एक वीडियो सध्या प्रचंड वायरल होतोय, एक मध्यमवयीन बाई एका पोरीला चांगलीच ओरडतांना दिसत होती. हा वीडियो दूसरा कुठला नसून कपल, आणि त्यांच्या प्रेमाच्या उघड प्रदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्ली मेट्रोमधला होता. आता दिल्ली मेट्रोतून निच्छितच चांगले कार्य घडते म्हणजे त्यातून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करत असतील; पण मी दिल्लीला राहत नाही त्यामुळे दिल्ली मेट्रोशी संबंध दूरदूरचा नाही, आणि दिल्ली मेट्रोबद्दल काही वायरल झालेले विडीयो पाहूनच कदाचित हे माझे मत असावे.
तर हा, त्या वीडियोवर येऊया, ती बाई त्या कपलला चांगलीच ओरडतांना दिसत होती, की कसे त्यांच्या घरच्यांनी संस्कार दिलेले नाहीत ई. आणि काही गोष्टी कशा चार भिंतीच्या आड केल्यातरच बऱ्या असतात. वगैरे. तर पोरीने ही प्रत्युत्तर म्हणून, "18+ हो गयी हूँ।" असे म्हणत तिची कृतीला बळ द्यायचा प्रयत्न केला. त्या गावात राहणाऱ्या हरयाणवी बाईला काय कळणार त्यातलं, तिचं ते चालूच होतं. प्रचंड वीडियो वायरल झाला, आणि त्या बाईचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होतांना दिसत आहे. काही उत्साही यूट्युबरनी त्या बाईचा पत्ता काढून नेमकं काय घडलं हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला, आणि तीच्या मुलाखतीत तीच्या म्हणण्यानुसार, ती मुलगी आणि तो मुलगा "एकमेकांची तोंड खात होती" असं तिचं म्हणणं, म्हणजेच आपल्या चांगल्या भाषेत "किस" करत होती. हा वीडियो एवढ्यावरच झाला.
पण यानंतर वीडियो आला तो त्या पोरीचा, ती त्यात सांगत होती की ती फक्त फ्रेंड्स सोबत मस्ती करत होती, आणि त्या काकूने तिला कसा ओरडा केला आणि तिला खरंच आता त्याचं वाईट वाटत आहे, आणि ती विणवण्या करतांनाही दिसली की तिचा वीडियो कृपया कोणी वायरल करू नये कारण ती एक मुलगी आहे वगैरे वगैरे.. आता तिच्यात "18+ हो गयी हूँ।" हा एटिट्यूड नव्हता उलट आता ती सोज्वळ आणि काहीच न केल्याचा आविर्भावात होती, 18+ असण्याचा तिने मेट्रोत दाखवलेला बोल्डपणा पार निघून गेला होता. असो!
आपला समाज कितीही प्रगल्भ झाला तरी, काही गोष्टी या चार भिंतीच्या आतच व्हाव्यात ही मानसिकता वाईट आहे का?? पुरोगामी म्हणून लहान मुलांसमोर सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य करणे किती योग्य, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक वयोगटातील लोकं वावरतात त्यांचं भान ठेवून वागनं बरं नाही का?? यावर आपलं मत काय, हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
ही त्या वीडियोची लिंक, फक्त यात त्या मुलीचा चेहरा ब्लर केलेला आहे. बाकी इतर सोशल मिडीयात अपलोड झालेल्या वीडियोजमध्ये चेहरा स्पष्ट दिसतोय.
https://youtu.be/9Kqsn3fPDbg
मुलींनी तोकडे कपडे घातल्याने
मुलींनी तोकडे कपडे घातल्याने समोरच्याला शारीरिक इजा होते का?
Submitted by आग्या१९९० on 20 November, 2019 - 21:14
एखाद्याच्या अशुद्ध लिखाणाने समोरच्याला शारीरिक इजा होते का?
तरीही स्वामिनी चौगुले यांना ट्रोल केलंच ना इथेच याच मायबोली साईटवर ?
https://www.maayboli.com/node/72368
Pages