Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कुजका कान्दा>>>>>
कुजका कान्दा>>>>>
छान , बरीच पुढे गेलीय मग. आता
छान , बरीच पुढे गेलीय मग. आता कोकणात प्रपोझ होइल एकदाचे.
आणि बबड्या कुठले कॉण्ट्रेक्ट करतोय? राजे काय पैसे देत आहेत का?
प्रपोज आधीच झालंय. आता इजहार
प्रपोज आधीच झालंय. आता इजहार ए मोहब्बत होऊ शकतो.
डबड्या =शनाया. ती जशी अचानक स्वबळावर राधिका मसाले ची पार्टनर होते तसाच डबड्या स्वतःच्या अकलेने अभिज् मध्ये पार्टनर झाल्यावानी वागतोय.
डबड्याने राजेंचे "अभिज किचन'
डबड्याने राजेंचे "अभिज किचन' हायजॅक केले वाटते. प्रीकॅप मध्ये तो त्या चष्मे फुटलेल्या आजोबांकडून स्वतःचे शूज पुसून घेतो (काहीतरी सांडलवंड होते वाटते त्या आजोबांकडून) किती डोक्यात जातो तो आपल्या आईच्या चांगुलपणाचा पुरेपूर फायदा उचलतो.
गावातला छोटा मुलगा आसावरी `
गावातला छोटा मुलगा आसावरी ` वहिनी` आणि अभिजित `भाऊ' म्हणतो!!
असं होउ शकतं गावी.
असं होउ शकतं गावी.
दुरच्या नंदेच्या तीन मुलींपैकी धाकट्या दोघी माझ्या नवर्यला दादा म्हणतात आणि मला मामी.
मोठी दादा वहिनी म्हणते. खरंतर मामा मामी बरोबर.
असं होउ शकतं गावी. Happy >
असं होउ शकतं गावी. Happy > बरोबर. पण नातं माहित असताना ठीक. अभिजित राजे प्रथमच येतात ना गावात. ते काही त्या मुलाच्या ओळखीचे नाहीयेत.
ते टीव्हीवर दिसणारे स्टार शेफ
ते टीव्हीवर दिसणारे स्टार शेफ आहेत ना, ओळखत असतील.
तरीही मागेपण कोणीतरी लिहीलं आहे की रा खे चा चा काळ वेगळा आहे आणि सासुबाईचा वेगळा, तर कसा काय ताळमेळ साधणार आहेत.
पहिला नवरा प्रकट होईल मालिकेत
बर्याच दिवसांनी प्रतिसाद लिहितेय..
पहिला नवरा प्रकट होईल मालिकेत, किंवा त्याने छळ केला असेल>>>>अन्जू तुम्हीच दिलेल्या प्रतिसादात तुमचे उत्तर दडलंय बहुदा...
पहिल्या नवऱ्याला भूत - आत्मा असं काहीतरी दाखवतील
-:G: :
आणि मला त्यांचा बजेट प्रॉब्लेम असेल असेही वाटते...
एका location रेंट मध्ये दोन सिरियल.
... "अग्गबाई सासूबाई, थांबा थोडसं.. माझे माजी सासरे बुवा आलेत... इतक्यात माझ्या भावी सासर्यांना हो नका म्हणू"
... "अगबाई हो का? असंच करते.. बाबांना किती वाईट वाटेल ना... आणि डबड्याला पण त्याच्या खऱ्या बाबांना भेटायचे आहे.. बर झाल ग शुभ्रा तू मला वेळेत कळवलस
ते.. माझा तर बाई गोंधळच उडालेला.. मी ठेवते हं फोन.... यांनी स्वर्गातून काय काय आणलय ते सगळं आवरायला घेते आता.."
कारवी चे प्रतिसाद मिस करतेय
कारवी चे प्रतिसाद मिस करतेय
सुषमाताई
सुषमाताई
तरीही मागेपण कोणीतरी लिहीलं आहे की रा खे चा चा काळ वेगळा आहे आणि सासुबाईचा वेगळा, तर कसा काय ताळमेळ साधणार आहेत. >>>>>>> ते मीच लिहिल होत, अन्जू.
असं होउ शकतं गावी. Happy
दुरच्या नंदेच्या तीन मुलींपैकी धाकट्या दोघी माझ्या नवर्यला दादा म्हणतात आणि मला मामी. Lol
मोठी दादा वहिनी म्हणते. Happy खरंतर मामा मामी बरोबर. >>>>>>>> सस्मित, तुम्ही ' तो' नसून' ' ती' आहेत हे मला आज कळल.
