मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

नाही,रिलीज होणार होता ,पण काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे रिलीज डेट पुढे ढकलली अशी पोस्ट सायली संजीवने टाकली होती.ती पण होती त्या पिक्चरमध्ये.

समहाऊ काही पिक्चर रिलिज होतंच नाहीत. एक रिद्धिमा पंडीत आणि अंकुश चौधरीचा दोन तीन वर्ष जुना अजून रिलिज झाला नाही, होणार की नाही माहीती नाही. त्यातपण नायिकेची आई माझी भाची आहे, म्हणून मला माहीती. ती रिद्धिमा मला खूप आवडायची, रजनी कांत सिरीयलमधे, रोबो होती.

बापरे, खूप दिवसांनी आले तर १०० पेक्षा जास्त नव्या पोस्ट्स ? मला वाटल चालुच आहे बीबी Proud
अन्जु अजुनही हार्डकोर फॅन आहे शिवीणाची Happy
वरच्या व्हिडिओ लिंकमधे वीणाने म्हंटलय त्यात काय चूक आहे? नेहा खरोखरच कॅमेरे अ‍ॅडजस्ट करून रडायला बसायची, सो अनॉयिंग !
जितुच्या शो मधे शिव , बिचुकले , नेहा सगळेच बिबॉ पब्लिक उथळ वगात होते, वीणा आणि मधव चांगले बोलत होते.
जितु स्वतः बेकार होस्ट आहे.
कोणाला पुढे काम मिळेल ते वेगळं टॅलेंट आहे आणि बिबॉ सारख्या रिअ‍ॅलिटि शो मधे चमकणे वेगळे टॅलेंट आहे.

अन्जु अजुनही हार्डकोर फॅन आहे शिवीणाची >>> हो, स्मिताचीही आहे. फक्त मी कोणालाही फॉलो करत नाही. किंवा फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पाठवत नाही. युट्युबवर कधी काही दिसलं आपोआप तर बघते. तेही सारखं बोअर होतं शिव वीणा किंवा स्मिता बघायला, त्यापेक्षा शेती, देश, फुड व्हिडीओज जास्त बघते.

मागे आम्ही 2 स्पेशल नाटक पाहायला गेलो होतो तेव्हा एक लहान मूल रडत होतं, त्यांना डिस्टर्ब झालं असेल पण त्याने नाटक थांबवून त्या पालकांचा इतक्या कडक शब्दांत पाणउतारा केला की अगदी ऐकवलं नाही ते दोघे बिचारे अपमानित होऊन निघून गेले. तेव्हापासून अगदी उतरला तो मनातून >> मला कलाकारांचा वागणं अतिशय बरोबर वाटत. . पाच वर्षाच्या खालच्या मुलांना पालकांनी आणू नये असं जाहिरातीत स्पष्ट लिहिलेलं असताना पण लोक घेऊन येतात. मूल अचानक जोरजोरात रडतात -ओरडतात- हट्ट करतात. तेव्हा जे प्रेक्षक सिरियसली नाटक बघायला आलेले असतात त्यांच्या वर अन्यायच होतो. .

बर कलाकार पण इतके जीव तोडून काम करत असतात. काही काही गंभीर प्रसंगात जर मुलं रडायला लागली तर त्यांचा रसभंग होतो . त्यांना पण काम करताना डिस्टर्ब् व्हायला होत. पटकन डायलॉग आठवत नाहीत . थोडक्यात मूड जातो आणि परत त्या त्या प्रसंगात भावना यायला थोडा वेळ जातो त्यामुळेच पालक लहान मुलांना आणतातच का ? हा प्रश्न आहे . मी पाहिलेल्या दोन नाटकांमध्ये एकदा शरद पोंक्षेनी . मला वाटत मी नथुराम गोडसे नाटकात . तिथल्या तिचे नाटक थांबवून पालकांची हजेरी घेतली होतो आणि दुसरे गिरीश जोशी . मुक्ता बर्वे आणि ते दोघांचाच नाटक होत. त्यावेळी पण त्यांनी तिथल्या तिथे थांबवून बऱ्या पैकी स्पष्ट शब्दात बोलले होते आणि ते योग्यच होत.

@सुजा, त्याने त्यांना बाहेर जायला सांगणं यात काही चूक नाही प्रश्न येतो तो भाषेचा. बोलण्याची एक पद्धत असते एवढया लोकांसमोर आपण काय भाषेत बोलावं एवढं समजायला हवं, प्रेक्षक पण त्यांच्यावरच्या प्रेमापोटीच येतात.
आणि एक सांगू का? आजकाल विभक्त कुटुंबामध्ये मुलांना कुठे ठेवायचं हा प्रश्न आहे, मुलं 5 वर्षांचे होईपर्यंत चा काळ बराच मोठा आहे खूप चांगली नाटकं, संहिता पहायच्या राहून जातात, त्यामुळे कधी लोक मुलांना समजावून वगैरे घेऊन येतात, अर्थात हे समर्थन नाहीच आहे, त्यांची एकाग्रता भंग पावते हे अगदी बरोबर आहे, पण लोक मुलांना का आणतात याबद्दल लिहिलं मी..असो. सध्या याच फेज मधून जात आहे आणि नाटकांवर प्रचंड प्रेम असून खूप दिवसांपासून नाटक याच कारणामुळे पाहू शकले नाही, सिनेमा नंतर अनेक प्लॅटफॉर्मस वरुन पाहता येतो परंतु नाटकाचा जिवंत अनुभव घेता येत नाही .

