लग्नापूर्वीची मी एक हुशार, मनमिळाऊ आणि थोडीशी टाॅमबाॅईश अशी मुलगी. शाळेत नेहमी चांगले मार्क्स. घरातून भरपूर प्रोत्साहन असल्याने वेगवेगळ्या स्पर्धा, परिक्षा,खेळ यात सहभाग असायचा. आईवडिल मला व्यवहारज्ञान यावे म्हणून बरीचशी कामे सांगायचे. उदा. बँकेत जाऊन लाईटबिल भरणे, पैसे भरणे-काढणे, एखाद्या परिक्षेचा फाॅर्म भरणे, पोस्टाची कामे इ. मला लागतील त्या वस्तू बहुदा मीच खरेदी करायचे.
माझे अरेंज मॅरेज झाले. लग्नाची माझी खरेदी बहिणींसोबत मीच केली होती. सासरी आल्यानंतर नवी नवरी म्हणून कौतुक व्हायचे. घरातील सर्व बायका अवतीभवती असायच्या, हवंनको ते बघायच्या. मलाही बरे वाटायचे.लागेल ती वस्तू कुणीतरी आणून द्यायचे. मात्र घराबाहेर पडण्याचा प्रसंग कधी आलाच नाही.असं करता करता एक महिना झाला. आपले शेजारी कोण आहेत हेदेखील मला माहित नव्हते. बर्याचदा ओळखीच्या बायका घरी यायच्या आणि हाॅलमध्ये बसून गप्पा मारून जायच्या.मला अशावेळी चहा करण्याच्या निमित्ताने किचनमध्ये पाठविले जाई. अगदीच कोणी बाई माझ्याशी ओळख करून घ्यायला आत आली, तर मला तिच्याशी बोलता येई, अन्यथा मी केलेला चहा दुसरेच कुणी बाहेर घेऊन जाई. हळूहळू माझ्या मनाचा कोंडमारा होऊ लागला,मात्र काहीच बोलता येईना. वरकरणी सर्व ठीक होते.
कधी एखादी वस्तू हवी असेल तर 'अग तू कशाला जातेस?अमका(अमकी) आणेल ना.! अशी नव्या नवरीसाठी काळजी दाखविली जाई.
पुढे मी नवर्याबरोबर राहण्यासाठी पुण्याला निघाले. घरातून बाहेर पडताना जाणवले , मी चक्क दोन महिन्यांनी घराबाहेर पडत होते.
बरे , आता नवर्याबरोबर पुण्याला आले, स्वतंत्र संसार थाटला, तरी हे 'काळजी प्रकरण' काही थांबेना. आता नवर्याला माझी ' काळजी' वाटत होती.
मी जवळच्या एका शाळेत अर्ज केला आणि माझी तिथे लगेच शिक्षिका म्हणून नेमणूक झाली.मात्र अगदी भाजी पासून ते माझे कपडे,चप्पल,पर्स इ. सर्व खरेदी नवर्याच्या सोबतीने पर्यायाने त्याच्या पसंतीने होऊ लागली. कधीतरी एखादी वस्तू मी घेतलीच ,तर ती कशी महाग पडली किंवा खराब आहे, हे ऐकवले जाऊ लागले. अजून काही दिवसांनी अशी वेळ आली कि एकटीने अगदी दहा रूपयांची वस्तू खरेदी करायची सुद्धा
माझी प्राज्ञा नव्हती. मला नवरा बरोबर असल्याशिवाय कोणतेच बाहेरचे व्यवहार करता येईनात! सतत 'घरचे काय म्हणतील किंवा मी चूक तर करीत नाही ना' हीच भिती!
दोन वर्षानी मला मुलगा झाला. आई आजारी असल्याने येऊ शकली नाही. सासूबाई आल्या. त्यांच्याच पद्धतीने बाळाचे सर्व काही करत होते. पटत नसले तरी. उदा. बाळाच्या कानात रोज तेल घालणे, रडत असल्यास नजर काढणे इ.