डबड्या =शनाया. ती जशी अचानक स्वबळावर राधिका मसाले ची पार्टनर होते तसाच डबड्या स्वतःच्या अकलेने अभिज् मध्ये पार्टनर झाल्यावानी वागतोय. >>>>>>> नैतर काय. मॅडीने तोण्ड उघडल ते बर केल. तरी बर, ती प्रज्ञा दिसत नाहीये बरेच दिवस.
प्रीकॅप मध्ये तो त्या चष्मे फुटलेल्या आजोबांकडून स्वतःचे शूज पुसून घेतो >>>>>> ते कारखानीस काका आहेत.
आणि बबड्या कुठले कॉण्ट्रेक्ट करतोय? राजे काय पैसे देत आहेत का? >>>>> ते त्या डबडयालाच माहित. राजेन्नी त्याला पैसे दिले सुद्दा. पाच लाख.
काल आसा आशा काळेसारखी घराबाहेर उदास बसली होती. काका- काकू तिच्यावर घर टाकून गेले भटकायला. तिला एवढया लाम्बून राजेन्चा आवाज ऐकू येतो, अर्थात टिव्हीमधून.
आकेरी छान शूट केलय. काल राजे हॅण्डसम दिसले.
आश्रमहरिणी गावातही राजेंबरोबर
आश्रमहरिणी गावातही राजेंबरोबर फट्फटीवर बसुन फिरतात का?
हो ना...गावात तर लगेच चर्चा
हो ना...गावात तर लगेच चर्चा होते.
काहीही दाखवितात. त्या मदन का फदन भाऊजींनाही नाही का कळत की हे राजे असे अचानक कसे काय आलेत आसावरीवहीनीं च्या मागे!
त्या आजी बाईंना पण काहीच संशय नाही
आपल्या कडे तर कुणीही त वरुन ताकभात ओळखायला तरबेज आहेत.
आश्रमहरिणी>>>:हहगलो:
आश्रमहरिणी>>>:हहगलो:
आसावरी &राजे Now a days in Akeri!
काल एक सीन पाहिला . डबड्या
काल एक सीन पाहिला . डबड्या राजेंना दारातुन ढकल्तो. राजे प्रेम प्रकरणाची कबुली देतात. आजोबा दारात रांगोळीची रेष मारुन निवेदिताला ही ओलांडायची नाहीत असे सांगतात.
हो काय तो फिल्मीपणा ईतके
हो काय तो फिल्मीपणा ईतके दिवस काय झोपले होते का सगळे. सात-आठ कोटींची उलाढाल, काहीही हं झी, इतक्या बावळट स्टाफला घेऊन तेपण. मदनचा मुलगा वेगळा राहतो का. आजी किती कृत्रिम संवाद बोलत होत्या. ती बाईक गिओची स्वतः ची बाईक आहे असे वाटते, त्यांच्यावरच्या तूनळी वरच्या एका व्हिडीओमध्ये आहे ती बाईक.
चिमणीची गोष्ट सान्गून आसा
चिमणीची गोष्ट सान्गून आसा राजेला घाबरवते, त्या सीन मध्ये एक व्यक्ती अन्गावर घोन्गडी घेऊन वावरते. राजे त्या व्यक्तीला बघून घाबरतात. वाटल, अण्णा नाईक किव्वा शेवन्ता आली की काय घाबरवायला. नन्तर कळल, ती आजी होती. तिला रात्री घराबाहेर फिरण्याची सवय आहे.
मस्त स्मायली क्ली ओ पा त्रा .
मस्त स्मायली क्ली ओ पा त्रा ... .
मी तर हीपण सिरेल सोडून दिली बघायची...फुकट डोक्याला ताप... लग्नाला पिकलेले राजे, मिळमिळीत नाटकी असवरी.. दबड्या ला तर एक लगावून द्यावीशी वाटते... शुभ्र डोक्यावर पडली असेल लग्न करताना...
धन्सं वेडोबा
धन्सं वेडोबा
मी तर हीपण सिरेल सोडून दिली बघायची>> मीही पिसं काढण्यासाठीच बघते!
