Submitted by ऋन्मेऽऽष on 5 December, 2019 - 22:41
आज बहुधा सर्वांसाठीच हि सकाळची शुभवार्ता असेल.
काही लोक ही पद्धत योग्य की अयोग्य यावर किस पाडत राहतील..
पण एक नक्की...
न्याय झाला !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ललितलेखन?
ललितलेखन?
धागे पाडायची एवढी हौस आहे तर योग्य ग्रुप निवडायचे कष्ट घ्या की.
सॉरी टू से, पण नआजकाल डिजिटल
सॉरी टू से, पण आजकाल डिजिटल न्युज सगळ्यांनाच एनकॅश करायची घाई असते. न्युज रीपोर्टर्स पण असे ओरडत असतात की, जसा काही ड्रामाच आहे. मुलीच्या आई वडीलांची मुलाखत काय, विचित्र प्रश्ण काय.
असाच न्याय सर्वांना मिळो.
हा न्याय असेल तर असाच न्याय सर्वांना मिळो.
हे लिहिण्यासाठी धागा?
हे लिहिण्यासाठी धागा?
<< आज बहुधा सर्वांसाठीच हि
<< आज बहुधा सर्वांसाठीच हि सकाळची शुभवार्ता असेल.
काही लोक ही पद्धत योग्य की अयोग्य यावर किस पाडत राहतील..
पण एक नक्की... >>
----- एक नक्की.... मला धागा काढायला निमीत्त मिळाले.
भरत, माझ्याकडे बहुतांशवेळा
भरत, माझ्याकडे बहुतांशवेळा ललितलेखनातच धागे उघडतात. हा मायबोली एपचा प्रॉब्लेम आहे का कल्पना नाही. आणखी कोणाला असा अनुभव येतो का?
ॲडमिन प्लीज चालू घडामोडीत हलवाल का?
चांगली बातमी आहे दिवसाच्या सुरुवातीला. वाद घालून मूड खराब नको कोणाचा...
आम्ही बाकीच्या ग्रुप्सचे पैसे
आम्ही बाकीच्या ग्रुप्सचे पैसे भरले आहेत. ललित फ्री आहे. तिकडे धागा उघडणे बिलो स्टेटस वाटते.
उत्तम झालं ... सकाळी सकाळी
उत्तम झालं ... सकाळी सकाळी छान बातमी मिळाली .
बरे झाले.
बरे झाले.
आता निर्भयाच्या गुन्हेगारांना बाहेर काढून ओळीत उभे करून गोळ्या झाडा. त्यांच्यावरचे आरोप तर शाबीतही झालेत.
1 बंदूक तिच्या आईच्या हातीही द्या, त्या माऊलीचे दुःख बघवत नाही.
झालं ते उत्तम च.. फक्त खरे
झालं ते उत्तम च.. फक्त खरे आरोपी असले म्हणजे मिळवलं... पोलीस ही reliable आहेत असं म्हणू शकत नाही.. हेच ते ज्यांनी मुलगी पळाली असेल असं तिच्या family ला सांगितलं..
Admin, खरडफळा लवकर चालू करा.
Admin, खरडफळा लवकर चालू करा.
उन्नावमधली पीडित मुलगी.
उन्नावमधली पीडित मुलगी. बलात्कार. वडिलांचा पोलिस कोठडीत मृत्यू. त्याआधी जीवघेणी मारहाण. तिच्या वाहनाला अपघात. इस्पितळात गंभीर अवस्थेत दाखल.
कशी आहे ती?
उत्तर प्रदेश पोलिस तर गेल्या दोन वर्षांत राजरोसपणे एन्काउंटर करत आहेत. या केसमध्ये काही चान्सेस. एन्काउंटर झाला तर कोणाचा होईल?
उन्नाव मधल्या गैंगरेप
उन्नाव मधल्या गैंगरेप पीडीतेला काल जिवंतपणी जाळले.
<< उन्नाव मधल्या गैंगरेप
<< उन्नाव मधल्या गैंगरेप पीडीतेला काल जिवंतपणी जाळले >>
---- दोन भिन्न घटना आहेत.... उन्नाव नावाने सर-मिसळ आणि गैरसमज नको.
