजायला २० एक मिनिटं सहज लागतात.
यात आता थोडी कोथिंबीर, मीठ, साखर, लाल तिखट घालून नीट मिसळून घ्यावं आणि उकळीचं गरम पाणी थोडं थोडं घालत उकडपेंडी शिजू द्यावी.
शेवटी झाकण घालून दोन दणदणीत वाफा येऊ द्याव्यात. अगदी वाढतेवेळी वरून लिंबाचा रस घालावा, थोडी कोथिंबीर पेरावी आणि अगदी गरमगरमच खायला घ्यावी. सोबत काही कुरकुरीत असेल शेव वगैरे तर फारच उत्तम. सध्या आमचा बाळोबा खायला लागल्यानं लाल तिखटाचं प्रमाण बर्यापैकी कमी आहे.
त्याल पाहून घ्या, येवढं हवं ब्रका
तयार झालीय. या...
पोटभरीचा प्रकार आहे. प्रवासाला जातांना वगैरे किंवा काही बाहेरची काम उशिरापरंत करायची असतील किंवा जेवायला वेळ होणार असेल तर करायला मस्त प्रकार आहे. सोबत ताक वगैरे असेल तर ब्रंच; ब्रेफा फॉर डिनर ला उत्तम
चिंचेचा कोळ असेल तर त्याच पातळ पाणी करून त्यात शिजवावी जास्त चांगली चव येते. अर्थांत नंतर लिंबू नाही वापरायचं .
नवरा ग्लुटेन फ्री फॅडात आहे,
नवरा ग्लुटेन फ्री फॅडात आहे, त्यामुळे सध्या घरी ज्वारीचं पीठ असतं. हे उकडपेंडी प्रकरण उद्या सकाळी ब्रेफाला करण्यात येईल.
1. यावेळेस फोटो दाखवले हे बेस्ट.
2. तुमच्या सगळ्या रेसिपीजमध्ये तेल जरा जास्तच वापरता का?
कणिक व ज्वारीपीठाची उकडपेंडी
कणिक व ज्वारीपीठाची उकडपेंडी भरपूर तेलाशिवाय चांगली होत नाही, भरपूर तेल , त्यात ते सर्व मटेरियल खमंग भाजणे, त्याच्या बारीक बारीक खमंग गुठळ्या होणे, मग नेमक्या वेळी बेताचे पाणी ओतून त्याच्या वाफेवर ते उकडले जाणे , असे स्किल लागते
तेल कमी पडले , कमी भाजले , पाणी जास्त पडले तर त्याचे उप्पीट होते.
फक्त तांदळाच्या उकडीला जास्त तेल लागत नाही
हम्!
हम्!
बिना तेलाचाही मसालेदार / झणझणीत स्वयंपाक करता येतो बरं का.
फक्त तांदळाच्या उकडीला जास्त
फक्त तांदळाच्या उकडीला जास्त तेल लागत नाही >>> जास्त तेल हवंच, त्याशिवाय मजा नाही येत. वरुन पण कच्चं तेल हवंच काहीजण तूप घेतात पण मला तेल आवडतं.
तोंपासु.
तोंपासु.
पण जरा महागडी रेसिपी आहे. दोन आख्खे कांदे ?
पोहे, सांजा आणि उपीट खाऊन
पोहे, सांजा आणि उपीट खाऊन कंटाळा आलेला म्हणुन जरा भीत भीतच केली उकडपेंडी.. मस्त जमली.. रेसिपीसाठी थँक्स..

Pages