बाळ पंधरा दिवसांचे होते. अचानक त्याला ताप आला.
यावर त्याला दवाखान्यात न नेता त्या दोन दिवस फक्त नजर काढत होत्या. अजून दोन दिवस गेले. ताप वाढला. बाळाची अवस्था नाजूक झाली होती.माझी घालमेल होऊ लागली. संध्याकाळी बाळ दूध देखील घेइना. तरी सासूबाई ढिम्म .
'काहितरी नजरच लागली असेल , एवढ्याशा बाळाला काय दवाखान्यात न्यायचे. डाॅ. विनाकारण अॅडमीट करून पैसे ऊकळेल' . याला नवर्याचीही सम्मती. रात्रभर मी विचार करीत जागले. शेवटी युक्ती सुचली.!
सकाळी उठून नवरोबा आणि सासूला म्हटले, तुम्ही दोघे देवाला जाऊन या, बाळासाठी साकडे घाला. याला मात्र दोघे तयार झाले. ते दोघे घराबाहेर पडताच बॅग घेतली, बाळाला उचलले आणि तरातरा चालत गेटजवळ पोहोचले, तोच वाॅचमनकाका मागून हाका मारत आले. अहो ताई, तान्ह्या बाळाला घेऊन एकट्याच कुठे निघालात? मग त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. बाळाला डाॅ. कडे नेते हे कळल्यावर
त्यांनाही पटले.त्यांनी आश्वासन दिले, ताई तुम्ही निर्धास्त रहा.
कुणाला कळणार नाही. बाळाला जपून न्या अन जपून आणा!
पायरया चढून दवाखान्यात गेले. बाळाला टेबलवर ठेवले. डाॅक्टर चकित!! वीस दिवसांच्या बाळाला घेऊन एकटीच बाई भर दुपारी कशी आली? मग मीच सर्वकाही सांगितले. त्यांनी बाळाला तपासून सांगितले, ताबडतोब काही अॅन्टिबायोटिक्स सुरू करावी लागतील अन्यथा न्यूमोनियाच होण्याच्या मार्गावर आहे. मग जवळच्या मेडिकलमधून औषधे आणून एक डोस डाॅ. समोरच बाळाला दिला.
घरी आल्याबरोबर सर्व औषधे कपाटात कपड्यामागे लपवली. रोज ठराविक वेळी सर्वांची नजर चुकवून बाळाला औषध देत राहिले. तीन दिवसात बाळ खडखडीत बरे झाले!
नवरोबांना म्हटले, 'देवाने तुमचे ऐकले बरं! देव पावला!'
आणिबाणीच्या क्षणी जर आपलीच
आणिबाणीच्या क्षणी जर आपलीच जवळची माणसे वेगळी किंवा विरोधी वागू लागली तर एका क्षणात सर्व परिस्थिती आणि लोकांना आपण बदलू शकत नाही. तितका वेळ नसतो. त्यावेळी ती वेळ कशीतरी निभावून न्यायची असते. ते म्हणतात ना 'सीधी उंगलीसे घी ना निकले तो उंगली टेढी करनी पडती हे'. आणि एकदा वेळ निभावून नेली कि मग आपल्या सोयीने आपण परिस्थिती ,जवळचे लोक यांना बदलू शकतो, किंवा समजावू शकतो.
बाळ बरे झाल्यानंतर आई ' देव पावला' असे नवर्याला म्हणत वरकरणी आनंद दर्शवित असली तरी तिच्या मनातून ते वाक्य उपरोधानेच आले आहे.
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार!
छान कथा. कथानायिका, नवरा,
छान कथा. कथानायिका, नवरा, सासू या प्रत्येकी स्वभावाचे नमुने पाहिलेले असल्याने फारच पटली.
