मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

माधव छान दिसत होता, शिव मला कायम बालिश वाटत आलाय, तसा तो दाख्वतो कि त्याचा टोन, भाषेची लय एक्दम लहान मुलासारखी आहे त्यामुळे असेल, विणाने बिचकुले किवा शिवानी विरुद्ध घेतलेला स्टॅन्ड मला फार आवडला होता तो तिने अजुनही मेटेन ठेवलाय समहाउ मला जोडित वीणा जास्त आवडते,( काल मात्र ते विणाच सतत गिगल कर नाटकी वाटल) जोडि ठिक आहे पण टिकणार कितपत सागन्ता येत नाही, विणाचा ड्रेस असा काय होता? नाईट गाउन घातल्यासारख वाटत होत.

खरतर आताच शिव वीणाचा खरा प्रवास चालू होईल.कोणाला कशी प्रोजेक्ट्स मिळतात,मिळतात की नाही,यश कोणाला ,कस मिळत,त्यिवेळी त्यांच बॉन्डिंग कस राहत,इतर कलाकारांसोबत, काम करताना दोघ एकमेकांना कसे समजून घेतात,समजा एकजणच पुढे गेला तर ,दुसरा ते कस समजून घेतो,यावर या फिल्डमधली रिलेशन्स ठरत असावीत.
म्हणूनच दोघांनी घाई करू नये.कदिचित या कारणामुळेही शिवच्या आईचा पूर्ण होकार नसेल.
शुक्रवारच्या भागात तर शिव म्हणालाही की आई या विषयावर बोलत नाही.
बाकी मला तो जितका इनोसंट बिबॉस मध्ये वाटला तेवढा इनोसंट विटला नाही,पण मेहनती आहे,हे खर.

त्याच्या आईला ह्या क्षेत्राची पण भीती वाटत असेल, ती साधीसुधी आहे तशी त्यामुळे मुलगी glam क्षेत्रातली नको असेल. पण तिचं लेकरू एरवी निरागस असलं तरी याबाबत नाही Lol . त्याचं आधीही अफेअर होतं आणि bb मध्ये पण सगळ्यांच्या सांगण्याला त्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या, अगदी आई बहिणीच्याही, हवं तेच केलं. बाहेर आल्यावर माझी आणि वीणाची जोडी किती आवडते सर्वांना, आमचे कित्ती व्हिडीओज आहेत हेच सांगत राहिला. सध्यातरी तरी तो जास्त प्रदर्शन करतोय प्रेमाचे, वीणा तशी calm वाटते involved असली तरी. ती फार शो बाजी नाही करत. कोणीतरी आमच्यावर पिक्चर करा आम्हाला घेऊन हेही म्हणत होता.

नेहापेक्षा वीणा दुसरी यायला हवी होती असं कलर्सवर दुसऱ्या वि chat मध्ये एकाच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला, ते त्याने कारणही सांगितलं की वीणाची लेवल वरची होती task मधली म्हणजे ती चीप कधी खेळली नाही असं म्हणायचं असावं त्याला, तिचे विचार task मधले चांगले होते जास्त. वीणाला हेच विचारल्यावर ती म्हणाली मी प्रेक्षकांनी जे ठरवलं आहे त्याचा आदर करते. त्यांनी हा कौल दिलाय.

परवा पण त्याने हिने आईचं मन जिंकलं म्हणाला आई खुश झाली पण जितु म्हणाला आई ही आई असते रे.

पुढचा सिझन आला की शिव वीणा मागे पडतील, मिडिया मग नवीन लोकांवर लक्ष केंद्रित करेल .

बिगबॉसचा रुपालीला एकंदरीत चांगलाच फायदा झालेला दिसत आहे,5 वर्ष तिला काम नव्हत, पण आता सुयोगच नाटक आणि सोनीवर 2 डिसेंबरपासून लोककलेवर आधारित शो सुरू होत आहे,ज्याच सूत्रसंचालन सुभा करणार आहे,त्यात ती पण आहे,मेघा घाडगे,आणखीही दोघी आहेत,अर्थात पूर्ण शो मध्ये आहेत की सुरुवातीलाच आहेत माहित नाही.डान्णससाठी आहेत तरी,काम मिळाल हे बर झाल.वैशाली पण आहे त्या शो मध्ये.

अरे वा छान.

