Submitted by ऋन्मेऽऽष on 22 November, 2019 - 22:37
मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार.. मी पुन्हा येणार..
आले
फडणवीस मुख्यमंत्री - अजित पवार उपमुख्यमंत्री
सत्तेसाठी कायपण !
महाराष्ट्रात भाजपा राष्ट्रवादीचे सरकार स्थापन.
आता फेसबूकवर माझ्या मित्रयादीतील सेना आणि भाजपा दोन्हीकडील भक्तांच्या कोलांट्या उड्या बघायला मजा येईल
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सेनेने स्वतः हुन द्यायला हवं
सेनेने स्वतः हुन द्यायला हवं होतं, काहीही होऊ शकतं माहिती नव्हतं का त्यांना, जाऊदे त्यांना शरद पवार ओळखायला अजून 100 जन्म घ्यावे लागतील, हे राऊतचं वाक्य राऊतवर उलटलं.
कोर्ट फार वेळ का लावतेय, द्यायचा ना जो काही असेल तो निकाल आज.
गटनेता बदलता येतो का नाही त्यावर असेल ना सर्व, ज्याला व्हीपचा अधिकार असेल तो महत्वाचा.
न्यायालय उशीर का करतंय.. जे
न्यायालय उशीर का करतंय.. जे काय व्हायचं ते होऊन जाऊदे.. २ दिवस वाढीव वेळ मिळाला तरी जास्त काही फरक पडणार नाही.
न्यायालय पण भाजपाच्या बाजुने
न्यायालय पण भाजपाच्या बाजुने असेल...
सर सलामत तो जजमेंट पचास
सर सलामत तो जजमेंट पचास
संत लोयाजी
न्यायालय उशीर का करतंय.. जे
न्यायालय उशीर का करतंय.. जे काय व्हायचं ते होऊन जाऊदे.. २ दिवस वाढीव वेळ मिळाला तरी जास्त काही फरक पडणार नाही.
Submitted by DJ.. on 25 November, 2019 - 12:54 >>
इथे होटेलांची बिलं चुकवता चुकवता तीन पक्षांच्या नाकी नऊ आलेत..
पडेल की फरक, आमदार अस्वस्थ
पडेल की फरक, आमदार अस्वस्थ होतात, फोडले जातात.
गटनेत्याबद्दल काय कायदा सांगतो, अजित पवार कायद्याने बदलता येत नसतील कोणाला, तर विषय संपतो, व्हीप अधिकार त्यांनाच ना. मग सरकार तरेल.
>>> व्हीप अधिकार त्यांनाच ना.
>>> व्हीप अधिकार त्यांनाच ना. मग सरकार तरेल. >>>
व्हिपचा अधिकार कोणालाही असला तरी,
(१) व्हिप मोडून दिलेली सर्व मते ग्राह्य धरली जातात व
(२) किमान दोन तृतीयांश आमदारांनी व्हिप मोडला असेल तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करता येत नाही.
समजा अजितदादांनी व्हिप काढून फडणवीसांना मत द्यायचा व्हिप काढला, तरी राष्ट्रवादीचे जे आमदार व्हिप मोडून फडणवीसांविरूद्ध मत देतील, ती मते ग्राह्य धरली जातील व असे विरूद्ध मत देणाऱ्या आमदारांची संख्या किमान दोन तृतीयांश असेल तर त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही.
आज शरद पवारांनी कराडला
आज शरद पवारांनी कराडला पत्रकार परिषद घेऊन "आम्ही शिवसेनेकडे अडीच वर्ष्यासाठी मुख्यमंत्री पद मागितले होते, मात्र ते द्यायला शिवसेनेनी नकार दिल्यामुळे अजीत पवारांनी पक्षातून बंड केले" असे विधान केले आहे.
बंड करून शेवटी काय मिळवले? उपमुख्यमंत्री पदच ना?