अगदी भाजी पासून ते माझे कपडे
अगदी भाजी पासून ते माझे कपडे,चप्पल,पर्स इ. सर्व खरेदी नवर्याच्या सोबतीने पर्यायाने त्याच्या पसंतीने होऊ लागली. कधीतरी एखादी वस्तू मी घेतलीच ,तर ती कशी महाग पडली किंवा खराब आहे, हे ऐकवले जाऊ लागले. अजून काही दिवसांनी अशी वेळ आली कि एकटीने अगदी दहा रूपयांची वस्तू खरेदी करायची सुद्धा
माझी प्राज्ञा नव्हती. मला नवरा बरोबर असल्याशिवाय कोणतेच बाहेरचे व्यवहार करता येईनात! सतत 'घरचे काय म्हणतील किंवा मी चूक तर करीत नाही ना' हीच भिती! >>>
हे माझ्या आयुष्याचं वर्णन केलंय तुम्ही
धन्यवाद वर्षा! शहरी भागात
धन्यवाद वर्षा! शहरी भागात जास्त नसेल तरी ग्रामीण भागात अंधश्रद्धा, मागासलेल्या विचारांचा खूप पगडा आहे. आजच्या काळातही . यात सुशिक्षित ,अशिक्षित असा भेद नाही.
@ helpme बर्याच घरात अशी
@ helpme बर्याच घरात अशी परिस्थिती असते. वरकरणी दिसून येत नाही. खरेदी हा स्त्रियांचा प्रांत मानला जातो. मात्र किंमत, नवर्याची आवडनिवड ,पसंती याचा विचार करून आणि बहुदा घरातील इतर सर्वांची खरेदी झाल्यावर किंवा बजेटचा अंदाज घेऊन मग स्त्रिया स्वतःची खरेदी करतात.
@ helpme बर्याच घरात अशी
@ helpme बर्याच घरात अशी परिस्थिती असते. वरकरणी दिसून येत नाही. खरेदी हा स्त्रियांचा प्रांत मानला जातो. मात्र किंमत, नवर्याची आवडनिवड ,पसंती याचा विचार करून आणि बहुदा घरातील इतर सर्वांची खरेदी झाल्यावर किंवा बजेटचा अंदाज घेऊन मग स्त्रिया स्वतःची खरेदी करतात. >>
नाही, तुम्ही लेखात दिलेल्या पॅराग्राफ प्रमाणे आमच्याकडे भाजी, कपडे, इतर घरगुती वस्तू घेताना आणि इतर प्रत्येक ठिकाणी नवरा सोबत येतो आणि सगळं त्याच्या मनाप्रमाणे खरेदी करतो. जर स्वतःच्या मनाने काही केलंच तर खूप ऐकून घ्यावे लागते, जसं की स्वस्त मिळणारी वस्तू मी कशी महाग आणली, किंवा एखादं काम त्याच्या सल्ल्याने वा ओळखीने कसं अजून चांगलं झालं असतं वगैरे वगैरे . आणि मग त्या कटकटी पेक्षा सगळीकडे नवर्याला मोठेपणा दिलेला परवडतो. माझी रोजची घुसमट होते हे वेगळं सांगायला नको.
अगदी बरोबर!मी वरील
अगदी बरोबर!मी वरील प्रतिसादामध्ये लिहीलेली परिस्थिती नवरा खरेदीसाठी सोबत असताना होते. फक्त तुम्हीच नाही तर माझ्या स्वतःच्या पाहण्यात अशा अनेक बायका आहेत.
ज्या स्वतःच्या आवडीने नवर्याला विचारल्याशिवाय एकही वस्तू घेऊ शकत नाहीत. यात अगदी उच्चमध्यमवर्गीय बायकाही आहेत.
इथे 10 स्त्री id असतील तर
इथे 10 स्त्री id असतील तर त्या मध्ये 2 च आयडी ना असा अनुभव आला असेल.
बाकी 8 आयडी ना नवऱ्याची चांगली साथ मिळत असेल.