लग्नाला पिकलेले राजे>>अगदी! अतिच दाखवतात कधीकधी... डबड्या ने थोडं शिकावं राजेकडून फ्लर्ट करायला... नवीन लग्न झालेय तरी या दोघांचं आपलं दुसऱ्याच गोष्टींंमध्ये लक्ष!
आसावरी अबोला वैगेरे धरून अबोलीची फुलं मागते वगैरे..कै च्या कै!
आता मुंबईला गेल्यावर आजोबा यांंची बिनपाण्याने हजामत करणार!!
त्या आजींचे कृत्रिम संवाद,
त्या आजींचे कृत्रिम संवाद, भावनाविरहीत चेहेरा नाही बघवत.
डब्ड्या अगदी काहीतरीच वागतोय. नुसता हॉटेलात जाऊन अरेरावी करायची त्याला कशाला प्रेझेंटेशन लागतंय.
नक्की प्रेझेंटेशन कसलं दिलं.
नक्की प्रेझेंटेशन कसलं दिलं. ज्याचं दिलं तिथे का नाही लक्ष घालत. पेपर कसले दिले सही करायला, तो भाग नाही बघितला मी. राजेंचा स्टाफ एवढा बावळट कसा, कोणीही येऊन दादागिरी करू शकतं.
हाहा हीपण स्मायली छान....
हाहा हीपण स्मायली छान.... डबड्या राजेंच्या प्रॉपर्टी साठी लग्न लावून देईल दोघांचं....अरे पण आसावरी च्या आधीच्या नवऱ्या बद्दल कोणी काहीच कसं बोलत नाही....तिला पण काही वाटत नाही का...जनरली या वयाच्या बायका स्वतः हुन लग्नासाठी होकार देतील असे वाटत नाही....समाजाची भीती असतेच ..
आसावरी तरी नक्कीच पुढाकार
आसावरी तरी नक्कीच पुढाकार घेणार नाही. पण लक्ष्मणरेषेच्या आत राहून ती इतकी रडेल, इतकी रडेल कि शेवटी आजोबाच म्हणतील 'जा जीले आपनी जिंदगी'.
ईतकी रडेल ईतकी रडेल खरं आहे.
ईतकी रडेल ईतकी रडेल खरं आहे. तोंड उतरवून बसेल, पाण्याच्या ऐवजी चहा देईल, मिठाच्या ऐवजी साखर टाकेल, आजोबा कंटाळून हो म्हणतील. मला वाटतं राजे घरजावई होणार. शुभ्रा आणि सोहम वेगळे होतील. आजोबा हाकलून देतील सोहमला.
हाकलण्याच्याच लायकीचा आहे
हाकलण्याच्याच लायकीचा आहे डबड्या.
तोंड उतरवून बसेल, पाण्याच्या
तोंड उतरवून बसेल, पाण्याच्या ऐवजी चहा देईल, मिठाच्या ऐवजी साखर टाकेल>>तसे केले तरी बाकीचे तिचा विचार करतील पण तिला असेही जमणार नाही.
आजोबा आणि डबड्या तिच्या जिवावर इतका आराम करतात पण एकदाही असा विचार करत नाही कि हि आपल्याला सोडून गेली तर आपल्याकडे कोण बघणार?
राजेंचा कालचा अभिनय छान......
राजेंचा कालचा अभिनय छान........शुभ्राचाही!
मुद्दाम नाही करणार आसावरी आणि
मुद्दाम नाही करणार आसावरी पण राजेंच्या आठवणीपायी करेल. आधीही अशा चुका झाल्या आहेत तिच्याकडून.
गिओ अभिनय बेस्टे
गिओ अभिनय बेस्टे
मला वाटतं राजे घरजावई होणार.
मला वाटतं राजे घरजावई होणार. शुभ्रा आणि सोहम वेगळे होतील. आजोबा हाकलून देतील सोहमला. >>>>>> अगदी अगदी. मला अस वाटतय की सोहम दुसर्या मुलीच्या नादी लागेल. राजे आणि आसा शुभ्राच दुसर लग्न लावून देतील. उपकाराची परतफेड म्हणून. सिरियल आहे, काहीही दाखवू शकतात.
राजेंचा कालचा अभिनय छान........शुभ्राचाही! >>>>>>>> +++++++++१११११११११
हाकलण्याच्याच लायकीचा आहे डबड्या. >>>>>>>>>> सहमत
आसावरी अबोला वैगेरे धरून अबोलीची फुलं मागते >>>>>> मला तो सिन आवडला.
Pages