Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 November, 2019 - 12:58
मना ओरखाडे
नसावे मनाचे
प्रहार शब्दांचे
कधी काळी
मनाचे सुमन
मनाच्या हातांनी
जपावे हसुनी
सर्व काळ
मनाची देवता
ईश गुरुदत्त
दिसावा सतत
मज तिथे
तिथे बसलेल्या
पुजावे देवाला
जरी त्या देहाला
भान नसे
ऐसी मती देई
विक्रांत पामरा
दत्त प्रभुवरा
मागणी ही
****
© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in
**
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
मनाची देवता ईश गुरुदत्त....
मनाची देवता ईश गुरुदत्त.... छान ओळ आहे.
मन्या,वेडोबा धन्यवाद
मन्या,वेडोबा धन्यवाद