समाजात सुधा तीच अवस्था आहे.
पोस्ट मध्ये जसे वर्णन केले आहे तशी परिस्थिती असलेली घर कमी आहेत.
Positive विचार ठेवा.
नेहमी नेहमी negetive विचार केला की पूर्ण समाजच खराब दिसतो
Rajesh188 , तुम्ही म्हणताय
Rajesh188 , तुम्ही म्हणताय तसं असेल तर खरंच पॉझिटिव्ह गोष्ट आहे
माझ्या पहाण्यात बहुतेक ठिकाणी
माझ्या पहाण्यात बहुतेक ठिकाणी उलट परिस्थिती आहे.
शॉपिंगला / नेहमीच्या खरेदीला एकटा नवरा जात असेल तरी त्याला कुठून काय किती कसं आणायचं निक्षून सांगितले जाते, आणल्यावर सर्व तपासून काही चूक आढळली तर दोन शब्द सूनवल्याही जातात.
काही ठिकाणी नवरा लक्षच घालत नाही, भाजी, किराणा, दळण आणणे की बायकांचीच कामे ती त्यांनीच करावीत असेही आहे.
माझ्या नात्यातला एका
माझ्या नात्यातला एका सासूनेसुद्धा "अनुभवाच्या" जोरावर एका बाळाला मरणाच्या दारात जवळजवळ ढकललेच होते. अगदी घराशेजारीच दवाखाना असल्याने शेवटी न्यूमोनियापायी ऍडमिट करावे लागले. ह्या सासवांना आणि त्यांच्या अनुभवांना योग्य वेळेस फाट्यावर मारण्याचे धैर्य यायलाच पाहिजे. तुम्हाला निदान पटत तरी नव्हतं, गंमत म्हणजे बहुतेक बाळंतिणी ज्ञानाअभावी आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे धाडसाअभावी असल्या मूर्खपणाला स्वसंमतीने शरण जातात.
नवरा बायको tas नाजूक नात असतं
नवरा बायको tas नाजूक नात असतं.
लग्न अगोदर चंद्र तारे तोडून देईल (म्हणजे काही ही करीन)अशी आश्वासनं देणारा पुरुष आणि मी तुझ्या शिवाय जगू शकत नाही अशी वल्गना करणारी स्त्री विवाह बंधनात अडकले की वेगळे वागायला लागतात.
लग्न अगोदर जबाबदारी नसते (अगदी एकमेकाची सुद्धा नाही) पण लग्न नंतर ती येते.
प्रेम म्हणजेच त्याग हे वाक्य प्रेमाची उपमा करताना सर्रास वापरले जाते पण त्याग करणाऱ्या प्रेमी जोड्या अस्तित्वात असतात का .
असतील पण विरळ .
नवरा बायको मध्ये एवढं जवळच नात हवे की संवाद साधण्यासाठी भाषेची गरज सुद्धा लागली नाही पाहिजे.
असं आदर्श प्रेम अस्तित्वात नसते.
तसाच आदर्श पत्नी,किंवा आदर्श पती सुद्धा अस्तित्वात नसतो.
नात टिकवायचे असेल तर कधी माघार घ्यावी लागते,कधी स्वतःच्या मनाला मुरड घालावी लागते.
कधी जोडीदार ल आनंद मिळावा म्हणून आपल्याला आवडात नसेल तरी आपला सहभाग नोंदवावा लागतो.
तर जोडीदार chya मनातील ओळखायची जादू ज्याला आली तो यशस्वी समजावे नात्यात.