पाच वर्ष काम नव्हतं पण ती सुमित राघवन बरोबर होतीना हिंदी सिरीयल मधे आणि त्याआधी दुर्वामधेही होती. हिंदी सिरीयलला पाच वर्ष नाही झाली.

https://www.instagram.com/p/B5H7rbfpSHw/?igshid=1ecu03k95blw7
अशा नावाचा कार्यक्रम कलर्सवर असतो हे इताच कळल.असो.
पण वीणाच हे सांगण पटल नाही.गरज नव्हती.कदाचित तसाच प्रश्न विचारला असेलही.पण वीणाने आतापर्यंत याबाबतीत खूप सयंम राखला होता ,अगदी दोन स्पेशलमध्येही छान उत्तर दिली होती,मग आताच ही अशी उत्तर देण्याची गरज काय,तो शो इता स्पर्धकांबरोबर प्रेक्षकही विसरत चालले आहेत.आता केवळ कोणाला कुठे आणि कशी संधी मिळते ते महत्वाच आहे.
खरतर काही स्पर्धक सोडले तर बाकीच्या काहींना बर्यापैकी कामही मिळायला लागली आहेत.
शिव आणि वीणालाच अजून किम मिळालेल दिसत नाही.
आता तरी त्यांनी एकत्र बिबॉस निमित्त अशा कार्यक्रमात जाण बंद कराव.
कदाचित या कार्यक्रमाच शूटिंग आधीही झाल असेल,पण तरीही इता बिबॉस बद्दल बोलण बंद कराव.निदान वीणाकडून ही अपेक्षा आहेच.
त्यि बाबतीत मात्र शिवानीच कराव तेवढ कौतुक कमीच आहे.

त्या लिंकमधे तिने लोकं स्ट्रॅटेजी करायची, आम्ही नाही एवढंच सांगितलं. बाकी काही कोणाबद्दल वैयक्तिक नाव घेऊन बोलताना दिसली नाही. प्रश्न विचारला असेल तसा. शिवपण हसत दुजोरा देत होता. पुर्ण प्रोग्रॅम बघायला मिळायला हवा. वुट वर नाहीये.

शिवानीला कोणी बिग बॉसबद्दल विचारत नाही किंवा तिला चॅनेलने पण कुठेही बोलावलं नाही, तिलाही त्या आठवणी नको असतील कारण तिची इमेज खराबच झाली एकंदरीत तिच्याच वागण्यामुळे आणि ती मुव ऑन करत असेल. मधे पिक्चरचं प्रमोशन करत होती, पिक्चर चालला की नाही समजलं नाही, भाचीला विचारायला हवं, तेव्हाच हिरकणी आला तो मात्र तुफान चालल्याच्या न्युज वाचल्या.

नाही,तो पिक्चर एवढा नाही चालला,म्हणजे दिवाळीचे पहिले चार पाच दिवस काहीसा बघितला असेल लोकांनी,पण नंतर उतरला थिएटरमधून.
हा शो रविवारी 9वाजता असतो.एक पार्ट 17ला झाला,ज्यात शिवची मुलाखत झाली,मला तर माहितच नव्हता हा शो.पण वूटवर नाही आहे .या रविवारी 9वाजता वीणाची मुलाखत आहे.

मला पण माहिती नव्हतं असला काही शो असतो ते पण youtube वर परवा एक शॉट बघितला, मग शोधत बसले voot वर.

तुम्ही बघितलात तर सांगा काय सांगितलं ज्योतिष त्यांचं.

थँक्स पिक्चरबद्दल सांगितलंत ते, भाचीला कसं विचारू हा विचार करत होते, पिक्चर चालला नसेल तर तिचा मूड नसेल.

हिरकणी 24 आणि तो 25 ला रिलीज झाला, नक्कीच हिरकणी बघण्यासारखा असणार, ऐतिहासिक होता, प्रोमोज पण मस्त होते त्याचे. ह्याला फार भाव मिळाला नसेल, त्यात शिवानी हेटर्स मुद्दाम तिकीट काढून कशाला जातील.