< उन्नावमधली पीडित मुलगी. बलात्कार. वडिलांचा पोलिस कोठडीत मृत्यू. त्याआधी जीवघेणी मारहाण. तिच्या वाहनाला अपघात. इस्पितळात गंभीर अवस्थेत दाखल. >>
------ त्या वाहन अपघातात काकू आणि अजुन एक व्यक्ती ठार झाली आहे.... त्या नंतरही धमक्यासत्र सुरुच आहे.
त्या आमदाराला भाजपाचे निवडून आलेले खासदार thank you म्हणायला तुरुंगात जातात...
<< झालं ते उत्तम च.. फक्त खरे
<< झालं ते उत्तम च.. फक्त खरे आरोपी असले म्हणजे मिळवलं... पोलीस ही reliable आहेत असं म्हणू शकत नाही.. हेच ते ज्यांनी मुलगी पळाली असेल असं तिच्या family ला सांगितलं.. >>
----- खरे आरोपी नसले तर अशी पण एक शक्यता आहे ना ? मग काय करायचे ?
या हत्यांंमुळे लोकक्षोभ कमी होईल पण पिडिताला तसेच मारल्या गेलेल्या आरोपींना न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही.
आरोप सिद्ध होण्यासाठी न्यायालये आहेत... पोलिस परस्पर " न्याय " करत असतील तर त्या प्रकराचे समर्थन करणे चुकीचे आहे.
आरोप सिद्ध होण्यासाठी
आरोप सिद्ध होण्यासाठी न्यायालये आहेत... पोलिस परस्पर " न्याय " करत असतील तर त्या प्रकराचे समर्थन करणे चुकीचे आहे>>>>>>> +१
दोन वेगवेगळ्या केसेस आहेत
दोन वेगवेगळ्या केसेस आहेत म्हणूनच गॅंगरेप म्हटले.
आरोप सिद्ध होण्यासाठी
आरोप सिद्ध होण्यासाठी न्यायालये आहेत... पोलिस परस्पर " न्याय " करत असतील तर त्या प्रकराचे समर्थन करणे चुकीचे आहे. +१
ते आरोपी आधी कस्टडी मधे होते ना? म्हणजे त्यांच्याकडे हत्यारे नसणार!
मग पळून जाताना पकडायच्या ऐवजी एन्काउंटर का केला? पिडीतांना न्याय मिळायलाच हवा पण तो योग्य प्रकारे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यातून
आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाऊ शकतात हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे.
पण इथे स्वागत करणार्या बहुतेकांना हा फेक एन्काउंटर असल्याची खात्री आहे. त्यामुळे प्रश्नचिन्ह बाद.
असा न्याय ब्रुटल आहे.पण
असा न्याय ब्रुटल आहे.पण मनातून बरं वाटलं.
जन क्षोभ इतका आहे की आरोपींवर हल्ला झाला असता.बरेच वाईट प्रकारे छळ झाले असते.(मला हेही मनातून पीडितेला न्याय आहे असं वाटलं असतां पण) पोलिसांवर आरोप झाले असते.कोणीतरी इन चार्ज सस्पेंड झाले असते.
काहीही न करता आरोपीना संरक्षण दिले असते तर जन क्षोभामुळे पोलिसांवर हल्ले होऊ शकले असते.
त्यापेक्षा पोलिसांनी प्रश्न संपवायचा निर्णय घेतला असेलही.मला वाईट वाटणार नाही.
फक्त आरोपी खरे असावेत .
फक्त आरोपी खरे असावेत .
आरोपी हेच होते हे कन्फर्म कसं केले पोलिस नी
उद्या शिक्षेच्या नावाखाली
उद्या शिक्षेच्या नावाखाली चौकात मुंडकं उडवणे किंवा हातपाय छाटने अशा गोष्टी घडू लागल्या तर आश्चर्य वाटू नये. खरेतर या घटनेने तिथवर पोहोचलो आहोतच आपण. असल्या उन्मादाने काय परिस्थिती ओढवते याचे भान उत्सवप्रिय समाजास नसणे हे एकवेळ कळू शकते, पण जबाबदार व्यवस्था, सरकार यांनीच शेण खावे हे धोकादायक आहे.