खरं की काय, मग अजीतदादांनी
खरं की काय, मग अजीतदादांनी रिस्क घेतली. आता ऐनवेळी काय करायचं ते आमदार ठरवतील. फोडाफोडी सुरु झाली असेल, शक्य आहे का हे. असो मला पटत नाहीये. मला युतीचं एकत्र सरकार बघायला आवडलं असते. आता कोणाचेच पटत नाहीये.
Thank u पुरोगामी.
अजितदादांचा गौप्यस्फोट वाचा
अजितदादांचा गौप्यस्फोट वाचा
>>> मग अजीतदादांनी रिस्क
>>> मग अजीतदादांनी रिस्क घेतली. आता ऐनवेळी काय करायचं ते आमदार ठरवतील. फोडाफोडी सुरु झाली असेल, >>>
मला दोन शक्यता दिसत आहेत.
(१) थोरले पवार यशस्वी वाटाघाटी करून अजितदादांना परत आणतील
किंवा
(२) पक्षात फूट पडू नये हे कारण पुढे करून राष्ट्रवादी विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात भाग घेणार नाही.
भाजपकडे अजितदादांच्या विरूद्ध काहीतरी जबरदस्त हाती लागले आहे हे नक्की. किंबहुना योग्य वेळी त्याचा वापर करण्यासाठीच ते भाजपने ५ वर्षे राखून ठेवले असावे.
ऑपरेशन लोटस सुरु करतायेत,
ऑपरेशन लोटस सुरु करतायेत, त्यामुळे आता तरतील.
अजितदादांचा गौप्यस्फोट वाचा >>> कोणत्या पेपरात आहे. टीव्ही वर दहा कारणे सांगतायेत तेच का.
१) थोरले पवार यशस्वी वाटाघाटी करून अजितदादांना परत आणतील >>> हे अजिबात होणार नाही, उलट सगळ्यांप्रमाणे मलाही पवार मोदी भेटीत ठरलंय सर्व असं वाटतंय.
जाउदे सगळेच एका माळेचे मणी, आपण फक्त बघायचं. आपण मत देऊ शकतो पुढे काय होईल ते ठरवू शकत नाही.
>>> ऑपरेशन लोटस सुरु करतायेत,
>>> ऑपरेशन लोटस सुरु करतायेत, त्यामुळे आता तरतील. >>>
५-६ आमदार हवे असतील तर ऑपरेशन लोटस चालू शकेल. जेव्हा किमान १५-२० आमदार हवे असतात, तेव्हा ऑपरेशन लोटस साठी ३०-४० आमदारांनी राजीनामा द्यावा लागतो. इतके आमदार लगेच राजीनामा द्यायची शक्यता शून्य आहे. मुळात मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४२ मंत्री असू शकतात व या सर्व ३०-४० जणांना (जर ते राजीनामा देऊन नंतर पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आले तर) मंत्रीपद देणे अशक्य असल्याने ते या ऑपरेशन मध्ये सामील होण्याची शक्यता शून्य आहे.
भाजप भक्तांचा निर्लज्ज पणा
भाजप भक्तांचा निर्लज्ज पणा भयंकर कौतुकास्पद आहे.
त्यांच्यामते भ्रष्टाचारशिरोमणी असणाऱ्या माणसाला, माफीचा साक्षीदार करायला तयार आहेत,
आता 3 4 बाबूंवर कारवाई करुन परत स्वच्छ कारभाराच्या नावाने टिर्या बडवायला सुरवात करतील.
आणि हे सगळे भारताबाहेर बसून करता आले तर फारच छान.
>>> उलट सगळ्यांप्रमाणे मलाही
>>> उलट सगळ्यांप्रमाणे मलाही पवार मोदी भेटीत ठरलंय सर्व असं वाटतंय. >>>
नक्कीच.
त्यामुळेच विश्वासदर्शक ठरावावरील मतदानात राष्ट्रवादी अनुपस्थित राहणार असे वाटत आहे व भाजपशी हातमिळवणी केल्याचा दोषारोप टाळण्यासाठी अजितदादांना पुढे पाठवून पक्षातील फूट टाळण्यासाठी मतदानात भाग घेतला नाही, या बचावाची पूर्वतयारी केली जात आहे.