जितेंद्र जोशीने घेतलेली मुलाखत काल पाहिली. बिचुकलेला पुढे पळवला, अगदीच ऐकवत नाही तो. चौघांचा पाहिला. बाकी मला तो जिजो तिसरे महागुरू वाटतात(दुसरे कोण ते सर्वज्ञात आहेच ). चान्स मिळाला कि लेक्चर सोडत नाही. तो शिव वीणाला प्रश्न विचारताना जरा जास्तच भोचकपणा करत होता. त्याचा टोन शिव वीणा बरोबर बोलताना वेगळा ,आणि नेहा माधवबरोबर वेगळा वाटला. मागे पहिल्या सिजनमधल्या लोकांबरोबर एक शो होता, तेव्हा पण हेच जाणवलं. Industry मधले लोक आम्ही लई भारी असा काहीसा वाटतो तो मला. फेबुवर मागे एकाने जिजो बरोबर बोलायला गेला तर आलेला वाईट अनुभव पण लिहिलाय त्यामुळे असेल कदाचित , पण मला तो प्रचंड गर्विष्ठ वाटतो .

हो तो जिजो जास्तच आगाऊपणा करतो. ज्याची मुलाखत आहे त्याला बोलू दे ना, स्वतःचच सांगत बसतो. अगदी विरस होतो तो असा मध्ये मध्ये बोलायला लागला तर. पाहुणे चांगले असतील तर अजून राग येतो त्याचा. आज प्रशांत आणि कविता आलेले असतानाही उगाचच खुर्चीवरून उठून हसणे, वाक्य तोडणे, स्वतःचे सांगत बसणे हे चालूच होते. पहिल्या भागात म्हणत होता सोशल मीडियावर लोक शरद पवारला अरे तुरे का करतात, त्यांना आदर का देत नाहीत, हा आलाय मोठा समाज सुधारक Angry

मकरंद अनासपुरे हवा होता खरं तर, पण तो सोनीवर गेलाय.

नेहा त्याची मैत्रीण म्हणून तिच्याशी वेगळं आणि शिव वीणाशी वेगळं वागत होता बहुतेक.

मधे मधे बोलणं, वाक्य तोडणं याला अगदी अगदी.

मकरंद छान मुलाखत घ्यायचा मागे त्या कार्यक्रमात. संयत आणि नॉर्मल राहून बोलायचा, खूप एक्साइटमेंट नाही की अगदी अलिप्तपणा पण नाही. यारी दोस्ती मध्ये जिजो आला होता तेव्हा तो कसा अति भावनिक आहे याचे किस्से सांगितले होते. कविता छान करतो आणि नाटकात कामही छान करतो पण मुलाखत घेऊ नये त्याने.

मी पाहिला, दोन स्पेशल बिग बॉस भाग.

तो बिचुकले माणूस कोणाला कसा आवडू शकतो , हे परत कोडं पडलं. देव त्याचे अज्ञान दूर करो.

बाकी, नेहा वगैरे अजून तितकेच विनोदी कपडे घालून पाहून, डोळ्याचे पारणं फिटलं.
शिव आणि वीणा- बोर वाटले.

मलाही जिजो फारसा आवडत नाही,दोन स्पेशल नाटकात आवडला होता.पण खूप फास्ट बोलतो आणि आपल्याला सगळ्यातल सगळ कळत असा भाव असतो.
दोन स्पेशलच सूत्रसंचालन तर त्याला झेपतच नाही आहे.मध्येच उठतो काय,टाळी काय मारतो.काहीही.

मला पूर्वी आवडायचा जिजो सुरुवातीला, पण आता जास्त आगाऊ वाटतोय, मागे आम्ही 2 स्पेशल नाटक पाहायला गेलो होतो तेव्हा एक लहान मूल रडत होतं, त्यांना डिस्टर्ब झालं असेल पण त्याने नाटक थांबवून त्या पालकांचा इतक्या कडक शब्दांत पाणउतारा केला की अगदी ऐकवलं नाही ते दोघे बिचारे अपमानित होऊन निघून गेले. तेव्हापासून अगदी उतरला तो मनातून, त्याच्यासोबत फोटो वगैरे काढायचे ठरवलं होतं पण इच्छाच नाही झाली. तुम्ही माणुसकीच्या मोठया गप्पा मारतात पण स्वतः माणूस म्हणून काय लायकीचे वागतात...

लहान मूल रडत होतं म्हणून नाटक संपल्यावर तो बोलला होता हे वाचलं होतं. नाटक गंभीर आहे त्यामुळे लक्ष केंद्रित करता येत नसेल. दामले म्हणाले की त्यांचं विनोदी नाटक असल्यामुळे त्यांना फरक पडत नाही, उलट ते त्यावरही जोक मारतात नाटकात. वाहतो ही दुर्वांची जुडी नाटक चालू असताना गंभीर प्रसंग चालू होता आणि लहान मूल बराच वेळ रडत होतं, तेव्हा अंशुमन विचारेने नाटक थांबवून त्यांना मुलाला बाहेर घेऊन जाण्याची विनंती केली होती, अगदी सौम्य शब्दात.

