दोन आठवड्यांपूर्वी एका ट्रिपला जाऊन आलो. ५-६ दिवसांची ट्रिप होती. खरंतर मी आणि नवऱ्याने ठरवूनच कधी नव्हे ते आधी बुकिंग करुन वगैरे सर्व नीट केलं होतं, तेही दोनेक महिने आधी. ट्रीपला जायचे दिवस जवळ आले तसे उत्साहाने खरेदीही केली. ती जागाच तशी होती, कॅंकून, मेक्सिको. इथल्या थंडीतून मस्त गरम वातावरणात ५-६ दिवस मिळणार होते. स्विमिंग पूल, तिथलं जेवण, ऊन आणि बाकीही पोरांच्या साठी ऍक्टिव्हिटीज प्लॅन केल्या होत्या. आणि इतकं सगळं असूनही मला मनात एकच भीती होती. दोन वर्षांपूर्वी याच महिन्यात अशाच उत्साहाने डिस्नीला ट्रिपला गेलो होतो. आणि परत येताना पाठदुखीचा जो त्रास सुरु झाला तो सर्जरीवरच थांबला. आजवर कधी कुठे जाताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायची सवय नव्हती. मनात आलं की निघालं. कितीही लांबचा प्रवास, ड्राइव्ह असू दे. पण दोन वर्षांनी बाहेर पडताना मला भीती वाटत होती.
जातानाही सर्व गोळ्या, औषधं सोबत घेऊनच निघाले. तिथे पोचण्याचा प्रवास तरी नीट पार पडला होता.पहिला दिवसही वॉटर पार्क मध्ये छान गेला. पण दुसऱ्या दिवसाची मात्र मला जास्तच काळजी होती. त्यादिवशी आम्ही झिप-लायनिंग, ऍडव्हेंचर कोर्स, स्पीड बोटिंग आणि स्नॉर्कलिंग हे सर्व करणार होतो. तिथे वेळेत पोहोचून झिपलायनिंगसाठी अंगावर साहित्य चढवलं आणि मला जबरदस्त भीती वाटू लागली. पोरं उत्साही असल्याने त्यांनाच पुढं केलं. मग हिंमत करुन दोर पकडला आणि तिथल्या लोकांनी ढकलल्यावर जे सुटले दोरावरून....... फक्त एक क्षणभर काय ती भीती वाटली पण पाण्यावर उंचावरुन जाताना एकदम भारी वाटत होतं. पहिल्या झिपलाईन वरुन नीट पोचल्यावर जरा बरं वाटलं.
पुढे ऍडव्हेंचर कोर्स होता. दोऱ्यांच्या जाळीला पकडून खालच्या लाकडी किंवा दोरीच्या गाठींवरुन पाय ठेवत पुढे जायचं होतं. ५ अडथळे पार करायचे होते. पोरं पटापट सरकुन पुढे जात होती आणि मी मात्र जपून पाय टाकत चालत होते. हो कुठे काय पाय मुरगळला वगैरे तर? गंमत म्हणजे माझ्या मागे दोन इथल्याच बायका ग्रुपमध्ये होत्या. त्यांचं वय निदान ५५ च्या पुढचं तरी होतं. आणि त्या निवांतपणे हे सर्व सर्व अडथळे पार करुन जात होत्या. त्यांना पाहून मलाच थोडीशी लाज वाटली. आम्ही शेवटचा अडथळा पार करुन स्पीड बोटच्या टप्प्यावर आलो. तिथे चार ग्रुप होते. आम्ही चौघे एका बोटमध्ये. तिथल्या माणसाने त्याच्या मेक्सिकन इंग्लिशमध्ये आम्हाला सर्व सूचना सांगितल्या. तो पुढे जाणार, आम्ही चार ग्रुप त्याच्या मागेआपापल्या बोटीत. बोटीचा वेग कमी जास्त करणे, ती चालवणे या सूचना मी जमेल तशा ऐकल्या. कारण चालवणार संदीप होता. त्या गाईडच्या मागे बोट घेऊन आम्हाला समुद्रात जायचं होतं.
संदीप आणि सानू बोटीत पुढे बसले आणि मी, स्वनिक मागे. आणि ज्या वेगाने बोट सुसाट निघाली, मला वाटलं संपलं ! पाठीला प्रचंड दणके बसत बोट वेगाने गाईडच्या मागे जात होती. मला त्रास होतोय म्हणून संदीपने थोडा वेग कमी करायचा प्रयत्न केला. पण आम्ही ग्रुपच्या मागे पडत होतो. म्हणून नाईलाजाने परत वेगानं जावं लागलं. लाटांवरुन, लाटांचा बोटीला बसणारा धक्का चुकवत आम्ही २५ मिनिटं बोट चालवून पाण्यात पोहोचलो जिथे स्नॉर्कलिंग करायचं होतं. मी तर पोहचेपर्यंत इतकी घाबरुन गेलेले की घरी तरी नीट पोहोचू दे असं वाटून गेलं.