मग ते नात प्रेमाचे,नवरा बायकोचे,आई मुलाचे,किंवा मैत्री etc कोणतंही असू ध्यात
खरेदीचा अधिकार नसणे हे खरेतर
खरेदीचा अधिकार नसणे हे खरेतर एक उदाहरण झाले. अपवाद असतातच, मात्र घराच्या कौटुंबिक ,व्यवहारीक अशा बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार बहुतेक स्त्रियांना दिले जात नाहीत. सतत असे निर्णयप्रक्रियेतून डावलल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होत राहतो. मात्र आणिबाणीच्या प्रसंगी अचानक मूळ स्वभावगुण वर येतात त्याजोरावर संकटावर धाडसाने मात केली जाते अन गमावलेला आत्मविश्वास परत मिळतो.आपल्याच सामर्थ्याची पुन्हा जाणीव होते, हे कथेतून सांगायचे आहे.
मुलानं विषयी निर्णय घेण्याचे
मुलानं विषयी निर्णय घेण्याचे पूर्ण स्वतंत्र हे त्यांच्या आई वडिलांना नच हवे(जो पर्यंत मुल लहान असते) सासू सासरे,दिर,भावजय,नाना,नानी कोण्ही ही आपली मतं त्यांच्या वर थोपवू नयेत फक्त मागितला तरच सल्ला द्यावा नाहीतर तटस्थ राहवे.
म्हणजे त्यांचे स्वतंत्र सुद्धा जपलं जाईल आणि काही चुकीचं घडल तरी जबाबदार पण धरले जाणार नाही.
असच वागावे काळानुसार.
Helpme, राजेशजी , मानवजी ,
Helpme, राजेशजी , मानवजी , राॅय प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!!
लग्न केले की काही जबाबदाऱ्या
लग्न केले की काही जबाबदाऱ्या त्या बरोबर येतातच.काही प्रसंगात मनाविरुद्ध झालेलं निर्णय कुटंब हिताचं असतात म्हणून स्वीकारावे लागतात.
सगळच तुमच्या मना प्रमाणे घडू शकत नाही.
ह्या सर्व सत्य परिस्थिती ची जाणीव ठेवूनच लग्न करावे नाही तर तो मार्ग न स्वीकारणे उत्तम.
ह्या मध्ये कुटुंब वगळले तरी नवरा बायको मध्ये सुद्धा हीच परिस्थिती असते.
त्या मध्ये पर्यंत पुढच्या पिढीमधील आपल्याच मुला मुलींनाच सहभाग कुटुंब ह्या व्याख्येत येतो.
तेव्हा मात्र आपण आपले विचार त्यांच्या वर थोपवतो.
अगदी कोणते शिक्षण घेतले पाहिजे ,कोणती शाळा कॉलेज निवडली पाहिजेत,किती मार्क मिळाले पाहिजेत ,कोणता क्लास लावला पाहिजे,असे असंख्य विचार आपण आपल्या मुलानं वर थोपवून आपण त्यांच्या स्वतंत्र वर गदा आणतोय ह्याची जाणीव आपल्या का नसते.
असा दुहेरी माणूस का वागतो ह्याच उत्तर अजुन तरी मिळालं नाही
IRONICALLY
IRONICALLY
A whole generation worked to empower women
BUT
Forgot to teach men how to live with such empowered women
स्त्रियांच्या हक्कासाठी एका अख्ख्या पिढीने संघर्ष केला
परंतु
त्यांनी अशा समर्थ स्त्रियांबरोबर कसं वागायचं हे पुरुषांना शिकवलं गेलंच नाही
हि खरी शोकांतिका आहे.
सुबोधजी +1
सुबोधजी +1
असल्या स्त्रिया प्रत्यक्ष
असल्या स्त्रिया प्रत्यक्ष असतात का? इथे बायकोला घाबरून राहणारेच सगळे बघितले आहेत. शॉपिंग ला गेलो तरी बायकोच्या पसंतीनेच घ्यावे लागते.
माझ्या ओळखीत एकही असा नाही जो स्वतःच्या बायकोचा फोन आल्यावर घाबरत नाही.
स्त्री ला बरोबरी ची वागणूक
स्त्री ला बरोबरी ची वागणूक बहुतेक सर्व कुटुंबात दिली जाते महाराष्ट्र मध्ये.
