रात्रीस खेळ चाले-२ : नवीन

Submitted by DJ. on 26 March, 2019 - 10:04

रात्रीक ख्योळ चालल्यान

आधीचो २००० प्रतीसाद होत आल्यां तवा ह्यो नवो धागो उघडण्यात ईलो. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

r1.jpg

.

Annaa1.jpgआण्णा - हरी नाईक
Mai2.jpgमाई - इंदु हरी नाईक
Chhaya1_0.jpgछाया - छाया हरी नाईक
Madhav1.jpgमाधव - माधव हरी नाईक
Datta1.jpgदत्ता - दत्ता हरी नाईक
Sarita2.jpgसरिता - सरिता दत्ता नाईक
Pandu1.jpgपांडु
Wachchhi1.jpgवच्छी - वत्सलाबाई
Bhivari1.jpgभिवरी
Shevanta1.jpgशेवंता - पाटणकरीण
Patankar1.jpgपाटणकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरिता भारीच तिखट बोलायला लागलीये आजकाल . पहिल्या पर्वातल्या सरिताची आठवण आली काल .

रघू गुरव आणि नेने वकिलांचा प्लॅन कामयाब होताना दिसतोय . सुसल्या गम्भीर आजारी असतानाही अण्णा शेवन्ताकडे जात नाहीये . नवरा गेलेल्या स्त्रीचे तोन्ड न पाहण्याचा सल्ला रघूने अण्णाला दिल्याने अण्णाने बिचार्‍या छायाला कोन्डून ठेवलंय .

अण्णा , रघू अन नेने निल्याच्या अड्ड्यावर माडी पिताना चोंगट्या अण्णाला बोलवायला येतो . तर अण्णा शेवन्ताकडे जायला साफ नकार देतो . रघु मान्त्रिक शेवन्ताला सांगतो की सुसल्याला तिच्या रक्ताच्या पुरुष नातेवाइकाने (म्हणजेच अण्णाने) पाणी पाजले तरच ती वाचेल !अण्णा काही येत नाही पण पांडू माधवाला घेवून अण्णाला शोधत फणसाखाली म्हणजेच शेवन्ता पाटणकरणीकडे जातात . माधव घरात आल्याबरोबर सुसल्याच्या तोन्डातून फेस आल्याने पाण्डू घाबरतो आणि घरी येवून सुसल्या मेल्याचे माईकडे जाहीर करून टाकतो ! बघूया काय होतंय ते कारण सुसल्या मरत नाही हे पहिल्या पर्वानुसार जगजाहीर आहे !

सुषमा अन्नाची मुलगी आहे हे मला कालचा भाग पाहून कळलं, नक्की किती वर्ष चालू आहे हे प्रकरण Uhoh शेवंताला नवरा गेल्यावर मुलगी झाली का.

धन्यवाद ममो. मागच्या सीझन मध्ये सांगितलं होतं की सुसल्या शेवंताची मुलगी आहे पण ती अण्णाची मुलगी आहे हे नव्हतं माहित.

आजचा पण मस्तच असणार आहे. छाया आण्णाला चांगलीच सुनावणार असं वाटतंय. दत्ता पण सण्सणीत कानफाड खाणार आहे आज.
माईने छायाला पण खोटं खोटं मारलं आणि हंबरडा फोडला..

माईने छायाला पण खोटं खोटं मारलं आणि हंबरडा फोडला..>>>> Rofl माईला रडण्याखेरीज दुसरे कामच नाहीये. नाहीतर उठसुठ आपल्या बेवड्या दादल्याची बाजू घ्यावी लागते माईला.

चंपा, ती अण्णुची पण मुलगी असते म्हणूनच तिला कोणी घरात घेत नाही नाहीतर पाटणकरची मुलगी असती तर आई बाप दोघेही जगात नाहीत म्हणून सहानूभुतीने तरी आश्रय दिला असता माईने.

माईन सांभाळुक व्हया तर प्वॉर पण देवगुणाचं असुक व्हया... सुसल्या तसा नव्ह्ता म्हणान माईन त्याक जवळ नाय केल्यान.

डिजे मी इथेच आहे. Happy काही वेळेस ईच्छा असुनही सिरीयल बघणे जमत नाही तेव्हा इथे येऊन वाचुन जाते. आठवण काढल्याबद्दल धन्यवाद.

दत्ताला सांभाळला तसं सुसल्याला का नाही सांभाळला माईने? > +१ पांडू ला पण सांभाळलं तर सुसल्याचा इत्का दुस्वास का? कनवाळू , ममताळू माईंन्ना काही शोभल नाही हे!

