Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59
मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.
आता इथल्या दुसर्या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.
जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html
तर ती चर्चा इथे चालू ठेवू.
इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सहज आठवलं म्हणून
सहज आठवलं म्हणून
"नरेंद्रबासां भेटी अनुसरण"
असे नववी ते बारावीच्या पुस्तकात प्रत्येक वर्षी एक धडा होता. खासकरुन धडा क्र. एक.
आठवतायंत का नीटसे कोणाला?
लीळाचरित्र चक्रधर स्वामी
लीळाचरित्र चक्रधर स्वामी बहुतेक
असे नववी ते बारावीच्या
असे नववी ते बारावीच्या पुस्तकात प्रत्येक वर्षी एक धडा होता. खासकरुन धडा क्र. एक.
आठवतायंत का नीटसे कोणाला?>>
मला हा धडा होता, दहावीत. 'आधारीचेयां परिसाचा दृष्टांत'. लोकसत्ताच्या 'Loksatta Yashasvi Bhava' ह्या युट्युबवर भरपूर जुन्या धड्यांची उजळणी आहे.
असे नववी ते बारावीच्या
असे नववी ते बारावीच्या पुस्तकात प्रत्येक वर्षी एक धडा होता. खासकरुन धडा क्र. एक.
आठवतायंत का नीटसे कोणाला? "नरेंद्रबासां भेटी अनुसरण" >>>>>>> हो, हे आठवतय. एक स्त्री अस्पृश्य माणसाशी नीट वागत नाही म्हणून लेखक तिला उपदेश करतो असा अन्धुकसा तपशील आठवतो.
प्रतिसाद देताना एक गोष्ट
प्रतिसाद देताना एक गोष्ट आवर्जून करा ती म्हणजे स्वतःचे दहावीचे वर्ष संदर्भ म्हणून द्या. म्हणजे कोण कुठल्या सिलॅबसला होता ते पक्कं कळेल आणि धडा शोधणाऱ्याला ते सोप्पं जाईल. धडा कोणत्याही इयत्तेतील असला तरी चालेल.
मी १९८३ साली दहावीला होतो,
मी १९७३ साली दहावीला होतो, तेव्हाचा एकही धडा, कविता मला आता आठवत नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
१९७३ साली १० वीला कुठला सिलॅबस असेल सांगू शकाल का? बाकी कुणाला १९६८-१९७३ (माझी ५वी ते १०वी) मधले काही धडे कविता आठवत असल्यास कृपया लिंक द्या.
धन्यवाद.
हाब, तुम्ही ७३ साली दहावीला
हाब, तुम्ही ७३ साली दहावीला होतात? तेव्हा दहावी एस एस सी होती की अकरावी? एवढ्या मागचं आठवणं कठीणच असणार.
मी ताईची पुस्तकं वाचायचो.
मी ताईची पुस्तकं वाचायचो. चितळे मास्तर त्यात होतं हे लक्षात आहे.
तेव्हा दहावी एस एस सी होती की
तेव्हा दहावी एस एस सी होती की अकरावी? एवढ्या मागचं आठवणं कठीणच असणार. >>बहुधा एस एस सीच असावे. अकरावी केल्याची आठवते आहे पण सर्टफिकिट दहावी नंतर मिळाले की अकरावी नंतर ते नीटसं आठवत नाही. सातवीत की कदाचित नववीत अशी एक वर्षे आपटी खाल्ली होती ते मात्र पक्क आठवतं आहे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
खरं सांगू का, आम्ही फक्त मोठे कल्ले ठेऊन, छान भांग पाडून आणि बेल बॉटम किंवा एलिफंटा विजारी घालून शाळा-कॉलेजात जायचो.. बस्स!. आमच्या पप्पांनाच आम्ही कितवीत आहोत ते माहित नसे तर आम्हाला काय माहित असणार.
बहुतेक सहावीत असताना, एक धडा
बहुतेक सहावीत असताना, एक धडा होता मराठीचा
लेखक लहान असताना त्यांच्या घरी तार येते. घरी सर्व अशिक्षित असल्याने, गावातल्या पाटील की अशाच कोणी सुशिक्षित माणसाकडे तार वाचून घेण्यासाठी त्याचे वडील जातात. तर, निरोप वाचण्यापूर्वी त्यांच्याकडून लाकडे फोडून घेतात. शेवटी कळते की त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची तार असते ती.
तराळ- अंतराळ मधला भाग होता बहुतेक.