ते इथे थोर महापुरुष आणि कर्तृत्व वान स्त्रियां इथे होवून गेल्या त्या मुळेच.
छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले ते जिजावू मातोश्री च्या मार्गदर्शन खाली.
घरातील निर्णयात स्त्री चा, सहभाग असतो ,एकत्र जेवणाला बसण्याची पद्धत सर्व कुटुंबात आहे.
मुलांवर सर्वात जास्त अधिकार ह्या स्त्रिया च गाजवतात.
कशावरून महाराष्ट्र मध्ये पुरुष स्त्री चा आदर करत नाही असे मत व्यक्त करता..
काही अपवाद लोक असतील ह्याचा अर्थ सर्वच पुरुष स्त्री चा अनादर करतात असा होत नाही.
मुळात प्रश्न स्री की पुरुष हा
मुळात प्रश्न स्री की पुरुष हा नाहीये तर सशक्त नात्याचा आहे. नात्यात साहचर्य हवे. सगळी सत्ता आपल्या हातात ठेवायचा प्रयत्न करणे , जोडीदारावर हुकूमत गाजवणे होत असेल तर ते नाते चुकीचे. आता ही हुकुमत गाजवणारी व्यक्ती स्त्री-पुरुष कुणीही असू शकते. नात्यातील एका व्यक्तीलाच खास अधिकार असणे, दुसर्या व्यक्तीला निर्णय स्वातंत्र नसणे किंवा अगदीच अत्यल्प असणे, जोडीदाराचा धाक/दहशत वाटणे, मानहानी-अपमानकारक वागणूक मिळणे, स्वतःचे असे खाजगीपण न उरणे, त्यावर अतिक्रमण होणे, संवादाचा अभाव, स्वतःचे स्वतंत्र मैत्री-नाते संबंध असण्याला प्रतिबंध, सातत्याने केली जाणारी टीका, अपराधी वाटायला लावून किंवा मनाशी खेळून दुसर्या व्यक्तीला आपल्या गरजा/इच्छांना नाकारायला भाग पाडणे , टोकाचे अवलंबून असणे आणि त्या असुरक्षिततेतून हुकूमत गाजवायचा प्रयत्न , असे काही नात्यात असेल तर ते नाते सशक्त नाही. काही वेळा नात्यात चुकीचे वर्तन दोन्ही बाजूने घडते. बरेचदा नात्यात जाणून बुजून छळ असतोच असे नाही, मात्र असे नाते मानसिक , शारीरिक छळापर्यंत खालावू शकते.
बरेचदा आपले वर्तन अयोग्य आहे याची जाणीवच नसते. आपली संस्कृती , आपली कुटुंब संस्था कशी महान आहे, स्त्रीयांचा आदर केला जातो वगैरे वाक्यं ऐकवली जातात. शाळा-कॉलेजातून पुस्तकी शिक्षण मिळते मात्र नातेसंबधातील योग्य-अयोग्य वर्तन वगैरे बाबत बोलणे नसते. योग्य मार्गदर्शनाअभावी बरेचदा लहानपणापासून बघितलेला चुकीचा पारंपारिक कित्ताच गिरवला जातो. रोगट नात्यांची साखळी एका पिढीतून दुसर्या पिढीत जाते. परस्परांच्या सहवासात आनंदात घालवायची उमेदीची वर्ष नासून जातात.
स्वातीजी , सहमत.
स्वातीजी , सहमत.
अशाच नात्यामध्ये असणारी व्यक्ती मग स्त्री असो कि पुरूष, जेव्हा एखादा कसोटी पाहणारा क्षण येतो तेव्हा कोणत्याही बंधनाचा , दडपणाचा विचार न करता धाडसाने योग्य ते पाऊल उचलते आणि तिचा आत्मविश्वास तिला परत मिळतो. हेच कथेतून सांगायचे आहे.