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण मध्ये शिवानीला 2नॉमिनेशन्स आहेत.
अभिनेत्री आणि फेस ऑफ द ईयर.
पैकी फेस ऑफ द ईयर मला ती वाटत नाही,आणि ट्रिपल सीट बघितला नसल्याने मी तिला नाही केल वोट.
हिरकणीसाठी सोनाली पण आहे,पण मी तोही पाहिलेला नाही.
मी आनंदी गोपाळ पाहिल्याने दोघांना वोट केल आहे.
पण ज्यांनी कुणी शिवानीचा पिक्चर पाहिला असेल आणि त्यात ती आवडली असेल तर तिला जरुर वोट करा.किंवा इतर आवडत्या कलाकाराला वोट करा
लिंक आहे
www.mfk2019.in

काहीच कोणाचे बघितले नाहीत चित्रपट.

आनंदीला करावं असं वाटतंय पण, पाच वर्षापुर्वी आमच्या सोसायटीत आमच्याबरोबर धुलीवंदन खेळलेली, तिची आत्या रहायची तेव्हा सोसायटीत, त्यावेळी यायची ती. फार गोड, सर्वांच्यात मिक्स झालेली. आता तिची आत्या शिफ्ट झाली मुंबईत. पण ती हा रोल करतेय, शुटींग सुरु आहे हे मला सांगितलं होतं तिच्या आत्याने.

त्या फेवरेट पॉप्युलर फेसमधल्या अमृता आणि वैदेही मला जाम आवडतात.

उत्तम अभिनेत्री अवॉर्ड हिरकणीलाच मिळेल असा माझा अंदाज.

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण मध्ये शिवानीला 2नॉमिनेशन्स आहेत.
अभिनेत्री आणि फेस ऑफ द ईयर. >>>>>>> बिबॉचा असाही फायदा झाला तर.

अजून वर्ष सम्पल नाही, आत्ताच कसा हा अवॉर्ड आला? Uhoh

त्या फेवरेट पॉप्युलर फेसमधल्या अमृता आणि वैदेही मला जाम आवडतात. >>>>>>>> +++++++११११११११११

नाही,आताच असतो तो. >>>>>> पण वर्षभर तरी थाम्बायला हव होत त्यान्नी हेमावैम

असो. किशोरी शहाणे एक हिन्दी वेबसिरिज करतेय अस ऐकलय.

हो.मी पण वाचल पेपरमध्ये.रुपाली,हीना यांच्या लावण्या तर शिवचा कोळी डान्स आहे सोनीच्या जय जय महाराष्ट्र माझा या कार्यक्रमात वेगवेगळ्या आठवड्यात.

आताच शिवचा बॉलिवूड स्पायवर राहुल भोजने घेतलेला नवीन इंटर्व्ह्यू पाहिला.
एक गोष्ट कळली की हा अतिशय हुशार,प्रत्येक गोष्ट जी करायची आहे त्याबद्दल पूर्ण ज्ञान असणारा,प्रत्येकाला व्यवस्थित ओळखून त्याप्रमाणे रिअँक्ट करणारा आहे.
हिंदी सिझन 13 बद्दल जे काही बोलला आहे, ते ऐकून तर हा किती विचार करून बोलतो हे कळत.
बिबॉसमध्ये तर वैशाली आणि केळकरने अस चित्र उभ केल होत की आम्ही आहोत म्हणून हा आहे,अस अजिबात नाही .मँच्युअर्ड आहे,आणि कुठे काय बोलायच,काय करायच बरोबर माहित आहे.वीणाच बावळट ठरेल त्याच्यापुढे........हसणारी बाहुली.
असो.पण एक नक्की की साहेबांना आता मोठ्या पडद्याचे वेद लागले आहेत.दोन प्रोजेक्ट्स येत आहेत आणि ममांसोबतच म्हणे फेब्रुवारीत सुरु होणार आहे.

अरे वा, अभिनंदन तिचं.

तिची इमेज सुधारायला मदत होईल आणि रोलही मिळतील अजून. मी voting केलं असतं तर अमृता किंवा वैदेहीसाठी केलं असतं.

शिवानीच अभिनंदन आहेच.पण अभिनेत्री कँटँगरीत मिळाल असत तर समजू शकलज असते पण पॉप्युलर फेस कुठल्या बेसवर मिळाल हे नाही कळल.
पण तिचे फँन्स सोडले तर आताही तिच्याबद्दल लोकांच्या निगेटिव्ह कमेंट् आहेत.
पण आता हे थांबायला हव.बिबॉस वेगळ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळ.