लेखक लहान असताना त्यांच्या
लेखक लहान असताना त्यांच्या घरी तार येते. घरी सर्व अशिक्षित असल्याने, गावातल्या पाटील की अशाच कोणी सुशिक्षित माणसाकडे तार वाचून घेण्यासाठी त्याचे वडील जातात. तर, निरोप वाचण्यापूर्वी त्यांच्याकडून लाकडे फोडून घेतात. शेवटी कळते की त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची तार असते ती.>>>>>>
,हो मलाही आठवतोय असा धडा होता. त्यात " रामा,जरा सरपण फोडून दे की " असं काहीसं वाक्य होतं. शेवट वाचून गलबलून यायचं. नाव आठवत नाही पण
. बालभारती पुस्तकांवर प्रचंड प्रेम होतं तेव्हा. अभ्यास म्हणून कधी वाटलेच नाही ते खरे सोबती म्हणूनच भासले.
अडाणी
अडाणी
आठवी ते दहावीची मराठी पुस्तके
आठवी ते दहावीची मराठी पुस्तके ऑनलाईन आहेत का बालभारतीप्रमाणे ?
दूर दूर माझे घर
दूर दूर माझे घर
दूर दूर माझे घर जोगाईच्या पलीकडे,
पाठ राखती तयाची डोंगराचे उंच कडे !
दूर दूर माझे घर गर्द राईच्या पल्याड,
घुमतसे कानी माझ्या राघू, कोकिळेची साद !
दूर दूर माझे घर वाट आडवळणाची,
मधे जमलीसे गर्दी किती ओहळ-नाल्यांची.
दूर दूर माझे घर आजोबाने बांधलेले,
जरी जुनाट पडके गणगोत सांभाळले,
दूर दूर माझे घर शेत इवले शेजारी,
पिकवितो बाप माझा तिथे जोंधळा बाजरी.
दूर दूर माझे घर घरी निजविते आई,
मज दळण दळता गात गोडशी अंगाई.
दूर दूर माझे घर घरी बहीण सानुली,
बोलाविते खेळायला तिजसंगे भातुकली.
दूर दूर माझे घर घरी शेळी, गाय, बैल,
कधी रुसते, पेटते तीन दगडांची चूल.
दूर दूर माझे घर तिथे कधी सणावारी,
उडे धमाल गाण्याची नाचण्याची रातभरी !
दूर दूर माझे घर उभे चांदीच्या रसात,
राखणीस रातकिडे किरकिरती जोसात !
— अज्ञात
>> ही कविता माझी खूप आवडती होती.
अन्नपुर्णा, पुर्ण धडा कुठे
अन्नपुर्णा, पुर्ण धडा कुठे वाचायला मिळेल?
Balbharati Marathi navach
Balbharati Marathi navach application ahe play store madhe...(sorry English typing sathi)
ओके. पण कितवीचं पुस्तक?
ओके. पण कितवीचं पुस्तक? कुठल्या बॅचचं?
तुम्हाला देता येइल का इथेच
तुम्हाला देता येइल का इथेच धडा?
वाचावासा वाटला मला. एका ध्ड्यासाठी अॅप डाउन्लोड नाही करत आता.
उद्या दिला तर चालेल का?
उद्या दिला तर चालेल का?
चालेल की.
चालेल की.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी थोडा वाचला बूकगंगावर. पण नेमकी शेवटची पानं नाहीयेत
(No subject)
अडाणी1
अडाणी2
अडाणी2
अडाणी3
अडाणी3
अडाणी4 अडाणी5 अडाणी6
अडाणी4
अडाणी5
अडाणी6
धन्यवाद अन्नपूर्णा
धन्यवाद अन्नपूर्णा
अनिल अवचट यांचा आतले बाहेरचे
अनिल अवचट यांचा आतले बाहेरचे हा लघुनिबंध होता...रोज आठवतो तो धडा
अनिल अवचट की अनंत काणेकर?
अनिल अवचट की अनंत काणेकर?
आतले आणि बाहेरचे हा धडा
आतले आणि बाहेरचे हा धडा बहुतेक वि.द. घाटे यांचा होता. रेल्वे डब्यात जागा मिळवण्यावरून सुरुवात होती धड्याची.
धन्यवाद अन्नपूर्णा, वाचून
धन्यवाद अन्नपूर्णा, वाचून अगदी गलबलून आलं .
धन्यवाद अन्नपूर्णा.
धन्यवाद अन्नपूर्णा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाचते आता.
Pages