याच्यावर किती विश्वास ठेवावा
याच्यावर किती विश्वास ठेवावा माहीत नाही पण इथे द्यावेसे वाटले
• निल्सन आणि डीएसपी ब्लॅकरॉक सर्वेनुसार ज्या महिला स्वतःचं अथवा कुटुंबासाठी आर्थिक नियोजन करतात अशा महिलांमध्ये घटस्फोटीत (७३%) व विधवा (६८%) महिलांचं प्रमाण कुमारी म्हणजेच सिंगल महिला (१८%) व विवाहित महिलांच्या(१३%) प्रमाणात कितीतरी पटिने जास्त आहे.
याचाच अर्थ आर्थिक नियोजन करण्यावाचून पर्याय नसल्यामुळे महिला आर्थिक नियोजनाचा विचार करतात. अन्यथा हा विषय त्यांच्या खिजगणतीतही नसतो.
• भारतात उच्च्शिक्षित गृहिणींचे प्रमाण सर्वात जास्त आहे. (संदर्भ: Riso woman campaigns).
• बहुतांश जाहिराती महिला दिनानिमित्त असणाऱ्या कपडे, ब्युटी प्रॉडक्ट आणि दागिन्यांच्या ऑफर्ससंदर्भात असतात. महिला म्हणजे शॉपिंग’ हे जणू एक समीकरणच पक्के झालं आहे.
• गुंतवणूक हा शब्द अनेक महिलांच्या खिजगणतीतही नसतो. घरच्या गुंतवणुकीचे गणित पती, वडील अथवा भाऊ बघत असतो. एका इंग्रजी वृत्तपत्रामधील सर्वक्षणानुसार ९२% उच्चशिक्षित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या महिला आर्थिक नियोजनासाठी वडील किंवा नवऱ्यावर अवलंबून असतात. त्यापैकी ८३% महिलांना एफडी, आर.डी, पोस्ट ऑफिस डिपॉझीट सोडून इतर गुंतवणूकींचे पर्यायही माहिती नव्हते. अगदी स्वतः कमावणाऱ्या मुली अथवा स्त्रियाही गुंतवणूक हा शब्द फारसा गांभीर्याने घेत नाहीत.
===
वरती Helpme, Rajesh, च्रप्स, मानव वगैरेंचे प्रतिसाद वाचून वाटलं जर "खरोखरंच" 'घरातील खर्चाचे निर्णय कोण घेतो' याचे उत्तर हवे असेल तर एक अनामिक सर्व्हे करायला हवा ज्यात इथले आयडी केवळ स्वतःबद्दल न सांगता आपल्या नात्यातील, शेजारपाजार, कलिग्ज, मित्रमैत्रिणी सगळ्यांना हे प्रश्न विचारतीलच + आपल्या संपर्कात येणारे कामगार/छोटे व्यावसायिक लोक मोलकरणी, गाडीचालक, गॅरेज-इस्त्री-भाजीवाले वगैरे येतील
१. जोडीदार आणि तुमचा वयोगट
• ३०-४०
• ४०-५०
• ५०-६०
• ६०-७०
२. दोघांचा शैक्षणिक स्तर
• शालेय
• ग्रॅज्युएट
• पोस्ट ग्रॅज्युएट
३. दोघांचे स्वतंत्र वार्षिक आर्थिक उत्पन्न गट
• < २.५ लाख
• < ५ लाख
• < १० लाख
• > १० लाख
४. अन्न वस्त्र निवारा वीज पाणी या मूलभूत गोष्टींवर कुटुंबाचा मासिक खर्च किती येतो
• < १५ हजार
• < २५ हजार
• < ५० हजार
• > ५० हजार
५. खर्चाचे निर्णय कोण कसे घेते
• नवरा दारू बिडीपुरते पैसे आपल्याकडे ठेऊन बाकीचे सगळे बायकोकडे देतो. ते पैसे + स्वतःची कमाई(असली तर) वापरून बायको घर चालवते. शिक्षण, आरोग्य, निवृत्ती वगैरेसाठी बचत शून्य आहे किंवा ते निर्णयदेखील बायकोच घेते.