आपण स्वत: जनक्षोभाचे बळी होऊ
आपण स्वत: जनक्षोभाचे बळी होऊ नये म्हणून पोलिसांनी घेतलेले बळी आहेत हे.
उन्नाव ११ महिन्यात एव्हढे
उन्नाव ११ महिन्यात एव्हढे बलात्कार आणि खून
https://m.livehindustan.com/uttar-pradesh/story-up-86-incidents-of-rape-...
झाले ते नक्की चांगले की वाईट
झाले ते नक्की चांगले की वाईट हे कुणीही ठरवू शकत नाही जोवर मूळ गुन्ह्याची पुर्ण उकल झाली नाही.
मूळ घटना अत्यंत घृणास्पद आणि उद्वेगजनक असली तरी जे एन्काऊंटरमध्ये मारले गेले ते आरोपी होते की गुन्हेगार हे सिद्ध नव्हते. आणि ह्यामागे अजून तिसरा हात नाही हे कश्यावरुन?
एन्काऊंटरची देखील चौकशी व्हायला हवी खरोखर ते पोलिसांची शस्त्रे घेऊन पळत होते का ?
हा झालेला न्याय सामान्यांना कितीही चांगला वाटला आणि 'जश्यास तसा' आहे असे वाटले तरी तो न्याय करायचे काम पोलीसांचे नक्कीच नव्हते.
छ. शिवरायांच्या काळातले दाखले काहीजण देताना दिसतात सोमिवर. पण त्या काळातसुद्धा तिथे न्याय छ. शिवराय आणि त्यांचे न्यायाधीश करत असत त्यांचे फौजदार, जमादार अथवा हवालदार नव्हते करत.
क्षुब्ध झालेल्या मनाला जरा
क्षुब्ध झालेल्या मनाला जरा वेळ शांत वाटले पण जरा वेळच. आम्हाला एन्काऊंटर नाही न्याय हवाय. ही सर्वांचीच फसवनूक आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल त्यांना मृत्यूदंड मिळालेला नाही, तर ते पळून जात असताना मारले गेलेत.
ळ घटना अत्यंत घृणास्पद आणि
ळ घटना अत्यंत घृणास्पद आणि उद्वेगजनक असली तरी जे एन्काऊंटरमध्ये मारले गेले ते आरोपी होते की गुन्हेगार हे सिद्ध नव्हते. आणि ह्यामागे अजून तिसरा हात नाही हे कश्यावरुन?
एन्काऊंटरची देखील चौकशी व्हायला हवी खरोखर ते पोलिसांची शस्त्रे घेऊन पळत होते का ?
हा झालेला न्याय सामान्यांना कितीही चांगला वाटला आणि 'जश्यास तसा' आहे असे वाटले तरी तो न्याय करायचे काम पोलीसांचे नक्कीच नव्हते. >>>>>> सहमत!
प्रकरण वाटते तितके सरळ नाही..
प्रकरण वाटते तितके सरळ नाही...
प्रियंका रेड्डीच्या चारही बलात्काऱ्यांना चौकशी दरम्यान पळून जाताना एनकाऊंटरमधे मारले .
चौघेही.. एकही जखमी जिवंत राहिला नाही..
चौकशीत पोपटासारखे बोलले होते की काय??
अतिशय संशयास्पद !!!!
त्या बलात्कार आणि जाळून मारण्याचे मास्टरमाइंड कोण होते या लिंक्सच तुटल्या म्हणायच्या !!
कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न ..
मास्टरमाइंड सलामत तो हादसे पचास..
एक ईतरत्र वाचलेली चर्चा...
जी काही शिक्षा देणे आहे ती
जी काही शिक्षा देणे आहे ती कायदेशीर मार्गे.
त्या साठी न्याय यंत्रणा आणि पोलिस यंत्रणा सक्षम करा.
गुंड,daku,सुधा असा न्याय द्यायचे मग त्यांना का दोष द्यायचा.
श्रीमंत लोकांना लुटून गरिबांना पैसे देणे हे पण मोठे पुण्यवान काम आहे .
पण ते सोकावले तर अराजक येईल.
चौघांचा किवा चौघांपैकी
चौघांचा किवा चौघांपैकी एखाद्याचा पोलिस कस्टडीत मृत्यू झालेला असण्याचीही एक शक्यता आहेच.
Pages