पॉप्युलर फेस कुठल्या बेसवर मिळाल हे नाही कळल. >>> काय माहीती. मलाही आश्चर्य वाटलं खरं तर. बिग बॉसमुळे खरंतर जास्त प्रसिद्धि मिळाली, निगेटीव्ह असली तरी. हिंदी सिरीयल्स चालल्या असतील पण मराठी सिरीयल्स, पिक्चर्स काही चालले नाहीत फार तिचे.

मला तर वैदेही किंवा अमृताला मिळावं असं मनापासून वाटत होतं.

अभिनेत्रीचं सोनालीला मिळालं का, हिरकणीसाठी. तिला किंवा आनंदी झालेलीला मिळायला हवं खरंतर.

पण आता हे थांबायला हव. >>> हो. तिला तिच्या बिग बॉसमधे निगेटीव्ह असण्याची शिक्षा तिथेच शेवटच्या विकेंडपासून फायनलपर्यंत मिळाली. नंतर बाहेर तिला इतक्या दिवसांनंतर ट्रोलिंग करणं सोडावं लोकांनी. बघायचं तर बघा तिचं काम नाहीतर बघु नका.

https://www.youtube.com/watch?v=zcmWrcBPOaU

खूप दिवसांनी शिव वीणाचं बघितलं youtube वर. एकत्र प्रोजेक्ट करणार आहेत 2020 मध्ये. करियरवर लक्ष केद्रित आधी, लग्नाबद्दल फार बोलत नाहीये शिव, आई सोटे देतेय अजुनही पण वीणावर प्रेम करत राहणार म्हणाला.

छान दिसतायेत दोघेही.

शिव लग्नाबद्दल बोलण नेहमीच टाळतो.आईचा अजून पूर्ण होकार नसेल पण तरीही त्याला हव तेच करतो.शेवटी मात्र आई सांगेल त्या मुलीशी लग्न करून मोकळा व्हायचा.

सोनी मराठीवर सोमवार आणि मंगळवारी जय जय महाराष्ट्र माझामध्ये यावेळी कोळी न्रुत्य ह्या लोकसंगीत भागात शिवचा डान्स आहे,किशोरी पण आहे,इतरही बरेच कलाकार आहेत.नंतरच्या कुठल्यातरी भागात नेहा पण आहे.
बाकी ,शिव वीणाच एकत्र प्रोजेक्ट सिरियल आहे की पिक्चर आहे ते कळेलच.शक्यतो सिरियल नको, खूप दिवस चिलते,प्रोफेशनल डिफरंसेस येण्याचे चान्सेस जास्त असतात,पिक्चरच शूटिंग लवकर संपत.खरच सिरियस असतील आणि लग्न करणार असतील तर श्री जानुसारख खर्या आयुष्यात नको व्हायला.
खर काय घडल माहित नाही,पण तेजश्री प्रधानबद्दल वाईट वाटत.

तेजश्री प्रधानबद्दल वाईट वाटत.>>>>>>> शशांकसाठीही वाईट वाटतं. >>>>>>>>> +++++++१११११११ अन्किता लोन्खडे- सुशान्त राजपूत, रश्मी देसाई- नन्दिश सन्धू ( उतरनमध्ये होता तिच्याबरोबर) ह्यान्च्याबाबतीत सुद्दा असच झालय. अफेअर सुरु होत तेव्हा चान्गला गाजावाजा झाला होता सुरुवातीला. ' मेड फॉर इच अदर' आणि काय काय. पुढे सगळ फुस्स!

आय होप की शिव आणि वीणाबाबत अस होऊ नये.

रश्मी नंदिशने खरंतर लग्नही केलेलं, वर्षभर टिकले बहुतेक. मला ह्यांची आणि सुशांत अंकिताची जोडी आवडायची.

शशांक तेजश्री जोडीला त्यावेळी झी मराठीने बरेच चढवलं होतं, फॅन्सही खुश होते, त्यामुळे तो शॉक होताच. शशांक आता दुसऱ्या संसारात रमलाय, तेजश्रीलाही मनासारखा जोडीदार मिळुदे.

तेजश्री प्रधानबद्दल वाईट वाटत.>>>>>>> शशांकसाठीही वाईट वाटतं. +१११ .
दोघांमध्ये नक्की काय झाल माहित नाही . आता ते कधीच कळणार नाही . पण असं घडायला नको होत.
तेजू च मात्र आता व्हायला पाहिजे . ती पण सेटल होऊन जाऊ दे .

रोल वेगळं आणि आयुष्यात प्रत्यक्ष ती व्यक्ती वेगळी असते.
तेजश्री प्रधान ही अहंकारी , पझेसिव्ह आणि मी म्हणेल तेच खरे असे आहे. पैसाच्या बाबतीत तर फार वाईट आहे( मे बी तिला तसे अनुभव आले असतील )

Pages