दत्ता हा सरळ स्वभावाचा, कामसु आणि कोणाच्या आध्यात-मध्यात नसलेला असा आहे तर पांडु हा ओ नाम्या अन सांगकाम्या या कॅटेगरीतला आहे.. ही दोन्ही पोरे वळायला सोपी म्हणुन माईने त्यांना जीव लावुन सांभाळले. माई दिसते तशी गुडी-गुडी आजिबात नाही.. ती नाईकांची सुन आहे.. आवळा देऊन कोहळा काढणे तिला छान जमते. Proud
सुसल्या ह्या इझीली वळु शकणार्‍यातला नाय हा हे माईन हेरल्यान म्हणान तिका पदरात नाय घेतलाहा. स्वत:च्या पदराक खार लाऊन कोण घेताहा..? Proud

पांडू ला पण सांभाळलं तर सुसल्याचा इत्का दुस्वास का?>>> शेवंतामुळे असेल. त्यात तिने समोरच्याच झाडाला गळफास घेतला म्हणुन असेल.

काल छायाला माईने खुप धोपटली.. तिला किती लागलं (?) असेल हे रवळनाथालाच ठाऊक.
कालच्या भागात रघु काकाचं घर पहिल्यांदाच बघितलं.. छान आहे..!
कालच्या भागात सगळ्यांनाच दाखवलं गेलं.. खुप फास्ट एपिसोड वाटला. माधव आणि सरिताच संभाषण, माधव आणि माईचं संभाषण मनाला भिडलं.

या सिरियलचा नेमका शेवट काय असेल. म्हणजे काही कळतच नाही कि हे सर्व कुठे थांबणार. कालच्या एपीच्या शेवटी वच्ची दिसली माधवला.

जिथे राखेचा 1 सुरू होतो तिथे शेवट व्हयला हवा लॉजिकली विचार केला तर>> कुठल्याही गुन्ह्यासाठी आण्णा शिक्शा न होता तो आरामात मेला असा शेवट केला तर तो अन्याय ठरेल.. मला वाटते या सर्व प्रकरणांची कुणालातरी माहिती असेल आणि त्याने/तिने आण्णाला विष पाजले असावे जेणेकरुन आण्णा मेला असं काहीतरी दाखवायला हवे.. ती बदला घेणारी व्यक्ती वच्छी असेल तर फार बरे वाटेल..!

कालच्या भागात छाया आणि माधवाची जुगलबंदी बघुन फार बरे वाटले. लहाणपणापासुन दोघे असेच.. छया नेहमी कुरघोडी करणारी.
काल पाटणकरीण हळदीची पाने घेऊन नाईकांकडे आलेली.. म्हणे माईकडुन पातोळ्या शिकायच्यात (अगं कितिवेळा शिकणारेस.. माठ कुठली..!)
बरं.. माईने तरी नीट शिकवाव्यात की नाही... पण डायरेक्ट ताटात वाढल्या Uhoh
पाटणकरीण आता माधव सोबत मुंबईला जाणारे म्हणे..

शेवन्ताच नाटक येतय. ' इब्लिस, शैतान हाजिर है' नावाच. राहुल मेहेन्दळे, सुनील देव आणि वैभव मान्गले आहेत नाटकात.

हो.. ४ दिवस धमाल केली पुर्ण टीम ने.

पाटणकरीण माधवासोबत मुंबईला जाणारे म्हणे म्हणजे थोडे दिवस 'इब्लिस' नाटकाचे दौरे करेल..
चोंगट्या अन पोष्ट्या अजुन जिवंत आहेत.. तेव्हा सिरियल संपण्यासारखं तर काही दिसत नाही.

आण्णा आणि शेवंता तार्कर्ली-देवबाग च्या समुद्र किनारी गाणं म्हणतानाचा टीझर काल सिरिअल च्या ब्रेक मधे दाखवला..!

अण्णुकल्या म्हणजे काय पांडोबा ला हम दिल दे के चुक गये सनम मधली ऐश्वर्या वाटली काय..... बकाबका मिरच्या खायला लावल्या की त्याला Lol
उद्या सकाळी बोंब होइल ना त्याची Lol

तार्कर्ली-देवबाग च्या समुद्र किनारी गाणं>>>> गोवा म्हणताहेत टीझरमधे Lol
मला त्या दोघांचा रोमान्स पाहुन शिसारी येते.

Pages