जितेंद्र जोशी, पुष्कर क्षोत्री, प्रसाद ओक वगैरे गुणी असली तरी जरा ओव्हरहाइप्ड मंडळी आहेत
त्यामानाने सुनील बर्वे, सुमीत राघवन वगैरे लोक जास्त आवडतात

Being said that, गेल्या काही वर्षात बघितलेल्या अश्या मुलाखत/गप्पा टाइप्स कार्यक्रमांच्या होस्ट मध्ये (गुप्ते, मोने, अनासपुरे) मला जितू त्यातल्या त्यात बरा वाटला.
बांदेकरांची लीग वेगळी आहे.

प्रसाद ओक, पुष्कर आणि सुबोध भावे हे ओव्हर हाइप आहेत. काही गुणी कलाकार मीडिया कडून दुर्लक्षित केले जातात आणि या तिघांच्या मुलाखती सतत बघायला मिळतात.

जिजो आधी झीवर कॅम्पस मालिकेचं सूत्रसंचालन करायचा तेव्हा बरा होता, पण आताशा जरा भावखाऊ वाटतो आणि डोक्यात जातो. बिगबॉस मध्ये आला काही वेळासाठी तेव्हा एवढं पकवलं की कंटाळा आला.. सर्वज्ञ असल्याचा त्याचा आव बोरिंग आहे...
दोन स्पेशलच्या पहिल्या भागात पण सुमीत राघवन आणि सुबोध भावे आलेले असताना हाच पुढे पुढे करत, मध्येच स्वतःचे किस्से पेरत त्यांचं बोलणं तोडत होता, वैताग आला त्याचा..
Anchoring जमत नाही त्याला आता, सुमीत राघवनकडे शिकवणी लावावी त्याने...
कलर्सच्या पुरस्कार सोहळ्यात सुमीतने केलेलं सूत्र संचालन कसलं भारी होतं राव!!!

जितेंद्र जोशी, पुष्कर क्षोत्री, प्रसाद ओक वगैरे गुणी असली तरी जरा ओव्हरहाइप्ड मंडळी आहेत
त्यामानाने सुनील बर्वे, सुमीत राघवन वगैरे लोक जास्त आवडतात >>> अगदी अगदी.

एकंदरीत बिबॉसच्या या सिझनच्या स्पर्धकांना नंतर चांगलीच काम मिळायला लागली आहेत अस दिसत आहे.
सोनीच्या जय महाराष्ट्र मध्ये रुपाली ,हीना डान्स तर वैशाली गायिका म्हणून आहे.
तर शिवानी तर सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी सोबत पिक्चर करत आहे,अस ऐकिवात आहे.खर माहित नाही.
निदान बिबॉसचे स्पर्धक नंतर रिकामटेकडे असतात हा समज या वेळचे स्पर्धक थोडातरी चुकीचा ठरवत आहेत,हे पाहून बर वाटल

शिवानीला मिळतील पिक्चर, ती आधीही करत होती. फक्त पहीला पार आपटला ज्यात तिचा हिरो आरोह होता. दुसरा आत्ता आलेला, किती चालला माहीती नाही.

पण सु भा, स्व जो बरोबर करत असेल तर चालेल पिक्चर.

तर शिवानी तर सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी सोबत पिक्चर करत आहे,अस ऐकिवात आहे.खर माहित नाही. >>>>>>>> बातमी खरी असेल तर ही चान्गलीच गोष्ट आहे. बादवे, तिचा ' सातारचा सलमान' येणार होता सायली सन्जीवबरोबर. त्या चित्रपटाच काय झाल? Uhoh

तो पडला बहुतेक.

तिचे पिक्चर पडतात. अर्थात मराठी पिक्चर सध्या चालणारे तीन दिसतायेत, हिरकणी, खारी बिस्कीट आणि फत्तेशिकस्त.

झाला नाही का, मग शूटिंग सुरू व्ह्यायच्या आधीचे प्रमोशन असेल मागे. खूप व्हिडीओज आलेले.

तिला सलमान, म मां पण देतील पिक्चर, मागे bb त म्हणत होते ना दोघे, दिसायला छान आहे, अभिनय चांगला करत असेल.

Pages