मुख्यमंत्रीपद दिलं तरी
मुख्यमंत्रीपद दिलं तरी अजितदादा परत येतील असं वाटत नाही.
>>> मुख्यमंत्रीपद दिलं तरी
>>> मुख्यमंत्रीपद दिलं तरी अजितदादा परत येतील असं वाटत नाही. >>>
भाजपकडे त्याच्याविरूद्ध नक्कीच काहीतरी जबरदस्त आहे.
>>त्यांच्यामते
>>त्यांच्यामते भ्रष्टाचारशिरोमणी असणाऱ्या माणसाला, माफीचा साक्षीदार करायला तयार आहेत<<
जरा प्रॅक्टीकली विचार करुन बघा
त्याच भ्रष्टाचारशिरोमणी माणसाला विरोधी पक्षात बसून बघण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून बघणे जास्त फायद्याचे नाहीये का?
समहाऊ अजित पवार थोडे नाराज
समहाऊ अजित पवार थोडे नाराज आहेत हे दिसत होतं, मिडियापण मध्ये मध्ये सांगत होती. मागेही मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सर्व विरोधक EVM ला नावं ठेवत होते, एकटे अजित पवार सोडून. त्यांनी सांगितलं माझा पार्थ पडला तो मोदीलाटेमुळे, मोदी लाट आहे आणि EVM चा दोष नाही.
नवीन Submitted by खरा पुणेकर
नवीन Submitted by खरा पुणेकर on 25 November, 2019 - 15:05
https://www.loksatta.com
https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/deput...
भाजपाशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आल्याचं वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिली आहे. अजित पवार आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना झालेल्या सिंचन घोटाळ्यावरून ते तपास यंत्रणांच्या रडारवर होते. लाचलुचपत विभाग, सक्तवसुली संचालनालय यांच्याकडून सिंचन घोटाळ्याचा तपास सुरु होता. देवेंद्र फडणवीस हे २०१२ मध्ये विधानसभेत विरोधी बाकावर असताना कायम अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करीत होते. मात्र आता अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
अरेच्या! फ्लोअर टेस्ट
अरेच्या! फ्लोअर टेस्ट झाल्यावर द्यायची ना!
आता अजित पवारांनी ती क्लीन
आता अजित पवारांनी ती क्लीन चीट ताब्यात घ्यावी, इथे राजीनामा द्यावा आणि तिथे मुख्यमंत्रीपद घ्यावं, गोल्डन चान्स आहे त्यांना .
बेअकली आहेत भाजपे.
बेअकली आहेत भाजपे.
सह्यांचा कागद घेऊन अजित पवार पळून जाऊ शकतात, मग क्लीन चिट घेऊन पळाले तर ?
आता ते क्लीन आहेत त्यामुळे
आता ते क्लीन आहेत त्यामुळे त्यांचा पाठिंबा घेतला म्हणून लूझर्स गॅंगनी बोंबाबोंब करु नये
भाजपाने स्वताचाच मार्ग सुकर केलाय
क्लिनच आहेत तर ते
क्लिनच आहेत तर ते राष्ट्रवादितच रहातील
हो हो.... त्यांनी म्हंटलच आहे
हो हो.... त्यांनी म्हंटलच आहे की ते राष्ट्रवादीतच आहेत आणि राहतील
आता रावसाहेब दानवे पत्रकार
आता रावसाहेब दानवे पत्रकार परिषदेत असे म्हणतायत,
की आज सरकारने अजीत पवार यांना कोणतीही क्लिनचीट दिली नाही, कारण हे प्रकरण अजून न्यायालयात आहे. मग लोकसत्ताकडे हि क्लिनचीटची बातमी आली कोठून ?
अहो म्हणतायत ना ते क्लीन चीट
अहो म्हणतायत ना ते क्लीन चीट दिली म्हणून तर घ्या की ठेवून
चौकशी तुर्तास बन्द म्हणे..
चौकशी तुर्तास बन्द म्हणे...
https://www.lokmat.com/crime/comfort-ajit-pawar-acb-inquiry-irrigation-s...
Pages