मराठी पाठ्यपुस्तकांतील धड्यांची चर्चा

Submitted by गजानन on 10 April, 2014 - 04:59

मराठी पाठ्यपुस्तकातील धड्यांची चर्चा करण्यासाठी एक धागा जुन्या मायबोलीत होता.

आता इथल्या दुसर्‍या एका बाफावर अशी चर्चा सुरू झाली आणि त्या धाग्याची आठवण झाली, म्हणून हा धागा काढला.

जुन्या धाग्यावरही बरीच चर्चा आहे. तीही जरूर वाचा.
जुन्या धाग्याचा दुवा: http://www.maayboli.com/hitguj/messages/46/4554.html

तर ती चर्चा इथे चालू ठेवू. Happy

इथे प्रताधिकाराचा भंग होईल असा मजकूर (कॉपी पेस्ट / चित्रे) प्रतिसादात देऊ नका.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ११ वीच्या कुमारभारती मधले धडे किंवा पूर्ण पुस्तकाचं हवे आहे. खूप मस्त होत ते 'झडीचे दिवसं ' नावाचा माझा आवडीचा धडा होता. रामनगरी मधला घर सोडून जाण्याचा प्रसंग सुद्धा एका धड्यात होता.

'वळीव' धडा आठवतो का कुणला? अत्यंत चित्रदर्शी होता. फार मस्त वर्णन होतं उन्हाची काहीली मग भरुन आलेलं आभाळ, वारा व नंतर वळवाचा पाउस!!

ही लिंक दिली नाही का कोणी आधी?

http://cart.ebalbharati.in/BalBooks/archive.aspx

बालभारती (मराठी) आणि सुलभभारती(हिंदी) सगळ्या आवृत्त्यांचे सातवी पर्यंतचे आर्काईव्ज ऊपलब्ध आहेत. ८० मध्ये शाळेत असणार्‍यांना सिरीज १ लागेल ९० मध्ये शाळेत असणार्‍या सगळ्यांना बहुतेक सीरीज २ किंवा ३ लागेल असे वाटते.

संबंधितांनी अ‍ॅडमिनना सांगून लेखाच्या मजकुरात ही लिंक अ‍ॅड करावी म्हणजे सगळ्यांना लगेच सापडेल.

धग - उद्धव शेळके यांच्या कादंबरीतला भाग धडा म्हणून मला आठवत नाही. कोणत्या बॅचला होता?

वळिव वर्णनावरून (धडा आम्हाला असल्याच आठवत नाही. नंतरच्या बॅचेस मध्ये कदाचीत अभ्यासक्रम चेंज झाला असेल.) शंकर पाटलांच्या वळिव पुस्तकातला असावा अस वाटतय.
सगळ्याच कथा सुरेख आहेत त्या पुस्तकातल्या. गारवेल पण तसाच सुरेख कथा संग्रह आहे त्यांचा.

वळीव म्हणजे तोच धडा का ज्यात पायाळू म्हातारा, वीज पडून मृत्यूचा धोका, त्याची बायको अंगठी द्यायला येते वगैरे होतं?
मला आठवतोय. मस्त होता.
कितवीला होता तेमात्र आठवत नाहीय.
हा अभ्यासक्रम १९९५पर्यंत दहावी झालेल्याना होता. ९६ ची दहावी-बारावी नवीन अभ्यासक्रमाची होती.

धग - उद्धव शेळके यांच्या कादंबरीतला भाग धडा म्हणून मला आठवत नाही. कोणत्या बॅचला होता?>>>> माझी दहावी १९९९ ला झाली, आमच्या ब्याच ला होता हा

धग - उद्धव शेळके यांच्या कादंबरीतला भाग धडा म्हणून मला आठवत नाही. कोणत्या बॅचला होता?>>>> माझी दहावी १९९९ ला झाली, आमच्या ब्याच ला होता हा
>>>

99च्या batch ला आमचेच पुस्तक असणार, मला मुळीच आठवत नाहीये Sad

मी सुद्धा 95 ते 2004 च्या बॅच मधली. माझ्यासारखेच बालभारतीच्या जुन्या धड्यांचे इतके चाहते आहेत हे पाहून खूप छान वाटलं. मायबोलीवर मी नवीनच आहे. पहिल्यांदा याच धाग्यावरती प्रतिसाद देते आहे.

पहिली का दुसरीच्या पुस्तकात 'गवताचं पातं वार्‍यावर डोलतं' ही (कुसुमाग्रजांची?) कविता होती. त्यानंतर अनेक वर्षांनी ती 'देवराई' या चित्रपटात पहायला मिळाली. शिवाय चालही छान वाटली.

सदानंद रेगेंची एक कविता होती सहावीला. 'दुपार' म्हणून.
ये तो सच है के भगवान है च्या चालीत पाठ केलेली. >>>>>>>> आम्हाला ' गे मायभु तुझे मी फेडिन पान्ग सारे' कविता होती. आमच्या शाळेतल्या एका मुलीने ती ' डोली सजाके रखना' च्या चालीवर म्हटली होती. Proud

इंदिरा संतांची "निवडुंगाच्या शिर्ण फुलांचे" ही कविता आमच्या वर्गात चेहरा है या चांद खिला है च्या चालीवर म्हणत असत

आम्हाला ' गे मायभु तुझे मी फेडिन पान्ग सारे' कविता होती. आमच्या शाळेतल्या एका मुलीने ती ' डोली सजाके रखना' च्या चालीवर म्हटली होती. Proud

Submitted by सूलू_८२ on 3 December, 2019 - 07:16
इंदिरा संतांची "निवडुंगाच्या शिर्ण फुलांचे" ही कविता आमच्या वर्गात चेहरा है या चांद खिला है च्या चालीवर म्हणत असत

>>> Sad

आम्हाला ' गे मायभु तुझे मी फेडिन पान्ग सारे' कविता होती. आमच्या शाळेतल्या एका मुलीने ती ' डोली सजाके रखना' च्या चालीवर म्हटली होती. >>>> आम्हाला 'ए रात के मुसाफ़िर चन्दा जरा बता दे' अशी चाल शिकवली होती ह्या कवितेला Happy

' गे मायभू तुझे मी फेडिन पांग सारे', 'हे राष्ट्र देवतांचे', 'सारे जहाँसे अच्छा', 'आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी' - या आणि अशा सर्व कवितांना आम्ही 'ऐ दिल मुझे बता दे' या गाण्याची चाल लावत असू. आणखीही कित्येक गाण्यांना ती चपखल बसते.

'रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवतफुला' आणि 'ओढ्याकाठी आपुल्या घरचि गाय घेउनी धावत होतो' - या कवितांना 'किलबिल किलबिल पक्षी बोलती' ची चाल.

इत्केच काय, 'कदम कदम बढाये जा' ला 'अजीब दास्ता है ये कहां शुरू कहां खतम' ची चाल.

Pages