पाण्यात एका जागी बोटी लावून गाईडने आम्हांला तोंडाला लावायचे मास्क दिले. त्याने तोंडाने श्वास कसा घ्यायचा हेही सांगितलं. पायांत बदकासारखे चप्पल घातले. सानूला नेहमीप्रमाणे घाई. ती पाण्यात उतरली, पण श्वास घ्यायचं नीट जमेना म्हणून परत वर आली. म्हटलं आपण बघावं जमतंय का म्हणून मी पाण्यात उतरले आणि एकदम समुद्रांत उतरलोय हे जाणवलं. आजवर फक्त पूलमध्ये उतरलेली मी. दोन सेकंदांतच परत बोटीवर आले. पण त्या बोटीला धरुन वर चढताही येईना. त्या दुसऱ्या ग्रुपमधल्या वयस्कर बाईंनीच मला हातांना धरुन वर ओढलं. समोर दिसणारा किनारा, डोक्यावरचं ऊन आणि इतक्या जवळ येऊनही कोरल्स बघायला पाण्यांत उतरता येत नाही याची खंत जाणवत होती.
पुढच्या पाच मिनिटांत आमचा गाईड तिथे आला आणि म्हणाला, Do you need help?. म्हटलं हो हो. त्याने पाण्यात खाली घेतलं मला तरीही काही नीट जमेना. शेवटी उजव्या हाताला त्याने धरलं आणि कुठल्यातरी एका क्षणी मला ते तोंडाने श्वास घेणं जमायला लागलं. पण हात काही सोडायला जमेना. शेवटी त्या गाईडनेच मला हात धरुन पुढे नेलं, पाण्यांत. श्वास घेता येऊ लागला तशी मी पाण्याखाली डोळे घातले. दोनेक मिनिटांतच आम्ही कोरल्स बघू लागलो. आजूबाजूचे सर्व आवाज बंद झाले. फक्त माझा श्वास आणि पाण्याखाली दिसणारे कोरल्स आणि त्या गाईडचा हातातला हात. इतकंच जाणवत होतं. पुढे जाऊ तसे त्यानं मला बोट दाखवून माशांचा एक जत्था दाखवला. अगदी हात लागेल इतक्या जवळून कोरल्स पाहिले. ती शांतता, ते दृश्य अनुभवतांना मला एकदम जिंदगी ना मिलेगी दोबारा मधले ह्रितिक आणि कतरीना आठवले. घाबरलेल्या त्याला हात धरुन नेणारी ती आणि पुढे गेल्यावर अवाक नजरेने ते सुंदर दृश्य बघणारा तो. आपण हे अनुभवतोय यावर माझा विश्वास बसत नव्हता. लवकरच मी बोटीवर परत आले. संदीप आणि पोरांचं बघून होईपर्यंत थांबलो आणि परत धक्के खात बोटीने मूळच्या जागेवर आलो.
पण खरं सांगू का? परत येणं ही केवळ फॉर्मॅलिटी होती. त्या अख्ख्या दिवसांत अनेक वेळा मला वाटलं होतं की 'आपण हे केलं नाहीतरी चालेल ना. काय बिघडतंय?'. पण भीती वाटत का होईना मी त्यादिवशी तिथल्या सर्व ऍक्टिव्हिटीज केल्या आणि त्या शेवटच्या टप्प्याला हवं ते अनुभवता आलं याचं समाधान आयुष्यभर राहील. अर्थात हॉटेलवर येऊन खाऊन, पिऊन मस्त झोप काढली ही गोष्ट निराळी. पण एका दिवसाकरता का होईना मी माझा 'जिंदगी ना मिलेगी ना दोबारा' चा क्षण जागून घेतला होता. दोन वर्षं मनात असलेली भीती थोडी का होईना कमी झाली होती.
"दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो
तो जिन्दा हो तुम
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेकर चल रहे हो
तो जिन्दा हो तुम
हवा के झोकों के जैसे आजाद रहना सीखो
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल एक नया समां देखे ये निगाहें
जो अपनी आँखोमें हैरानियाँ लेके चल रहे हो
तो जिन्दा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेकर चल रहे हो
तो जिन्दा हो तुम. "
(जिंदगी ना मिलेगी दोबारा मधली ही शायरी.)
विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/
त्यांना पाहून मलाच थोडीशी लाज
त्यांना पाहून मलाच थोडीशी लाज वाटली. >> लाज कशाबद्द्ल विद्या? तुला काय त्रास झालाय ते तुलाच माहीती! अनुभव हा कधीही आपला स्वतःचाच असतो. त्यावरुनच पुढचं पाऊल उचललं जातं.
आवडले.
छान लिहलंय
छान लिहलंय
मी सुद्धा गेले तीन वर्ष
मी सुद्धा गेले तीन वर्ष डिस्नीलँड चा प्लॅन करत होतो आणि फायनली मागच्या महिन्यात अप्पूघर जाऊन आलो.
च्रप्स
च्रप्स

मस्त विद्या !
मस्त विद्या !
फारच भारी च्रप्स
फारच भारी

च्रप्स
भारीच!
भारीच!
थोपुवर ह्या लेखासोबत फोटो आहेत, ते पाहिले.. छान आहेत
छान लिहलं आहे. पाण्याखालच जग
छान लिहलं आहे. पाण्याखालच जग बघायचा थरारक अनुभव आम्ही सुद्धा घेतला आणि कदाचित हा पहिला आणि अखेरचा असवा. थायलंड्ला गेलो तेव्हा सी वॉक केले होते. यात डोक्यावर काचेची हंडी घातलेली जिचे वजन नक्कीच ४ -५ किलो असावे. त्यात ऑक्सीजन नळी द्वारे सोड्ण्यात आलेले जी बोटीला जोडलेली होती. सुरवातिला पाण्यात उतरताना मजा वाटत होती. पण जसं पाण्याचा स्पर्श त्या हंडीच्या मोकळ्या पोकळीला झाला तसे हवेचा दाब वाढल्याची जाणिव झाली अन् क्षणात जीव गेला बहुदा असे वाटले तुम्ही लिह्ल्याप्रमाणे आमच्या सोबतही गाईड होता त्याच्या हाताला ईतके घट्ट धरून ठेवले होते की बस..... योग्य त्या सगळ्या खाणाखुणा अम्हाल समजावून सांगितल्या होत्या परंतू त्या क्षणी त्या सर्व विसरून गडबडून जातो आपण.
यात असलेली एक भीती म्हणजे या हंडितून बघताना केवळ समोर, डावीकडे उजवीकडे असेच पहायचे. कारण चुकुनही तुम्ही खाली बघितले अथवा ही हंडी थोडी जरी तिरकी झाली तर बुड बुड घागरी झालच म्हणून समजा आणि त्या नंतर जे काही होईल त्याची कल्पनाच नको. जो काही क्षणभराचा अनुभव घेतला होता त्यावरून शेवट जवळ आला तर आपण काय विचार करू शकतो याची एक झाकी मात्र मिळाली.
छान लिहिलेय. येथेही फोटो
छान लिहिलेय. येथेही फोटो डकवायला हवे.
छान लिहिलेय. येथेही फोटो
छान लिहिलेय. येथेही फोटो डकवायला हवे.>>>+111
आवडलं. भितीवर मात केलयानंतरचा
आवडलं. भितीवर मात केलयानंतरचा आनंद खूप खूप खास असतो
Chan
Chan
छान. वाटतोय.
छान. वाचतोय. डायरीच्या पुढील पानाच्या प्रतिक्षेत.
मनातली धाकधूक पोचली. भीती
मनातली धाकधूक पोचली. भीती दाखवणार्या इतक्या सगळ्या गोष्टी एकदम म्हणजे खरंच अॅडव्हेंचर टूरिझम.
स्नॉर्केलिंग म्हटल्यावर मला जिंदगी ना मिलेगी दोबारा आठवला. तो चित्रपट पाहताना तो क्षण जेवढा पोचला नव्हता, तेवढा हा लेख वाचताना पोचला.
छान लिहिले आहे. च्रप्स
छान लिहिले आहे.
च्रप्स
वर्णन, साहस आवडले.
वर्णन, साहस आवडले.
छान लिहिलंय..!!!
छान लिहिलंय..!!!
छान लिहिले आहे.>>> +१.
छान लिहिले आहे.>>> +१.
छान लिहिलेय भरत + 1
छान लिहिलेय
भरत + 1
छान
छान
कमेंट्सबद्दल सर्वांचे आभार.
कमेंट्सबद्दल सर्वांचे आभार. ट्रिप छान झाली ती या अनुभवामुळेच.
विद्या.