• नवरा मूलभूत खर्चाएवढा पैसा बायकोकडे देतो. बाकीचे सगळे पैसे स्वतःकडे असतात. मोठ्या खर्चाचे निर्णय नवरा घेणार. बाकी छोटेमोठे निर्णय बायकोला दिलेल्या पैशातून तिचेतिने घ्यायचे.
• मूलभूत खर्चाचे निर्णयदेखील नवर्याकडेच आहेत. बायको व्यवहारचतुर नाही, तिची कपडे-ऍक्सेसरीची आवड माझ्या स्टेटसला शोभेशी नाही असे त्याला वाटते. त्यामुळे तो सगळे निर्णय घेतो.
मला वाटतं वार्षिक उत्पन्न ५+ लाख असणारे कुटुंब शेवटच्या दोन गटात समसमप्रमाणात येतील. ५- लाख उत्पन्न गटातले लोकमात्र पहिल्या गटात येतील.
अॅमी, माझ्या मते तरी तुमचा
अॅमी, माझ्या मते तरी तुमचा अंदाज बरोबर आहे.
ॲमी घराचे आर्थिक नियोजन
ॲमी घराचे आर्थिक नियोजन (मोठ्या निर्णयांसकट) कोण करतं आणि प्रत्येक खरेदी करताना कोण वर्चस्व गाजवतं या वेगळ्या गोष्टी आहेत.
विवाहित जोडप्यात आर्थिक स्वातंत्र्य स्त्रियांना नक्कीच बरेच कमी असावे पुरुषांच्या तुलनेत.
अॅमिशी सहमत,
अॅमिशी सहमत,
परंतु हा धागा अमेरिकेन मित्र आणि त्याचा मासिक खर्च अशाप्रकारे वहावत जाऊ नये ही अपेक्षा
1) सर्व पैसे बायकोच्या हातात
1) सर्व पैसे बायकोच्या हातात देणारा आणि सर्व आर्थिक निर्णयाची
जबाबदारी बायको वर टाकून नामानिराळा राहणारा नवरा.
ह्या बायकोच्या प्रतिक्रिया.
1) त्याच्या निर्णयच सन्मान राखून योग्य आर्थिक नियोजन करते.आणि समाधानी असते.
2) पैसे घरात आणून दिले म्हणजे जबाबदारी संपली का
बिनकामाचा नवरा आहे.
हा एक प्रकार झाला.
दुसरा प्रकार.
रोजच्या खर्चाला लागतील तेवढेच पैसे बायकोला देणारा आणि सर्व पैस्या वर स्वतःचा अधिकार ठेवून त्याचे योग्य नियोजन करून कुटुंब ची आर्थिक स्थिती उत्तम ठेवणारा असा..
आणि त्या सुधारलेल्या आर्थिक स्थिती ची फळ मात्र सर्वांना चाखू देणारा
ह्या वर बायकोची प्रतिक्रिया
1) काय नालायक माणूस आहे ह्याच्या कडे रोज पैसे मागावे लागतात नका काही अधिकार आहेत की नाही
2) घर उत्तम स्थिती मध्ये ठेवण्याचे आणि प्रगती करण्याचे सर्व श्रेय बायको नवऱ्या ला देवून खुश असते.
तिसरा प्रकार
जे काही निर्णय घेणे आहे ते दोघे मिळून घेतात .त्या मुळे चांगले आणि वाईट परिणाम चा श्रेय किंवा दोष एकावर येत नाही .
अशी सर्व प्रकारची कुटुंब सर्व आर्थिक स्तरावर असतात..
पाथफाईंडर>> 1++
पाथफाईंडर>> 1++
भयानक आहे हे सगळं.
भयानक आहे हे सगळं.
Pages